'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
ए इतकं काय अरे!
ए इतकं काय अरे!
जया-धना चं काहीही चाललंय..
जया-धना चं काहीही चाललंय.. काय तर म्हणे गुरुजी आजकाल.. असोच.. जौद्या झालं..
स्पृहाचे पाय खरंच...
महाएपिसोड वाया घालवला..
एकटा उका हि सिरियल खेचुन नेतोय.
मला मालिका आवडत नाहिये असं नाही पण समहाऊ मला काहीही कारणासाठी खोटं बोलुन लग्न करणे पटत नाहिये. इतकंच प्रेम असेल तर स्पृहाने समजुतदारपणा दाखवुन त्याला त्याच्या सत्यासकट (मंजिरीचा नव्हे) अॅक्सेप्ट केले पाहिजे.
पण मग मालिका संपून जाईल.
सत्यासकट (मंजिरीचा नव्हे)
सत्यासकट (मंजिरीचा नव्हे)
स्पृहाच्या घरचे म्हणजे राहुल
स्पृहाच्या घरचे म्हणजे राहुल रॉय कडून अभिनय (!!!) शिकल्यासारखे करतात. नवीन कलाकारांच्या नावाखाली रद्दी भरली आहे. स्पेशली तीचा तो अतिभोचक आणि आगाऊ लहान भाऊ म्हणजे अतिशय डोक्यात जाणारं पात्र. उमेशच्या शेजारचे आजोबा तर महासुमार. दिवसेंदिवस पकाऊ आणि दर्जाहीन होत चाललेली मालिका. एलदुगो ची काडीमात्रही सर नाही. पण उमेश कामतने स्वत:ला सिद्ध केलं आहे. मोहन जोशी भन्नाट .
समस्त मा.बो.कर आणि करणींनो,
समस्त मा.बो.कर आणि करणींनो, ए.ल.ति.गो मध्ये भोचकभवानी ईशाच्या मैत्रिणीचे (अश्विनीचे) संवाद लिहिणारा/री हा धागा वाचतो/ते नकीच. आज अश्विनी ईशाला फोनवर माज करू नकोस, तसंच तू 'सिक' आहेस असं काहीतरी म्हणाली....आप्पुनका दिलखुस....लगेहातो ईशाचा कान चांगला करकचून पिळून आगाऊपणा 'आवर' असंही सांगितलं असतं तर बरं झालं असतं....
दक्स....
दक्स....
अबोलीजान्हवी
अबोलीजान्हवी
अग्ग अनिश्का तुम्ही पण त्या
अग्ग अनिश्का तुम्ही पण त्या ओम ईशा सारखं ऊंदीर ऊंदीर करायचं ना? आय मीन पाल पाल
अंजली अगं मला नाई वाटत पालीची
अंजली अगं मला नाई वाटत पालीची भिती ( अंगावर उडी मारे पर्यंत ).....माझा नवरा च धावत असतो इथे तिथे....ती अॅड नाही का कसली तरी...मुलगा धावत येतो मग डॅडी धावत येतो...आणि आत पाल असते तशी सिचुएशन आमच्या घरी...
पण खरच...माझं ठाम मत आहे ही इशा बदला आता...नाहीतर अॅमच्यॅ घॅरी प्रॅर्थॅनॅ म्हॅणतॅत...हे ऐकुन ऐकुन जीव जाईल....प्रिया बापट पण अशिच बोलते अस मला वाटते....मी शिवाजी भोसले बोलतोय मधे काल ती बोलत होती.." बॅबॅ कॅय हो हॅ...."
मला एक कळत नाही. ईशाला ओम नी
मला एक कळत नाही. ईशाला ओम नी रविवारच्या एपिसोड मध्ये सगळ सगळ खर ते सांगितलं ना? मग आत्ता त्या म्याडम चा नवरा येउन सगळी नाटक झाल्यावरच इशा एकदम कशी काय बिथरली?. ओम नि तिला सगळ खर खर सांगितलं तरी सुद्धा . काहीच कळत नाही. येडचाप सारख चाललाय सगळ. पहिल्या पहिल्यांदी मालिका सुरु झाली कि ताबडतोब बंद करत होते. आताही तेच करायला पाहिजे
ईशाला ओम नी रविवारच्या एपिसोड
ईशाला ओम नी रविवारच्या एपिसोड मध्ये सगळ सगळ खर ते सांगितलं ना?
>> नाही. ते त्याचं स्वप्न होतं.
काल मी सर्च करता करता बघितला
काल मी सर्च करता करता बघितला भाग या सिरीयल चा....ती रागवुन बॅग घेउन निघुन जाते....मग उमेश कामत तिच्या पाठी जातो....बंद दारा बाहेर बसुन रडतो आणि बोलतो मी तुला सर्व खर सांगणार होतो गं...मला सोडुन जाउ नको मी एकटा पडेन गं....पण ही दार उघडत नाही......
तीला बसलेला धक्का आणि तीचं वागणं स्वभाविक आहे....त्या वेळे पुरतं माणुस गडबडुन जातो फसवणुकीच्या भावनेने...पण माझ्या नवर्याला काल काय झालेले माहित नाही.....तो तर फुल ऑन सूटलेला...बोलत होता...ही ईशा बावळट आहे, ती अस काय वागतेय, हा कशाला पाठी जातोय, सोडुन द्यायच ना तीला इतका भाव खातेय तर,.........मी तस म्हणालेही की अरे तीला धक्का बसलाय..उद्द्या दाखवतील ना ती त्याच्याशी बोलताना.....त्याला उमेश कामत ची दया येत होती... ( मलाही...तो क्युट दिसत होता ...रडतानाही )
मला मायबोली आठवली....तर नवरा म्हणतो कसा जा तुझा मायबोली फ्रेंड्स ना सांग...त्यांनाही तसच वाटत असेल.....म्हणुन आलिय इथे....काल त्या एपिसोड आणि नवर्याने डोक्याची भजी केली...... :रागः आता ही सिरीयल बंद झालीच पाहिजे.....
( मलाही...तो क्युट दिसत होता
( मलाही...तो क्युट दिसत होता ...रडतानाही )>> हो. कालचा अख्खा सीन उमेश कामतने खाल्ला. त्याअधी त्याच्या घरी ती काय बडबडली ते बघून तिला धक्का बसलाय की वेड लागलंय अशा प्रश्न पडला.
त्याअधी त्याच्या घरी ती काय
त्याअधी त्याच्या घरी ती काय बडबडली ते बघून तिला धक्का बसलाय की वेड लागलंय अशा प्रश्न पडला. >>> +१००
'अग्निहोत्र' परत दाखवताहेत. त्यातली स्पृहा आणि ह्यातली स्पृहा यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अग्निहोत्र मधला अभिनय तिला 'बाय फ्लूक' जमला असावा अशी शंका यायला लागली आहे मला.
त्याअधी त्याच्या घरी ती काय
त्याअधी त्याच्या घरी ती काय बडबडली ते बघून तिला धक्का बसलाय की वेड लागलंय अशा प्रश्न पडला. >>> काय म्हणाली थोड सांगा.. तो भाग चुकला...
त्याअधी त्याच्या घरी ती काय
त्याअधी त्याच्या घरी ती काय बडबडली ते बघून तिला धक्का बसलाय की वेड लागलंय अशा प्रश्न पडला. >>> काय म्हणाली थोड सांगा.. तो भाग चुकला...
>>
+१
तिला (घरचे सगळे खोटे आहेत) हे
तिला (घरचे सगळे खोटे आहेत) हे सगळं कळल्यानंतर अतिशय वेड्यासारखं हसून मला तुम्ही कुणी नको आहात, मला तुमच्या सगळ्यांची भीती वाटते असं बडबडत होती...हे सगळं बोलताना ती अखंड हसत होती!! (कारण राग आला तर तिला हसायची सवय आहे म्हणे...)
स्पृहा काल अतिशय डोक्यात गेली आहे.
आणि तितकाच उमेश कामत अप्रतिम.. कालचा एपिसोड त्याने खरंच खाऊन टाकला. इशाच्या घराबाहेर बसून बोलतानाचा प्रसंग त्याने असा केलाय ना...बस्स्स!!
अय्यो! बरं झालं मग मी बघितलं
अय्यो! बरं झालं मग मी बघितलं नाही
इशाच्या घराबाहेर बसून
इशाच्या घराबाहेर बसून बोलतानाचा प्रसंग त्याने असा केलाय ना...बस्स्स!!>>तो तिच्या मागून जातो तो सीनदेह्खील त्याने अफाट केलाय. बायदवे, त्याच्याकडे फ्लॅटची एक चावी असते ना? मागच्यावेळेला तीच वापरून तो आत येतो ना?
स्पृहाचा अस्मिताने मेन्शन
स्पृहाचा अस्मिताने मेन्शन केलेला वेडेचाळे प्रकार मी पाहिला नाही तेच बरं झालं. नाहीतर मी माझं स्वतःचं ४० हजाराचं नुस्कान करून घेतलं असतं (टिव्ही फोडून)
दक्षे तु स्वःताचा तर फोडलाच
दक्षे तु स्वःताचा तर फोडलाच असतास.. पण शेजारुन जर का चुकुन सिरेलचा आवाज आला असता तर त्यांचा पण फोडला असतास ईतका वेडपट प्रकार होता ईशाचा..
बायदवे, त्याच्याकडे फ्लॅटची
बायदवे, त्याच्याकडे फ्लॅटची एक चावी असते ना? मागच्यावेळेला तीच वापरून तो आत येतो ना? >>> हो मि पण घरि काल हेच बोललि ...
तो घाईत विसरला असेल ...
तो घाईत विसरला असेल ...
हो, म्हणजे आज लक्षात येईल
हो, म्हणजे आज लक्षात येईल त्याला....
बॅग घेऊन बाहेर पडताना पण
बॅग घेऊन बाहेर पडताना पण मुर्खासारखा अभिनय केलाय. दनदन्दन सगळं विचारून मोकळं व्हायचं ते नाही. उगिच शॉक्ड स्थितित बसायचं आणि आमच्या डोक्याला ताप.
दक्षे, तु सिरियल बघु नगोस..
दक्षे, तु सिरियल बघु नगोस..
हो, इशाचा आततायीपणा जरा
हो, इशाचा आततायीपणा जरा जास्तच दाखवलाय. त्या आधी किशोर कदमचं पात्र फुल्ल गंडलंय. त्याची एन्ट्री कसली खतरनाक झाली. पण नंतर काय बावळटपणा चालू होता! इशाचंही तेच चाललंय लेखकाची चूक की दिग्दर्शकाची ते कळेना!
उमेश गोड आहे आणि मोहन जोशी अफाट!
त्या सिरियलमध्ये ते तिघंच
त्या सिरियलमध्ये ते तिघंच मोजो, उका आणि मोआ आणि त्यातल्या त्यात ती दाते. बाकी शून्य.
कालच्या भागात स्पृहाचा अभिनय
कालच्या भागात स्पृहाचा अभिनय भयंकर होता .
आणि ईशाची सत्य कळल्यावर जी प्रतिक्रिया दाखवली ती अत्यंत विचित्र होती
स्पेशली जेव्हा ओम तिच्या खांद्यावर हात ठेवतो ,तेव्हा ती जे किंचाळली आणि ज्या पद्धतीने हसत होती ,घाबरून घराबाहेर पळून जाणं
कालचा एपिसोड भंपक होता
त्या सिरियलमध्ये ते तिघंच
त्या सिरियलमध्ये ते तिघंच मोजो, उका आणि मोआ आणि त्यातल्या त्यात ती दाते. बाकी शून्य>>>>>> सागर तळाशीकर पण मस्तय
Pages