Submitted by juyee on 14 January, 2011 - 02:43
सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....
संक्रांतीला घरोघरी हळदीकुंकुचा कार्यक्रम असतो... त्यात वाण / दान द्यायची/ करायची प्रथा आहे.
कोणकोणत्या वस्तू देता येतील ... ?सांगाल का...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्याजवळपास अंध, कर्णबधिर,
तुमच्याजवळपास अंध, कर्णबधिर, मतिमंद अशा मुलांचे हॉस्टेल, वर्कशॉप असेल तर त्यांनी बनवलेल्या वस्तू विकत घेऊन त्या इतरांना देऊ शकता. गाडीमधे ठेवायचे टिशू बॉक्सेस, पॉपुरी ( सुगंधीवस्तूचंचे कपड्यांच्या घड्यांमधे ठेवणाचे ) पाउचेस, साड्या हँगरवर लटकवल्यावर त्यावर घालायचे कव्हर अशा गोष्टींचा वापर होतो अन शिवाय गरजू व्यवसायिकांना मदत होते. सर्वसाधारण दुकानातून , मॉलमधून वस्तू विकत घेण्यापेक्षा अशा ठिकाणून वस्तू घेता येतील का ते पहावे.
>>>>>>>>>>>>
मेधा अशा मुंबईमधल्या काही संस्था असतिल तर क्रूपया सांगा... नवी मुंबई मधिल काही असेल तर उत्तमच.. नक्की प्रयत्न करेन
नवी मुंबईत महाप्याला कर्णबधीर
नवी मुंबईत महाप्याला कर्णबधीर मुलांसाठी 'हेलन केलर इन्स्टिट्युट' आहे, तिथे त्या मुलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात.
धन्यवाद .. नक्कीच प्रयत्न
धन्यवाद .. नक्कीच प्रयत्न करेन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरच खुप धन्यवाद..
साबा यावेळेला शिवण उसवायचे
साबा यावेळेला शिवण उसवायचे छोटे पेन असते ना.. ते लुटणार आहेत. एकदम उपयोगी वस्तु.
आणी फारतर १० रुपयाला एक मिळते.
हे पेन पाहण्याआधी मी सेफ्टीपीनने शिवणी उसवायचे. :वैतागः
आता इतकं मस्त वाटतं हे पेन मिळाल्यावर.
मी या वर्षी ही ऑफीस मधील हाऊस
मी या वर्षी ही ऑफीस मधील हाऊस किपींग च्या बायकांना आणि घरी काम करण्यासाठी येणार्या ताईंनाच वाण देणार आहे. गेल्या वर्षी ६ स्टीलच्या प्लेटचा सेट दिला होता, या वर्षी सहा स्टील बॉल्स चा सेट देणार आहे. ऑफीस मधील हाऊस किपींग च्या मुलींना काहीतरी द्यावेसे नेहेमी वाटते, संक्रांत म्हणजे माझ्यासाठी चांगले निमित्त असते. आणि त्यांना ही संक्रांतीचे वाण याचे अप्रूप आहे.
गेल्यावर्षी हाऊस किपींग च्याच सवाष्ण नसलेल्या बायकांना ही वाण दिले होते.
saamee, kitee chhaan
saamee, kitee chhaan![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या साबानी २० वर्षांपुर्वी
माझ्या साबानी २० वर्षांपुर्वी फक्त सवाष्णीना वाण द्यायची प्रथा आमच्यापुरती डिसकार्ड केली.
सामी.. मस्तच !!!
सामी.. मस्तच !!!
मी यावेळी रांगोळीचे छाप आणि
मी यावेळी रांगोळीचे छाप आणि रांगोळी लुटणार आहे.
पुण्याची विनीता ---- मस्त आहे
पुण्याची विनीता ---- मस्त आहे तुझ्या सा बा ची प्रथा......
सामी ----- मस्त कल्पना , सगळ्यानाच दे सरसकट ..सवाष्ण असणे / नसणे criteria न ठेवता.... ( असे मला वाटते बर का...)
मी तर मागच्या वर्शी स्ट्रोल्स दिलेत......सगळ्या जणी मस्त वापरतात.....
माझ्या एक मैत्रिणीने --- उदबत्त्या दिल्या होत्या वाण म्हणुन..मस्त होती आयडिया ..इथे आम्हाला तश्या छान सुवासिक मिळत नाहीत.
माझ्या नणंदेच्या सा.बा ही
माझ्या नणंदेच्या सा.बा ही ..सवाष्ण असणे / नसणे criteria कधी पाळत नाही . त्यामुळे नणंद आणि आता मी ही .
तसेही संक्रातीच्य सुमारास लेकाचा वाढदिवस असतो . त्यांमुळे वेगळे हलदीकुंकु करत नाही . मुलांबरोबर त्यांच्या आई , आज्या सगळ्याना return gifts देते .
या वेळेला छोटे pouches आणले आणि आता त्यात feviquick ची छोटी tube , brown paper envolpes , U paper clips , saftey pins अश्या ग्रुहपयोगी वस्तु भरल्या .
आणि आज्यां साठी चांगल्यातले हातरुमाल .
खूप मस्त आयडियाज मिळत आहेत.
खूप मस्त आयडियाज मिळत आहेत. मसाल्यांची आयडिया खूप हटके वाटली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्यांना गरज आणि किंमत आहे अशांनाच दिल्याचं समाधान.
मेधा माहीतीसाठी खरंच खूप आभार. अभिनव कल्पना आहे. खूप आवडली.
मंजूडी माहीतीसाठी आभार.
फक्त सवाष्णीना वाण द्यायची प्रथा आमच्यापुरती डिसकार्ड केली.>> पुण्याची विनीता मस्तच!!
सामी घरकामाच्या ताईंसाठी सेम पिंच! मी तर सणाचे पदार्थ नातेवाईकांना देण्याचा पायंडा कधीच मोडलाय. (किंमत नाही वर नावं ठेवणं प्रकार) कचरेवाले, घरकामाच्या मावशी, वॉचमेन, बाळाच्या बेबीसिटींग मध्ये असेच देते दिवाळी फराळ, तिळगूळ, बर्थडे केक वै.
अवांतर : वाण / नैवेद्य म्हणून कांदा, लसूण वापरु नये असं माझं वैयक्तिक मत. कारण मी मा.बो.वरच वाचलं आहे कि नैवेद्याला लसुन्,कांदा चालत नाहि.त्या आधी ऐकलं नव्हतं.आमच्याकडे शाकाहारी काहिही चालतं नैवेद्याला म्हणुन विचारलं.>> भान, शक्यतो नैवेद्याला कांदा लसूण वापरत नाहीत कारण हे तामसी वृत्ती वाढवतात म्हणून उपास/नैवेद्याला वर्ज्य समजतात. पण माझ्या माहेरीसुद्धा नैवेद्याला कांदा लसूण वापरतात.
मी गुरूवार, शनिवार उपवास करायचे. सोडताना भाजी आमटी कांदालसूण घालून करायचे तेव्हा साबा ओरडलेल्या. पण मला नाही जमलं आठवड्यातून दोन उपवास, तेही दिवसभर न खाता रात्री बिन कांदा लसूण जेवण!
म्हटलं हे उगा पाळण्यापेक्षा राग, चिडचिड, भांडणं, खोटं बोलणं, उणीदुणी बंद करेन उपासाच्या दिवशी नाहीतर कांदा लसूण टाळा आणि क्रोध पाळा कशाला असलं! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुहास्य, आमच्याकडे सवाष्ण
सुहास्य, आमच्याकडे सवाष्ण असणे / नसणे या गोष्टी सारख्याच समजतात आई कडे आणि इथे साबांकडे पण.
माझी आई संक्रातीचे हळदीकुंकू वैगरे करत नाही. साबा करतात.
मी पहिल्या वर्षी त्यांची आवड म्हणून हळदी कुंकू वैगरे दिले. मलाही मजा वाटली. पण मग ते दरवर्षी सरसकट सगळ्यांनाच काहीतरी वस्तू नाही पटले, त्यापेक्षा ऑफिस मधल्या हाऊस किपिंगच्या बायकांनाच आणि घरी कामासाठी येणार्या ताईंनाच काहीतरी चांगलेच द्यावे असे वाटले. यावर्षी नेहेमी ज्यांच्या कडून भाजी घेते त्या मावशींना पण वाण देणार आहे.
सामी ---एकदम भारी .... मी
सामी ---एकदम भारी .... मी पण एक मस्त स कु स प GTG करते ह्या निमित्ता ने .....
ड्रीमगर्ल--<<<< कांदा लसूण टाळा आणि क्रोध पाळा कशाला असलं! स्मित>>>>.
हे बोलता बोलता सहज कल्पना सुचली म्हणजे लहान पण चे आई चे हळदी कुन्कु आठवले ---- तिने मुगाची डाळ आणी तान्दुळ खिचडीच्या प्रमाणात एकत्र करुन प्लास्टिक बॅग मधे घालुन वाटले होते .....तसेच करावे असे वाटत आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निवडलेल्या भाज्यांची
निवडलेल्या भाज्यांची पाकिटे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तयार इडली पीठ
बिस्कीट पॅकेटस
केक पॅकेटस
रेडी टु कुक पॅकेटस
असे वा तत्सम खाद्य पदार्थ दिले तर गृहिणींचे खरोखर आशीर्वाद मिळतील. निदान मुलांच्या डब्याचा प्रश्ण तरी सोडवा
पुण्याची विनिता, स्वस्ति आणि
पुण्याची विनिता, स्वस्ति आणि सामी - सवाष्ण नसलेल्या स्त्रीलाही तुम्ही तुमच्या घरी तोच मान देत आहात हे वाचून खूप छान वाटलं. आपल्या आईच्या पिढीसाठी कुंकू लावून घेणं, हळदी कुंकवाला बोलावणं असणं खूप मॅटर करायचं. आणि पतीचे निधन झाल्यामुळे ह्या गोष्टींना वंचित राहायला लागणं त्यांना खूप दु:ख देऊन जायचं
काही बायकांच्या घरी पाहुण्या बायका आलेल्या असताना त्या निघायला लागल्यावर फक्त सवाष्ण आणि कुमारिकांना कुंकू लावून पाठवतात. त्यावेळी सवाष्ण नसलेल्या स्त्रियांना काय मनःस्ताप होतो ते मी पाहिलय. खर तर मला अशा घरात हळदी कुंकू लावून घेणं अजिबात आवडत नाही पण ते माझे घर नसते म्हणून मी काही बोलत नाही.
हळदी कुंकू हे एक चांगलं गेट टुगेदर आहे असे माझे म्हणणे आहे पण मी स्वतः हळदी कुंकू करत नाही. ह्या मागचं कारण कदाचित हे असेल की त्यासाठी करायच्या पूजा आणि पाळायच्या प्रथा मला पटत नाहीत. पण आयुष्यात कधी हळदी कुंकू केलं तर मी सवाष्ण असणार्या आणि नसणार्या स्त्रियांमध्ये काही भेदभाव ठेवणार नाही हे नक्की.
आजच एका मैत्रिणीची पहिलीच संक्रांत आणि त्याहून महत्वाचे तिचा पहिलाच सण. तिला साम्गितलं की सासूबाईंना वगळू नकोस, घरात जसे लग्न झालेल्या बहिणीला, आईला, जावेला हळदी कुंकू लावून वाण देणार तसे सासूबाईंना सुद्धा कर. पाहू तिला पटतय का.
आपल्या आईच्या पिढीसाठी कुंकू
आपल्या आईच्या पिढीसाठी कुंकू लावून घेणं, हळदी कुंकवाला बोलावणं असणं खूप मॅटर करायचं. आणि पतीचे निधन झाल्यामुळे ह्या गोष्टींना वंचित राहायला लागणं त्यांना खूप दु:ख देऊन जायचं.त्यावेळी सवाष्ण नसलेल्या स्त्रियांना काय मनःस्ताप होतो>>>>> अजूनही हा प्रकार हळदीकुंकवाला होतोच.बाईला ती एक व्यक्ती म्हणून न महत्व देता जिचा नवरा हयातआहे,तिलाच महत्व दिले जातेय. वाईट गोष्ट म्हणजे नवीन पिढीसुद्धा(काही अपवाद वगळता) ,याबाबत वेगळा विचार करताना दिसत नाही.
अवांतर... माझ्या ऑफिसमधल्या हळदी कुंकू समारंभात,सवाष्ण नसलेल्या स्त्रियांना,वगळून इतरजणींना लावले होते.माझ्यापर्यंत आल्यावर मी करंडा घेऊन त्यांना ,हळदी कुंकू लावले व त्यांच्याकडून लावूनही घेतले.हा किस्सा
फक्त ओघात आले म्हणूनच लिहिलाय.
सोळा शृंगारापैकी एक कुंकू आहे.बाई लग्नाआधीही व लग्नानंतरही कुंकू लावत असते.
हळदी कुंकू हे एक चांगलं गेट टुगेदर आहे असे माझे म्हणणे आहे पण मी स्वतः हळदी कुंकू करत नाही. ह्या मागचं कारण कदाचित हे असेल की त्यासाठी करायच्या पूजा आणि पाळायच्या प्रथा मला पटत नाहीत>>>>> वेल,१००% सहमत आहे.माझी आई सुगड पुजायची/वटपूजन करायची, याचे कारण मुलीवर ते संस्कार व्हावे म्हणून.पण मीच(सातवी-आठवीत होते) तिला सांगितले की झाले इतके संस्कार बस झालेले.आता पुरे. तेव्हा पडत्याफळाची आज्ञा मानून आईने सर्व थांबवले.
तुम्ही सगळ्यानी नवी आयडिया
तुम्ही सगळ्यानी नवी आयडिया आवडली म्हणलात, खुप छान वाटले...
चला, नव्या युगात आपण ही नवे विचार मनात रुजवूया.. स्त्रीला चांगला दर्जा मिळवून देण्याचे काम स्त्रीच करू शकते.
हो मी पण ऑफिस मधल्या अशा
हो मी पण ऑफिस मधल्या अशा बायकांना धरुनच वस्तु आणते आणि त्यांना देतेही..
हळदी कुंकू ह्या कार्यक्रमाला
हळदी कुंकू ह्या कार्यक्रमाला सवाष्ण आणि कुमारिकांसोबत गतधवा स्त्रियांनाही आमंत्रण द्यावे, त्यांना पटत असेल तर त्यांनाही हळदीकुंकू लावून, वाण देऊन त्यांचाही तितकाच सन्मान करावा हा विचार मायबोली पलिकडेही पोहोचण्यासाठी काय करावे?
(मी हळदी कुंकू करावे आणि हा विचार अमलात आणावा ह्यापलिकडे काय करावे)
वेल, माझ्या आईने ज्या बायका
वेल, माझ्या आईने ज्या बायका कुंकू लावून घ्यायच्या नाहीत त्यांना हक्काने समजावून हळदीकुंकू लावले आहे. त्यांना ही हवे असते/आवडते पण लोक काय बोलतील या भितीने त्या नको म्हणतात असे मला वाटते. आई चे म्हणणे 'कळायला लागल्यापासून बालपणापासून तुम्ही हळदीकुंकू लावता मग आताच असा काय फरक पडतो'.
कोणी नकळत हर्ट होत असेल आणि
कोणी नकळत हर्ट होत असेल आणि आपल्यालाही पटत नसेल तर अशा प्रथा , असले मिनिंगलेस समारंभ करुच नयेत अॅक्चुअली!
गेट टुगेदर आणि गिफ्ट एक्स्चेंज हाच हेतु असेल तर 'लेडीज ओन्ली गेट टुगेदर' करावं सरळ इन्फॉर्मल .. उगीच सौवाश्ण - कुमारिका वगैरे लेबल्स च्या भानगडीत न पडता.. किती दिवस बायकांनीच बायकांचं कॅटॅगरायझेशन करायचं आणि एखादीला केवळ मॅरिटल स्टेट्स वरून बाजुला ढकलायचं !
त्यांना ही हवे असते/आवडते पण
त्यांना ही हवे असते/आवडते पण लोक काय बोलतील या भितीने त्या नको म्हणतात असे मला वाटते. आई चे म्हणणे 'कळायला लागल्यापासून बालपणापासून तुम्ही हळदीकुंकू लावता मग आताच असा काय फरक पडतो'.>>>+१
दीपांजली + १ मी नवरात्रात
दीपांजली + १
मी नवरात्रात देवीच्या दर्शनाला बोलावते, हळदी कुंकूवाला नाही
गेट टुगेदर आणि गिफ्ट
गेट टुगेदर आणि गिफ्ट एक्स्चेंज हाच हेतु असेल तर 'लेडीज ओन्ली गेट टुगेदर' करावं सरळ इन्फॉर्मल >>++११
किती दिवस बायकांनीच बायकांचं
किती दिवस बायकांनीच बायकांचं कॅटॅगरायझेशन करायचं आणि एखादीला केवळ मॅरिटल स्टेट्स वरून बाजुला ढकलायचं ! >> +१
sugaDa pujaayachii nasela
sugaDa pujaayachii nasela tara hallichyaa prathepramaaNe navina aalelaa mobile phonechi pujaa karaNyaas limbilaa suchavaave kaa?
सर्वांनीच एकत्र जमावं, गोडधोड
सर्वांनीच एकत्र जमावं, गोडधोड (किंवा अगोड! ;-)) खावं-प्यावं, हसावं-खिदळावं, आनंद साजरा करावा हा मूळ उद्देश. त्यात स्त्री-पुरुष, सवाष्ण-गतधवा-कुमारिका इ. इ. भेदभाव नकोच वाटतो!
भेटवस्तू कोणतीही लुटा, पण त्याबरोबर मने कटू होऊ देऊ नका.
सहमत.
सहमत.
किती दिवस बायकांनीच बायकांचं
किती दिवस बायकांनीच बायकांचं कॅटॅगरायझेशन करायचं आणि एखादीला केवळ मॅरिटल स्टेट्स वरून बाजुला ढकलायचं !>>+1000
त्याच सोबत वेग्वेगळ्या कारणांनी असं जे करतात त्यांच प्रबोधन कसं करायचं. इथे हकु बद्दल बोलतोय म्हणून हकु मध्ये कॅटेगयाझेशन करणार्यांना कसं समजवायचं?
Pages