'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
हो नंदिनी, तुझे बरोबर आहे
हो नंदिनी, तुझे बरोबर आहे कारण किती महिने किंवा किती एपिसोड ह्याबद्दल नाही बोलली ती.
गुंतता हृदय हे आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट साधारण सहा महिने चालणार असे सांगितले होते पण ह्या मालिकेबद्दल ठोस काही नाही सांगितले.
म्हणजे अजून ३-४ वर्ष 'एका
म्हणजे अजून ३-४ वर्ष 'एका लग्नाची चौथी गोष्ट ' वगैरे सुरू होणार नाही असं दिसतंय....;)
पण ह्या लग्नांच्या गोष्टी मालिका आता आवरा म्हणावं नाहीतर १००-१५० वर्षांनी 'सेन्च्युरी' होईल....'एका लग्नाची शंभरावी गोष्ट - सेंटेनियल सेलेब्रेशन' वगैरे....देवा रे....
त्या दिवशी काय ते चर्हाट चालु
त्या दिवशी काय ते चर्हाट चालु होत.....अळी काय कोश काय....तो मुल्गा त्याला काढ्तो अन ते मरते काय........ती ईशा पकवत होती......७-८ चॅनेल बदलुन परत मी तिथे आली तरी तेच ते पुराण संपतच नव्हते....
सर्व शा॑त का? मालिका खुपच
सर्व शा॑त का? मालिका खुपच आवडली वाटते......;-)
काल दोघांकडेही आलेली केस
काल दोघांकडेही आलेली केस कदाचित दोघांना एकत्र आणेल असं मला वाटतंय.
Naahee naahee...
Naahee naahee... tyaasaatheech tee kes aalee (aaNalee) aahe
बहुतेक ती केस मोठ्याबाबांनीच
बहुतेक ती केस मोठ्याबाबांनीच पाठवली असेल.
आता त्यात सनदीची भानगड का
आता त्यात सनदीची भानगड का घुसडलीये ते कळलं नाही
काल दोघांकडेही आलेली केस
काल दोघांकडेही आलेली केस कदाचित दोघांना एकत्र आणेल असं मला वाटतंय.
>>>> त्यासाठीच तर ती केस आलीय ना मालिकेत...
त्यांचपण पुन्हा जुळवुन देतील अन स्वत:च पण पुन्हा जुळवतील
दक्षुतै, ते स्वप्न होतं ना?
दक्षुतै, ते स्वप्न होतं ना?
सध्या मालिकेत काय चाललंय? ते
सध्या मालिकेत काय चाललंय?
ते नवरा बायको आपापली केस घेऊन इशा आणि ओमला भेटतात त्या एपि. पर्यंत पाहिले होते मी.
पण इथली चर्चा वाटुन अजुन काही घडलेय असं वाटत नाही.
पियु.. काल मी ५ मिनीट बघितलं
पियु.. काल मी ५ मिनीट बघितलं २३ चा एपिसोड.. त्यात दोघेही आपापल्या मित्राला/मैत्रीणी ला एक्दम बरबाद असे रडके डायलॉग बोलुन दाखवत होते.. ही केस म्हणजे श्राद्ध आहे ह्या नात्याच.. चौदाव्याला गोड खायला हाच हॉटेलात येवु वगैरे... त्यात ती ईशा मधुन्च हसत होती...
मग मी बंद केल.. उगाच डिप्रेशन नको!!
काहीही डायलॉग्ज दिलेत इशाला
काहीही डायलॉग्ज दिलेत इशाला या मालिकेत..
ह्या मालिकावाल्यांना तिला फक्त लाडावलेली दाखवायचीये कि निर्बुद्ध पण?
चिमाने स्वतःला परत एकदा सिद्ध
चिमाने स्वतःला परत एकदा सिद्ध केलयं या मालिकेत असली रटाळ भाषा लिहुन!!
चिमा नाही लिहितेय ना आता?
चिमा नाही लिहितेय ना आता?
सॉरी.. तो पटकथा लिहीत
सॉरी.. तो पटकथा लिहीत होता..
डायलॉग्ज साठी जो कोणी असेल तो
ती केस मोठ्या बाबानी
ती केस मोठ्या बाबानी पाठवलेय.
अर्थात त्याना कसं कळालं तर दत्ताराम भाउ गायब झालेत घरातुन.
ते जाउन भेटले सासवड मध्ये मोठ्या बाबाना.
हा अंदाज बायकोने लावलात.
काल पासुन केबल बंद आहेत.
त्यमुळे प्रचन्ड वेळ हाताशी मिळतोय.
आता बन्दच करुन टाकावी असा विचार आहे.
झकासराव....बरोब्बर....आमच्याक
झकासराव....बरोब्बर....आमच्याकडेही हेच मत पडलं....त्यात ओम-ईशाचे बॉस लोकंही सामील असणार (बॉसच्या भूमिका करणार्या कलाकारांचं दुसरं काही काम नाहीच दिसतंय) आणि पडद्यामागील सूत्रधार आजोबा देशमुख आणि दत्तारामभाऊ असणार....ओम आणि ईशा दोघांनाही परस्परांच्या बाजू कळाव्यात म्हणून स्ट्रॅटॅजिकली त्या त्या केसेस दिलेल्या असणार....हे नक्की आजोबा देशमुखांचं डोकं....केसच्या शेवटी वकील आणि त्यांचे अशील आपापल्या रिस्पेक्टिव्ह पार्टनरची बाजू समजून घेणार आणि मग आssssल ईssssज वेssssल.... नन्नन्ना नननानना..नन्ननननानना..नन्ननननानना..नानानाना....
स्पृहा(ईशा) खरंच ह्यात
स्पृहा(ईशा) खरंच ह्यात निर्बुद्ध आणि लाडावलेली दाखवलीय, कशी काय वकील झाली काय माहिती?
ह्याच स्पृहाने अग्निहोत्रमध्ये वकिलाचा रोल चांगला केला होता, नक्की हि तीचना असे वाटायला लागलेय.
कोर्टात इशा आणि ओम जी केस
कोर्टात इशा आणि ओम जी केस लढवत आहेत. ती अगदी त्यांच्या सारखीच घेतलेय. बायको नवर्याला त्याच म्हणणं मांडूच देत नाही. स्वताला जसा वाटेल त्याप्रमाणे त्याच्या वागण्याचा अर्थ लावते. बायकोला पण तेच वाटत जे ईशाला वाटत असत. ( आपण फसवले जातोय) आणि तरीही ईशाला मात्र तिच्या विरुद्ध च्या अशीलाची केस लढायची असते. पटकथाकाराच आणि संवाद लेखकाचं कौतुक कराव तितक कमीच
मालिका आता खरंच कंटाळवाणी
मालिका आता खरंच कंटाळवाणी झालीय....पण तरीही पहाते....दुसरा उपाय नाही न.....घरात ७ ते १०.३० पर्यंत झी मराठी शिवाय दुसरी वाहिनी लावूनच देत नाही कोण....परिणाम काय, तर हे मालीकांवरचे धागे....नाही आवडलं तरी तेच तेच पाहायचं आणि चर्चा करत बसायची. कंटाळा येतो. आता वाटत दुसरी वाहिनी नाही बघू दिली तरी झी मराठी नाही बघायचं....उगाच डोक्याला ताप कशाला!
मला एक टेक्निकल प्रश्न आहे.
मला एक टेक्निकल प्रश्न आहे. घटस्फोटाची केस ही अर्थातच नवरा-बायकोंमधली असते. अशावेळी नवर्या अथवा बायकोसोबत अजून एक रिस्पॉन्डन्ट लावून त्यावरही केस लावली जाऊ शकते का?
पूनम, मला पण सेम शंका होती
पूनम, मला पण सेम शंका होती पण आपल्याला काही कळत नाही. असेल बुवा असंही म्हणून मी विषय सोडुन दिला
(No subject)
:खीखी:
:खीखी:
भाऊ बॅन्ग ऑन! हो, रिया,
भाऊ बॅन्ग ऑन!
हो, रिया, आपल्याला काऽऽऽहीही कळत नाही सिरियलींमधलं यात वाद नाहीच
भाऊकाका, किती परफेक्ट!!!!
भाऊकाका, किती परफेक्ट!!!!
(No subject)
भाऊकाका, खरंच एकदम परफेक्ट.
भाऊकाका, खरंच एकदम परफेक्ट.
भाऊ
भाऊ
Pages