ढब्बू मिरचीची हिरवी भाजी (फोटोसहीत)

Submitted by दक्षिणा on 19 January, 2014 - 08:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ ढब्बू मिरच्यांचे कापून चौकोनी तुकडे करावेत, वाटीभर मटार वाफवून, कांदा (लांब चिरून), मिरच्या, लसूण,(२ मिरच्या आणि हव्या तितक्या लसूण पाकळ्यांचा ठेचून गोळा) तेल, मीठ, साखर, कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट.

क्रमवार पाककृती: 

प्रथम ढब्बू मिरची कापून तिचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मटार वाफवून मऊ शिजवून घ्यावेत. (मी वाफवल्यावर मिरचीवरच टाकले होते)
गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे, मोहरी वगैरे काहीही घालू नये. तेल तापलेय असं वाटलं की लांब चिरलेला कांदा घालून परतावे. थोडा गुलाबीसर झाला की चिरलेली मिरची आणि मटार टाकावेत. (भाजी झाकू नये) थोड्या थोड्या वेळाने परतत रहावी. किंचित शिजली आहे असं वाटलं की मिरची आणि लसूणाचा ठेचलेला गोळा घालावा. मीठ, साखर आणि कोथिंबीर सर्व घालावे. मधून मधून परतत रहावे. झाली भाजी तयार. सर्वात शेवटी थोडे शेंगदाण्याचे कूट घालून भाजी सारखी करावी.

वाढणी/प्रमाण: 
दोन लोकांसाठी किंवा एका माणसासाठी दोन वेळेला.
अधिक टिपा: 

अत्यंत सोपी आणि साधी पाकृ असल्याने अधिक टिपा काय देणार? नेहमीच्याच भाजीत थोडे बदल केलेत. जिन्नस नेहमीचे आणि सारखेच वापरले तरिही चव वेगळीच असते प्रत्येकाच्या हातची.
असो... भाजी अजिबात झाकायची नाहिये. आणि नको असेल तर साखर वगळू शकतो. खरंतर ही भाजी अगदी छान कोरडी खुसखुशीत होते परतून परतून. पण माझ्याकडे वेळ आणि पेशन्स कमी असल्याने मी अलिकडेच थांबले.

माहितीचा स्रोत: 
माझा प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजी मस्त दिसतेय. ढबू मिरची कशी पण आवडतेच. करून बघेन एकदा.

फोटो टाकलेत ते प्रतिसाद संपादित करून तिथल्या लिंक्स कॉपी करून वर पाककृतीमध्ये पेस्ट कर म्हणजे फोटो रेसिपीमध्ये येतील.

amhee... kislel ola khobar varun takato.. kuta evaji... te ghalun pan chan lagat....

मस्तं झाली भाजी , दक्षिणा !
सिमला मिर्ची कमी असल्याने बटाट्याची भेसळ करावी लागली पण एकदम टेस्टी !
दाण्याचं कुट हिरवी मिर्ची लसुण एकत्रं वाटण करून टाकलं शेवटी , थोडं लिंबु पिळलं वरून ..
फोटो फार क्षीण आलाय शिवाय फुलकाच दिसतोय मेजर , तरी टाकतेय Proud
image_14.jpg

दीपांजली भाजी मस्त हिरवीगार दिसतेय, सिमलामिरची-बटाटा भाजी मी बरेचदा करते, ह्या पद्धतीने नाही केली, पीठ पेरूनपण करते. मी साखर मात्र घालत नाही.

व्वा, दक्षे आज करुन पाहिली तुझ्या या पद्धतीने.
खुप मस्त झाली होती. नाहीतर आमच्याकडे सिमला मिरचीची भाजी कधीतरी वर्षातुन १-२दा होत असायची.
आता नेहमी करेन.

दक्षिणा ताई,
ढब्बू मिरची कुठ्ल्या ही प्रकारात खाल्ली तर फार मळमळ सुटते, त्यावर काही उपाय आहे का?

दक्षे, काल ह्या पद्धतीने केली भाजी. खूप छान लागत होती. घरात सगळ्यांना आवडली स्पेशली सानुला Happy

मुख्य म्हणजे उग्र लागत नव्हती. आता अधून मधून व्हरायटी म्हणून अशी करत जाईन. Happy

नेमकं घरातलं दा.कु. संपलेलं म्हणून मी ओलं खोबरं घातलं. ते ही चांगलं लागतं. पुढच्यावेळी दा.कु. घालेन.

आज केली होती. मटार नव्हते आणि साखर घातली नाही. अतिशय खमंग आणि तोंपासु झाली होती. दा.कु आणि लसणीची चव फार महान लागली.

पाकृबद्दल धन्यवाद, दक्षे Happy

Pages