ढब्बू मिरचीची हिरवी भाजी (फोटोसहीत)

Submitted by दक्षिणा on 19 January, 2014 - 08:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ ढब्बू मिरच्यांचे कापून चौकोनी तुकडे करावेत, वाटीभर मटार वाफवून, कांदा (लांब चिरून), मिरच्या, लसूण,(२ मिरच्या आणि हव्या तितक्या लसूण पाकळ्यांचा ठेचून गोळा) तेल, मीठ, साखर, कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट.

क्रमवार पाककृती: 

प्रथम ढब्बू मिरची कापून तिचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मटार वाफवून मऊ शिजवून घ्यावेत. (मी वाफवल्यावर मिरचीवरच टाकले होते)
गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे, मोहरी वगैरे काहीही घालू नये. तेल तापलेय असं वाटलं की लांब चिरलेला कांदा घालून परतावे. थोडा गुलाबीसर झाला की चिरलेली मिरची आणि मटार टाकावेत. (भाजी झाकू नये) थोड्या थोड्या वेळाने परतत रहावी. किंचित शिजली आहे असं वाटलं की मिरची आणि लसूणाचा ठेचलेला गोळा घालावा. मीठ, साखर आणि कोथिंबीर सर्व घालावे. मधून मधून परतत रहावे. झाली भाजी तयार. सर्वात शेवटी थोडे शेंगदाण्याचे कूट घालून भाजी सारखी करावी.

वाढणी/प्रमाण: 
दोन लोकांसाठी किंवा एका माणसासाठी दोन वेळेला.
अधिक टिपा: 

अत्यंत सोपी आणि साधी पाकृ असल्याने अधिक टिपा काय देणार? नेहमीच्याच भाजीत थोडे बदल केलेत. जिन्नस नेहमीचे आणि सारखेच वापरले तरिही चव वेगळीच असते प्रत्येकाच्या हातची.
असो... भाजी अजिबात झाकायची नाहिये. आणि नको असेल तर साखर वगळू शकतो. खरंतर ही भाजी अगदी छान कोरडी खुसखुशीत होते परतून परतून. पण माझ्याकडे वेळ आणि पेशन्स कमी असल्याने मी अलिकडेच थांबले.

माहितीचा स्रोत: 
माझा प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!

बेसन घालुन करते बरेचदा ही भाजी. आता शेंगदाण्याचं कूट घालुन पण करुन पाहीन. नाहीतरी शाकाहारी लोकान्चा रोज भाजी काय करायची हा प्रश्नच असतो. अशी वेरीएशन्स मस्त वाटतात.

धन्यवाद स्वप्नांची राणी. Happy

वरती फोटो कसे अ‍ॅड करू समजले नाही, म्हणून इथे प्रतिसादात देत आहे.

कांदा परतताना
20140115_092458.jpg

वाफवलेले मटार आणि ढब्बू मिरची टाकल्यावर
20140115_092809.jpg

लसूण मिरची, मीठ, साखर, कूट घालून
20140115_094625.jpg

फायनल भाजी
20140115_095058.jpg

सोपी आणि सुटसुटीत.. Happy

<< दोन लोकांसाठी किंवा एका माणसासाठी दोन वेळेला.>>

आवडती असल्याने मला एकट्यालाच एक वेळा पुरेल.. Wink

दक्षे, पहिली पाककृती ना ? अभिनंदन.
छान लिहिलेस. जाड आणि घट्ट सिमल्या मिरच्या मिळाल्या तर त्या किसताही येतात. त्याची भाजी चांगली मिळून येते आणि रंग न बदलता शिजते.

अरे वा, छानच Happy आवडली. पुन्हा केव्हा करणारेस, खायला येणार! भरपुर मिरच्यांची करावी लागेल तुला, मला आणि हाफ तिकिटाला कुटवाली ढबु अतिप्रिय आहे!!

सर्वांना धन्यवाद Happy

वर्षा झाकण ठेवलं की गिर्र शिजते भाजी, मला तशी शिजवायला आवडत नाही. शिवाय कोरडी करण्याच्या प्रयत्नात पेशन्स संपले होते. कोरडी करायची असेल तर झाकण ठेवायचे नसते. पाणी उडणार कसं मग? Uhoh

@ सई - तुझ्याकडची बघूनच मी कॉपी करण्याचा निष्फळ प्रयत्न केलाय मॅडम. आठवत नाही का? नील त्या दिवशी नुसती भाजी भरत होता.

तुझा प्रयत्न सुफळ झालेला स्पष्ट दिसतोय शेवटच्या फोटोतून.. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट पण घेतलेयस. माझी ढकलाढकली आणि उरकाउरकी असते!

वर्षा, कुणाहीकडे आणि कधीही ये गं, विचार काय करायचा त्यात Happy

शेंगदाणा कूट टाकल्याने मस्त चव येत असावी असा अंदाज आहे.
पण साखरेचं प्रयोजन समजलं नाही.
या मिरच्या फारशा तिखट नसल्याने भाजी करताना आम्ही थोडंसं लाल तिखट टाकतो त्यात.
असो.... प्रत्येकाची वेगळी आवड.

Pages