नमस्कार,
टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप मी तयार केला त्याबद्दलचा अनुभव आणि तो कसा केला याबद्दल थोडेफार..
माझ्या लहानपणी मला सांभाळलेल्या व् आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी माझी चित्रे लहानपणापासून पाहिली होती,
आणि सध्याच माझ क्षेत्र ही कलेतच आहे हे त्यांना माहित होत.... त्या अनुषंगाने त्यांनी मला त्यांच्याकडे असलेला एक खूप जुना असा अंदाजे ३.५ फूट उंच आणि २ फूट रुंदीचा एक तांब्याचा पिंप
माझ्या घरी माझ्यासमोर आणून ठेवला, आणि म्हणाले कि जे काही सुचेल जे काही जमेल ते या पिंपाच काहीतरी कलात्मक बनवून देशील का?
मी तेवा अगदी आत्मविश्वासाने त्यांना सांगितल कि हो काहीतरी नक्की करेन....
त्यांना त्यावेळी हो सांगितलं खर पण जेवा मी त्या पिंपाला जवळून निरखून पाहिलं तर यावर काय काय करू शकतो याचा विचार केला पण काहीच सुचत नवत कि जे प्रत्यक्षात उतरवता येईल त्या पिंपावर..
बर तो पिंप पण धातूचा होता त्यामुळे त्यावर कोरीव काम कराव तर ते हि शक्य वाटल नाही... काही कोलाज कराव तर तेही नाही, काही पेंटिंग कराव तर नंतर ते लवकरच खराब होईल याची शक्यता दाट होती म्हणून तेही नाही.
आता काय कराव... त्यांना तर हो म्हणून सांगितलं होत.... मित्रांना विचारून त्यांच डोक खल्ल तिकडूनही पटेल असं काही मिळाल नाही...
अक्षरशः घरच्यांनी तो पिंप वापरायला घेतलेला, काही करत तर नाही जागा अड़तेय तर त्यात अडगळीच्या वस्तू ठेवल्या त्यांनी...
घरात थोड काम चालू होत म्हणून परत मध्ये खंड पडला....
पण त्यातच मला मस्त कल्पना सुचली..
पूर्वी कापडावर चित्र काढलेली थोडीफार मग डोक्यात टूब पेटली कि आपण कापडावर मस्त एखाद चित्र काढून छान काहीतरी तयार करुया..
ठरल मग...
पण आता काढायचं तरी कोणत चित्र हा प्रश्न.. लगेच आठवल कि त्यांच्याकडे लहान मुलगा आहे तर त्याच्यासाठी काहीतरी कार्टून काढूयात...
मग लहानात प्रसिद्ध असलेल Finding नेमो हे चित्र काढायचं ठरल ( पिंप हा पाण्याचा म्हणून कार्टून ही पाण्यात्लाच घेतला)
मग पिंपावर व्यवस्थित बसेल असं पांढर जाडसर (बहुतेक मांजर पाटच असाव) कापड दुकानातून आणल.
मग ते पिंपावर गुंडाळून अगदी मोजून मापून हवा तेवढा कापून घेतला...
मग मोबाईल वर ते कार्टून घेतलेलं ते पाहून हळू हळू स्केचिंग सुरु केल त्या कापडावर....
मध्ये मध्ये अंदाज घेत होतोच, पिंप चारही बाजूनी दिसू शकणार असल्यामुळे ते चित्र कुठूनही पाहिलं तरी अर्धवट नाही दिसल पाहिजे असं असाव या अंदाजाने पूर्ण केल..
मग त्यात रंग भरले आणि कापडावरच चित्र पूर्ण केल...
आता खरी परीक्षा होती ती ते कापड त्या पिंपावर राहील कसं???
पण बिनधास्त पणे मनाला वाटल तेच केल.. भरमसाट असा (नेहमी भरव्श्याचा असा) फेविकॉल त्या पिंपावर थापला मुख्यतः वरच्या कडेला आणि खालच्या कडेला जास्त....
मग ते कापड त्याला गुंडाळला व्यवस्थितपणे घडी/वळी न पडता आणि त्याची कडा अशी केली होती कि जर ते कपड व्यवस्थित तंतोतंत चित्कवल तर ते बघितल्यावर असच वाटेल कि अखंड कापड लावल आहे...
मग वरून आतल्या बाजूस आणि खालून आतल्या बाजूस पडलेल्या वळ्या ज्या आल्या होत्या त्यांना लपवण्यासाठी वेगळी पट्टी आजूबाजूच्या चित्राला match करेल अशी परत रंगवली आणि लावली ...
नशिबाने अंदाज पण अगदी perfect आला आणि अखेर सुंदर असा पिंप तयार झाला....
आणि मुख्य म्हणजे मी फक्त कार्टून काढून नुसता दिसायला चांगला वाटेल असा पिंप करायला गेलो आणि जेवा तो तयार झाला त्यानंतर भन्नाट कल्पना सुचली की याचा लहान मुलांची खेळणी ठेवता येईल असा उपयोग होऊ शकतो...
अश्याप्रकारे हा भंगारत देण्या लायक असलेला पिम्प मस्त पैकी एक शोभेचा असा करू शकतो....
खाली पिम्पाचे making करतानाचे फोटो दिले आहेत.
१) जुना असा अंदाजे ३.५ फूट उंच आणि २ फूट रुंदीचा एक तांब्याचा पिंप.
२) कापड आणि त्यावर सुरु केलेले स्केचिंग....
३) अंदाज घेण्यासाठी अर्धवट झालेल चित्र पिम्पला लाउन बघितल.
४)
५)
६) कलाकृति पूर्ण झालेला पिम्प...
७) टप्प्या टप्प्याने तयार झालेली कलाकृति ....
मस्त कलाकारी !
मस्त कलाकारी !
मस्त केले आहे.
मस्त केले आहे.
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
मस्तच
मस्तच
Wa kya bat hai
Wa kya bat hai Saurabh....mast
खुप सुंदर ! अगदी बोलकी चित्रे
खुप सुंदर ! अगदी बोलकी चित्रे आहेत.
हे शाब्बास!! काय मस्त दिसतंय
हे शाब्बास!! काय मस्त दिसतंय पिंप ते!!
गोंडस दिसतोय अगदी Nemo
सहिच!
सहिच!
शाब्बास सौरभ!
शाब्बास सौरभ!
प्रचंड आवडलं हे. लहान
प्रचंड आवडलं हे. लहान पोरांचीच खेळणी भरायला मस्त आहे. आणि अशी इंटरेस्टींग बास्केट असल्यावर मुलं आपण होऊनही खेळणी भरतील त्यात.
छान आयडिया आहे. माझ्याकडे
छान आयडिया आहे. माझ्याकडे स्टीलचा पाण्याचा मोठा पिम्प पडून आहे स्टोअरमध्ये. सध्या नको असलेल्या वस्तूच ठेवल्या आहेत त्यात.
त्यावर असं काहीतरी करून मुलाच्या रुममध्ये ठेवता येईल.
सुरेख झालीय कलाकारी.
वॉव! मस्त आयडिया ..
वॉव! मस्त आयडिया ..
superb !!!
superb !!!
वाह, खूपच इनोव्हेटिव्ह .....
वाह, खूपच इनोव्हेटिव्ह .....
कल्पक झालाय. मस्त
कल्पक झालाय. मस्त
अप्रतिम एवढा एकच शब्द !!!
अप्रतिम एवढा एकच शब्द !!! मानलं तुमच्या कल्पना शक्तिला !!
खूप खूप धन्यवाद सर्वांचे…
खूप खूप धन्यवाद सर्वांचे…
वर्षा >> हो लहान मुलांना एखादी गोष्ट आवडली कि ते त्याची तितकीच काळजी पण घेतात…
आता जवळ जवळ ३ वर्ष झाले त्यांच्याकडे तो पिंप तसाच फ्रेश आहे अजूनही….
अल्पना >> नक्की काहीतरी कर त्या पिंपाच आणि लवकर दाखव
gr8!! mast idea aahe.
gr8!!
mast idea aahe.
छान!
छान!
हॅट्स ऑफ सौरभ !!!
हॅट्स ऑफ सौरभ !!!
धन्यवाद प्राची, स्वाती 2,
धन्यवाद प्राची, स्वाती 2, पियु परी...
वाह क्या बात है !! सहावा फोटो
वाह क्या बात है !! सहावा फोटो पाहीपर्यंत मला लेख वाचू मजा आली तितकी आली नाही पण तो फोटो पाहिला आणि एखादा अप्रतीम शेर काफियापाशी आल्यावर क्षणार्धात नेमका अर्थ प्रकट होवून एखादा साक्षात्कार व्हावा शेर आकळावा तशी मजा आली
धन्यवाद
मस्तच.
मस्तच.
वॆभव जी अन धारा जी धन्यवाद.
वॆभव जी अन धारा जी धन्यवाद.
Mast. sundar jhale ahe
Mast. sundar jhale ahe painting.
मस्त !
मस्त !
खुप सुंदर ! ...........
खुप सुंदर ! ...........
सौरभ उप्स... खुपच छान झालयं..
सौरभ उप्स...
खुपच छान झालयं.. पिंप..
आमच्या कडे पण आहे तसले... त्यावर मला देखील असे काही तरी करता येईल.
साबा त्यात धान्य किराणा ठेवतात.... त्याला चित्र पण कणसे, शेत असे काहि तरी करता येईल..
तुमचा उद्योग आवडला.
भारी आयडीया. खूप आवडल.
भारी आयडीया. खूप आवडल.
धन्यवाद डॅफोडिल्स , रावी,
धन्यवाद डॅफोडिल्स , रावी, स्रुष्टी, आरती, प्रदिपा...
Pages