कोई जब राह न पाये, मेरे संग आये
कि पग पग दीप जलाये, मेरी दोस्ती मेरा प्यार|
'दोस्ती' सिनेमातील मजरूह सुल्तानपुरींनी लिहिलेले आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे अवीट गोडीचे गीत!
ऐकताक्षणीच न आवडते तर नवलच!
अनेकदा हे गाणे ऐकले, प्रत्येकदा आवडले पण दोनतीन दिवसांपूर्वी मुखड्याच्या अर्थावर विचार करू लागलो नि वाटले किती सुंदर अर्थ आहे ह्या गाण्याचा.
शब्दांना खूप महत्व देण्याचा स्वभाव असतानाही गेली अनेक वर्षे अनेक गाण्यांच्या बाबतीत असे झालेले आहे की ऐकलेली चाल आवडली म्हणून ते गीत आवडले आणि अर्थावर फारसा विचार प्रथमदर्शनी केला गेला नाही. परंतू नंतर कधीतरी ट्यूब पेटली आणि अशा चालींमधे हरवलेल्या कवितांचा साक्षात्कार झाला.
तर मित्रहो, आपणां सर्वांच्या बाबतीतही असे कधी ना कधी झाले असणारच किंवा आताही होत असणार. तर ह्या धाग्याच्या निमित्ताने अशा गाण्यांचा उल्लेख करायचा का?
नोंदवलेल्या गाण्याच्या काव्यातला आशय प्रभावी असावा असे पाहिल्यास उत्तम.
चला तर मग.............
काही गाणी मात्र निव्वळ आणि
काही गाणी मात्र निव्वळ आणि निव्वळ अर्था करता आवडतात.....
मेरे मेहबूब तुझे मेरे मोहोब्बत की कसम... हे गाणं मला फारसं आवडत नाही (चाल)
पण
सामने आके जरा पर्दा उठा दे रूख से
एक यही मेरा इलाज-ए-गम्-ए-तनहाई है
तेरी फुरकत ने परेशाँ किया है मुझको
अब तो मिल जा के मेरी जान पे बन आयी है......
महेंद्र कपूर यांचं एक गाणं आहे चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो
त्यांचा आवाज मला फारसा नाही आवडत. पण...त्या संपूर्ण गाण्याचा अर्थ अतिशय सुरेख आहे.
ते ही गाणं मला निव्वळ त्यांनी गायलंय म्हणून आवडत नाही.
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाये मेरी बातों से
न ज़ाहिर हो तुम्हारी कश्म-कश का राज़ नज़रों से
...
तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशकदमी से
मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पराए हैं
मेरे हमराह भी रुसवाइयां हैं मेरे माझी की
तुम्हारे साथ भी गुज़री हुई रातों के साये हैं
खास करून तिसरं कडवं तर कातिल आहे.
तार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
हाय ! काय आठवण काढली आहे.
'चलो इक बार फिरसे' जबरदस्तच आहे.
निव्वळ अर्थासाठी आवडलेली गाणी-
"हमने देखी है इन आंखोसे महकती खुशबू
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम ना दो
सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो.." - गुलजार. फुलस्टॉप.
'मै पल दो पल का शायर हूं' मधल्या या ओळी-
कल और आएंगे नगमो की खिलती कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले
आणि
वो भी इक पल का किस्सा थे, मै भी इक पल का किस्सा हूं
कल तुमसे जुदा हो जाऊंगा, वो आज तुम्हारा हिस्सा हूं..
'सलामे इश्क मेरी जां' मधला किशोरच्या आवाजातला पीस- "इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन" पासून पुढे. कधीही ऐकले तरी अंगावर काटा.
बरेच आहेत.. लिहूया हळूहळू.
या अशा गाण्यांच्या आठवणी निघाल्या की आत्ताच्या आत्ता ऐकायला मन आतुर होते.
प्यार को प्यार ही रहने दो,
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो.." - <<< हे खरंच अप्रतिम आहे
रोज रोज आखोतले मधल छोटीसी एक
रोज रोज आखोतले मधल
छोटीसी एक उलझन है
ये सुलझा तुम
जीना तो सिखा है मरके
मरना सिखा दो तुम
या ओळी रुंजी घालतात मनात
तसेच दिलसे मधल ऐ अजनबी तू भी
तसेच दिलसे मधल
ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहिसे हे गाण निव्वळ अप्रतिम
त्यातल्या
तू तो नही है लेकिन तेरी मुस्कराहट है
चेहरा कही नहीं है पर तेरी आरजू है
या ओळि तर कातिल आहेत
मुकद्दर का सिकंदरचेही तसेच
मुकद्दर का सिकंदरचेही तसेच झाले होते. मला तर चित्रपट पाहण्याआधी असे वाटले होते की मुकद्दर हे विनोद खन्नाचे आणि सिकंदर हे अमिताभचे नांव असेल आणि मधल्या 'का' चा अर्थ मी मराठी का प्रमाणे घेतला होता. म्हणजे हा की तो असे काहीतरी! >>> बेफि - हे महान आहे
नंदिनी ते 'मेरे घर मे तुमको कुछ सामान मिलेगा, दीवाने शायर का एक दीवान मिलेगा' मधला 'दीवान' म्हणजे माझ्या घरी एक दिवाण मिळेल असे म्हणतोय असेच वाटायचे (आनंद बक्षीचा काय भरवसा). 'दीवान' चा तेथील अर्थ बर्याच नंतर कळाला
ज्ञानेश - कभी कभी मधले तसेच "मै हर इक पल का शायर हूँ" मधली कडवी तशीच अर्थपूर्ण आहेत. तोपर्यंत चालीकडे लक्ष राहिल्याने लौकर लक्षात येत नाहीत. किंबहुना साहिर ची कोणतीही गाणी लक्ष देउन ऐकल्यास काहीतरी नवीन सापडतेच (मराठीत गदिमा)
हा धागा पुनरुज्जीवीत करावा
हा धागा पुनरुज्जीवीत करावा असे वाटले!
Pages