बालपण

Submitted by समीर चव्हाण on 2 December, 2013 - 02:53

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक शेर आहे मतला आहे त्या जमीनीत काफिये सुचता सुचेनात सुचले तरी रदीफ अडचणीची वाटू लागली नाही म्हणायला त्यानंतर ओढून ताणून मी तीन चार शेर केले पण सफाई काही केल्या येइना नाही म्हणायला अजून एक शेर असा होता की तो बर्‍यापैकी जमला असे म्हणता येत होते पण विषय चघळून चोथा झालेला म्हणून मग गझलच केली नाही
तो मतला असा.....

माझ्या गझला अन् माझ्यात बखेडा आहे ....
'विठ्ठल नक्की कोणापायी वेडा आहे?" .

असे अनेक शेर अजून आहेत एक शेर असा .....

उत्तर कळल्यावर प्रश्न अजूनच छळतो
की ..विठ्ठल का वागेल असा माझ्याशी ?

मला वाटते की एकदा जमीन सुचली की त्याच जमीनीत अजून शेर न होण्यामागे तिच्यातील आपली तल्लीनता .एकाग्रता काही अपरिहार्य अश्या ही तांत्रिक/भावनिक कारणांमुळे टिकवून ठेवता न येणे हाही घटक असू शकतो

आपली तल्लीनता .एकाग्रता काही अपरिहार्य अश्याही तांत्रिक/भावनिक कारणांमुळे टिकवून ठेवता न येणे हाही घटक असू शकतो>>>

चांगला मुद्दा वैभव!

विदीपांच्या मागील प्रतिसादाशी सहमत....

त्या जमिनीत ५ शेर करणे त्यांना मुळीच कठीण नाही.... परंतु आशय आणि इतर तडजोडी मान्य नसल्याने असे शेर फुटकर अशआर या सदरात रहातात .

विदिपा, मला नाही वाटत चर्चेला समीरचा विरोध असेल.

माझा नक्कीच विरोध नाही. परंतु ज्या पध्दतीने काही लोक कमेंन्टस देत आहेत. फार अस्वस्थ करणारे आहे.
कुणी म्हणते बालकविता आहे. बालकविता काय असते हे समजून तर घ्या असे विधान करण्यापूर्वी.
उंबरठ्यावर असताना धाकधूक होती
घरात गेल्यावर थोडे हायसे वाटले

ह्या शेरातली भीतीची सावली कुठल्या बालकवितेत आपण पाहिली नमूद करावे.
तर कुणी दुस-या धाग्यावर आवडलेल्या शेरांना इथे दाद देत आहे.
आवडले नाहीतर तसे लिहा. वा लिहा सुमार आहे. रचनेला धरून लिहा म्हणजे झाले.

भूषण, मात्रा वृत्तातील लय म्हणून म्हणून जोखावी लागते.
तसेही फुटकर मध्ये अनेक वृत्तातील शेर एकत्र देण्याचा प्रघात आहे. तेव्हा लय बदलणे ह्यात गैर असे काहीच जाणवले नाही.

गझलेत किती शेर आवश्यक असतात ह्या बाबतीत सांगावेसे वाटते की दीवान-ए-गालिब मध्ये किमान ५-१० गझला तीन-चार शेरांच्या आहेत. ह्या मोजक्या गझलांमध्ये रहिए अब ऐसी जगह जहा कोई न हो ही गालिबची अजरामर गझल आहे. २०० आकड्यांत ५-१० लहान असला तरी गालिब त्यांना फुटकर समाविष्ट करीत नाही ह्याचे कारण तो अश्या रचनांनाही गझलच समजतो, हे समजून घ्यायला हवे.

देवा: प्रत्येक शेरात एक फील आहे वा कथन आहे. प्रत्येक शेर स्वयंपूर्ण आहे हे काळजीपूर्वक पाहिल्यास लक्षात येइल. शेरात वर्णन असू नये असे थोडेच आहे. मीर ची मौसम है निकले शाखोंसे पत्ते हरे हरे
ही गझल चांगलं उदाहरण आहे.

कमी-अधिक बोललो असल्यास गैरसमज नसावा.
तूर्तास इतकेच.

दोन दिवस मी बाहेरगावी होतो; म्हणून लिहू शकलो नाही.

आपण अगदीच टोकाचे लिहिलेय असे जाणवले.

मी अगदी टोकाची प्रतिक्रिया दिली; कारण मी समजत होतो की समीर चव्हाण हे गज़लचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी पूर्वी काही उर्दू शायरांच्या गज़लांचे रसग्रहणात्मक अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले होते.

तुम्ही शीर्षक दिले आहे - 'बालपण'. अर्थातच वाचक समजणार की 'बालपण' या विषयाला धरून काही ओळी खाली असतील. सर्व ओळी वाचल्या तर जाणवते की काही ठिकाणी तुटक तर काही ठिकाणी एकसंघ विचार आलेले आहेत.

त्यातला एखादा शे'र अर्थपूर्ण आणि मात्रापूर्ण असेलही... पण अपवादाला नियम म्हणता येत नाही.

गालीब किंवा अन्य काही शायरांच्या ४ शेरांच्या गज़ला आहेत, पण त्या गज़ला म्हणून प्रसिद्ध आहेत; दोन तीन वेगवेगळ्या जमिनीच्या गज़ला एकत्र करून एक गज़ल म्हणून नव्हे.

जर हे फुटकळ शेर म्हणून लिहिले असतील तर त्यांना तसे शीर्षक द्यायला हवे होते. सध्याच्या रचनेतून यातील कुठलीच गोष्ट दिसून येत नाही. Uhoh

हे फुटकळ शेर म्हणून लिहिले असतील तर त्यांना तसे शीर्षक द्यायला हवे होते.

माझ्यामते आपल्या अगोदरच्या प्रतिसादात हा फुटकळ मुद्दा हायलाइट होत नाहीय.
किमान आपला प्रतिसाद मागील प्रतिसादाशी सुसंगत असावा (त्यातील मुद्दे लय आणि बालकविता), इतकेच वाटते.
राहिलं शीर्षकाचं तर धाग्यामध्ये (tag) काव्यलेखन, फुटकर, मस्नवी खंड-१ असे विषय आहेत.
ही टेक्निकली मस्नवी (वा तिचा खंड) नाही म्हणून शीर्षकात हे टाळले. टाकताना मस्नवीसदृश्य रचनेचा खंड ह्या विचाराने नाव दिले होते.

धन्यवाद.

समीर.. आपला मुद्दा मान्य..
फक्त मला एक दोन जागी शेर अर्धवट राहिला असे वाटले.
उदा.
शाळेच्या समोर होता छोटा दरवाजा
निघायचा तो मोठ्या वाड्याच्या भेदाशी

इथे पुढे अजून काहितरी येइल अशी अपेक्षा निर्माण होते, त्यामूळे तो पूर्ण आहे असं मला वाटत नाही.
अर्थात हा माझ्या बुद्धीचा दोष असू शकतो. पण जे वाटले ते लिहिले. (पण वाट्टेल ते नाही Happy )

बेफिजींच्या पोस्टसना अनुमोदन.

विदिपा अतिशय योग्य मुद्दा चर्चेसाठी घेतल्याबद्दल धन्यवाद.

<<<आपली तल्लीनता .एकाग्रता काही अपरिहार्य अश्याही तांत्रिक/भावनिक कारणांमुळे टिकवून ठेवता न येणे हाही घटक असू शकतो>>>> १००% सहमत.

माझा एक शेर नमूद करावासा वाटतोय इथे

किती पचवायचे हे दुखवट्यांवर दुखवटे
किती चढवायचे रे मुखवट्यांवर मुखवटे ?

एका भावनावेगात हा होवून गेला, दुखवटे- मुखवटे मुंळे पडलेल्या मर्यादा जाणते मी परंतू त्या परिस्थितीत
या शेरातून माझ व्यक्त होण मला स्वतःलाच खुप धीर देवून गेल. आता यापुढे या जमिनीत गझल रचण तांत्रिक नि मानसिकदृष्ट्याही अशक्य आहे.

Pages