एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉरर सिनेमात काम करायचे असेल तिला पुढे. गुढ वातावरण, हातात सुरी, बॅकग्राउन्डला चमत्कारीक सन्गीत आणी चन्द्राच्या प्रकाशात फळे कापणारा हात........!!!!

नुसतं हातावर का फिरवली पण सुरी? सरळ गळ्यावर तरी फिरव म्हणावं (स्वतःच्या हं)
म्हणजे निदान आमची तरी सुटका होईल Proud

दक्षे... Rofl

युरी,

टायटल सॉंग बदललेलं नाही ग.
ते शेवटच कडव होत गाण्यातल....सुरवती-सुरवातीला दाखवायचे नंतर ते दाखवण बंद केल होत. पण आता दुसऱ्या कडव्या ऐवजी ते दाखवतायत.

टायटल सॉंग बदललेलं नाही ग.
ते शेवटच कडव होत गाण्यातल....सुरवती-सुरवातीला दाखवायचे नंतर ते दाखवण बंद केल होत. पण आता दुसऱ्या कडव्या ऐवजी ते दाखवतायत.

>> ठांकु.. मी भलतीच कन्फ्युज झाले होते काल.

घरी ती काय बडबडली ते बघून तिला धक्का बसलाय की वेड लागलंय अशा प्रश्न पडला.+१११११
स्पृहा प्रचंड डोक्यात जायला लागलेय. कालचा पूर्ण एपिसोड बंद करून टाकला. डोक फिरवते ती स्पृहा

<< भाऊ चित्राखाली काय लिवलाहा? दिसाक नाय काय पण.>> दिसाक नाय , तरी पण वर "भाऊ मस्तच " असो प्रतिसाद कसो इलो ? कमाल आसा !! Wink
[ खालीं असां लिवलाहा - " अग, आपल्या एकाच लग्नाची एकुलती एक गोष्ट असूनही मला आतां ती खूप बरी वाटूं लागलीय " ]

नुसतं हातावर का फिरवली पण सुरी? सरळ गळ्यावर तरी फिरव म्हणावं (स्वतःच्या हं)
म्हणजे निदान आमची तरी सुटका होईल >>>> मग काय्य च्यायला.........

<< मला दिसत आहे खाली लिहिलेले, म्हणून लगेच प्रतिसाद दिला.>> तें कळलं म्हणूनच दक्षिणाच्याच संगणकाचा कदाचित प्रॉब्लेम असावा असं सूचित केलं.
<< डोक फिरवते ती स्पृहा >> मला अजूनही वाटतं " डोकं फिरवते ती ईशा " म्हणणं ठीक आहे; नेमून दिलेलं काम करत्येय त्या स्पृहाला दोष कसा जातो ?

मुळात कथा आत्ता महत्वाच्या टप्प्यावर आहे अस वाटतंय. म्हणजे कथा काय असणार हे माहित आहे साधारत: सगळ्यांना....पण तरीही उत्स्तुकता वाटत आहे.

उमेश कामत खुप मस्त आणि मन लावून त्याचं काम करतो. दिसायला छान असल्याने रडतानाही क्युट वाटतो. पण त्याच्या पुढे ईशा अगदीच सुमार वाटते. अश्या वेळी मुक्ता बर्वेची कमतरता जाणवते.

घरात गेले काही एपिसोड आज्जी बाई दाखवत नाहीयेत....कुठे गेल्या शोभा खोटे???? तो शेजारचा म्हातारा मात्र असतो.

एका मोठ्या कुटुंबात वाढलेली, कांहीशी लाडावलेली व आतां स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व घडवूं पहाणारी एक मुलगी , ही भूमिका स्पृहाने अभ्यासपूर्वक, बर्‍यापैकीं निभावली आहे हें माझं प्रामाणिक मत. त्या उलट, उमेश - सॉरी, उम्या - कामतच्या सहजसुंदर अभिनयाबद्दल शंका नसली तरी कौटुंबिक ताणतणावात बालपण गेलेल्या 'ओम' या व्यक्तिमत्वाचे त्या अनुषंगाने कांगोरे न दाखवता, केवळ उमेशच्या गोड व क्यूट प्रतिमेवर वेळ मारून नेणं, ही लेखन व दिग्दर्शनातली त्रुटी - किंवा चालुगिरी - वाटते.

भाऊ, तुमच्याशी काही अंशी सहमत. कालच्या एपिसोड मध्ये, स्पृहाने पण रडण्याची भूमिका चांगली केली.

कालच्या एपिसोड मध्ये, स्पृहाने पण रडण्याची भूमिका चांगली केली.>> मला या प्रसंगातच फक्त उमेश कामत पेक्षा स्पृहा चा अभिनय जास्त नॅचरल वाटला...

एका मोठ्या कुटुंबात वाढलेली, कांहीशी लाडावलेली व आतां स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व घडवूं पहाणारी एक मुलगी , ही भूमिका स्पृहाने अभ्यासपूर्वक, बर्‍यापैकीं निभावली आहे हें माझं प्रामाणिक मत. त्या उलट, उमेश - सॉरी, उम्या - कामतच्या सहजसुंदर अभिनयाबद्दल शंका नसली तरी कौटुंबिक ताणतणावात बालपण गेलेल्या 'ओम' या व्यक्तिमत्वाचे त्या अनुषंगाने कांगोरे न दाखवता, केवळ उमेशच्या गोड व क्यूट प्रतिमेवर वेळ मारून नेणं, ही लेखन व दिग्दर्शनातली त्रुटी - किंवा चालुगिरी - वाटते.>>>>>>>>>++++++++++१००००००००

कालच्या एपिसोडमधील ईशा व आजोबा यांच्यातील संभाषणाचा भाग या मालिकेला लेखन, दिग्दर्शन व अभिनय या सर्वच बाबतीत एका वरच्या पातळीवर घेवून गेला असं वाटलं . [ कदाचित, मोहन आगाशे यांच्या बाबतीत कामचलाऊ, वेळखाऊ लिखाण सहन केलं जाणार नाही, ही जाणीव याला कारणीभूत असावी ! ].

मोहन आगाशेंनी आजोबांचं काम मस्त केलंय. ईशानंही चक्क छान काम केलं. मोठे बाबा सोडून सरळ आजोबा म्हणायला पाहिजे पण

सगळाच अतिरेक चाललाय ........
ओमच आताच वागण
,ईशा ज्या प्रकारे अश्विनीशी बोलत होती ,

मला आता ही मलिका खरच आवडत नाही ,फ़क्त सवयीने पहिली जाते ,
ईशा एक शिकलेली मुलगी आहे
कमीत कमी एकदा तरी तिने ओमशी बोलायला हवय ,
तो अस का वागला ,त्या मागे काय कारण होत एकदा तरी विचारायला पाहिजे
मला समोरच्याच ऐकून सुद्धा न घेणारया माणसांचा खुप राग येतो
कितीही राग आला असला तरी समोरच्याच म्हणण काय आहे ते एकदा तरी ऐकून घ्याव
मग निर्णय घ्यावा

<< कितीही राग आला असला तरी समोरच्याच म्हणण काय आहे ते एकदा तरी ऐकून घ्याव
मग निर्णय घ्यावा >> प्रश्न इथं रागाचा नसावा; दृढ विश्वासालाच प्रचंड सुरूंग लागल्याने हादरलेल्या मनाचा असावा. त्यामुळें, वाटतं तेवढं हें चित्रण अतिरेकी नसावं .

मनरंग +१
भाऊ आता झाले की बरेच दिवस! त्या अति प्रेमापोटीच तिने त्याला का असं का म्हणून विचारायला हवं होतं!

मनरंग +१
भाऊ आता झाले की बरेच दिवस! त्या अति प्रेमापोटीच तिने त्याला का असं का म्हणून विचारायला हवं होतं!>>>>>>+१

मी त्या अश्विनीच्या जागी असते तर एक मुस्काटात ठेवून ही सगळी नाटकं इथं नाही आपापल्या घरी करायची असं निक्षून सांगितलं असतं.

दृढ विश्वासालाच प्रचंड सुरूंग लागल्याने हादरलेल्या मनाचा असावा. >>> दृढ विश्वास निर्माण व्हायला काही काळ जायला नको का? हल्ली हल्ली तर प्रेम स्विकारलय त्या दोघांनी. अजून समोरच्या व्यक्तीला जाणून घ्यायच्या पायरीवर आहेत ते दोघे (असे मालिकेत तरी दाखवलय). इशाला राग येणे समर्थनीय आहे पण ती जरा अतीच करते आहे असंच वाटतय.

मागे या धाग्यावर कामत आजोबांचे पात्र न आवडल्याबद्दल काही जणांनी लिहिले होते. पण कालचे त्या पात्राचे वागणे एकदम सही होते. आजीच्या मागे पडण्यात त्यांचा 'माणसांचा सहवास' एवढाच उद्देश होता. ते किती एकटे आहेत हे काल खूप टोकदारपणे दाखवले होते.

ओमच्या घरातली बहुतेक सगळीच पात्रे मस्त रंगवली आहेत.

Pages