Submitted by juyee on 14 January, 2011 - 02:43
सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....
संक्रांतीला घरोघरी हळदीकुंकुचा कार्यक्रम असतो... त्यात वाण / दान द्यायची/ करायची प्रथा आहे.
कोणकोणत्या वस्तू देता येतील ... ?सांगाल का...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हकु मध्ये कॅटेगयाझेशन
हकु मध्ये कॅटेगयाझेशन करणार्यांना कसं समजवायचं?
>> अश्या बायकांना समजावणं बरंच अवघड असतं. मी अश्या बायकांना तुमच्यावर अशी वेळ आली आणी तुम्हाला असे वगळले गेले तर आवडेल का असे विचारुन बघितले. त्यातल्या काही बायकांनी स्पष्ट "हो. तशीच पद्धत आहे आपल्या समाजात" असं सांगितलं. काहिंना हा प्रश्नच खुप अभद्र वाटला. काहिंना हि कल्पनाच नकोशी वाटली. "सौभाग्याचं मरण" हेच त्यांच्या लेखी आयुष्याची इतिकर्तव्यता होती.
एवढंच कशाला? मागे एका बाईंनी मला सांगितले कि "सवाष्ण" हा "सहवासिनी" या शब्दाचा अपभ्रंश आहे. "सहवासिनी" म्हणजे जी बाई आपल्या नवर्यासोबत राहाते ती. आता काळानुसार नवरा कामानिमित्त परगावी राहात असेल तर ठिके अन्यथा नाही. तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली कि मी ऐकलेल्या कथेनुसार कोल्हापुरची अंबाबाई ही बालाजीवर रागावुन कोल्हापुरात येऊन राहाते. त्यामुळे ह्या बाईंच्या लॉजिकनुसार तीपण सवाष्ण नाही का? तर या बाई "हो" म्हणाल्या. आता जर देवी ह्या दुय्यमतेतुन सुटली नाही, तिथे सर्वसामान्यांची काय कथा? नवरा आहे म्हणजे सर्वकाही.. नवरा नाही म्हणजे संपलं सगळं. मग तु जगतजननी का असेनास. थक्क करणारा विचार आहे.
पियू भन्नाट असतात बायका! माझे
पियू भन्नाट असतात बायका! माझे बाबा गेल्यावर आईला साबानी कुंकू लावले सहज एकदा तर आईने आमचे घरच वर्ज्य केले तेव्हापासून... आता घरातच ही कथा तर बाहेर तर काही विचारू नकोस.. खुद्द देवीला सोडत नाहीत आपल्या पूर्वग्रहदुषित विचारांतून म्हणजे काय!
आता घरातच ही कथा तर बाहेर तर
आता घरातच ही कथा तर बाहेर तर काही विचारू नकोस
>> खरंय. आपलीच आई म्हटल्यावर समजावणे सोपं असेल असं वाटतं आपल्याला. पण आपल्या आईलाही आपण नाही समजावु शकत बरेचदा. मग साबा इ. कडुन काय अपेक्षा ठेवायच्या?
.
.
किती दिवस बायकांनीच बायकांचं
किती दिवस बायकांनीच बायकांचं कॅटॅगरायझेशन करायचं आणि एखादीला केवळ मॅरिटल स्टेट्स वरून बाजुला ढकलायचं ! >> +१
किती दिवस बायकांनीच बायकांचं
किती दिवस बायकांनीच बायकांचं कॅटॅगरायझेशन करायचं आणि एखादीला केवळ मॅरिटल स्टेट्स वरून बाजुला ढकलायचं !>>>> +१००००००००
अश्या बायकांना समजावणं बरंच
अश्या बायकांना समजावणं बरंच अवघड असतं. मी अश्या बायकांना तुमच्यावर अशी वेळ आली आणी तुम्हाला असे वगळले गेले तर आवडेल का असे विचारुन बघि>>>>अशांना समजवायच्या भानगडीत पडूच नये. मरेनात का!!! अशा विचारापर्यंत मी आलेले आहे. जे आपल्याला पटते ते बिनधास्त करावे, कुणाचे ऐकून घेऊ नये, आणि कुणाला समजवण्याच्या भानगडीत पडू नये.
त्यामुळे ह्या बाईंच्या लॉजिकनुसार तीपण सवाष्ण नाही का? तर या बाई "हो" म्हणाल्या. >>> सामाजिक, मानसिक जाऊ देत, पण बाईची धार्मिक समजदेखील फारच खालच्या दर्जाची आहे. अशावेळेला आपण शांत बसायचं....
मी संक्रांतीचं हळदीकु़ंकू करणं तिसर्या वर्षापासून बंद केलं. बाकी, इतर कसलंही हाळदीकु़ंकू करत नाही. वाण वगैरे देण्यापेक्षा स्वतःसाठी-लेकीसाठी काहीतरी वस्तू विकत घेते. हौस म्हणून तिचं बोरन्हाण मात्र करते.
यावर्षी नेहेमी ज्यांच्या कडून
यावर्षी नेहेमी ज्यांच्या कडून भाजी घेते त्या मावशींना पण वाण देणार आहे.>>>>> आवडलं!
अश्या बायकांना समजावणं बरंच अवघड असतं.>>> यावर नंदिनी यांचा प्रतिसाद मस्त आहे.
मी स्वतः ह.कु करीत नाही,पण कोणाकडे यासाठी जाताना आवजून काहीतरी वस्तू घेऊन जाते.याला कारण माझी एक शेजारीण! आमच्या इमारतीमधील एकजण ह.कु करीत नव्हते.तर ही शेजारीण म्हणाली की लोकांची वाणे या दोघी सासु-सुना घेतात.मग लोकांना द्यायला नको का? हे ऐकून मी गार! परत शेजारीण वयाने मोठी.तेव्हापासून कानाला खडा लावला की ह.कु.स जाताना काहीतरी नेणे mustच.
आपल्याकडे कोणी पाहुणे आले
आपल्याकडे कोणी पाहुणे आले असतील तर जातांना आपण बायकांना हळदी-कुंकू लावतो तेव्हा मी अजिबात भेदभाव करत नाही सर्वांना लावते, काही सवाष्ण नसलेल्या बायका ते सहज स्वीकारतात आणि त्यांना बरे वाटते पण काहीना स्वतःलाच odd वाटते, अजूनही समाजाचा खूप पगडा आहे काहींच्या मनावर, ज्या प्रमाणात समाज-परिवर्तन व्हायला हवे तेवढे अजूनही नाही. sorry थोडे अवांतर लिहिल्याबद्दल.
मुळात एखाद्या बाईला नसेलच
मुळात एखाद्या बाईला नसेलच आवडत लाऊन घेतलेल्लं हळदी कुंकु ( यात समाजाने टॅग लावलेल्या सगळ्या बायका आल्या , कुमारीका-मॅरिड-डिव्होर्स्ड-विडो) तर कशाला जबरदस्ती करायची लावायची आणि मुळात जबरदस्तीने ते लावणं कसं पवित्रं /सन्मानीय वगैरे आहे हे प्रत्येकीला पटायलाच हवं का ?
काही बायका असतात ओम शान्ति ओम च्या दीपिका सारख्या ' एक चुटकी सिंदूर कि किमत ' वाल्या आणि काही अशाही असतील 'व्हॉट्स द बिग डिल ' बाटणार्या .. दोन कलर चे ठिपके कपाळाला लाऊन घेण्यात काय अशी धन्यता आणि काय ते पावित्र्यं ' असे विचार करणार्या !
लेडीज ओन्ली गेट टुगेदर म्हंटल् कि 'हळद कुंकु' वगैरे टिपिकल गोष्टी आल्याच पाहिजेत का ?
मुळात स्वतःलाच जर खटकत असेल तर स्टॉप गेटींग ऑब्सेस्ड विथ इट..
दीपांजली तुम्ही म्हणता ते
दीपांजली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हळदी- कुंकू लावून घ्यायला आवडत नसेल तर वेगळी गोष्ट पण कधी असा अनुभव येतो की त्या म्हणतात की अग आता मी अशी झाले (sorry मला हे लिहायला पण बरे वाटत नाही), मला नको लावूस, प्रथा आहे. हे ऐकल्यावर बरे नाही वाटत.
मी हळदी-कुंकू करते एक गटग
मी हळदी-कुंकू करते एक गटग म्हणून. बायका-मुलींचा गप्पाटप्पा सेशन म्हणून मला फार आवडतो हा प्रकार. मी आलेल्या सगळ्या मुलींना/आज्ज्यांना/मैत्रिणींना कोणतीही कॅटेगिरी न करता हळद-कुंकू लावणे, फळं , फुल इ. देणे अत्तर-गुलाबपाणी वगैरे सगळे सारखे करते. माहेरी बर्यापैकी कर्मठ परिसरात वाढल्यामुळे बराच विचित्रपणा पाहिला आहे. बायकांना समजावणं बरंच अवघड असतं. वडील गेल्यानंतर आईने पण खूप सोसलं आहे. समाज आणि या चालीरिती(?) किती वाईट असतात हे जवळून पाहिलं आहे. त्यातून मी जाणीवपूर्वक शिकत गेले आणि स्वतःला त्या जागी ठेवत गेले.
आणि आता अमेरिकेत राहताना सुद्धा काही मुली असेच बुरसटलेले विचार बाळगत जगत असतानाही पाहिलं आहे. अर्थातच राग येतो.
वाण देण्यासाठी गेल्या १-२ वर्षांत आम्ही काही मैत्रिणींनी ठरवून नवीन प्रथा पाडली आहे. जवळच फूड बँक आहे जिथून होमलेस लोकांना, वृद्धाश्रमांना, आणि फोस्टर केअर सेंटरला अन्न पुरवठा होतो. तिथे काही डोनेशन देतो. आणि जमेल तसे कामही करतो. जितक्या मैत्रिणींना वाण द्यायचं असेल तेवढे पाउंड्स तांदूळ किंवा बीन्स, किंवा कॅन फूड असं जे जमेल ते देतो.
हकु ला येणार्या प्रत्येकीचं घर भरलेलं असतं. आपल्या त्या एवढ्याश्या वस्तूने असा काय फरक पडणार त्यांच्या जीवनात. मूठभर तांदूळाच्या ओटीपेक्षा तेच जर एखाद्या फोस्टर केअर दिले तर लहान पोरे जेवल्याचं मानसिक समाधान तरी मिळते.
अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न. मी स्वतः देखील पारंपरिक प्रकार काही वर्षे केला मग ते वाण लुटण्यामधला फोलपणा दिसायला लागला. जेव्हा वाण म्हणून मिळालेल्या प्लास्टीक ताटल्या, बोल्स, अॅलर्जी देणारे साबण अस काय काय घरी साठायला लागल मग सोडून दिलं वाण म्हणून काहीतरी देणं.
बरोबर आहे तुझी कळकळ
बरोबर आहे तुझी कळकळ अंजु.
म्हणूनच मुळात अशा गेट टुगेदर्स मधे कोणालाच नाही लावलं हळदी कुंकु तर काय बिघडेल .. 'ग्रूप ऑफ लेडीज एकत्रं आल्यावर नाही झाला 'हळदी कुंकु' सामारंभ' तर कोणी एंजॉय करु शकत नाहीत का ?
दीपांजली -- पटलं. आणि
दीपांजली -- पटलं. आणि अन्जूचही पटलं. माझी आई स्वतः असं म्हणायची माझे वडील गेल्यावर.
खरंतर मनातून तिला खूप हौस आहे. अजूनही सगळे समारंभ तिला आवडतात. पण ती स्वतःहूनच जरा मागे मागे राहते.
हो हो अगदी, मी स्वतः
हो हो अगदी, मी स्वतः हळदी-कुंकू असे करत नाही, कधी कधी पाहुणे आले असतील आणि जातांना एखादी बाईच कधी कधी आठवणीने म्हणते, चल आम्ही निघतो आता, कुंकू लाव असेही होते.
माझी आईपण थोडी कर्मठ विचारांची आहे, आम्ही बहिणी तिला समजावतो की तू हळदी- कुंकू लावताना भेदभाव करू नको.
धनश्री तुमचा उपक्रम आवडला. यंदा मी आमच्या शाळेला देणगी देणार आहे, मागच्यावर्षी एका अनाथाश्रमात साखर, खाऊ आणि थोडे पैसे असे दिले होते.
वाण देण्यासाठी गेल्या १-२
वाण देण्यासाठी गेल्या १-२ वर्षांत आम्ही काही मैत्रिणींनी ठरवून नवीन प्रथा पाडली आहे. जवळच फूड बँक आहे जिथून होमलेस लोकांना, वृद्धाश्रमांना, आणि फोस्टर केअर सेंटरला अन्न पुरवठा होतो. तिथे काही डोनेशन देतो. आणि जमेल तसे कामही करतो. जितक्या मैत्रिणींना वाण द्यायचं असेल तेवढे पाउंड्स तांदूळ किंवा बीन्स, किंवा कॅन फूड असं जे जमेल ते देतो.
<<
धनश्री , आव्डला हा उपक्रम , मेक्स सो मच सेन्स !
हळदी-कुंकु कार्यक्रमाचे
हळदी-कुंकु कार्यक्रमाचे धार्मिक महत्व किती ते माहित नाही. पण मला असे कार्यक्रम आवडतात. सर्व बायका मस्तपैकी नटुन-सजुन येतात, गोड गोड गप्पा मारतात, नविन ओळखी होतात, एकाच कॉम्प्लेक्समध्ये असुनदेखील कधी न बघितलेल्या बायका भेटतात. मला तर असे कार्यक्रम बायकांच्या आयुष्यातील ताण-तणाव दुर करणारे वाटतात. आता त्यासाठी हकु कशाला करायला पाहिजे हे आलेच. पण नुसते गटग किंवा वन डिश पार्टी असले कि चांगल्या ओळखीच्या बायकांनाच बोलवता येते किंवा त्यांनाच जास्त कंफर्टेबल वाटते. तेच हकु आहे म्हतल्यावर सर्व वयाच्या बायका आरामात येतात. तो एका ठराविक ग्रुपचा कार्यक्रम न वाटता सासु-सुना, नणंद-भावजय सर्वांनाच आवडतो. बाकी ते मॅरिटल स्टेट्स वरुन एखादीला बाजुला करणे कधीच नाही पटले.
मुळात बायकाच दुसर्या बाईला
मुळात बायकाच दुसर्या बाईला छळत असतात.समाजाचं काय घेवून बसलात?
अगदी स्वतः मॉर्डन आहोत(त्यांच्या मते मॉर्डन म्हणजे फक्त कपडेच व राहणीमान अश्य बायका) असे दाखवणार्या व फुकटची मत बोलणार्या, लिहिणार्या प्रत्य्क्षात एकदम भयानक असतात.
ह्याच उदाहरण पाहिलेय, महिला मंडळ चालवणार्या आमच्या पुण्यातील बिल्डिंग मधल्य बायका ज्या भाषणं देतात की बाईने असे करावे , तसे करावे... त्यातलीच एका बाईचा नवरा गेल्यावर, गॉसिप सुरु झाले की बाई एकदमच ताठ.. आली लगेच मंडळाची कामं करायला, काय बाई फॅशनच्या साड्या अजून नेसतेय वगैरे.
हि बाई मधल्या मीटींगला आली आली की ह्या नालायक बायकंची, कुजबुज सुरु, साडी बघ, कुंकू सुद्धा लावतेय...
इतका अचाट आणि हिपोक्राईट बायका पाहून मी मेंबरशीप घेण्याचा विचार सोडला. मी भारतात परतल्याने मला बकरा बनवत होत्या की आम्ही किती सुधारक म्हणून काम करतो, ह्यांव नी त्यांव.... मी खर तेच कारण सांगितले. तुमचा दुटप्पी स्वभाव मला जमायचा नाही. सोसायटीची मेंबर होणं वेगळं पण महिला मंडळाची मेंबर होण्यास जबरदस्ती करु नका. निर्लज्ज बायका तश्याच दात फेंदारून हसल्या पण इतर ज्या जॉइन करायला आलेल्यांनी , नंतर कळवतो आमचा निर्णय म्हणून घरी गेल्या.
अमेरीकेत रहाणार्या व मी अशी विचाराने प्रगत, तशी प्रगत सांगणाया अश्या बायका उगाच विधवा बायकांविषयी पण गॉसिप करत, किंवा डिवोर्सी झालेल्या कोणी ग्रूप मध्ये बायका असतीलच तर, ती पहा ; नवरा सोड्लाय पण कशी मिरवतेय. किंवा नवर्याने सोडलय तरी रूबाब बघा..
ह्या अश्या त्यांच्या कुचाळक्या. तेव्हा समाजाला सुधारण्यापेक्षा आपल्याच आजू बाजूच्या बायकांना फटकारावे अश्या कोणी दिसल्याच वागताना, बोलताना. त्या बायकंना फरक पडला की नाही पेक्षा कमी हिंमत करतील तोंड सोडून बोलायला व दुसर्या विधवा/डिवोर्सी बाईला टोचून बोलताना.
माझी आजी एकदमच कर्मठ. तिच्या
माझी आजी एकदमच कर्मठ. तिच्या दबावाला घाबरून आईला करावे लागायचे. पण जशी आजी गेली, मी आईला सांगितले की आता काळ बदललाय. तुला उगाच ह्या अवजड प्रथ करायचे कारण नाही. तब्येत बरी नसताना सुद्धा सासरची प्रथा सांभाळा. कशाला? दोन दोन नवरात्रं, तेवढी वेळा हळदी कुंकू. गरजच नाही जर एखादी गोष्ट मनाला, शरीराला त्रास देते तर.
Pages