नमस्कार,
टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप मी तयार केला त्याबद्दलचा अनुभव आणि तो कसा केला याबद्दल थोडेफार..
माझ्या लहानपणी मला सांभाळलेल्या व् आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी माझी चित्रे लहानपणापासून पाहिली होती,
आणि सध्याच माझ क्षेत्र ही कलेतच आहे हे त्यांना माहित होत.... त्या अनुषंगाने त्यांनी मला त्यांच्याकडे असलेला एक खूप जुना असा अंदाजे ३.५ फूट उंच आणि २ फूट रुंदीचा एक तांब्याचा पिंप
माझ्या घरी माझ्यासमोर आणून ठेवला, आणि म्हणाले कि जे काही सुचेल जे काही जमेल ते या पिंपाच काहीतरी कलात्मक बनवून देशील का?
मी तेवा अगदी आत्मविश्वासाने त्यांना सांगितल कि हो काहीतरी नक्की करेन....
त्यांना त्यावेळी हो सांगितलं खर पण जेवा मी त्या पिंपाला जवळून निरखून पाहिलं तर यावर काय काय करू शकतो याचा विचार केला पण काहीच सुचत नवत कि जे प्रत्यक्षात उतरवता येईल त्या पिंपावर..
बर तो पिंप पण धातूचा होता त्यामुळे त्यावर कोरीव काम कराव तर ते हि शक्य वाटल नाही... काही कोलाज कराव तर तेही नाही, काही पेंटिंग कराव तर नंतर ते लवकरच खराब होईल याची शक्यता दाट होती म्हणून तेही नाही.
आता काय कराव... त्यांना तर हो म्हणून सांगितलं होत.... मित्रांना विचारून त्यांच डोक खल्ल तिकडूनही पटेल असं काही मिळाल नाही...
अक्षरशः घरच्यांनी तो पिंप वापरायला घेतलेला, काही करत तर नाही जागा अड़तेय तर त्यात अडगळीच्या वस्तू ठेवल्या त्यांनी...
घरात थोड काम चालू होत म्हणून परत मध्ये खंड पडला....
पण त्यातच मला मस्त कल्पना सुचली..
पूर्वी कापडावर चित्र काढलेली थोडीफार मग डोक्यात टूब पेटली कि आपण कापडावर मस्त एखाद चित्र काढून छान काहीतरी तयार करुया..
ठरल मग...
पण आता काढायचं तरी कोणत चित्र हा प्रश्न.. लगेच आठवल कि त्यांच्याकडे लहान मुलगा आहे तर त्याच्यासाठी काहीतरी कार्टून काढूयात...
मग लहानात प्रसिद्ध असलेल Finding नेमो हे चित्र काढायचं ठरल ( पिंप हा पाण्याचा म्हणून कार्टून ही पाण्यात्लाच घेतला)
मग पिंपावर व्यवस्थित बसेल असं पांढर जाडसर (बहुतेक मांजर पाटच असाव) कापड दुकानातून आणल.
मग ते पिंपावर गुंडाळून अगदी मोजून मापून हवा तेवढा कापून घेतला...
मग मोबाईल वर ते कार्टून घेतलेलं ते पाहून हळू हळू स्केचिंग सुरु केल त्या कापडावर....
मध्ये मध्ये अंदाज घेत होतोच, पिंप चारही बाजूनी दिसू शकणार असल्यामुळे ते चित्र कुठूनही पाहिलं तरी अर्धवट नाही दिसल पाहिजे असं असाव या अंदाजाने पूर्ण केल..
मग त्यात रंग भरले आणि कापडावरच चित्र पूर्ण केल...
आता खरी परीक्षा होती ती ते कापड त्या पिंपावर राहील कसं???
पण बिनधास्त पणे मनाला वाटल तेच केल.. भरमसाट असा (नेहमी भरव्श्याचा असा) फेविकॉल त्या पिंपावर थापला मुख्यतः वरच्या कडेला आणि खालच्या कडेला जास्त....
मग ते कापड त्याला गुंडाळला व्यवस्थितपणे घडी/वळी न पडता आणि त्याची कडा अशी केली होती कि जर ते कपड व्यवस्थित तंतोतंत चित्कवल तर ते बघितल्यावर असच वाटेल कि अखंड कापड लावल आहे...
मग वरून आतल्या बाजूस आणि खालून आतल्या बाजूस पडलेल्या वळ्या ज्या आल्या होत्या त्यांना लपवण्यासाठी वेगळी पट्टी आजूबाजूच्या चित्राला match करेल अशी परत रंगवली आणि लावली ...
नशिबाने अंदाज पण अगदी perfect आला आणि अखेर सुंदर असा पिंप तयार झाला....
आणि मुख्य म्हणजे मी फक्त कार्टून काढून नुसता दिसायला चांगला वाटेल असा पिंप करायला गेलो आणि जेवा तो तयार झाला त्यानंतर भन्नाट कल्पना सुचली की याचा लहान मुलांची खेळणी ठेवता येईल असा उपयोग होऊ शकतो...
अश्याप्रकारे हा भंगारत देण्या लायक असलेला पिम्प मस्त पैकी एक शोभेचा असा करू शकतो....
खाली पिम्पाचे making करतानाचे फोटो दिले आहेत.
१) जुना असा अंदाजे ३.५ फूट उंच आणि २ फूट रुंदीचा एक तांब्याचा पिंप.
२) कापड आणि त्यावर सुरु केलेले स्केचिंग....
३) अंदाज घेण्यासाठी अर्धवट झालेल चित्र पिम्पला लाउन बघितल.
४)
५)
६) कलाकृति पूर्ण झालेला पिम्प...
७) टप्प्या टप्प्याने तयार झालेली कलाकृति ....
अप्रतिम कलाकृती!
अप्रतिम कलाकृती!
सौरभ, सिम्पली ग्रेट....
सौरभ, सिम्पली ग्रेट....
भारीये आवडल
भारीये
आवडल
वॉव, किती कल्पक आहेस.. अतिशय
वॉव, किती कल्पक आहेस.. अतिशय सुंदर दिस्तोय , पिंपाचं मेकओवर
सुंदर..
सुंदर..
वा! अतिशयच सुरेख.
वा! अतिशयच सुरेख.
खूप मस्त कल्पना आणि कलाकृती
खूप मस्त कल्पना आणि कलाकृती
व्वा, छानच!
व्वा, छानच!
क्या बात है.....एकदम भारी !!
क्या बात है.....एकदम भारी !!
खूप छान.. म्हणजे अप्रतिम.
खूप छान.. म्हणजे अप्रतिम.
मस्तच सौरभ!
मस्तच सौरभ!
Great job....
Great job....
वॉव. खूप सुंदर कलाकारी. हॅट्स
वॉव. खूप सुंदर कलाकारी. हॅट्स ऑफ!!
सौरभ, खुप म्हणजे खुपच आवडले.
सौरभ, खुप म्हणजे खुपच आवडले. मस्त कल्पना पण नुसती कल्पना चांगली असुन चालत नाही कलाही लागते. तुझ्यात ते दोन्ही आहेत. तुझी दुसरी चित्रे बघायला नक्की आवडतील.
धन्यवाद मुग्धमानसी, सामी, मउ,
धन्यवाद मुग्धमानसी, सामी, मउ, वर्षू नील, चॆत्रगंधा, दक्षिणा, कविन, सायली जयवी, वेल, पारिजाता, गोपिका, धनश्री, विद्याक....
विद्याक >> धन्यवाद, बाकी काही
विद्याक >> धन्यवाद, बाकी काही चित्रे टाकली आहेत, आणी हळु हळु टाकेन अजुनही....
सर्व चित्रे पाहीली. मस्त जमली
सर्व चित्रे पाहीली. मस्त जमली आहेत.. सर्व कार तर खुप मस्त जमल्यात. पु.ल.चे मात्र जरा खटकले.
सौरभ, कारची सर्वच चित्रे
सौरभ, कारची सर्वच चित्रे भन्नाट आहेत. मस्त!!
अप्रतिम प्रश्नच नाही
अप्रतिम
प्रश्नच नाही
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
कसलं अप्रतिम गोड आहे हे...
कसलं अप्रतिम गोड आहे हे... आधी जर कायापालट झालेलं चित्र बघीतलं असतं तर विश्वासच ठेवला नसता की हे त्या पिंपावर चितारलेलं आहे... _/\_
सौरभ खुप फीनिशिंग आहे तुझ्या
सौरभ खुप फीनिशिंग आहे तुझ्या पेंटिंग मध्ये ग्रेट , खासंच
सुंदर! शोभेचा पिंप मी तयार
सुंदर!
शोभेचा पिंप मी तयार केला >>>>>>>>>मला वाटलं माझाच.
Pages