४ ढब्बू मिरच्यांचे कापून चौकोनी तुकडे करावेत, वाटीभर मटार वाफवून, कांदा (लांब चिरून), मिरच्या, लसूण,(२ मिरच्या आणि हव्या तितक्या लसूण पाकळ्यांचा ठेचून गोळा) तेल, मीठ, साखर, कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट.
प्रथम ढब्बू मिरची कापून तिचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मटार वाफवून मऊ शिजवून घ्यावेत. (मी वाफवल्यावर मिरचीवरच टाकले होते)
गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे, मोहरी वगैरे काहीही घालू नये. तेल तापलेय असं वाटलं की लांब चिरलेला कांदा घालून परतावे. थोडा गुलाबीसर झाला की चिरलेली मिरची आणि मटार टाकावेत. (भाजी झाकू नये) थोड्या थोड्या वेळाने परतत रहावी. किंचित शिजली आहे असं वाटलं की मिरची आणि लसूणाचा ठेचलेला गोळा घालावा. मीठ, साखर आणि कोथिंबीर सर्व घालावे. मधून मधून परतत रहावे. झाली भाजी तयार. सर्वात शेवटी थोडे शेंगदाण्याचे कूट घालून भाजी सारखी करावी.
अत्यंत सोपी आणि साधी पाकृ असल्याने अधिक टिपा काय देणार? नेहमीच्याच भाजीत थोडे बदल केलेत. जिन्नस नेहमीचे आणि सारखेच वापरले तरिही चव वेगळीच असते प्रत्येकाच्या हातची.
असो... भाजी अजिबात झाकायची नाहिये. आणि नको असेल तर साखर वगळू शकतो. खरंतर ही भाजी अगदी छान कोरडी खुसखुशीत होते परतून परतून. पण माझ्याकडे वेळ आणि पेशन्स कमी असल्याने मी अलिकडेच थांबले.
मस्त!! बेसन घालुन करते बरेचदा
मस्त!!
बेसन घालुन करते बरेचदा ही भाजी. आता शेंगदाण्याचं कूट घालुन पण करुन पाहीन. नाहीतरी शाकाहारी लोकान्चा रोज भाजी काय करायची हा प्रश्नच असतो. अशी वेरीएशन्स मस्त वाटतात.
धन्यवाद स्वप्नांची राणी.
धन्यवाद स्वप्नांची राणी.
वरती फोटो कसे अॅड करू समजले नाही, म्हणून इथे प्रतिसादात देत आहे.
कांदा परतताना
वाफवलेले मटार आणि ढब्बू मिरची टाकल्यावर
लसूण मिरची, मीठ, साखर, कूट घालून
फायनल भाजी
दक्षी मला?????
दक्षी मला?????
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
मला फोटो दिसत नाहियेत
मला फोटो दिसत नाहियेत
सोपी आणि सुटसुटीत.. << दोन
सोपी आणि सुटसुटीत..
<< दोन लोकांसाठी किंवा एका माणसासाठी दोन वेळेला.>>
आवडती असल्याने मला एकट्यालाच एक वेळा पुरेल..
मस्त! मी पण नेहमी अशीच करते
मस्त! मी पण नेहमी अशीच करते भाजी .. मसाला बनवायचा कंटाळा आला की सरळ शेंगदाण्याची चटणी घालते
मस्त दिसतेय, करायला हवी ह्या
मस्त दिसतेय, करायला हवी ह्या पद्धतीने.
मटार मावे असल्यास त्यात पटकन वाफवता येतील.
दक्षिणा इथे बघ फोटोसाठी. छान
दक्षिणा इथे बघ फोटोसाठी.
छान आहे रेसीपी ... मी नेहमी बेसन घालुन करते. या पद्धतीने करुन बघेन.
छान फोटो आणि रेसिपी !
छान फोटो आणि रेसिपी !
मस्तच!
मस्तच!
वॉव, दक्षु, साउंड्स गुड!!!!!
वॉव, दक्षु, साउंड्स गुड!!!!!
chan ahe.....thx Dax.
chan ahe.....thx Dax.
भाजीबद्दल काय मत व्यक्त करणार
भाजीबद्दल काय मत व्यक्त करणार मी बिचारा ?? खायाला बोलावलीस तरच म्त देईन.
गुळाऐवजी साखर का?
गुळाऐवजी साखर का?
दक्षे, पहिली पाककृती ना ?
दक्षे, पहिली पाककृती ना ? अभिनंदन.
छान लिहिलेस. जाड आणि घट्ट सिमल्या मिरच्या मिळाल्या तर त्या किसताही येतात. त्याची भाजी चांगली मिळून येते आणि रंग न बदलता शिजते.
दक्षे, खूप छान.मस्त ! पहिल्या
दक्षे, खूप छान.मस्त ! पहिल्या -वहिल्या खमंग पाककृती बद्दल अभिनंदन...आता पुढच्या ....च्या प्रतिक्षेत.
सेम भाजी पण थोडासा पावभाजी
सेम भाजी पण थोडासा पावभाजी मसाला घालुन आवडते लेकाला. झाकण का नाही ठेवायचे म्हणे
मस्त दिसतेय............
मस्त दिसतेय............
मस्त आहे रेसिपी. नक्की करुन
मस्त आहे रेसिपी. नक्की करुन बघणार
झाकण का नाही ठेवायचे म्हणे <<
झाकण का नाही ठेवायचे म्हणे << पाणचट होते
माझी नावडती भाजी अशीही करुन बघेन..
अरे वा, छानच आवडली. पुन्हा
अरे वा, छानच आवडली. पुन्हा केव्हा करणारेस, खायला येणार! भरपुर मिरच्यांची करावी लागेल तुला, मला आणि हाफ तिकिटाला कुटवाली ढबु अतिप्रिय आहे!!
एकदम तोंपासु, भरपूर लसुण
एकदम तोंपासु, भरपूर लसुण असल्याने साबा नसतानाच करावी लागणार...
सर्वांना धन्यवाद वर्षा झाकण
सर्वांना धन्यवाद
वर्षा झाकण ठेवलं की गिर्र शिजते भाजी, मला तशी शिजवायला आवडत नाही. शिवाय कोरडी करण्याच्या प्रयत्नात पेशन्स संपले होते. कोरडी करायची असेल तर झाकण ठेवायचे नसते. पाणी उडणार कसं मग?
@ सई - तुझ्याकडची बघूनच मी कॉपी करण्याचा निष्फळ प्रयत्न केलाय मॅडम. आठवत नाही का? नील त्या दिवशी नुसती भाजी भरत होता.
मस्तच दिसतीय भाजी, वेगळी आहे
मस्तच दिसतीय भाजी, वेगळी आहे त्यामुळे नक्की करुन बघणार.
हम्म.. आता झाकण न ठेवता करुन
हम्म.. आता झाकण न ठेवता करुन पाहिल.
आता मला प्रश्न पडलाय, सई कडे जावे की दक्षीकदे भाजी खायला
तुझा प्रयत्न सुफळ झालेला
तुझा प्रयत्न सुफळ झालेला स्पष्ट दिसतोय शेवटच्या फोटोतून.. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट पण घेतलेयस. माझी ढकलाढकली आणि उरकाउरकी असते!
वर्षा, कुणाहीकडे आणि कधीही ये गं, विचार काय करायचा त्यात
शेंगदाणा कूट टाकल्याने मस्त
शेंगदाणा कूट टाकल्याने मस्त चव येत असावी असा अंदाज आहे.
पण साखरेचं प्रयोजन समजलं नाही.
या मिरच्या फारशा तिखट नसल्याने भाजी करताना आम्ही थोडंसं लाल तिखट टाकतो त्यात.
असो.... प्रत्येकाची वेगळी आवड.
सुंदर फोटो. पाककृतीपण आवडली.
सुंदर फोटो. पाककृतीपण आवडली.
उल्हास काका, मला सगळ्यात गोड
उल्हास काका,
मला सगळ्यात गोड चव लागते. थोडी ओलसर असती भाजी तर गुळ घातला असता, नाहीतर साखर असतेच
Pages