Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाचवा सीझन काल चालू केला....खरं तर चौथा संपल्यावर आता वॉल्ट साहेब परत कशाला त्या कूकिंगच्या भानगडीत पडतायत असं झालय... चौथ्या सीजनला स्टोरी संपवायला हरकत नव्हती, असं नाही वाटत का?

ओके, मला एक प्रश्न आहे.

*** स्पॉयलर ***

सि०५ए१५ आणि सि०५ए१६ -

वॉल्टच हायजेनबर्ग आहे हे पब्लिक नॉलेज कसे होते? Ozymandias मध्ये ज्यांना माहित असते त्यांच्याकडून DEA कळत नाही. जास्त न लिहिता, वॉल्टची खरी ओळख बाहेर कुणालाच नसते. आता हँकच्या नोट्स, मरी(डिव्हिडी) /स्कायलर(डॉमिनो) कडून बाहेर जातं वगैरे गॄहितं धरली तर 'साहजिकच आहे' वगैरे होईल पण ते जरा नीट दाखवायला पहिजे होते. असो.

विजिगीषु,

*** स्पॉयलर ***

पब्लिक नॉलेज म्हणजे तुमचा रोख ग्रेचेन आणि इलियटच्या टीव्हीवरच्या मुलाखतीकडे आहे का?
मला वाटते जेव्हा वॉल्ट आणि स्कायलरची हातघाईची होते आणि वॉल्ट हॉलीला घेऊन जातो त्यावेळी वॉल्टर ज्युनियर ९११ कॉल करून पोलिसांना बोलावतो आणि नंतर मरीही येते, त्यावेळी आपसूकच हे सगळे ऊघडे पडणे आलेच ना?
'साहजिकच आहे' वगैरे होईल पण ते जरा नीट दाखवायला पहिजे होते. असो. >> +१०

*** स्पॉयलर ***

जेसी आणि माईक बॅकआऊट करतांना ट्रेनमधून चोरलेले मेथलॅमिन ज्या गँगला विकणार असतात त्यांच्या बरोबरच्या डेझर्टमधल्या मिटिंगमध्ये वॉल्ट जेव्हा म्हणतो 'से माय नेम' आणि पुन्हा 'आय एम इन एम्पायर बिजनेस' म्हणतो तेव्हाही 'हायझेनबर्ग'चं नाव जपण्यात त्याला फार ईंट्रेस्ट आहे असे वाटत नाही.
त्याला हायझेनबर्गचं अस्तित्व आणि वचक वाढावा असं वाटतंच पण त्याच बरोबर हायझेनबर्ग = वॉल्टर व्हाईट हे समीकरण ऊघडं पडू नये असंही वाटतंच. (माईकशी कन्फ्रन्टेशन आणि प्रिझनमधलं खून सत्र )
हँकला कळल्यानंतर तर ही प्रायोरिटी फक्त वॉल्ट ज्यु.ला कळू नये ईथपर्यंत खाली येते.
अन्यथा पुराव्यांअभावी सॉलला हाताशी धरून तो कदाचित सगळ्यांतून सहीसलामत सुटला ही असता.

हे आपलं ऊगाच लिहिलंय 'टॉकिंग ऑट लाऊड' वगैरे. Happy

माझे सीझन ५ चे ५ एपिसोड्स झालेत. पण नेटफ्लिक्स वर ८ पर्यंतच दिसतायत. एकूण किती एपिसोडस आहेत सीझन ५ मध्ये? ८ च्या पुढले कुठे बघावे?

सहा.

सीझन ६ बहूतेक अ‍ॅमेझॉननेच तयार केला आहे, म्हणजे ५ व्या सीझनच्याच ९-१६ एपिसोड्सचा सीझन ६ केला आहे बहूतेक. नेटफ्लिक्सवर नाहीयेत शेवटचे आठ भाग.

रायगड, हो ना?! तो लोएस्ट पॉइन्ट आहे वॉल्टच्या ब्रेकिंग बॅडचा. आणि त्यात स्कायलरही सहभागी!!

मी पाहिलाय सहावा सिझन अ‍ॅमेझॉनवर>> पण त्यात नविन काही आहे का की वरती लिहिल्याप्रमाणे सि ५ मधले शेवटले एपिसोड्सच आहेत?

५ च सीझन आहेत. पण पाचव्या सीझन मध्ये १६ एपिसोडस आहेत. अ‍ॅमेझॉन वर ५ व्या सीझनच्या ९ ते १६ एपिसोडना सीझन ६ म्हटलय.

Really, Walt has now broken totally bad! स्कायलरचा मला तितका राग येत नाहीये. ती फार आनंदाने यात सहभागी झाल्ये असं मला वाटत नाही. ती money laundering करायचा प्रयत्न करत्ये पण तिला त्या पैशात आनंद वाटतोय असं वाटत नाहीये.
पण हो, तो कन्फेशन व्हीडीओ बनवण्यात ती सामील झाल्ये - त्याचा राग येतोय.

५ व्या ६ व्यातले एपिसोड्स ह्याकडे मी फार लक्ष दिलेलं नाही त्यामुळे लक्षात येत नाही.
ते कन्फेशन ५व्यात आहे? मला लक्षात राहिनासं झालंय.

५ च सीझन आहेत. पण पाचव्या सीझन मध्ये १६ एपिसोडस आहेत. अ‍ॅमेझॉन वर ५ व्या सीझनच्या ९ ते १६ एपिसोडना सीझन ६ म्हटलय.>>+१

स्कायलरचा मला तितका राग येत नाहीये. >>+१
तिला फक्त तो एक अकांटिंग चॅलेंज वाटत आहे Wink

एकूणात मी 'वाल्मिकीचा वाल्या' चे सर्व अध्याय पूर्ण केले.
मला सि ४ ए १० पर्यंत हुक्ड ऑन वगैरे अजिबातच वाटलं नाही. त्यापासून पुढे मात्र एक मिनिटही फास्ट फॉर्वर्ड न करता बघावं असं वाटलं (याचा अर्थ मी फा फॉ केलं नाही असा काढू नये)

यो रायगड Happy

आमचा मुक्काम अल्बुकर्कीवरून हलून बेकर स्ट्रीटवर पडला आहे. येत्या वीकएंडला ब्लु मेथचा खातमा करायचा विचार आहे.

नुसतं अल्बुकर्की असं मोघम नको. एव्हाना अ‍ॅड्रेस सांगता आला पाहिजे. Proud
बाकी बेकर स्ट्रीट कसं वाटलं ते सांगितलंच नाही तृप्ती आवटींनी. Proud

त्यांना सांगू का धागा काढायला? बैजवार लिहिता येइल तिथेच.

रच्याकने, त्यांचं फेबु अपडेट बघा की Happy

Pages