सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन पीठ ( बेसन पीठ फॅन क्लब)

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 4 January, 2014 - 01:04

सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन पीठ ( बेसन पीठ फॅन क्लब)

सध्या एक भांडे, एक गॅस आणि एक पालाभाजी यावर दिवस सुरु आहेत. कंटाळा आला म्हणून अर्धा किलो बेसन पीठ आणलं आणि भाज्या त्याच अस्य्नही रोज नव्या नव्या वाटू लागल्या.

मग जाणवलं की बेसन पीठ हे स्वयपाकघरातील बहुगुणी पीठ आहे.

भजी, वडा असे स्वतंत्र पदार्थ बेसनची खासियत आहेच.

पालेभाज्या इतर भाज्या करता येतात.

पिठलं ते झुणका , गट्टे की सब्जी असे विविध प्रकार करता येतात.

लाडू, म्हैसूर पाक, वड्या ... अशा गोड पदार्थातही बेसनच.

नुसता कांदा जास्त तेलात परतून थोडे पीठ लावले तर मस्त पदार्थ तयार होतो. व्हेज आम्लेट करता येते.

हा धागा बेसन पिठाचे पदार्थ आवडणार्‍यांसाठी आहे.

नव्या जुन्या पाककृती थोडक्यात द्याव्यात. जुने धागे असतील तर लिंका द्याव्यात.

बेसन पीठ कुठून आणावे, कसे साठवावे .. अमेरिकेत कुठे मिळते, पिठात प्रोटीन किती, वात किती, पित्त किती .... कश्यकश्यालाही या धाग्यावर बंदी नाही.

besan_0.JPG

फोटो गुगल इमेजवरुन घेतले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली खास महाराष्ट्रीयन वाटली डाळ !!
ग्णपती विसर्जनाच्या दिवशी हीच प्रसाद म्हणुन हीच करतात.
जेवणात ही साइड डीश म्हणून मस्त

कैरी घालून आंब्याची डाळ (खास चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाला हमखास करतात). हा बेसन नाही पण खास वाटलेली चणाडाळ घालून केलेला पदार्थ.

जेवणात ही साइड डीश म्हणून मस्त>>>होना...पण इतकी मस्त लागते ना कि माझी आई मला नेहमी सांगायची..कि ती मेन डीश नाहीये जरा कमी खा Proud

सर्व पीठांचे शक्तीपीठ.....मस्त शिर्षक.
पुरणपोळी, मोहनथाळ, मुठीया

मीपण ह्या फॅनक्लबमध्ये... शीर्षक एकदम लाजवाब आहे..
पुरणपोळी, टोमॅटो ऑम्लेट, कढी, वाटली डाळ.... तोंडाला पाणी सुटलय जाम
जेवणात ही साइड डीश म्हणून मस्त>>>होना...पण इतकी मस्त लागते ना कि माझी आई मला नेहमी सांगायची..कि ती मेन डीश नाहीये जरा कमी खा >>> १०० टक्के अनुमोदन.. वाटली डाळ विथ लॉट्स ऑफ कैरी... आहाहा ... स्वर्गसुख ते खाणं म्हणजे Happy

भजी आणि बटाटेवडे, फरसाण फाफडा खूप आव्डते, पण बेसन ८१ रु. किलो असल्या मुळे आजिबात आणत नाही. कधीतरी हे पदार्थच १०० ग्राम आणून खाते. टोमाटो आमलेट सांडविच नावाचा ग्रिल्ड प्रकार पण हपिसात मस्त मिळतो. बेस्ट म्हणजे तळ्ण केल्यावर ते उरलेली बारकी भजी ! घो साळ्याची भजी पूर्वी पुण्यात लग्नाच्या पंगतीत हमखास असत. आता बुफे मेन्यू आले. परवा एका लग्नाला गेल्ते ते मीटिंग चे जेव्ण अ सते तेच वाटले.

मालवणी खाजा, खटखटे लाडू (हे मध्यम जाडीच्या शेवेचे गुळाच्या पाकातले तिळाच्या लाडवाच्या आकाराचे लाडू - खाताना दात तुटल्यासारखा आवाज येतो Lol ) मालवणी घीवर.

मोतीचूर लाडू, बुंदीचे लाडू, बेसन लाडू, रवा-बेसन लाडू... मावेत मिनिट्भर गरम करून खावेत. न खाणारा ४/४ लाडू खाऊन जाईल. केवळ त्याकरता मावे घ्यायला हरकत नाही... Happy
भर थंडीत गरम लाडू... जबरदस्त!

हरबर्‍याला चिक पी का म्हणतात?

रामायण महाभारतात बेसन पीठ होते का? ते त्याचे काय करायचे?

आज सकाळी सकाळी खाल्ले.

bread pakoda.JPG

गोविंदाच्या एका गाण्यातही बेसन आहे.

चक्की पे बैठा टायसन
सबको बेच रहा था बेसन

Happy

बेसनाशिवाय स्वयंपाकघर अपुर्ण Happy

रामायण महाभारतात घोड्यांना चण्याचा तोबरा घालत असतील तर त्याच चण्यांचं पीठही अस्तित्वात असेलच.

चण्याच्या डाळीला इंग्लिशमधे चिक-पी किंवा बेन्गाल ग्रॅम म्हणतात. शास्त्रीय नाव Cicer arietinum

याचा जगातला सर्वात प्राचीन पुरावा पूर्व मेडिटेरियन प्रदेशात (लेबानन-तुर्की-सिरिया आणि सभोवतालचा प्रदेश) प्रथम सापडतो - साधारणपणे इ.स.पू ९०००च्या आसपास. भारतीय उपखंडात प्रथम याचं अस्तित्व इ.स.पू ३र्‍या सहस्रकात सिंधू संस्कृतीत मिळतं. महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन वसाहतींमधेही चण्याच्या डाळीचे पुरावे मिळाले आहेत.

आयुर्वेद वा इतर अनुभवसिद्ध औषधांतूनच मॉडर्न मेडिसिन उत्क्रांत झालेले आहे.
विषय वेगळा आहे.
नंतर बोलू.>>> हो क्का??? बऽऽरं! Lol

पितृ पंधरवड्यात पाटवड्या करतात त्या ,आळूच्या वड्या ,शेंगोळ्या लै पदार्थ राहिलेत.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट.
व्यक्तिगत प्रतिसाद.

हो क्का??? बऽऽरं! हाहा
<<
तुमच्या कोणत्या शेपटिवर माझा पाय केव्हा पडलाय ते ठाऊक नाही, पण माझ्या नादी लागणे थांबवाल तर बरे. Proud
बेसनात आयुर्वेद घालायची बेसिकातच गरज नव्हती.
वरतून स्मायल्या टाकून काड्या करू नका.

धन्यवाद!

मंजूडी,

>> हो क्का??? बऽऽरं! Lol

त्याचं काय आहे की लोकायत तत्त्वज्ञानाचे एक प्रणेते चार्वाक यांनीच आयुर्वेद उचलून धरलाय. हा तिढा सुटत नाही तोवर विषय 'वेगळाच' असणार आहे! तोपर्यंत माबोवर सर्वसामान्य लोकांना महान विद्वानांच्या चार पायांचा प्रसाद खावा लागणार असं दिसतंय. त्याला काही इलाज नाही.

आ.न.,
-गा.पै.

Pages