४ ढब्बू मिरच्यांचे कापून चौकोनी तुकडे करावेत, वाटीभर मटार वाफवून, कांदा (लांब चिरून), मिरच्या, लसूण,(२ मिरच्या आणि हव्या तितक्या लसूण पाकळ्यांचा ठेचून गोळा) तेल, मीठ, साखर, कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट.
प्रथम ढब्बू मिरची कापून तिचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मटार वाफवून मऊ शिजवून घ्यावेत. (मी वाफवल्यावर मिरचीवरच टाकले होते)
गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे, मोहरी वगैरे काहीही घालू नये. तेल तापलेय असं वाटलं की लांब चिरलेला कांदा घालून परतावे. थोडा गुलाबीसर झाला की चिरलेली मिरची आणि मटार टाकावेत. (भाजी झाकू नये) थोड्या थोड्या वेळाने परतत रहावी. किंचित शिजली आहे असं वाटलं की मिरची आणि लसूणाचा ठेचलेला गोळा घालावा. मीठ, साखर आणि कोथिंबीर सर्व घालावे. मधून मधून परतत रहावे. झाली भाजी तयार. सर्वात शेवटी थोडे शेंगदाण्याचे कूट घालून भाजी सारखी करावी.
अत्यंत सोपी आणि साधी पाकृ असल्याने अधिक टिपा काय देणार? नेहमीच्याच भाजीत थोडे बदल केलेत. जिन्नस नेहमीचे आणि सारखेच वापरले तरिही चव वेगळीच असते प्रत्येकाच्या हातची.
असो... भाजी अजिबात झाकायची नाहिये. आणि नको असेल तर साखर वगळू शकतो. खरंतर ही भाजी अगदी छान कोरडी खुसखुशीत होते परतून परतून. पण माझ्याकडे वेळ आणि पेशन्स कमी असल्याने मी अलिकडेच थांबले.
वर्षे पोळ्या आपापल्या घेऊन
वर्षे पोळ्या आपापल्या घेऊन येणे. कृपयाच
भाजी मस्त दिसतेय. ढबू मिरची
भाजी मस्त दिसतेय. ढबू मिरची कशी पण आवडतेच. करून बघेन एकदा.
फोटो टाकलेत ते प्रतिसाद संपादित करून तिथल्या लिंक्स कॉपी करून वर पाककृतीमध्ये पेस्ट कर म्हणजे फोटो रेसिपीमध्ये येतील.
amhee... kislel ola khobar
amhee... kislel ola khobar varun takato.. kuta evaji... te ghalun pan chan lagat....
मस्त आहे भाजी... मी करणार
मस्त आहे भाजी... मी करणार नक्की
करुन बघणार नक्की
करुन बघणार नक्की
मिरची लसूण कधी घालून केली
मिरची लसूण कधी घालून केली नाही. लवकरच करणेत येईल.
मस्तं झाली भाजी , दक्षिणा
मस्तं झाली भाजी , दक्षिणा !
सिमला मिर्ची कमी असल्याने बटाट्याची भेसळ करावी लागली पण एकदम टेस्टी !
दाण्याचं कुट हिरवी मिर्ची लसुण एकत्रं वाटण करून टाकलं शेवटी , थोडं लिंबु पिळलं वरून ..
फोटो फार क्षीण आलाय शिवाय फुलकाच दिसतोय मेजर , तरी टाकतेय
मस्त ग दक्षे.
मस्त ग दक्षे.
दीपांजली भाजी मस्त हिरवीगार
दीपांजली भाजी मस्त हिरवीगार दिसतेय, सिमलामिरची-बटाटा भाजी मी बरेचदा करते, ह्या पद्धतीने नाही केली, पीठ पेरूनपण करते. मी साखर मात्र घालत नाही.
व्वा, दक्षे आज करुन पाहिली
व्वा, दक्षे आज करुन पाहिली तुझ्या या पद्धतीने.
खुप मस्त झाली होती. नाहीतर आमच्याकडे सिमला मिरचीची भाजी कधीतरी वर्षातुन १-२दा होत असायची.
आता नेहमी करेन.
वा दीपांजली, भाजी मस्तच
वा दीपांजली, भाजी मस्तच दिसतेय एकदम...
दिपांजली भाजी मस्तच दिसतेय
दिपांजली भाजी मस्तच दिसतेय की, आणि छान हिरवीगार शिजलिये
दिपांजली भाजी मस्तच दिसतेय
दिपांजली भाजी मस्तच दिसतेय की, आणि छान हिरवीगार शिजलिये>>> +१
दीपांजली भाजी मस्त हिरवीगार
दीपांजली भाजी मस्त हिरवीगार दिसतेय....
दक्षिणा, मी आता कोबीच्या
दक्षिणा, मी आता कोबीच्या भाजीला 'पिवळीजर्द शिजलीये' असं म्हणणार
वर्षे पोळ्या आपापल्या घेऊन
वर्षे पोळ्या आपापल्या घेऊन येणे. कृपयाच >> ठीके दक्षे.. माझ्या ताटाकडे बघुही देणार नाही तुला
थँक्स फोटोतली भाजी
थँक्स फोटोतली भाजी आव्डलेल्यांना :).
मस्त दिसतेय!
मस्त दिसतेय!
दक्षिणा ताई, ढब्बू मिरची
दक्षिणा ताई,
ढब्बू मिरची कुठ्ल्या ही प्रकारात खाल्ली तर फार मळमळ सुटते, त्यावर काही उपाय आहे का?
दक्षे, काल ह्या पद्धतीने केली
दक्षे, काल ह्या पद्धतीने केली भाजी. खूप छान लागत होती. घरात सगळ्यांना आवडली स्पेशली सानुला
मुख्य म्हणजे उग्र लागत नव्हती. आता अधून मधून व्हरायटी म्हणून अशी करत जाईन.
नेमकं घरातलं दा.कु. संपलेलं म्हणून मी ओलं खोबरं घातलं. ते ही चांगलं लागतं. पुढच्यावेळी दा.कु. घालेन.
करून खाल्ली. उत्तम झाली..
करून खाल्ली. उत्तम झाली.. धन्यवाद दक्षिणा...
मस्त झाली ही भाजी. आवडली.
मस्त झाली ही भाजी. आवडली.
हि भाजी २,३ वेळा केली.मस्त
हि भाजी २,३ वेळा केली.मस्त खमंग होते.फार आवड्ली सगळ्यांना..अनेक धन्यवाद
दक्षु, मै जब आउंगी तो मेन्यु
दक्षु, मै जब आउंगी तो मेन्यु दूंगी तेर्कु.. नो कॅप्सीकम नो शेपु प्ली>>>ज
(No subject)
आज केली होती. मटार नव्हते आणि
आज केली होती. मटार नव्हते आणि साखर घातली नाही. अतिशय खमंग आणि तोंपासु झाली होती. दा.कु आणि लसणीची चव फार महान लागली.
पाकृबद्दल धन्यवाद, दक्षे
Pages