Submitted by समीर चव्हाण on 2 December, 2013 - 02:53
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अ प्र ति म अगोदर सांगीतलेले
अ
प्र
ति
म
अगोदर सांगीतलेले होतेच!
इथे प्रकाशित केलेस हे बरे झाले. नवीन गझलेच्छुंनी भरभरून घ्यावे असे कन्टेन्ट प्रत्येक शेरात आहे. किंबहुना कसलेल्या गझलकारांनासुद्धा अंतर्मुख करायला लावणारे सगळेच शेर झालेत.
धन्यवाद!
वुई आर प्राऊड ऑफ यू समीर!
नवीन गझलेच्छुंनी भरभरून
नवीन गझलेच्छुंनी भरभरून घ्यावे असे कन्टेन्ट प्रत्येक शेरात आहे. किंबहुना कसलेल्या गझलकारांनासुद्धा अंतर्मुख करायला लावणारे सगळेच शेर झालेत.
ही गझल आहे?
ही गझल आहे?>>> उल्लेख म्हणूनच
ही गझल आहे?>>>
उल्लेख म्हणूनच शेरांबद्दल केलाय वैदेही.
हे सर्व बालपण ह्या विषयावर फुटकळ/फुटकर शेर आहेत.
ओह असे आहे होय. माझं
ओह
असे आहे होय.
माझं अज्ञान.
शेर आवडले.
बालपणा इतकेच निखळ शेर ...
बालपणा इतकेच निखळ शेर ... प्युअर
शाळेच्या समोर होता छोटा
शाळेच्या समोर होता छोटा दरवाजा
निघायचा तो मोठ्या वाड्याच्या भेदाशी
हा आवडला.
बालपणाच्या हृद्य आठवणी .....
बालपणाच्या हृद्य आठवणी ..... छान वाटलं वाचताना.
शेवटच्या दोन द्वीपदी सर्वात विशेष वाटल्या.
सर्वच शेर खास....
सर्वच शेर खास....
सॉरी... अजिबातच
सॉरी... अजिबातच आवडल्या/भिडल्या नाहीत या ओळी... माझंही अज्ञानच असेल कदाचित...
मात्रा वगैरे मोजल्या नाहीत मी, लयीत वाचता आल्या त्यामुळे आणि समीरजींनी गझल टॅगमध्ये टाकल्यामुळे बरोबर असतीलच...
उंबरठा आणि सुई या द्विपद्या
उंबरठा आणि सुई या द्विपद्या आवडल्या.
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून आभार.
संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत हे स्पष्ट आहे.
जाणीवपूर्वक वेगळे काही लिहिण्याचा प्रयत्न नव्हता.
खरेतर एक मस्नवी ला जवळ जाणारी दीर्घकविता लिहीत आहे गेल्या काही महिन्यांपासून.
फुटकर १ आणि २ तसेच बालपण हे त्याचेच भाग आहेत.
असो, काय कमी आहे ह्यावर नक्कीच विचार करीन.
सगळ्या शेरांमध्ये एक वृत्त, एक लय नाही हे अगदी मान्य.
धन्यवाद.
कविता फारशी आवडली नाही पण जे
कविता फारशी आवडली नाही पण जे जे लिहिले आहे ते ते प्रत्यक्ष अनुभवून मग लिहिले असल्याचे लगेच जाणवते अतीशय प्रामाणिकपणाने लिहिले आहे ही बाब आवडली
विदिपा, ही काय चर्चा सुरू
विदिपा,
ही काय चर्चा सुरू केली? बालकविता म्हणून ठिक आहे. पण गज़ल? फुटकळ द्वीपदी? काही विचार आणि त्यांची मांडणीसुद्धा चांगली आहे, हे अमान्य करता येणार नाही.
सगळ्या शेरांमध्ये एक वृत्त, एक लय नाही हे अगदी मान्य.
कुठल्या शेरामध्ये एक वृत्त, एक लय आहे? माझ्यामते एकाही द्वीपदीमध्ये वृत्त, लय नाही.
हां. मुक्तछंद म्हणता येईल फार तर!
शरदजी: आपण अगदीच टोकाचे
शरदजी:
आपण अगदीच टोकाचे लिहिलेय असे जाणवले.
एकाही द्वीपदीमध्ये वृत्त, लय नाही.
ह्याला उत्तर म्हणून एकच शेर कसा वृत्तात आणि लयीत आहे ते समजावून सांगतो:
पुराने कसे हाल करवले ऐकत होतो
तुझी कहाणी अमुच्यासाठी गोष्टच होती
हा शेर मात्रावृत्तात असून ८ + ८ + ८ अश्या मात्रा पाहता येत आहेत.
पुराने कसे - हाल करवले - ऐकत होतो, असे वाचलं की लयही सापडेल.
रचनेच्या गुणवत्तेविषयी आपआपले मत देण्याचा हक्क ज्याला-त्याला आहे, त्यावर मी काय बोलू.
ह्या वृत्तातला माझाच एक शेर आठवला:
किती ठरवतो कलहापासुन दूर रहावे
स्वतःस आवरता आवरता विस्कटतो मी
धन्यवाद.
समीर
किती ठरवतो कलहापासुन दूर
किती ठरवतो कलहापासुन दूर रहावे
स्वतःस आवरता आवरता विस्कटतो मी... वा वा !!
बरेच शेर आवडले.
धन्यवाद !
शरदजी, 'फुटकर अशआर' ही
शरदजी,
'फुटकर अशआर' ही उर्दूतली संकल्पना आपण वाचलेली असावीत अशी अपेक्षा.
कितीही म्हटले तरी कुठल्याच शायराकडून सलग गझल लिहून होत नाही. बर्याच जमीनी फक्त एका शेरापुरत्या आपल्याकडे पडून राहतात. असे अनेक शेर एकत्र प्रकाशित करायला हरकत का असावी? भले त्याला गझल म्हणता येणार नाही.
पण एक शेर ही एक स्वयंपूर्ण कविता हा निकष आहेच की! अशा अनेक स्वयंपूर्ण कविता एकतर स्वतंत्र प्रकाशित करता येतील किंवा एकत्रही, कवीला स्वातंत्र्य असलेच पाहिजे.
अनेक हायकू एकाच ठिकाणी प्रकाशित केले जातातच ना?
गझलेत किमान पाच शेर असावेत
गझलेत किमान पाच शेर असावेत असे ऐकून आहे. या एका जमिनीतले पाच शेर काही आपल्याला लिहिता येत नाहीत हे एकदा स्वीकारले की जे सुचलेय ते फुटकर शेर म्हणून मांडायचे असेच का?
मयेकर, विषय सांगायचा माझ्या
मयेकर,
विषय सांगायचा माझ्या माहितीतून प्रयत्न करतो. अनेक दिग्गज शायरांचे गझलसंग्रह वाचले. सुरुवातीची बहुतांशी पाने पूर्ण गझला दिलेल्या असतात. शेवटच्या काही पानांवर असे मुक्त शेर असतात जे एखाद्या गझलेचा भाग नसतात.
हे शेर कसे निर्माण होतात? तर हे शेर निर्माण होण्याची प्रक्रिया अधिक अस्सल असते कारण ह्या शेरांच्या आधी मतला किंवा नंतर गझल पूर्ण करण्यासाठी भरतीचे शेर घेण्याचा मोह शायर टाळतो. आता हाच मोह तो इतर गझलांच्या बाबतीत का टाळत नसेल, की इतर गझला खरोखरच पूर्ण सुचणार्या असतात? ह्या प्रश्नाची एकाहून अधिक उत्तरे आहेत.
१. इतर गझलांच्या जमीनी तुलनेने सोप्या असल्याने इतर काही समकालीन (सुचण्याची प्रक्रिया चालू असताना जे इतर खयाल मनात घोळत असतात ते समकालीन) खयाल त्या जमीनीत ओवता येतात.
२. अनेकदा गझलेची जमीन उस्ताद शायराकडून ओळी करवून घेते. म्हणजे शेर नाही, पण एक अख्खीच्या अख्खी प्रवाही व नोर्दोष ओळ आपोआप मनात येईल इतक्या ताकदीच्या शायराला जमीन ती मुभा स्वतळ्हून देते. ती ओळ इतकी प्रभावी घडते की शायर स्वानुभुतीतील काही खयाल दुसर्या ओळीत मांडून सहज एक प्रभावी व जवळपास अस्सल शेर करू शकतो.
३. अनेकदा एखाद्या जमीनीतील काफिया किंवा वृत्त हे खयालसुद्धा सुचवते. हे 'अनैसर्गीक' आहे असे म्हणण्यात कवींच्या एका पिढीने धन्यता मानली, मात्र हेच गझलेचे सौंदर्य आहे. अप्सरेला कोणीही दागिन्यांनी मढवेल (म्हणजे मुळातच आशय चांगला असला तर कोणताही आकृतीबंध चांगला दिसेल) पण फक्त आकृतीबंधच हाताशी असताना काहीतरी चांगले असे स्वतःच्या कवीमनातून निर्मिणे आणि जगाला देणे हे एकाचवेळी आव्हानात्मक आणि रंजक ठरते व गझलकार ह्याच आकर्षणात आयुष्य घालवू लागतात.
मात्र हे सगळे असतानाही काही वेळा शायर काही खयाल, काही शेर सुट्टेच ठेवून देतो. ह्यातून त्याला अशी पोझ घ्यायची नसते की 'गझलेच्या नियमांसाठी उगाच भरतीचे शेर करणार्यातला मी नव्हे, सुचले तर करेन नाहीतर नाही'! त्याची भूमिका अशी असते की ह्या जमीनीत काही इतर खयाल गुंफण्यापेक्षा ह्या आशयाच्या कोनावर काही इतर सुट्टे शेर रचल्यास अधिक समाधान मिळेल. जसे, या धाग्यामध्ये बालपण ह्या एकाच रम्य कालावधीचे अनेकविध पैलू दाखवण्याचे शायराने ठरवलेले आहे, हे नाही ठरवले की एका जमीनीत आणखीन काही शेर रचूयात! हा शेवटी त्या त्या क्षणी झालेला शायराचा चॉईसच असणार!
असे, एका विषयाशी निगडीत शेर एकत्रीकरण करून देण्यातही एक वेगळी मजा असते आणि त्याला अनेकदा फुटकर (मराठीत फुटकळ - बहुतेक - नक्की माहीत नाही) या सदरात सादर केले जाते. अनेकदा गझल (मुशायर्यात) पेश करण्याआधी हे शेरही ऐकवले जातात (एक दोन शेर).
हे शेर एकाच जमीनीत असावेत असे मुळीच नाही, मात्र ते सहजगत्या उच्चारण्यास सुलभ असावेत व त्यात उगाचच सुटी घेतलेल्या नसाव्यात ही अपेक्षा आहे. एकच शेर करायचा तर सुटीबिटी कशाला घ्यायच्या? आणि लय सर्वांना समजेल, जाणवेल अशी का नसावी? इत्यादी!
बाकी मला आशा आहे की फुटकर अशआर निर्मीतीबाबत मी मांडलेले विचार पटावेत.
धन्यवाद
-'बेफिकीर'!
बेफिकीरजीचे विचार पटले,
बेफिकीरजीचे विचार पटले, त्याबाबतीतही विचार करून वरील द्विपदी पुन्हा वाचल्या. निराशा झाली, वाढली.
आनंदयात्री याँचा शेर आठवला. पण जाऊ देत.
धन्यवाद बेफिकीर. वेगवेगळ्या
धन्यवाद बेफिकीर.
वेगवेगळ्या जमिनीतले अनेक शेर एकामागोमाग एक वाचण्यात 'ती; मजा येत नाही असे मत अनुभवान्ती होते आहे.
फुटकळ शेर म्हणताना ते मोजकेच असले, मासिकांमधल्या पानपूरकांसारखे इथे तिथे वाचायला मिळाले तर मजा येईल, पण एक सदर म्हणून असे शेर वाचण्यात येईल का?
<मात्र ते सहजगत्या उच्चारण्यास सुलभ असावेत व त्यात उगाचच सुटी घेतलेल्या नसाव्यात ही अपेक्षा आहे. एकच शेर करायचा तर सुटीबिटी कशाला घ्यायच्या? आणि लय सर्वांना समजेल, जाणवेल अशी का नसावी? इत्यादी! > अगदी नेमके लिहिलेत.
पुढचा मुद्दा फारच अवांतर होत असेल तर इथे उत्तर देण्यापेक्षा गझलेविषयीच्या सर्वसाधारण चर्चेच्या धाग्यावर दिलेत (द्यावेसे वाटले तर)तरी चालेल. गझलेचे सौंदर्य मात्रावृत्ताऐवजी अक्षरगणवृत्तात अधिक खुलून दिसते असे म्हटले तर चालेल का?
वेगवेगळ्या जमिनीतले अनेक शेर
वेगवेगळ्या जमिनीतले अनेक शेर एकामागोमाग एक वाचण्यात 'ती; मजा येत नाही असे मत अनुभवान्ती होते आहे.
फुटकळ शेर म्हणताना ते मोजकेच असले, मासिकांमधल्या पानपूरकांसारखे इथे तिथे वाचायला मिळाले तर मजा येईल, पण एक सदर म्हणून असे शेर वाचण्यात येईल का?<<<
मयेकर, ह्या धाग्यातील मुनव्वर राणांचे असे फुटकर (फुटकळ) शेर वाचून कृपया एकदा त्या मतावर पुनर्विचार करून पाहा अशी विनंती! याशिवाय, अनेक दिग्गज उर्दू शायरांच्या गझलसंग्रहात असे सुटे शेर मिळतात तेही आवडल्याचा माझा अनुभव आहे.
एक राहिलेला मुद्दा - एकाच विषयावरील विविध शेरांना फुटकर म्हणतात असेही नव्हे तर सुट्या सुट्या शेरांना म्हणतात, ते शेर वेगवेगळ्या विषयावरही असू शकतातच. फक्त गझलकार त्या जमीनीत अधिक काहीही प्रयास करण्यास विशेष उत्सुक नसतो म्हणूनही थांबतो, असेही होते.
गझलेचे सौंदर्य
गझलेचे सौंदर्य मात्रावृत्ताऐवजी अक्षरगणवृत्तात अधिक खुलून दिसते असे म्हटले तर चालेल का?>>>
१००% सत्यकथन
सगळ्यांची सहमती असल्यास एकाच
सगळ्यांची सहमती असल्यास एकाच जमीनीत एकाच शेरावर थांबून जाण्याची काय कारणे असू शकतात हे माझ्या एका शेराच्या उदाहरणावरून अधिक विशद करण्याची इच्छा होत आहे.
बेफिकीर, मुनव्वर राणांचे ते
बेफिकीर, मुनव्वर राणांचे ते शेर फुटकळ आहेत की त्यांच्या एका रसिक वाचकाने दिलेले निवडक शेर आहेत? ते शेर आहेत हे सांगितले नसते तरी वाचताक्षणी लक्षात आले असते.
मुशायर्यात, मैफलीत गझल सादर करण्यापूर्वी शायर, गायक असा फुटकळ शेर ऐकवतो, क्वचित मध्येही ऐकवतो, तेव्हा मजा येतेच.
मयेकर, मी त्या लेखातही
मयेकर, मी त्या लेखातही म्हंटल्याप्रमाणे, ते शेर फुटकरच आहेत व स्वतः कवीनेच ते तसे ठेवलेले आहेत. ते चुनिंदा अशआर अश्या सदरातील शेर नाही आहेत.
ओके. तिथले शेर वाचताना मजा
ओके. तिथले शेर वाचताना मजा आली.
त्या लेखात जर मी काही शेर
त्या लेखात जर मी काही शेर सुटे दिलेले असले तर ते वेगळे, पण स्वतः मुनव्वर राणांचे असे फुटकर शेर भरपूर आहेत त्या गझलसंग्रहात!
विदिपा, मला नाही वाटत चर्चेला समीरचा विरोध असेल.
ओके. हा शेर घेतो, दुष्काळाचा
ओके.
हा शेर घेतो,
दुष्काळाचा तोरा काही कायम चालत नाही
एक वेळ आली की पाउस येतो म्हणजे येतो
हा शेर जेव्हा सुचला तेव्हा महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता खूपच वाढलेली होती. आणि हा एक अत्यंत सहज सुचलेला शेर आहे.
वरील शेरात मात्रा वृत्त असले तरीही लयीची सहजताही बर्यापैकी आलेली आहे. पण झाले काय की, जमीन बर्यापैकी कठीण होऊन गेली.
१.समजा रदीफ 'येतो म्हणजे येतो' अशी घ्यावी तर पुढच्या अनेक काफियांत र्हस्व उकाराची सूट घ्यावी लागू शकते.
२. रदीफ 'म्हणजे येतो' अशी घेतली तर 'ए' अलामत आणि 'तो' अंत्याक्षर असलेले काफिये निवडावे लागतील जे किचकट आहे ज्यामुळे कृत्रिमता येण्याला भरपूर वाव आहे.
३. नुसत्या 'येतो' रदीफेची शक्यता नाहीच. घेतली तर स्वरकाफिया घ्यावा लागेल. जो ओढूनताणून आणल्यासारखे वाटणे सहज शक्य आहे.
आता हा शेर मात्र बर्यापैकी झाला असला तरीही क्राफ्ट्समनशिप उघडपणे जाणवेल इतपत तडजोडी करायला माझे मन तयार होत नाहीये म्हणून हा शेर तसाच पडून आहे. हा शेर असलेली गझल पुन्हा होईल असे मला आतातरी वाटत नाही.
धन्यवाद!
सुचेल तसे अजून काही मुद्दे मांडतो सावकाश.
या चर्चेस योग्य असे उदाहरण
या चर्चेस योग्य असे उदाहरण ठरावे हे! (ह्या उदाहरणात जमीनीची क्लिष्टता हे कारण ठरले आहे).
प्रत्येक शेर निदान संपूर्ण
प्रत्येक शेर निदान संपूर्ण कविता व्हायला पाहिजे.. इथे ह्या द्विपदी कमी पडतात.
अर्थात हे माझे मत..
चु. भू. द्या. घ्या
Pages