एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे या धाग्यावर कामत आजोबांचे पात्र न आवडल्याबद्दल काही जणांनी लिहिले होते. पण कालचे त्या पात्राचे वागणे एकदम सही होते. आजीच्या मागे पडण्यात त्यांचा 'माणसांचा सहवास' एवढाच उद्देश होता. ते किती एकटे आहेत हे काल खूप टोकदारपणे दाखवले होते. >> माधव, अनुमोदन. मी ही लिहिले होते की ते पात्र मला आवडले नाही, कारण तेव्हापर्यंत त्यांचा फक्त पोरकटपणाच दाखवला होता सिरियलमध्ये. कालचे त्यांचे संवाद खरंच परिणामकारक होते.

मी त्या अश्विनीच्या जागी असते तर एक मुस्काटात ठेवून ही सगळी नाटकं इथं नाही आपापल्या घरी करायची असं निक्षून सांगितलं असतं.>>>+१

कामत आजोबांचे पात्र >> कालचे त्यांचे संवाद खरंच परिणामकारक होते.

>> त्या महाएपिसोडमध्ये पण त्यांची माणसांची/ सहवासाची गरज छान जाणवली होती.

इशा वकील आहे ना? मग किमान ओम असा का वागला हे समजून घ्यावंसं पण तिला वाटत नाही का? ओमचा काका आल्यावर किती उर्मटप्णा दाखवते.. त्या मैत्रीणीशी पण सतत अरेरावीने बोलत असते.

त्या मैत्रीणीशी पण सतत अरेरावीने बोलत असते.>>> अनुमोदन. आजच तिला किती आगाऊपणे कॉफी करायला सांगत होती.

ईशा आगाऊ, उर्मट आणि निर्बुध्द आहे. आत्ताच नाही आधीच्या भागांतपण तशीच होती. मला तेंव्हाच वाटायचं की ह्या ओमसारख्या मुलांना ह्या अशाच आगाऊ, उर्मट आणि निर्बुध्द मुली कशा भेटतात आणि आवडतात. मलातर ओम तिला "जा उडत" सांगताना आणि मग एखाद्या अश्विनीसारख्या सेंसिबल मुलीशी त्याचं लग्न झालेलं बघायला खूप आवडेल.

राखी जियो...
या घरात पुन्हा इशाचा विषय नको हे सांगणारा ओमही आवडला मला.
काल काय झालं सांगा जरा, काल चुकली ही मालिका...

मुळात ओम खोटं बोलतो कारण या इशाचा आजोबा त्याला सांगतो की आम्हाला आम्ची इशा एकत्र कुटुंबातच द्यायची आहे, आईवडील वेगळे झालेले वगैरे घर नको. पन या इशाबाईंचे वागणे पाहता त्या एकत्र कुटुंबात काय टिकून राहणार आहेत.

सजन रे झूठ मत बोलो निव्वळ फार्सिकल मालिका होती, त्यामुळे मस्त एम्जॉकरायता यायची. ही मालिका फर्सिकल विषय घेऊन इमोशनल केल्याने सगळंच बोंबललंय.

नंदिनी अनुमोदन धड विनोदी नाही धड इमोशनल नाही. पार कचरा केलाय त्या इशा ने.
लग्न करून जा निघून म्हणावं आता. अभिनय करण्याचा निष्फळ प्रयत्न बास झाला.

या इशाबाईंचे वागणे पाहता त्या एकत्र कुटुंबात काय टिकून राहणार आहेत.

>> खरंय.. तिच्यामते एकत्र कुटुंब म्हणजे सगळ्यांनी मिळुन तिचे लाड करायचे.
मला तिच्या घरातल्या त्या इटुकल्या मुलीची दया येते. ती लहान आणी कैकपटीने गोड असुनही तिच्यापेक्षा जास्त अटेंशन इशाला मिळतं घरात.

'सजन रे झुठ मत बोलो' मध्ये पण असंच होतं का? म्हणजे सुमीतच्या प्रेयसीला लग्नाआधीच हे सगळं खोटं आहे हे कळतं का? कळत नसेल तर मग त्याचे नातेवाईक असल्याचं नाटक खुप एपिसोड्स चाललं का? मी 'सजन रे..' नीट पाहिली नाही.

मस्त होती मालिका ती>>>> हो आणि त्यात सुमीत राघवन होता Happy

दक्षिणा नको स्वतःला इतका त्रास करुन घेउ. ९ वा. इतर सोनी-झी-स्टार वर बागड. नैतर मुझिक चॅनेल्स. फुड चॅनेल्स. Happy

ईशा हे पात्र अत्यंत उर्मट आणि तापट दाखवले आहे. एकत्र कुटुंबात राहुन सतत हिला अटेन्शन मिळावे असे काही हिने अचिव्ह केले आहे असेही दाखवले नाहिए. फक्त हिला आजोबांसारखे यशस्वी वकिल व्हायचे आहे. अशा तापट वकीलाकडे कोणी आपला प्रॉब्लेम घेऊन कशाला जाईल?
हिचे ओमच्या घरुन निघाल्यापासुनचे वागणे फारच विचित्र दाखवले आहे. हिच्या घरच्यांना काय अपेक्षित आहे की असले विचित्र ध्यान ओमच्या घरच्यांनी सांभाळुन घ्यावे? एखाद्याला स्पेस द्यावी पण किती? काल तर हाईट झाली रणजित काकाशी वागायची.
ह्यातुन काय दाखवायचे आहे दिग्दर्शकाला? रबर ताणले तर तुटते हे माहित नाही का?

इशा स्वतःच्या आईलाही किती हाडत्-हुडुत करते आणि नोकरासारखी वागवते. तरी ती मायमाऊली लोचटासारखी तिच्या मागे मागे बाळा बाळा करत फिरत असते. आशुलाही ती दारातल्या कुत्र्यासारखी वागवते. मुळातच अत्यंत उर्मट व आगाउ कार्टी (पुलंच्या नारायण मधली ती अर्पिता की कपर्दीका..जिच्या उगीचच एक ठेवून द्यावीशी वाटते ती मुलगी लहानपणीची इशाच असेल असे वाटते Happy ओम्या सांभाळ रे बाबा ! Happy

इशा स्वतःच्या आईलाही किती हाडत्-हुडुत करते आणि नोकरासारखी वागवते. तरी ती मायमाऊली लोचटासारखी तिच्या मागे मागे बाळा बाळा करत फिरत असते.>>>>

हे प्रत्यक्ष पाहिले आहे...मुलीला आपल्या आई-वडिलांबद्दल आज्जीबात माया,प्रेम नाही. Sad तरीही आई वडील खूपच लाड करतात... आई म्हणजे तर पाय्पुसानेच आहे,खरतर पायापुसाण्यालाही किमत असते पण त्या माउलीला नाही ... Sad

आजच्या भागात पण काय उगिचच त्या काकाचा अपमान केला तिने.
एक वेळ समोर उभं राहून ओमला निदान जाब विचारावा असं ही तिला वाटू नये? कठिण आहे.
अशिक्षितातला अशिक्षित माणूस पण ती तयरी दाखवतो. सिरियल मध्ये तर अकलेचं दिवाळंच आहे लिखाण काय आणि दिग्दर्शन काय.. धन्य... (खास करून स्पृहा बाई)
आवरा त्यांना.

तिला खर तर ओम चे हे कुटुंब अस अतरंगी काय अस वाटतच होत . तिचा दृढ विश्वास वगैरे नव्हताच . फक्त ती डोळ्याआड करत होती. जे ती डोळ्याआड करत होती ते अस समोर आल्यावर तिला इतका धक्का बसण्याची खर तर आवशकता नव्हती. आणि ज्या पद्धतीने ती वागतेय ते तर बिलकुल समर्थनीय नाहीये. एक लाडोबा असली तरीही..तिचे वडील तिला बोलताना दाखवलेच आहेत. आणि घरच्यांचा काय दोष.? तू त्यांच्यावर एवढी आरडून ओरडून खेकसून का बोलतेस? घरचे लोक तुला एवढे जपत असतान त्यांच्यावर इतक ओरडण्याची बिलकुल जरुरी नाही. एवढी शिकल्येस न तू ?

सुमेधाव्ही....प्रचंड अनुमोदन तुमच्या पोस्टीचं....ती ईssssशा ओमच्या घरी जाऊन नवा रंग लावूया का वगैरे अकलेचे तारे तोडत होती तेव्हाच मला हे वाटून गेलं होतं की, हीच ती पु.लं.ची 'नारायण' वाली, लहानाची मोठी झालेली 'चालू फॅशन' चं नाव वाली आगाऊ कार्टी.
बाकी घरचे कितीही पुढारलेले असले तरी ईशा काय झालं सांगत नाहिये आणि बाकी सगळे गप्प बसलेत हे पटत नाही. स्पेस देणं वगैरे मान्य. काहीतरी सीरियस आहे हे स्पष्ट दिसतंय, तेही तिच्या होणार्या नवर्याबद्दल ती विचित्र विधानं करतीये, मग तिला विश्वासात घेऊन नाहीतर कानाखाली वाजवून सांगितलं असत एखादीच्या आईवडिलांनी नाटक बंद कर आणि काय झालंय सांग आधी.

ईशाचं बोलणं, वागणं आतां खूपच खटकतं. फक्त, दोष स्पृहाचा, लेखकाचा, दिग्दर्शकाचा, निर्मात्यांचा कीं कांहीश्या नियमितपणे ही एकच मराठी मालिका पहाणार्‍या माझाच, या संभ्रमात मीं सध्यां आहे !!

ईशाचं कॅरॅक्टर सजन रे मधल्या टिकू ताल्सानियाच्या कॅरॅक्टरवर बेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काहीही खटकणार नाही. Wink

<<.... टिकू ताल्सानियाच्या कॅरॅक्टरवर बेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. >> पण आतां तें मराठी प्रेक्षकांच्या जीवावर बेततंय ना !!! Wink

मराठी प्रेक्षकांना नवीन म्हणून काही पहायलाच नको.
वर तक्रार करणार की काही बदलतही नाही. बाकीच्या मालिकांतल्या नायिका रडतात त्याऐवजी इथे नायकाला रडताना दाखवले. हाही एक क्रांतिकारक बदल.

मालिका बघणं केव्हाच बंद केलं पण अधूनमधून इथे डोकावल्यावर मात्र जाम मजा येते. सगळ्यांची नुसती धुसफुस चालू आहे त्या इशावर नतद्रष्ट कार्टी असल्यागत Happy
बाय द वे, रणजीतकाकाची प्रतिक्रिया काय होती इशाच्या वागण्यावर?

बाकी घरचे कितीही पुढारलेले असले तरी ईशा काय झालं सांगत नाहिये आणि बाकी सगळे गप्प बसलेत हे पटत नाही. स्पेस देणं वगैरे मान्य. काहीतरी सीरियस आहे हे स्पष्ट दिसतंय, तेही तिच्या होणार्या नवर्याबद्दल ती विचित्र विधानं करतीये, मग तिला विश्वासात घेऊन नाहीतर कानाखाली वाजवून सांगितलं असत एखादीच्या आईवडिलांनी नाटक बंद कर आणि काय झालंय सांग आधी.

>> अनुमोदन. हि लेखकाची चुक आहे.

Pages