सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन पीठ ( बेसन पीठ फॅन क्लब)
सध्या एक भांडे, एक गॅस आणि एक पालाभाजी यावर दिवस सुरु आहेत. कंटाळा आला म्हणून अर्धा किलो बेसन पीठ आणलं आणि भाज्या त्याच अस्य्नही रोज नव्या नव्या वाटू लागल्या.
मग जाणवलं की बेसन पीठ हे स्वयपाकघरातील बहुगुणी पीठ आहे.
भजी, वडा असे स्वतंत्र पदार्थ बेसनची खासियत आहेच.
पालेभाज्या इतर भाज्या करता येतात.
पिठलं ते झुणका , गट्टे की सब्जी असे विविध प्रकार करता येतात.
लाडू, म्हैसूर पाक, वड्या ... अशा गोड पदार्थातही बेसनच.
नुसता कांदा जास्त तेलात परतून थोडे पीठ लावले तर मस्त पदार्थ तयार होतो. व्हेज आम्लेट करता येते.
हा धागा बेसन पिठाचे पदार्थ आवडणार्यांसाठी आहे.
नव्या जुन्या पाककृती थोडक्यात द्याव्यात. जुने धागे असतील तर लिंका द्याव्यात.
बेसन पीठ कुठून आणावे, कसे साठवावे .. अमेरिकेत कुठे मिळते, पिठात प्रोटीन किती, वात किती, पित्त किती .... कश्यकश्यालाही या धाग्यावर बंदी नाही.
फोटो गुगल इमेजवरुन घेतले आहेत.
जस्ट टू गूड!!!! सुरळीच्या
जस्ट टू गूड!!!!
सुरळीच्या वड्या
कोथिंबीर वडी
भरले टोमॅटो
बाकी, प्रस्तावनेतली प्रकाशचित्र प्रताधिकारमुक्त असू द्या.
(No subject)
एक भांडे, एक गॅस आणि एक
एक भांडे, एक गॅस आणि एक पालाभाजी >>> गोडबोले काकु खुपच काटकसर करताहेत.
एक भांडे, एक गॅस आणि एक
एक भांडे, एक गॅस आणि एक पालाभाजी
पालेभाजी विकणारा फळभाजी ठेवत नाही काय?? एवढी काक करुन कुठे जायचेय???
नै हो. सध्या जॉब्नमधून
नै हो. सध्या जॉब्नमधून वेळ मिळत नाही. त्यामुळे बाहेरच खाणे होते. पण पालाभाजी बाहेरच्या जेवणात नसते, त्यामुळे तेवढेच रोज करुन रोजच्या राइस प्लेटा बाहेरच्याच मागवून खाणे सुरु आहे.
--
--
ढोकळाही बेसन पिठाचाच करतात
ढोकळाही बेसन पिठाचाच करतात का?
अच्छा ओके.
अच्छा ओके.
मस्तच!
मस्तच!
नाव बेस्ट ढोकळा बेसनचा असतो
नाव बेस्ट
ढोकळा बेसनचा असतो
माझा रुममेट जेव्हा ऑमलेट करुन
माझा रुममेट जेव्हा ऑमलेट करुन मला टूकटूक करुन दाखवतो तेव्हा मी लगेच मस्त टॉमेटो, कोथिंबीर घालून बेसनाचे धिर्डे बनवून त्याला उत्तर देतो.
पोह्यासारखाच लगेच जमणारा, होणारा सोपा आणि चवदार पदार्थ - बेसनाचे धिरडे
अहाहा लक्ष्मी गोडबोले, फोटोत
अहाहा लक्ष्मी गोडबोले, फोटोत बेसनाचे पिठले दिसत्येय. हिरव्याकंच मिरच्या घालून तयार केलेले तिखटजाळ पिठले, बरोबर ना?
आ.न.,
-गा.पै.
सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन
सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन पीठ - प्रस्तावना भारी आहे!!!
काहीजण मेथी, कोथिंबीर, पालक
काहीजण मेथी, कोथिंबीर, पालक यांचे ठेपले नुसते बेसन घालून करतात. मी बेसन आणि थोडी इतर पीठे मिक्स करते.
बेसन लावून आंघोळ केल्यास
बेसन लावून आंघोळ केल्यास कांती उजळ होते.
बेसन लावून आंघोळ>>> हा तर
बेसन लावून आंघोळ>>> हा तर आयुर्वेदिक उपाय आहे, तुम्ही कसा काय सुचवलात इब्लिस?
इब्लिस पण हिवाळ्यात ते चालणार
इब्लिस पण हिवाळ्यात ते चालणार नाही, कारण ते तेल शोषुन घेते, कोरडे पडते. त्या ऐवजी मसूर डाळ पीठ वापरतात.
पाटवड्या पण होतात की. मी गोडखाऊ असल्याने तोन्डाला पाणी सुटलेय बेसनामुळे. लाडु, वड्या, मोहनथाळ, म्हैसुर्पाक ( चेन्नईचा मऊ).
बेसन लावून आंघोळ>>> हा तर
बेसन लावून आंघोळ>>> हा तर आयुर्वेदिक उपाय आहे, तुम्ही कसा काय सुचवलात इब्लिस?
मन्जूडी.:फिदी: इब्लिस ना अडकवले का?:फिदी:
गोळाभात, बटाटेवडे, भजी,
गोळाभात, बटाटेवडे, भजी, कढी,खमणढोकळा
दिनेशदा, तुस्सी कित्थे हो ?
दिनेशदा, तुस्सी कित्थे हो ?
मस्त लिहिलंय. शेव, गाठ्या,
मस्त लिहिलंय.
शेव, गाठ्या, फाफडा ....
कढीगोळे, गट्टे की सब्जी.
कढीगोळे, गट्टे की सब्जी.
ढोकळा, फाफडा, ठेपला,वडा,
ढोकळा, फाफडा, ठेपला,वडा, मेथीगोटा, दालवडा, शेव, भजी, पाथरा (अळुवडी), पाटोळ्यांच बट्ट, गट्टाकरी, चिल्ला (मुग्डाळीचे तसेच बेसन पीठाचे)
माझा सगळ्यात आवडता लाडु बेसन
माझा सगळ्यात आवडता लाडु बेसन लाड.
अळु वडी पण मस्त्च होते.
>>>फोटोत बेसनाचे पिठले
>>>फोटोत बेसनाचे पिठले दिसत्येय. हिरव्याकंच मिरच्या घालून तयार केलेले तिखटजाळ पिठले
फोटोत दखवले आहे ते सिंधी बेसन करी सारखं दिसतंय!!!आणि त्या बहूतेक आख्ख्या भेंड्या आहेत!!!!
बाप रे जेम्स बॉण्ड ला बर्याच
बाप रे जेम्स बॉण्ड ला बर्याच देशी पदार्थांची माहिती आहे की !
टकिला बरोबर ठेपला, इ.
हा तर आयुर्वेदिक उपाय आहे,
हा तर आयुर्वेदिक उपाय आहे, तुम्ही कसा काय सुचवलात इब्लिस?
<<
आयुर्वेदात औषध आहे.
होमिओपथीत औषध नाही.
आयुर्वेदाच्या नावाखाली कुणी मूर्ख बनवीत असेल तर त्याला विरोध आहे.
आयुर्वेद वा इतर अनुभवसिद्ध औषधांतूनच मॉडर्न मेडिसिन उत्क्रांत झालेले आहे.
विषय वेगळा आहे.
नंतर बोलू.
शक्तीपीठ पिठल्याचेच किती
शक्तीपीठ
पिठल्याचेच किती तरी प्रकार करता येतात. सगळ्यात आवडतं पिठलंच. मग वडे, भजी, पीठ पेरून वेगवेगळ्या भाज्या, धिरडी इ.
बुंदीचे/मोतीचुराचे
बुंदीचे/मोतीचुराचे लाडू
बेसनाचे लाडू
फरसाण
बेसनाची नसली तरी चण्याच्या डाळीची बंगाली पाकृ - छोलार दाल
मोतीचुराचे लाडू न आठवल्याच्या
मोतीचुराचे लाडू न आठवल्याच्या पातकाचे क्षालन तो लाडू खाऊनच करावे लागेल का?
खारी बुंदी, गोड बुंदी.
Pages