'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
काहीच नव्हती अगं
काहीच नव्हती अगं
रणजित काका ओमला बोलला बरं
रणजित काका ओमला बोलला बरं झालं आधी कळालं ते.
नण्तर नखं काढली असती तिने.
तुझही तुझ्या आई बाबांसारखच झालं असतं पुढे.
मयेकर.....अनुमोदन....बावर्ची
मयेकर.....अनुमोदन....बावर्ची सिनेमा आठवला, " यहीं हमारी फिल्म ऑफबीट हो जाती है, गाना गाडीवान गाता है ।"
मी पूर्वी ही मालिका बघत असे.
मी पूर्वी ही मालिका बघत असे. आता नियमितपणे बघत नाही. मालिकेतला रस संपण्यामध्ये ईशाचं कॅरेक्टर हे मुख्य कारण.
ती त्या अश्विनीशी ज्या प्रकारे rudely बोलते आणि ती हिची गुलाम असल्यासारखी हुकूम सोडते- ते बघवायचं नाही. इतकी उर्मट रुममेट आणि मैत्रिण कोण खपवून घेईल?
स्पृहा उत्तम अभिनेत्री आहे पण कॅरेक्टर लिहितानाच गंडलंय असं वाटतं. उमेश कामत मात्र मस्त!
ओम चे बाबा म्हन्जे मोहन जोशि
ओम चे बाबा म्हन्जे मोहन जोशि कूथे गायब झाले?
स्पृहा उत्तम अभिनेत्री आहे पण
स्पृहा उत्तम अभिनेत्री आहे पण कॅरेक्टर लिहितानाच गंडलंय असं वाटतं. उमेश कामत मात्र मस्त!>> +१११
इथे इशा म्हणून कोण बरं छान वाटली असती? मुक्ता मोठी वाटली असती उकासमोर आणि तो अगदीच जास्त गोड व बिच्चारा वाटला असता... नाहीतर एखाद्या फटकळ वकीलाची भूमिका मुक्तासाठी परफेक्ट होती कारण बाकीच्या वेळी ती डोक्यात नसती गेली. घरच्यांसोबत, रूमीसोबत छान वागली असती.
मोठे बाबा उर्फ मोहन आगाशे एनी टाईम फेव.. आणि चक्क तो शेजारचा चिकटू म्हातारबाबा पण आवडायला लागलाय. इशा चा रोल खरंच चांगला लिहायची गरज आहे किंवा इशा तरी बदलायची...
ते पिवळ्या गवताचं चित्र बित्र... कोण आहे म्हणे संवाद लेखक??? डोक्यात जाताहेत ते असंबंध संवाद... अगं राग आलाय ना... मग गप्प बसून नुसतं भुवयांतून व्यक्त कर निषेध. ते जास्त इफेक्टीव्ह वाटेल.. पण बोलू नकोस बायो... काळं शेत, पिवळं गवत नी काळे पांढरे बैल...
गप्प बसली की सफरचंद कापते... अरे काये हे!!!
नविन पिढीच्या मानसिकतेवर
नविन पिढीच्या मानसिकतेवर जबरदस्त पगडा बसवण्याची ताकद ही मालिका आतां दाखवते आहे -
(No subject)
भाऊ, सहीच.
भाऊ, सहीच.
भाऊ, जाम आवडलं!!
भाऊ, जाम आवडलं!!
मला हि सिरियल बघवत नाही.
मला हि सिरियल बघवत नाही. गोष्ट एकदमच बंडल. काय तो उका सगळ्यांना फुकटात घेवून घरात ठेवलय.
त्यात त्यांचे उच्चार.
स्पृहाचे ते , बास, माला ना(मला ना म्हणण्याएवजी), उगाच.... आणि नाही नाही नाही म्हणत किंचाळणं...
त्यात ती स्पृहा विचित्र वाटते. खरेतर दिसते. जाडी, बुटकी, भयनाक रंगाचे चुडीदार वगैरे.
सुरुवातीच्या टायटल साँगमध्ये तिला तो सफेद गाउन दिला आहे ना, अरे बापरे भयानक दिसते. जाडी. स्थूल हात, मुरुमं. हे व्यतिगत टीपणी वाटली तरी पुर्णपणे कॅरक्टरला शोभत नाही म्हणून लिहिलेय. नाहितर ती उंच माझा झोकात बरोबर वाटलेली. चेहराच इतका वरण भात आहे तिचा , तेव्हा त्यात शोभलेली.
उका का इतका आवडतो काहींना हे एक कोडंच आहे मला.(पण असते एकेकाची आवड.. ते म्हणतात ना पसंद अपनी..)
काही काही अँगले मध्ये म्हतारा, बुटका, हनुवटी आत असलेली खूप दिसते.
स्पृहा तिरस्कार क्लब स्थापन
स्पृहा तिरस्कार क्लब स्थापन करायचा का एक ?
<< स्पृहा तिरस्कार क्लब
<< स्पृहा तिरस्कार क्लब स्थापन करायचा का एक ? >>
मालिका आताशा बंडल वाटायला
मालिका आताशा बंडल वाटायला लागल्ये. एक उकाच तारणहार आहे मालिकेचा
भाउकाका
भाउकाका
ती स्पृहा फार उलट बोलते. आता
ती स्पृहा फार उलट बोलते. आता तर मला उ.का चा पण राग यायला लागला आहे.
भाऊ, सहीच.
भाऊ, सहीच.:)
स्पृहा दिसायला यथातथाच आहे.
स्पृहा दिसायला यथातथाच आहे. मालिकेची हिरवीण म्हटली तर. पण दिसण नेहमीच बाजूला ठेवावं आणि अभिनय बघावा. " उंच माझा झोका " मध्ये तिने खरच चांगला अभिनय केला होता. पण या मालिकेत तिच्या पात्राला असा काय स्वभाव दिला आहे कि बासच. एक नंबरची आगाऊ/अहमन्य .
त्यामुळे ती डोक्यात जातेय. स्पृहाला वेगळ्या स्वभावाच करेक्टर रंगवण्याची संधी मिळालेय. पण त्यामुळे ती डोक्यात जायला लागलेय. लोक करेक्टर चा तिरस्कार करण्याऐवजी स्पृहाचा तिरस्कार करायला लागली आहेत का?
उका पण आता मोठा दिसायला लागलाच आहे. लग्नाचा मुलगा शोभत नाहीच
झंपी, यु सेड इट
झंपी, यु सेड इट
सॉरी टु से, पण बीना मेक अप ची
सॉरी टु से, पण बीना मेक अप ची ती काल भयानक दिसत होती. वर शेपटी बान्धलेली छोटी मान्जरीण किन्वा उन्दरीण. अपरे नाक मुमताजला शोभायचे, पण हीला अजीब्बात नाही. चपटा बनपाव वाटते ती.
एखाद्या व्यक्तीवर एवढ्या
एखाद्या व्यक्तीवर एवढ्या खालच्या लेवल वरची चिखलफेक पाहून, एक मायबोलीकर म्हणून शरम वाटली
अरे नसेल ती अभिनय चांगला करत, पण एखाद्याच्या शरीरावरून इतक्या कमेंट ?
असो चालू द्या
अहो बन्याभाऊ तुम्ही इतर
अहो बन्याभाऊ तुम्ही इतर बाफान्वर बघा कशा कमेन्ट्स केल्यात ते. त्या आधी वाचा एकदा, लोका सान्गे ब्रम्हज्ञान कशाला? आणी तिचे दिसणे सोडाच, ती किती फडाफडा सगळ्याना बोलताना दाखवलीय ते बघा आधी. कुणीही बाई किन्वा पुरुष इतके रुड वागुच शकत नाहीत, अन्यथा ते सायकीक असतील तरच.
सगळी दुनिया तिची शत्रु असल्यासारखी दाखवते ती. ती एलदुगो मधली मुक्ता किती समजदार दाखवलीय.
आधी सिरीयल बघा.
ओम चे बाबा म्हन्जे मोहन जोशि
ओम चे बाबा म्हन्जे मोहन जोशि कूथे गायब झाले?>>>+अनलिमिटेड
मोजो नेहमी गोडबोलेंच्या मालिकांतून मध्येच गायब होतात... उदा. अग्निहोत्र (रिप्लेस्ड बाय नारकर), एलदुगो (कि पहिली?)
बहुदा बोअर होतात कथानकाला
ईशाचा रोलच फार उथळ आणि बेकार
ईशाचा रोलच फार उथळ आणि बेकार आहे, त्यात स्पृहाची ओरिजिनॅलिटी भर घालते...
@रश्मी ताई मी कोणालाही
@रश्मी ताई
मी कोणालाही त्याच्या वयक्तिक शरीरावरून कमेंट्स केलेल्या नाहीत कधीच
मी मालिका बघून काय करू , त्यात ती कशीही वागताना दाख्वून्देत कि , म्हणून एखाद्याला असे बोलणे कितपत शोभते ? तुम्हालाच नाही एकंदरीत सर्वांनाच हा प्रश्न आहे
मोजो नेहमी गोडबोलेंच्या
मोजो नेहमी गोडबोलेंच्या मालिकांतून मध्येच गायब होतात... उदा. अग्निहोत्र (रिप्लेस्ड बाय नारकर), एलदुगो (कि पहिली?
मोहन जोशि नाहि , गिरिश ओक याना रिप्लेस्ड बाय नारकर
अहो तुमचे बरोबर असेलही.
अहो तुमचे बरोबर असेलही. आम्हालाही नाही आवडत असे बोलणे. पण तो रोल स्वीकारताना कोणत्या बेसिसवर हे स्वतचे कॅरेक्टर त्यात बसवतात देव जाणे. तरीही मी म्हणेन की सिरीयल बघाच, निदान आताचे लेटेस्ट भाग तरी बघा.
मला आता कथेतही दम वाटत
मला आता कथेतही दम वाटत नाहीये. अस वाटत कि काहीतरी चुकीच चालू आहे. सिरीयलचा दर्जा तो नाहीये, जसा मला वाटला होता.
रच्याकने,
ए.ल.दु.गो. ची सीडी आलीये विकायला मार्केट मध्ये.
पुण्याची विनिता:
पुण्याची विनिता:
आपल्याकडे हे असंच का
आपल्याकडे हे असंच का असतं?
म्हणजे एकतर नायिका डोक्यात जाण्याइतकी गरीब, सहनशील, ॲडजस्ट करणारी (डोअरमॅट) असते- अगदी मुक्ता बर्वेची राधासुध्दा शेवटी त्या ढोल्यासाठी पारंपारिक बायको झालीच.
किंवा मग हे दुसरं टोक- आगाऊ, rude, उध्दट.
Pages