Submitted by वैवकु on 24 January, 2014 - 15:16
काळ चांगला होता ..लोक बेखबर होते
या इथे कधीकाळी देखणे शहर होते
चालवायचो मी ते फार चालले नाही
वेगळ्या विचारांचे ते नवे सदर होते
कालची नशा नाही आजही उतरलेली
ज्या नशेत तू माझे चुंबिले अधर होते
फक्त तेवढ्यांवरती चालली तिची सत्ता
एक शेजघर होते एक माझघर होते
मी कधीच सौख्यांचा चंद्र पाहिला नाही
ज्या कुशीसही वळलो दु:ख रात्रभर होते
जीवजाळती माफी तू नकोस मागू ना
मीच आपल्यामधले छेडले समर होते
रोज मानतो त्यांचे ऋण अता सुना रस्ता
ज्याकुणी इथे काही लावले तगर होते
मीच राखतो थोडे हातचे असे काही
शेर छान झाला की वेदना प्रखर होते
वेगळे असे काही होत फारसे नाही
जे मला हवे आहे तेच फारतर होते
मी जिथे जिथे जातो लोक मारती जोडे
विठ्ठला तुझ्यापायी केवढी कदर होते
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुखद आठवण "आवारगी"ची ! सुरेख
सुखद आठवण "आवारगी"ची !
सुरेख वेडेपण !
बरेच शेर आवडले....
बरेच शेर आवडले....
धन्यवाद........
समर, फारतर, कदर हे आवडले.
समर, फारतर, कदर हे आवडले.
फक्त तेवढ्यांवरती चालली तिची
फक्त तेवढ्यांवरती चालली तिची सत्ता
एक शेजघर होते एक माझघर होते
अप्रतिम, वैभव.
चालवायचो मी ते फार चालले नाही
वेगळ्या विचारांचे ते नवे सदर होते
वेगळे असे काही होत फारसे नाही
जे मला हवे आहे तेच फारतर होते
दोन्ही शेर आवडले. काही नवे शब्द शिकलो.
धन्यवाद.
फक्त तेवढ्यांवरती चालली तिची
फक्त तेवढ्यांवरती चालली तिची सत्ता
एक शेजघर होते एक माझघर होते<<< वा वा
सदर आणि फारतर हेही आवडले.
वैभव तुझ्या काव्यात नाविन्य
वैभव तुझ्या काव्यात नाविन्य सुंदर होते
सर्वानी करावी वाहवा असे हे शेर होते
माजघराचा शेर भन्नाट. गझल
माजघराचा शेर भन्नाट.
गझल आवडली.
अधर, फारतर, हे सर्वात छान
अधर, फारतर, हे सर्वात छान वाटले.
अफलातून आवडली विशेषतः अधर,
अफलातून आवडली
विशेषतः
अधर, माझघर, प्रखर, फारतर वा वा !
-सुप्रिया.
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार
पुण्याचीविनिता ह्यांचे विशेष आभार माझ्या गझलेवर पहिल्यांदाच त्यांचा प्रतिसाद पाहतो आहे
वैभव तुमच्या विशेष आभाराचे
वैभव तुमच्या विशेष आभाराचे माझे पण विशेष साभार
व्वा ! संपूर्ण गझल भन्नाट !
व्वा ! संपूर्ण गझल भन्नाट !
धन्यवाद मासरूळकर
धन्यवाद मासरूळकर
बेहद... बेहद... बेहद आवडली.
बेहद... बेहद... बेहद आवडली.
मस्त गझल ! फक्त ते माझघर नसुन
मस्त गझल !
फक्त ते माझघर नसुन माजघर आहे !
अतिशर सुंदर गझल…. 'माजघर'
अतिशर सुंदर गझल….
'माजघर' शेर अप्रतिम झालाय.
चालवायचो मी ते फार चालले नाही
वेगळ्या विचारांचे ते नवे सदर होते
सुंदर…
कालची नशा नाही आजही उतरलेली
ज्या नशेत तू माझे चुंबिले अधर होते
व्वा…
मी कधीच सौख्यांचा चंद्र पाहिला नाही
ज्या कुशीसही वळलो दु:ख रात्रभर होते
सुरेख शेर… ( सौख्यांचा ऐवजी सौख्याचा अधिक चांगले वाटेल का ?)
गझलेची लगावली जाम आवडली…
शुभेच्छा.
धन्यवाद अमित मु.कु. आणि फाटक
धन्यवाद अमित मु.कु. आणि फाटक साहेब
) करून योग्य तो बदल करीनच 
मु.कु. विशेष आभार आपले . माजघर <<थोडीफार शाहनिशा (की शहानिशा
आता एक लहानसा बदल सुचला आहे एका शेरात तो करत आहे ..
रोज मानतो त्यांचे ऋण अता सुना रस्ता
ज्याकुणी इथे काही लावले तगर होते
पुनश्च आभार सर्वांचे
फक्त तेवढ्यांवरती चालली तिची
फक्त तेवढ्यांवरती चालली तिची सत्ता
एक शेजघर होते एक माझघर होते
आवडला....
फक्त "माझघर" असते का "माजघर" या बद्दल शंका आहे.
जाणकारांनी निरसन करावे...... (जाणकारांनीच... )