सौदा

Submitted by समीर चव्हाण on 24 December, 2013 - 02:48

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दृष्टी न राहिली पण बघतोय काय जाणे
होते असे कधी का इच्छा हयात नाही

घेणार दिवस थोडे, देणार रात्र थोडे
सौदा बरोबरीचा कोठे कुणास काही<<< वा वा, शेर मस्त

सांगावयास काही, नाहीच घडत काही
काहीतरी घडावे, इच्छाच होत नाही

दृष्टी न राहिली पण बघतोय काय जाणे
होते असे कधी का इच्छा हयात नाही

व्वा, गझल आवडली.

पाहण्यात नाही ही फ्रेज थोड्या वेगळ्या अर्थाने('नॉट सीन बिफोर' अशा अर्थाने, ह्या शेरात ती 'आउट ऑफ साईट' असे अभिप्रेत असावे) मराठीत वापरतात असे वाटले समीर, गै. न.

भाषेचा कीस पाडत आहोत हे मात्र कबूल!

गझल जास्त भावली नाही. बहुधा माझ्या आकलनशक्ती मुळे असावे कदाचित...

सांगावयास काही, नाहीच घडत काही
काहीतरी घडावे, इच्छाच होत नाही

मिळवून मिळविल्या मी काही टुकार गोष्टी
मागेच ठरवले तू त्याही कशात नाही>>>

इथे दोन्ही वेळेस "च" ओढून आलेला आहे असे वाटले.

नाही आणि काही फक्त हेच काफिये का वापरले ते ही समजले नाही.

एकंदरीत समीरजींच्या नेहमीच्या गझलांच्या तुलनेत मला तरी डावी वाटली.

कृपया गैरसमज नसावा.. जे वाटले ते लिहित आहे. Sad

सगळ्यांचे धन्यवाद

प्रशांतः
गझल उजवी डावी होत राहतेच.
आवर्जून प्रतिसाद दिलात. आभार.
बोली भाषेत अनेकदा च एखादी गोष्ट ठसवून सांगण्यासाठी
तर कधी सुध्दा ह्या अर्थीही वापरतात.
आपण भाषेच्या वापराचा किंवा नेमकेपणाचा फारच बाऊ करतो.
तुकाराम, नेमाडे वाचल्यानंतर लक्षात येते की ही शुध्द फसवणूक आहे.
वायांविण किंवा वायां विण हा शब्द तुकाराम अनेकदा वापरतो जो
मोल्सवर्थमधेही आढळत नाही. वायांविण चा अर्थ वाया असाच आहे तर तुकारामाच्या
वापराचे प्रयोजन काय ?
छंदपूर्ती की शब्दनिर्मीती ?
उर्दूमध्ये दुष्यंतकुमार वाचल्यावर ह्याचीच प्रचिती येते.

असो,
फार बोललो.

जाता-जाता एक सांगावेसे वाटतेयः शेवटच्या शेरावर
नजीर अकबर आबादीच्या दुनिया ह्या सुंदर कवितेतील एका मिस-याचा प्रभाव आहे.

मिळवून मिळविल्या मी काही टुकार गोष्टी
मागेच ठरवले तू त्याही कशात नाही ....हा सोडून बाकिचे शेर अतिशय आवडले

फक्त एक शंका आहे समीरजी

<<<मागेच ठरवले तू त्याही कशात नाही>>>

'कशात नाही' हे जर गोष्टींबद्दल बोलत असूत तर 'मागेच ठरवले तू त्याही कशात नाहीत' 'नाहीत' लिहिणे जास्त प्रशस्त राहिलं ना ?

चुभूदेघे.

-सुप्रिया.

अनेक प्रतिसदातून अनेक मुद्दे निघालेत मलाही काही मुद्दे काढता येतील (केवळ चर्चा व्हावी ह्या निखळ उद्देशाने ..गैन) पण वरच्या सुप्रियातैंच्या प्रतिसादातील मुद्द्यावरून सुरुवात करतो

कशात नाहीत' 'नाहीत' लिहिणे जास्त प्रशस्त राहिलं ना ?<< नाही !!! नाहीत हा शब्द बसावा असा एंगल कुठेच नाही शेरात ...नाहीस असे क्रियापद हवे आहे पण जमीनीसाठी नाही असे आले असावे ह्या शेरात त्याही कशात म्हणताना ही कशाला आलय हे कळत नाहीयै तद्दन भरीचे वाटत आहे मराठीत बोलीभाषेत त्याही कशात असे बोलताना कुणाला बघीतले नाही ऐकले नाही

असो सगळेच शेर छान आहेत
इच्छा हयात नसणे ही कल्पना फार फार आवडली
सौदा हा शेर मात्र मला आकळला नाही फारसा अवघडही नसणार असेही वाटते पण कळत नाहीये इतके खरे
(समीरजी समजावूनसांगाल का? )

असो
धन्यवाद

सौदा हा शेर मात्र मला आकळला नाही फारसा अवघडही नसणार असेही वाटते पण कळत नाहीये इतके खरे (समीरजी समजावूनसांगाल का? )

घेणार दिवस थोडे, देणार रात्र थोडे
सौदा बरोबरीचा कोठे कुणास काही

मला अभिप्रेत अर्थ असा असावा: रात्र आपल्याला शांती, नीज, स्वप्न देते. मात्र अगोदर ह्याची किंमत मोजावी लागते. दिवस वसुली करतोच. एकंदर हा सौदा बरोबरीचा असतो. कोणी काही गमावत नाही, काही मिळवत नाही.
दिवस-रात्र हे एकाच वस्तूची दोन अंग असं समजलं की कोणाचा कोणाशी सौदा हा अर्थही लागतो.

धन्यवाद.