Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सद्ध्या ब्रेबॅ बघत होते परत. संपत आलं. काल ती 'कन्फेशन' सीडी पाहिली. माझ्यासाठी त्या शोमधला बिगेस्ट शॉक तो होता. दॅट इज हिज अल्टिमेट ब्रेकिंग बॅड!
पुन्हा बघताना रायटिंग/डिरेक्टिंग/अ‍ॅक्टिंग आणखीनच अ‍ॅप्रीशिएट करते आहे! मास्टरपीस!!

पहिले दोन सीजन बघून दोन वर्ष झालेली. का कोणास ठाऊन पुढचं बघितलं गेलं न्हवत, गेल्या काही दिवसात बिंज करून काल शेवटचे एपिसोड उडवले.
मास्टरपीस!!!
वॉलटचं सत्य हॅन्कला समजतं तेव्हा मनात 'नको कळू दे', 'आता याने सगळं सोडलंय' हा विचार मनात आला आणि चर्र झालं.
हॅन्कला द्यायला वॉलट सीडी करतो त्यात तो खरच कन्फेशन करेल असं वाटत असताना केलेले आरोप ऐकून आता हा ज्युनिअरला पण काही बोलेल/ करेल की काय अशी भीती वाटू लागलेली.
सी ५ ए १ मात्र फार विनोदी झालाय. (गस मेल्यावारचा). एकूणच पाचवा सीजनचा लेखक इतर चार पेक्षा कुणी वेगळाच आहे की काय, किंवा आता आवरा आवरी करायची आहे असं मनात ठेवून सगळ्या गोष्टी निस्तरायच्या आहेत करून केलेलं लेखन वाटलं शेवटच्या सीजनचं. तो बार मध्ये जातो तिकडे ग्रेचनची मुलाखत चालू असते, तिकडे त्याला कार मिळते, त्याची की पण मिळते. तो त्यांच्या घरी जातो (ते न्यू योर्कला असतात असं ऐकलेलं वाटलं, मग तिकडे स्किनी आणि तो दुसरा मित्र कसा सापडले हे झेपलं नाही) त्यांना पैसे देऊन ते ज्युनिअरला द्यायला सांगतो. हे इंजीनियर्ड वाटलं. लिडियाला कसं मारतो हे आपल्याला समजावून सांगणं तर अजिबात नाही आवडलं. हॉलीला वॉलट घेऊन जातो तेव्हा डायपर चेंज केल्यावर ती ममा म्हणते, आता आपण हॉलीला कार सीट घेऊया असं वॉलट म्हणतो ते ही असच डोक्यात गेलं, अचानक सटलपणा जाऊन डंब संवाद का टाकले कोण जाणे.

काही प्रश्न : विमान अपघात होतो त्यात ते सॉफ्ट टॉय वॉलटच्या स्वीमिंग पूल मध्ये पडतं. त्याचा तो डोळा काढतो, उचलतो आणि तो नंतर अनेकदा दिसत राहतो त्याचा सिग्निफिकंस नाही कळला.
जेसी च्या गफ्रे (एमी?? नाव विसरलो) चा मृत्यूचं पातक वॉलटवर आहेच, पण त्यामुळे तिचे वडील सैरभैर होतात आणि एअर कंट्रोल मध्ये चुका करतात आणि विमान अपघात होतो त्याचं पातक वॉलटवर जरा फेच्ड आणि काऊ ट वाढवायला केलंय असं वाटलं. वॉलटकारणीभूत आहे ते समजतंय पण मान्य करवत नाहीये.
सगळ्या मरणाना लॉजिकच्या पातळीवरून केलेलं समर्थन नर्व रेकिंग होतं, त्यानेच गुंतत गेलो मी.
स्काय कधी मतलबी, कधी अगतिक अनेकदा गोंधळलेली काय करू न समजणारी, आजचा दिवस पुढे नेणारी, वॉलटच्या बाबत प्रेम आणि किळस/ त्रागा, शेवटी फॅमिलीसाठी सगळं केलं म्हणणार समजून आलेला संताप, मी स्वतःसाठी केलं ऐकल्यावर मनातून माफ केलं असं वाटणं, खूपच रीअलीस्टीक वाटली.
कसलं स्टोरी टेलिंग आहे. जबरदस्त.

अमित, ब्रेबॅ चे दिवस परत आठवून देतोयस तू!!! हम्म्म्म!!! टोटल बिंज मोड मध्ये सगळे एपिसोड बघितलेले...

अरे वा!
स्वाती लिंक चालत नाहीये.

यो

अल कमिनो.. ठीक ठाक वाटला... खास आवडला नाही असे म्हणावेसे वाटते पण तसे थेट म्हणणे टाळतो.
मि. व्हाईट Proud आणि यो बिचचा रेस्टॉरंट मधला सीन पाहून २००८-२०१३ अशी सहा वर्षे डोळ्यांसमोरून झरझर तरळून गेली.

टॉड -- टॉड आणि जेसीचे पूर्ण अफेयर फार बोर झाले, स्टोरीसाठी ते जरूरी असेल पण ते दाखवण्याची आवश्यकता आणि त्याला दिलेला स्क्रीन टाईम ह्याचे गुणोत्तर चुकल्यासारखे वाटले . 'फेलिना' मध्ये टॉडला मारतांना जेसीच्या भावनांचा एवढा ऊद्रेक का झाला ह्याचे अजून खोलात जाऊन नीट ऊत्तर देता आले असते. जेसी, टॉड आणि अंकल जॅकची कॅप्टिव्हिटी का सहन करत राहतो ते कळाले पण ते फार कन्विन्सिंग वाटले नाही.
टॉडच्या अपार्टमेंटमधला आणि वेल्डिंग कंपनीतला सीनही ऊगाचच खेचल्यासारखे वाटले.

खरंतर बारीक बारीक डिटेल दाखवत सीन नाहक खेचत रहाणे आणि मोक्याच्या वेळी त्या सीनच्या प्रेडिक्टिबिलीटीला धोबीपछाड घालत खेचलेला सीन आणि त्यातले डीटेल्स किती अर्थपूर्ण होते हे न सांगताही पटवून देणे ही गिलिगनच्या डिरेक्शनची युएसपी आहे... जी सिरिजमध्ये खूप मस्त वाटते पण दोन तासांच्या सिनेमात ती तेवढी ईफेक्टिव वाटली नाही.

(फॉर ऑब्विअस रिझन्स) सॉल सोडून जवळ जवळ सगळे गँग मेंबर्स सिनेमात दर्शन देऊन जातात.

आणि हो.. सिनेमा बघण्याआधी ट्रेलर पुन्हा जरूर बघा.. कारण ट्रेलर फक्त ट्रेलर नसून सिनेमाचाच भाग आहे.. ट्रेलर मधला सीन पुन्हा सिनेमात येत नाही.

पण एक गोष्ट पुन्हा खूप प्रकर्षाने जाणवली.. हायझेनबर्ग + जेसी + माईक + सॉल ही टीम आणि फॉर दॅट मॅटर गस फ्रिंज सुद्धा बाकी गँग्ज चालवणार्‍या लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त डोकेबाज आणि कावेबाज असतात म्हणूनच ते एवढी वर्षे सर्वाईव आणि थ्राईव करू शकतात.

अल कमिनोने जेसीच्या संघर्षाला क्लोजर दिलं आहे, जे फायनल सिझनने दिलं नाहि. नाउ, इज दॅट रियली ए क्लोजर, ओन्ली जिलिगन कॅन कंफर्म... Wink

मी शेवटचा सीझन पुन्हा रिकॅप करतोय कारण टॉड कोण हेच मला आठवत नव्हते. आता तो सीझन पाहताना पुन्हा पहिल्यापासून पाहावे की काय विचार करतोय Happy पाचव्या सीझन मधे माइक च्या संवादांत एक सरकॅजम आहे. तो आधीच्या सीझन मधे होता का लक्षात नाही.

(मायबोलीच्या) हायझेनबर्गशी सहमत.
अल-कमिनो बघण्याआधी शेवटचा एपिसोड परत बघितला, आणि त्या मूड मध्ये आलो. (कोणी बघणार असेल तर मी रेकमेंड करेन शेवटचा एपि. बघुन मग हा मूव्ही बघायला)
उत्सुकतेने बघत रहावासा वाटला पण सिनेमा म्हणण्यापेक्षा पुढचा एपिसोड आहे असंच वाटत राहिलं आणि मग प्रचंड मोठा वाटला. जेसी कॅप्टिव्ह झाला, त्याच्यात आणि टॉडच्यात इतकी कटूता का आली ह्याची उत्तरं मिळाली पण जेसीने उरले सुरले पैसे मिळवायला काय केलं इ. बघण्यात (बघुन झाल्यावर) काय हशिल असं वाटत राहिलं. रादर जेसीची न्यू स्टार्ट ही इतकी डिटेल मध्ये दाखवण्यासारखा क्लोजर हवा होता का? जेसी वॉज सेट फ्री! त्याच्या आणि वॉ.व्हा. मधल्या शेवट शेवटच्या कुठल्यातरी संवादात जेसीच्या मनातला सल आणि त्याच्या अ‍ॅस्पिरेशन्स टाईप काही तरी येऊन गेलेलं आहे असं पुसटसं आठवतय. ते पुरेसं न्हवतं का? असं अगदी व्हूअर्सना हाताला धरुन शेवट पर्यंत घेऊन जायची काय गरज होती?
वॉज्यु, स्क्याय आणि मुलीला दाखवलं नाही तेवढंच नशिब म्हणायचं, आणि हँकच्या कॉर्डिनेट्सला ट्रेस केलेलं दाखवलं नाही ते ही.
ब्रे.बॅ. फॅन्सनी नक्की बघा. हायझेनबर्ग आणि जेसीला परत बघुनच पैसे वसुल होतात. फार काही हाती लागलं नाही तरी आय एंजॉईड दॅट टाईम.
मलाही पूर्ण सिरिज रीरन कराविशी वाटू लागली आहे. Happy

अल कमिनो बघितला असेल तरच खालचे वाचा.
स्पॉयलर अलर्ट

अमित, तो स्क्रॅप डीलरवाला रडार डिटेक्टर टाईप ईन्स्ट्रुमेंट वापरतांना त्याला नेमके काय समजते म्हणून पळून जातो. ते कळाले का?

हायझेनबर्ग आणि जेसीला परत बघुनच पैसे वसुल होतात>>>>> एकदम. जेसी हॉटेल दरवाज्यावर नॉक करतो त्यानंतर वॉल्टरला बघून शिट्टीच मारली. रेस्टॉरंटवाला सीन एकदम मस्त. पाईनॅपल ब्रॉमॅलीन .. Happy त्यांची च केमिस्ट्री भारी जमलीये.

स्पॉयलर
तो काहीतरी कंपनी अ‍ॅक्टिव्हेटेड म्हणतो ना? नक्की काय ते समजलं नाही, पण लोकेशन ट्रॅकिंग रिलेटेड काही फीचर कार मध्ये असेल आणि ओल्ड जो तिकडे असताना ते कुणितरी (पोलिसनी) अ‍ॅक्टिव्हेट केलं असेल. त्याच्या कडील डिव्हाईस आरएफ स्कॅनर असेल आणि त्यात सिग्नल डिटेक्ट झाला असेल. म्हणुन तो फ्ली करतो आणि आत्ता पोलिस इथे येतील तर पिंकमनला पण पळायला सांगतो. असा मी अर्थ घेतला.

स्पॉयलर

हो ती लोजॅक नावाची 'स्टोलन कार रिकवरी सिस्टीम' आहे जी अ‍ॅक्टिवेट केल्यावर कार ची जीपीएस लोकेशन समजते. म्हणजे ओल्ड जो ने तिथे असायला, त्याच्याकडे ऑन केलेला स्कॅनर असायला आणि कंपनीने ती जीपीस ट्रॅकिंग सिस्टिम अ‍ॅक्टिवेट करायला एकच गाठ पडली आणि जेसी लक बाय चान्स वेळेत अ‍ॅलर्ट झाला असे?
स्किनी पीट आणि बॅजरच्या फ्रेंड्शिपचा पॉईंट दाखवायला हा फारच फार फेच्ड योगायोग घडवून आणला म्हणावं लागेल.

स्पॉयलर अलर्ट

>>हा फारच फार फेच्ड योगायोग घडवून आणला म्हणावं लागेल.<<
ओल्ड जोला जेसीने बोलवलं असावं, अल कमिनोची विल्हेवाट लावायला. ओल्ड जो, बिइंग इन बिझनेस ऑफ बाइंग्/अ‍ॅक्वायरिंग स्टोलन कार्स, कम्स प्रिपेर्ड टु एन्शोर कार इज "क्लीन". कार स्कॅन करताना त्याला कळुन चूकतं कि लोजॅक पोलिसांनी अ‍ॅक्टिवेट केलेला आहे, आणि ते कुठल्याहि क्षणी तिथे पोचतील, म्हणुन तो घाईघाईत तिथुन पळ काढतो. आता यात एक गोष्ट अन्क्लियर आहे ती म्हणजे पोलिसांना नोटिफाय कोणी केलं? डिड पुलिस फाइंड टॉड्स बॉडी?..

स्पॉयलर
हो अर्थात ना?
इतक्या राऊंडस फायर झाल्यावर पुलिस तर येणारच ना? त्याच्यां कित्येक कार येताना बघुन जेसी लपतो. मग त्यांना कार्टेल, हायझेबर्ग यांच्या बॉड्या सापडतात. जेसी पळाला हे ही समजतं. त्यात टॉडही मिळालाच असेल. त्यांचे बॅकग्राउंड चेक्स मध्ये गाडी सापडली आणि ट्रॅकर अ‍ॅक्टिव्हेट केला.
हेच विचारताय का आय एम मिसिंग समथिंग?
तो ट्रॅकर आधी अ‍ॅक्टिव्हेट न्हवता आणि ऑल्ड जो आल्यावरच झाला हे जर अती टायमिंग आहे. पण देऊ थोडा बेनिफिट ऑफ डाऊट. Happy

स्पॉयलर अलर्ट
>>हेच विचारताय का आय एम मिसिंग समथिंग?<<
यु आर राइट. काल लास्ट सिझनचा फिनाले परत एकदा पाहिल्यावर क्लॅरिटी मिळाली (इट्स बीन ए व्हायल). पोलिस आले क्राइम सीनवर पण त्यांनी डॉट्स जुळवुन अल कमीनो ट्रॅक करण्या ऐवजी लिडियाने शेवटचा श्वास घेण्यापुर्वि पोलिसांना नोटिफाय केलं असेल का? जस्ट ए थॉट....

स्पॉयलर अलर्ट

तो ट्रॅकर आधी अ‍ॅक्टिव्हेट न्हवता आणि ऑल्ड जो आल्यावरच झाला हे जर अती टायमिंग आहे. पण देऊ थोडा बेनिफिट ऑफ डाऊट. Happy >> +१ असेच वाटते आहे.
तसेच, पूर्ण घर धुंडाळल्यावर फ्रिजमधून आपसूक नोटांची गड्डी पडणे हा सुद्धा अती टायमिंग. .. ह्या योगायोगापेक्षा टॉड बद्दलच्या फ्लॅश बॅक आठवणीतून जेसीला अजून काही तरी स्मार्ट क्लू आठवला असे दाखवायला हवे होते.
तो टॉडचा शेजारचा म्हातारा असाच अननेसेसरिली ईरिटेटिंग वाटला.. जेसी पकडला गेल्यावर त्याचे नेमके तेव्हाच क्नॉक करणे पुन्हा योगायोग.

आधी बॉग्डन, सॉलची रिसेप्शनिस्ट वगैरे कसले भारी कॅरॅक्टर्स होते.

लिडिया अजून मेली नाही ना (डिड आय मिस समथिंग)? म्हणजे 'अल कमिनो' हा मास शूटआऊट नंतरच्या एक-दोन दिवसात घडणाराच सिनेमा आहे .. ती मेली नसल्याचे शक्य आहे. न्यूज रिपोर्टिगमध्ये 'ड्रग किंग्पिन ड्र्ग्ड की पॉईझन्ड अ व्हाईट वुमन' असं सांगितल्याचं आठवतं आहे. पोलिसांना सगळी स्टोरी सांगण्यासाठी लिडिया थोड्या वेळ तरी जिवंत रहायला हवी.

मी नेहमी हेक्टर, टुको, अंकल जॅक किंवा टॉड पेक्षाही लिडियाला लई म्हणजे लईच जास्त हेट केले... देट्स व्हाय शी कॅननॉट डाय Proud

अवांतर :- ब्रेकिंग बॅड आणि सॉल मिळून सगळ्यात जास्त आवडलेलं कॅरॅक्टर म्हणजे किम वेक्सलर.

Pages