Submitted by आनंदयात्री on 20 January, 2014 - 01:16
राजगडला, लोहगडला
मोरोशीच्या भैरवला
साल्हेर, वासोटा, माळशेजला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?
वाटाच वाटा - जाऊ कुटं
थंडीचा काटा - र्हाऊ कुटं
उन्हात रापायला, वार्यात टाकायला
सोबत चला नं भटकायला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला?
पायात अॅक्शन घालून,
पाठीस हॅवर लावून
कातळ चढून, दरीत पाहून
कधी कधी जाऊया रॅपलिंगला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?
कोकण कडा तर आवडीनं
टक्कमक बघूया जोडीनं
सनसेट पाहून, शेकोटी लावून
गुहेत जाऊया झोपायला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?
- नचिकेत जोशी
(पूर्वप्रसिद्धी - 'चक्रम हायकर्स' तर्फे प्रकाशित 'सह्यांकन २०१३' स्मरणिका
आणि
http://anandyatra.blogspot.in/2014/01/blog-post_20.html)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हौस पुरवा की राव .लई मिठीभर
हौस पुरवा की राव .लई मिठीभर थंडी पडलिया .
मस्त.......
मस्त.......
सहीच!
सहीच!
मूळ गाण्याची चाल आणि
मूळ गाण्याची चाल आणि ट्रेकिंगची परिभाषा .... छान मेळ जमलाय.
आभार!
आभार!
mastach
mastach
व्वा! व्वा! ट्रेकींग भारी.
व्वा! व्वा! ट्रेकींग भारी.
मस्त कोकण कडा तर
मस्त
कोकण कडा तर आवडीनं
टक्कमक बघूया जोडीनं
सनसेट पाहून, शेकोटी लावून
गुहेत जाऊया झोपायला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?>>> हे खरं तर खालील प्रमाणे हवय
सुधागड तर आवडीनं
राजगड चढूया जोडीनं
सांधण व्हॅलीत, झोका तो घेऊन
एकोही जाऊया ऐकायला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला
मस्तच रे आनंद कविता
मस्तच रे आनंद
कविता :d