Submitted by प्रीति on 9 January, 2014 - 11:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
रताळं
बारीक केलेला गुळ
मीठ
कणीक
क्रमवार पाककृती:
रताळ्याची साल काढुन बारीक तुकडे (फ्रोजन तुकडे केलेलं पण चालेलं) करुन पातेल्यात शिजवायला ठेवावे. शिजल्यावर गुळ टाकुन गॅस बंद करावा. एकदा जरा सगळं मॅश करुन घ्यावे. गार झाल्यावर चवीला मीठ टाकुन, मावेल तेवढी कणीक टाकुन मळुन घ्यावे. जास्त कणीक झाली तर थोडा पाण्याचा हात लावावा. १०-१५ मिनीटांनी, तेलाच्या हाताने मळावे. लाटुन तुप लाऊन खरपुस भाजावे.
अधिक टिपा:
गरम, गार कसेही चांगले लागतात. २-३ दिवस बिना फ्रिजचे छान टिकतात. शेंगदाणा चट्णी किंवा नुसते पण चांगले लागतात. घारग्यांच्या पीठाचे पण करता येतात, ह्या वरुनच सुचलयं हे. आई साखरेच्या पाकात कणीक भिजवुन पण करते, त्या जरा कडक असतात. मुलांना ह्या दशम्या खुप आवडतात.
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा छान वाटतायेत .. लाल
अरे वा छान वाटतायेत ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाल भोपळ्याचे बरेचदा केले आहेत.. आता रताळ्याचे करून बघेन..
तसेच खमंग (तिखट, जिरेपुड, लसूण, कोथिंबीर टाकुन) पण छान लागतील
अरे वा. फारच मस्त. नक्की करुन
अरे वा. फारच मस्त. नक्की करुन बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
sunder
sunder
इथे ऑस्ट्रेलियात केशरी रताळी
इथे ऑस्ट्रेलियात केशरी रताळी मिळतात. ती आणलेली होती. त्यांचे खमंग दशमी/पराठे केले. अत्यंत खुसखुशीत आणि छान होतात.
विशेष म्हणजे रंग असला फर्मास आला होता. (ते फोटो-बिटो जमलच नाही).
रेसिपीसाठी मनापासून धन्यवाद
mastach.
mastach.
याला दशमी शब्द कसा काय
याला दशमी शब्द कसा काय वापरतात बुवा? आम्ही तर बाजरीची पीठ दुधात मळून केलेल्या भाकरीला दशमी म्हणतो. वर त्याला चांगल पांढरा पापुद्रा येतो. अन्य पदार्थाला दशमी म्हणलेल काही झेपत नाही.
दशमी म्हणजे उसाच्या रसात
दशमी म्हणजे उसाच्या रसात बाजरीच पीठ भिजवून केलेली भाकरी.(असे आमच्यात तरी समज्तात)
अहाहा! काय लागते. वरून साजूक तूप.
दशमी म्हणजे उसाच्या रसात
दशमी म्हणजे उसाच्या रसात बाजरीच पीठ भिजवून केलेली भाकरी.(असे आमच्यात तरी समज्तात)![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अहाहा! काय लागते. वरून साजूक तूप. >> फक्त पाण्याएवजी उसाचा रस वापरुन नेहमीप्रमाणे भाकरी थापुन भाजायची की अजुन दुसरे काही करायचे. कधी पाहिली नाही म्हणुन प्रश्न पडला
ताजाच उसाचा रस घ्यायचा. त्यात
ताजाच उसाचा रस घ्यायचा. त्यात पीठ कालवून थापायची. अजून दुसरे म्हणजे?
भाकरीप्रमाणे आधी तव्यावर आणि
भाकरीप्रमाणे आधी तव्यावर आणि मग विस्तवावर भाजायचे ना?
सांगली-कोल्हापूर भागात दुधात
सांगली-कोल्हापूर भागात दुधात मळून केलेल्या चपातीला दशमी म्हणतात. दशमी आणि झुणका एक नंबर काँबिनेशन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाकरीला दशमी म्हणलेलं काही झेपत नाही
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
धन्यवाद! दाद करुनही पाहिले,
धन्यवाद! दाद करुनही पाहिले, मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड प्रकार आणि २-३ दिवस टिकतो, दशमी सारखाच लागतो म्हणुन दशमी
ज्यांना झेपत नाही त्यांनी काहिही म्हणा
याचं प्रमाण काय घेऊ गूळ व
याचं प्रमाण काय घेऊ गूळ व रताळ्याचं? एक वाटी रताळं असेल (स्मॅश केलेलं) तर गूळ अंदाजे किती? माझ्याकडे ती गोड शेंदरी अमेरिकन रताळी आहेत.
साधारण पाव ते अर्धा वाटी.
साधारण पाव ते अर्धा वाटी.