आधुनिक सीता - २५

Submitted by वेल on 1 January, 2014 - 04:20

भाग २४ - http://www.maayboli.com/node/46887

आता रफिकचा विश्वास बसावा म्हणून प्रयत्न करणं मी सोडून द्यायचं ठरवलं. कितीही समजावून सांगितलं तरी त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास नव्हताच बसला. बसला असता तर त्याने मला असं बंदी बनून ठेवलं नसतं.

पूर्वी टॅब वर डायरी लिहिताना रोज मी नवा दिवस असं लिहित असे. रफिकने टॅबवर दिवस तारखेचं सेटिंग केल्यापासून मी तारिख घालून लिहू लागले होते. कॅलेंडरमधली नवरात्र संपली तर माझ्या आयुष्यातली नवरात्र संपली नव्हती. दिवाळी येऊन गेलेली मला साधारण कळली होती, पण त्या दिवाळीत मला दिवेही दिसले नव्हते की अनेक वेळा विनंती करून सूर्यप्रकाश. पण कधी कधी काही हव्या असलेल्या गोष्टी नको असलेल्या गोष्टींमुळे अनपेक्षित रित्या होतात.

एक दिवस रात्री डायरीत तारीख लिहिता लिहिता माझ्या लक्षात आलं, माझी तारीख चुकली होती. डायरीतल्या जुन्या नोंदी मी वाचल्या. नक्कीच चुकली होती. हे व्हायला मला नको होते, पण स्वतःचं दु:ख कुरवाळत बसलेल्या मला रफिकला शारिरीक रित्या सरेंडर होताना त्यावेळी काळजी घ्ययला हवी होती हे लक्शातच आलं नाही. आलं असतं तरी रफिक किंवा फातिमाने मदत केली असती का नाही माहित नाही.
'पण आता काय करायचं?' मी स्वतःलाच विचारलं. 'काय करणार आहे मी तरी? जे सत्य आहे ते सांगायचं आणि रफिकचा काय निर्णय आहे त्याची वाट पाहायची.'
मला स्वतःशीच संभाषण करायची सवय लागली होती. 'मानसिक संतुलन बिघडण्याची ही पहिली पायरी नसू दे' मी स्वत:लाच म्हटलं. पुन्हा स्वत;चं स्वतःलाच हसू आलं. प्रसंग काय आणि मी काय विचार करते आहे ह्याच.

रोजच्या सारखा रफिक सकाळी नाश्त्याला आला. माझं नाश्ता करण्यातही लक्ष नव्हतं ही गोष्ट मी रफिकला कशी सांगायची आणि त्याची त्यावर प्रतिक्रिया काय असेल त्याचाच विचार करत होते मी. रफिकने विचारलच मला. "बरं नाही का तुला? खात का नाही आहेस?"
"तशी बरी आहे मी. पण तुला एक सांगायचं होतं."
"आता काय नवीन. तेच पुन्हा सांगणार असलीस तर मला ते एइकायचं नाही आहे."
"रफिक मला वाटतय..."
"काय वाटतय?" थोड्या तुच्छतेनेच विचारलं त्याने.
"मला वाटतय I am pregnant"
"काय? that's a good news. but are you sure? inshaalaah. I am going to be a father. I will have my own baby. I dont need to pamper other babies now. . पण मला मुलगी हवी हा, तुझ्यासारखी दिसणारी. wow, I am going to be a father. I must tell everyone. I am going to be a father."
रफिकचा आनंद शब्दात मावत नव्हता.
"रफिक मला खात्री नाही आहे, पण मला तसं वाटत आहे.खात्री करून घ्यायला हवी"
"हो हो नक्की. मी फातिमाला सांगतो. ती तुला ते प्रेग्नन्सी किट आणून देईल. पॉझिटिव्ह असेल तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ चेकप करायला."
आणि रफिक घाई घाईने नाश्ता न संपवताच बाहेर गेला. नक्कीच फातिमाला सांगायला. काय वाटत असेल तिला. आणि रफिक असं का म्हणाला, I am going to be a father. I will have my own baby. I dont need to pamper other babies now.म्हणजे रफिकला मूल बाळ नव्हतं? रफिकचं लग्न होऊन सात आठ वर्ष झाली होती. म्हणजे फातिमामध्ये काही प्रॉब्लेम होता का? का म्हणूनच रफिकने मला इथे पळवून आणलं होतं का?

रफिक परत आला आणि पुस्तकांबद्दल कामाबद्दल पुन्हा काही तरी बोलत बोलत त्याने नाश्ता संपवला.
"मी थोड्याच वेळात येतो. फातिमा तुला ते किट आणून देईल, मग आपण पुढे कसं काय ते पाहून" असे सांगून तो कुठलं तरी गाणं गुणगुणत निघून गेला. थोड्या वेळाने फातिमाने प्रेग्नन्सी टेस्ट्चं किट आणून दिलं. रिझल्ट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते कन्फर्म करण्यासाठी ती माझ्या सोबत त्याच खोलीत थांबली होती. मी अक्षरशः देवाचा धावा करत होते मनात की टेस्ट निगेटिव्ह येऊ दे. निसर्गाला अनुसरून पण माझ्या दुर्दैवाने टेस्ट पॉझिटिव्ह होती. मी तसे फातिमाला सांगितले. तिने माझ्याकडे एखादा क्षणच पण रोखून पाहिले आणि ती माझ्या खोलीच्या बाहेर गेली. मोजून दुसर्‍या मिनिटाला रफिक त्या खोलीत आला.
"आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. चल लगेच तयार हो. फक्त केस व्यवस्थित बांधून घे आणि ते दिसणार नाहीत अशा प्रकारे त्यावर स्कार्फ बांधून घे."तितक्यात फातिमाने काळ्या रंगाचा एक मोठा स्कार्फ आणून दिला.मला सगळे केस बांधून ते लपवता येत नव्हते. फातिमानेच माझे केस बांधून त्यावर केस दिसणार नाहीत असा स्कार्फ बांधून दिला. याशिवाय तिने एक पूर्ण उंचीचा ओव्हरकोटसुद्धा दिला. त्या ओव्हरकोटात माझे हात पाय पूर्णपणे झाकून गेले होते. मला बाहेर जायचं होतं पण ह्या कारणाकरता, हे असं? पण पुन्हा तेच माझ्या हातात काहीच नव्हतं.

फातिमाला सोबत घेऊन रफिक मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पितलच्या दारातून पाऊल टाकत असताना अंगावर शिरशिरी उठून गेली. हेच ते हॉस्पिटल जिथे माझा नवरा मानाने काम करत होता. नवर्‍याचं नाही तर नवर्‍याच्या कर्मभूमीचं दर्शन तर मला घडलं होतं. मला माझ्या नवर्‍याच्या कर्मभूमीचं दर्शन जसं झालं तसं माझ्या नवर्‍याचंही दर्शन कधीतरी होईल का, असा विचार माझ्या मनात येऊन गेला.

मला आश्चर्य वाटलं हॉस्पिटलमध्ये गायनॉकॉलोजिस्ट म्हणून एक स्त्री डॉ होती. तिने माझ्या तपासण्या करून मी प्रेग्नंट आहे ह्याचा निर्वाळा दिला. काही औषधे - सप्लिमेंटस वगैरे तिने लिहून दिली होती. सुरुवातीचे तीन महिने योगासने पूर्ण बंद हे सांगायलाही ती विसरली नाही आणि त्या ऐवजी मला तिने थोडा वेळ चालणे हा एकच व्यायाम करायला सांगितला. आणि तोही जमिनीवर चालण्याचा ट्रेडमिलवर नाही. मी चालण्याचा व्यायाम आता माझ्या खोलीत करू शकणार होते का? माझ्या खाण्यापिण्याकडे खास लक्ष ठेवण्यासही सुचवले होते. माझ्या शरीराला पचतील असे माझ्या खाद्यसंस्कृतीतले पदार्थ मी खावेत ह्यावर तिचा कटाक्ष होता.

माझं चेकप झाल्यानंतर ती डॉक्टर आणि रफिक बराच वेळ एकमेकांशी अरेबिक मध्ये बोलत होते. मला अरेबिक येत नाही ह्याबद्दल मला खरच खूप वाईट वाटलं.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला भेटून झाल्यावर झाल्यावर रफिक मला आणि फातिमाला एका जवळच्या मॉलमध्ये घेऊन गेला. त्याने आम्हा दोघींसाठी कपडे आणि दागिन्यांची खरेदी केली. माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. मी त्याला दिलेली बातमी एवढी चांगली होती का की ज्यामुळे तो मला बाहेर फिरायला खरेदीला घेऊन गेला होता.

घरे पोहोचल्यावर दिसले की रफिकच्या घरातील अनेक बायका मला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यात रफिकच्या चारही आया आणि त्याच्या एका बहिणीला मी ओळखले. रफिकने मला सांगितले बाकीच्या रफिकच्या मोठ्या बहिणी होत्या ज्यांचे लग्न झाले होते. दोघी रफिकच्या चाची होत्या. सगळ्या बायकांनी मला घेराव घातला, मला जवळ घेतले, मला अगदी निरखून निरखून पाहू लागल्या त्या.

क्रमशः

पुढील भाग - http://www.maayboli.com/node/47220

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता २ शक्यता हिला मूल होणार किंवा नाही .. झाल तर लगेचच सुटका किंवा काय
नाही तर मधेच रफिकचि सिक्युरिटी सैल झाली की बया पळुन जाण्याच धाडस करते की नाही .. हिला कुण्या भारतियाची तिथे मदत मिळते की नाही ...
शिवाय तिच्या नवर्‍याचे पराक्रम एकदम क्लायमेक्स मधेच वाचायला मिळणार की काय ..
वा वा इंटरेस्टिंग झालय ..
पण लवकर लवकर येउ दे ग मुली ..

रफीक पण डॉक्टर आहे ना? मग तिला लगेच हास्पिटलात कशाला नेतो? घरी व्हिजिटला का नाही आणत डॉक्टर? थोडं कन्फुझिंग झालं>

रफीक पण डॉक्टर आहे ना? मग तिला लगेच हास्पिटलात कशाला नेतो? घरी व्हिजिटला का नाही आणत डॉक्टर? थोडं कन्फुझिंग झालं>>>+१

खरे सांगायचे तर ही कादंबरी जरा जास्तच पाल्हाळ लावतेय आणि विनाकारण खेचली जातेय असे तीव्रतेने जाणवतेय.
एकतर दहा -वीस ओळींचे भाग आणि म्हणावे तसे उत्कंठावर्धक किंवा पकड घेणारे भाग काही दिसत नाहीये. अगदी ४ आठवड्यांनंतर आले तरी ४-५ भाग पोस्ट केलेले दिसतात आणि ते ही १० मिनिटात वाचून संपतात आणि विशेष काही घडत नाही..

कादंबरी सुत्र चांगले आहे पण अती तेथे माती हे सुत्र लक्षात ठेवली तर कादंबरी चांगली पकड घेईल आणि सातत्य राहिले तर उत्सुकता कायम राहील.

रफिकचे हॉस्पिटल आहे पण तो शिक्षणाने इंनिनियर आणि व्यवसायाने बिझिनेसमन आहे. भाग छोटे असण्याबाबत - मी पेशाने ऑडिटर आहे त्यामुळे ऑफिसमध्ये बसून वेळ मिळेल तसे लिहून साधारण १००० शब्द झाले आणि मला हवा तो पॉईंट आला की भाग पोस्ट करते. मी फार मोठा भाग लिहित बसले तर मला नवा भाग टाकायला २ आठवडे लागतील.

वेल तू please public pressure ला बळी पडू नकोस. वेळ घे पण तुझी originality घालवू नकोस. मला कथा आवड्लीच पण त्याहून जास्त तझ्या नाईकेच character आवडल. अश्या कठिण परिस्थितीत किती शान्त डोक ठेऊन ती विचार करते. फातिमा बद्द्लपण वाचायला आवडेल.