राजकीय सेमिफायनल - विश्लेषण व चर्चा

Submitted by बेफ़िकीर on 7 December, 2013 - 21:50

नमस्कार मित्रहो. हा धागा त्या सर्वांसाठी आहे ज्यांना आज होणारी मतमोजणी, त्यातून निघणारे निकाल, त्यांचे अर्थ, मतदारांचा कल, नजीकच्या भविष्यावर होणारे त्यांचे परिणाम या सर्वांवर हिरीरीने किंवा विश्लेषणात्मक चर्चा करायची आहे अथवा वाचायची आहे.

मतमोजणी सुरू झालेलीच आहे.

वैतक्तीक शेरेबाजी टाळली तर धागा सुरळीत चालेल व मा. प्रशासकांना लक्ष घालण्याची वेळ येणार नाही असे वाटते.

बाकी राजकीय पक्ष, नेते, आपण सगळे ह्या सर्वांची खुसखुषीत खेचाखेची सगळ्यांनाच आवडू शकेल, एका मर्यादेत.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नॉट सरप्राइज्ड; अपेक्षित निकाल. आता आमपार्टी दिल्लीत लोकपाल बिल कसं आणते त्याकडे लक्ष.

मोदि फॅक्टर काँग्रेसला भारी पडला; आतातरी काँग्रेस डिनायल मधुन बाहेर पडणार का? Happy

राज, एकवेळ काँग्रेस बाहेर पडेल डिनायल मोड मधून पण इथले काही काँगीभक्त मान्य करणं अशक्य आहे Wink

एकवेळ काँग्रेस बाहेर पडेल डिनायल मोड मधून पण इथले काही काँगीभक्त मान्य करणं अशक्य आहे >> +१००

<<<केजरीवाल प्रत्येक कामात आम्ही म्हणू तसंच झालं पाहीजे या हेकेखोर पणाने खोडा घालतील अशी दाट शक्यता आहे.>>> तसे होणार नाही. कारण केजरीवाल सरकारी अधिकारी होते. कामे कशी केली जातात (प्रोसिजर) याची त्यांना चांगली कल्पना आहे. फक्त ते भ्रष्टाचार होऊ देणार नाहीत. त्यामुळे ज्यांनी कामे करायची ते हतोत्साह होतील; आणि त्याचे खापर केजरीवाल याअंच्यावर फोडले जाईल.

दिल्लीत परत निवडणूकाच होतिल. काँग्रेसचे आमदार फुटणं तसं अवघड नाहीये. पण ८ पैकी ३ आमदार मुस्लिम आहेत जे फुटायची काहीही शक्यता नाहीये. बाकीच्या ५ पैकी सुद्धा सगळेच फुटतिल असं नाही. भाजपा आणि अकाली दल यांचे ३२ आमदार आहेत. एक अपक्ष आहे जो मुळचा भाजपाचाच आहे. तो कदाचीत देईल पाठिंबा कारण तो निवडून आलेला मतदार संघ (साहेब सिंग वर्मा यांच गाव) पुर्वापार भाजपाचा गड आहे. म्हणजे ३३ आमदार. जेडीयु चा एक आमदार आहे आणि त्यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय.

जर काँग्रेसचे ३ आमदार फोडता आले तरच सरकार बनेल.

भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराने तर सांगितलंय की ते राज्यपालांना सरकार बनवण्यासाठी भेटणार नाही.
आता राज्यपाल त्यांना बोलवतिल आणि संधी देतिल जर ते नाही म्हणाले तर आपला बोलवतिल. आपने पण सरकार बनवणार नाही हे जाहिर केलंय. (कोणालाही पाठिंबा देणार नाही आणि कोणाचाही पाठिंबा घेणार नाही).

म्हणजे परत निवडणुका आणि तोपर्यंत राष्ट्रपती शासन. परत निवडणूका आता लोकसभा निवडणुकांच्या बरोबरच होतिल.

आपचे जास्त फुटावे लागतिल ना? २८ पैकी ८-९ तरी फुटावे लागतिल. मुरलेले राजकारणी नाहीयेत आपचे उमेदवार, त्यामूळे सत्तेसाठी ८-९ लोक फुटणं अवघड वाटतंय. जर तसं झालं (आपचे उमेदवार पण फुटले) तर मात्र आपला काही भवितव्य नाही.

आमच्या भागातून पण आपची उमेदवार निवडून आलीये. काँग्रेसचा सध्याचा आमदार तिसर्‍या क्रमांकावर आहे, आणि आप आणि भाजपामधे जवळपास ६००० मतांचं अंतर आहे.

माझे काही मित्र दिल्लीच्या विजयाचा शंखनाद करत आहेत... आणि काँग्रेसच्या पराभवाचा आनंद घेत आहेत..

पण त्याच वेळेला हे विसरत आहे की काँग्रेस दिल्लीत "किंगमेकर" बनले आहे.. ज्याला पाठिंबा दिला त्या पक्षाला बहुमत मिळाले... Biggrin

एक तर पाठिंबा घ्या अन्यथा......... परत निवडणुका लढवा....... Wink

बिहारमध्ये त्रिशंकू विधानसभेनंतर पुन्हा निवडणुका होऊन जद(यु)ला स्पष्ट बहुमत मिळाले होते.
पुन्हा निवडणुका होऊन आपली कामगिरी सुधारण्याची आशा भाजप, आप दोघांना असेल.

लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी करून पार्टी विथ अ डिफरन्सच्या( Wink ) नावाला बट्टा लावायला भाजप तयार नसावी.
वजनदार नेत्यांखेरीज इतरांना पक्षांतर म्हणजे पोलिटिकल करियर संपुष्टात येण्याची भीती नाही का? (जोवर पक्षात उभी फूट पडत नाही तोवर) इथे पक्षात फूट पाडायला काही मुद्दा नको का?

इथे पक्षात फूट पाडायला काही मुद्दा नको का?<<<

दिल्ली या राजधानीच्या शहराला पुनर्निवडणुकांच्या बोज्याखाली न ढकलता वेळीच कणखर प्रशासन मिळावे म्हणून पटत नसतानाही केलेला पक्षत्याग असे एक उदात्त कारण असू शकते.

दिल्लीत आता काय घडेल हा धागा सर्व राज्यातले निकाल व त्याचे विश्लेषण हा विषय सोडुन फक्त दिल्लीवर केंद्रीत केलेला आहे. सहा पर्याय आहेत. सातवा, आठवा आणि नववा सुध्दा असेल.

बिहारमध्ये त्रिशंकू विधानसभेनंतर पुन्हा निवडणुका होऊन जद(यु)ला स्पष्ट बहुमत मिळाले होते.
पुन्हा निवडणुका होऊन आपली कामगिरी सुधारण्याची आशा भाजप, आप दोघांना असेल.

लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी करून पार्टी विथ अ डिफरन्सच्या( डोळा मारा ) नावाला बट्टा लावायला भाजप तयार नसावी.
वजनदार नेत्यांखेरीज इतरांना पक्षांतर म्हणजे पोलिटिकल करियर संपुष्टात येण्याची भीती नाही का? (जोवर पक्षात उभी फूट पडत नाही तोवर) इथे पक्षात फूट पाडायला काही मुद्दा नको का? >>>

यासगळ्याला +१.

भाजपानी तोडाफोडीचं राजकारण नाही केलं तर पुढच्या वेळी दिल्ली विधानसभेत आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणूकीत त्यांच्याकडे अजून जास्त लोक आकर्षित होतिल.

कृपया दिल्लीत काय घडेल हा चर्चेचा भाग नितीनचंद्र ह्यांच्या धाग्यावर पुढे न्यावा अशी प्रतिसाददात्यांना विनंती!

http://www.ndtv.com/elections/article/assembly-polls/aap-stuns-bjp-singl...

इथला पाचवा मुद्दा : Which leaves only the Congress' eight MLAs, one Independent and a Janata Dal (United) member. To break the Congress without attracting the anti-defection law, the BJP will have to bring to its side more than two-thirds - at least six of that party's eight legislators. A tough ask.
पक्षांतरविरोधी कायद्याला चकवायला २/३ लोकांना बाहेर पडायला लागते असे म्हटले आहे.

As per the 1985 Act, a 'defection' by one-third of the elected members of a political party was considered a 'merger'. Such defections were not actionable against. The Dinesh Goswami Committee on Electoral Reforms, the Law Commission in its report on "Reform of Electoral Laws" and the National Commission to Review the Working of the Constitution (NCRWC) all recommended the deletion of the Tenth Schedule provision regarding exemption from disqualification in case of a split.

http://www.indianexpress.com/news/antidefection-law/339606/

Finally the 91st Constitutional Amendment Act, 2003, changed this. So now at least two-thirds of the members of a party have to be in favour of a "merger" for it to have validity in the eyes of the law. "The merger of the original political party or a member of a House shall be deemed to have taken place if, and only if, not less than two-thirds of the members of the legislature party concerned have agreed to such merger," states the Tenth Schedule.

सर्व प्रतिसाददात्यांचे मनापासून आभार. चर्चा रंगली व योग्य दिशेने पुढे जाऊन संपन्न झाली.

-'बेफिकीर'!

२००३ पर्यंत एखाद्या पक्षाचे निवडून आलेल्यांपैकी १/३ लोक स्वतःचा वेगळा गट स्थापन करून दुसर्‍या पक्षाला पाठिंबा देऊ शकत होते, परंतु त्यावेळेस दुरुस्ती करून २/३ चा नियम आला असे थोडक्यात दिसते.

फेसबुकवर वाचलेल्या २ पोस्ट इथे शेअर कराव्याश्या वाटल्या (त्यातली एक देवकाकांची आहे)

१. केजरीवाल प्रमाणिक आहेत यात शंका नाही त्यांचे यश हे त्यांच्या व्यापक विचारांचे आणि तरुणाई ला भावलेल्या नव्या प्रचार शैलीचे आहे तथापि संसदीय राजकारणा मध्ये उतरल्या नंतर ' आणखी एक निवडणूक होवू दे ; होवू दे खर्च ' हि भूमिका तुमच्या विरोधात जाणारी असते त्या पेक्षा दगडा पेक्षा वीट मऊ असे म्हणून जर त्यांनी भा. ज. पा . ला पाठींबा देवू केला आणि आपले संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करण्या करिता आपली रणनीती सत्तेच्या परिघात राहून नव्याने आखली तर भविष्यात किमान दिल्लीमध्ये त्यांची सत्ता येणे अवघड होणार नाही !

२. केजरिवाल ह्यांची कालची मुलाखत पाहिली आणि अगदी खरं सांगायचं तर त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वेळी...आम आदमीही सब कुछ करेगा...मैं कोन हूँ? मेरी हैसियतही क्या है? वगैरे बोलणं विनयशीलता वगैरेच्या नावाने जरी खपणार असलं तरी...एका राजकीय नेत्याकडे जे काही धोरण, योजना इत्यादि असाव्यात आणि ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांच्यासाठी काही ठोस काम करू असे आत्मविश्वासाने म्हणायला हवे...ते तसं मला काहीच दिसलं नाही...अर्थात म्हणून इतक्यात मी त्यांना बाद ठरवणार नाहीये...पण हा माणूस नक्की काही वेगळं करेल अशी खोटी आशाही मनात बाळगत नाहीये..हेही निश्चित...पुढे काय होणार हे पाहायला नक्कीच आवडेल.!

भाजपचे अभिनंदन! शिवराज चौहान आणि रमणसिह ह्यांच्या कामाचे श्रेय त्यांना मिळु द्या कि !
कोंग्रेसने धडा आणि योग्य तो बोध घ्यावा. फक्त सबसिड्या देउन लोक खुश होत नाहीत , improved transparent governance , industrial growth हे पण हवय लोकाना.

पराभवाचे पडघम

डिसेंबर 8, 2013 2 प्रतिक्रिया

रविवारी, दि. 8 डिसेंबर रोजी मिनी लोकसभा म्हणून ज्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात होते, त्या चार राज्यांचे निकाल जाहीर झाले. आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील ऐतिहासिक विक्रमी जाहीरसभेत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला news_2होता. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह राजधानी दिल्लीतील जनतेने याला उत्स्फुर्त प्रतिसाद देत, या निवडणुकांत काँग्रेसचे पानिपत करत, मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. राजधानी दिल्लीत तर आम आदमीच्या झाडूने काँग्रेसला अक्षरशः दिल्लीच्या राजकारणाबाहेर फेकले आहे. देशातील सर्वात जुना पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसला राजधानीत दोन आकडी संख्याही पार करता आली नाही, यातच सारे काही आले.

विकाऊ माध्यमे तसेच सरकारी यंत्रणांना हाताशी धरून काँग्रेसने मोदी यांच्याविरोधात कारस्थाने आखली. मात्र, मोदी यांनी त्याला भीक न घालता, प्रचाराचा धडाका सुरू ठेवला. मोदी यांच्या सभांना मिळणारा वाढता पाठिंबा प्रचाराच्या शेवटच्या फेरीपर्यंत राहिला. त्याचवेळी काँग्रेसी स्टार प्रचारक राहूल याच्या सभांमधून उपस्थितांनी काढता पाय घेतला, त्याचवेळी काँग्रेसचे भवितव्य मतदान होण्यापूर्वीच निश्चित झाले होते. जातीयवादी, देशाचे तुकडे पाडणारा पक्ष अशा शब्दांत काँग्रेसने भाजपाची केलेल्या संभावनेकडे मतदारांनी दुर्लक्ष करत, मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडत, काँग्रेसचा तथाकथित सेक्युलर बुरखा टराटरा फाडला, हे या निकालांचे विशेष. पारंपारिक व्होट बँक हा समज या निकालांनी निकालात काढत, समर्थ तिसरा पर्याय म्हणून आमची केलेली निवड काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना विचारात पाडणारी आहे.
छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे, तर दिल्लीसह राजस्थानात सत्तापालट घडवून आणला आहे. दिल्लीतील तिरंगी लढतीत ‘आम’ आणि भाजपा यांनी काँग्रेसच्या वाट्याला काहीही शिल्लक ठेवले नाही. आमच्या अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करायलाच हवे. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा 22 हजारांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या शीला दिक्षीत यांनी अधिकृत निकालांची वाटही न पाहता, तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देत, कार्यालय रिकामे करून घरचा रस्ता पकडला. असाच फटका आंध्रप्रदेशात एनटीआर, तसेच तेलगु देसम पार्टीने काँग्रेसला दिला होता, त्याचे स्मरण झाले. त्याचवेळी प्रादेशिक पक्षांच्या उपद्रवक्षमतेबाबत आम्ही मागे उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह ‘आम’ने अधोरेखित केले. एका भाजपा नेत्याने व्होटब्रेकर असा म्हणूनच ‘आम’चा उल्लेख केला.

मोदी यांच्यासाठी अॅसिड टेस्ट असे म्हणत, त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर काँग्रेसी माध्यमांनी प्रारंभी प्रश्नचिन्ह उभे केले. त्याचवेळी मोदी यांची जादू गुजरातच्या बाहेर चालणार नाही, असा सूर लावला. त्याचवेळी त्यांच्या सभांना होणारी विक्रमी गर्दी पाहिल्यानंतर, राजस्थानात जनता कोणालाही सलग संधी देत नाही, तर मध्यप्रदेशात भाजपाची कामगिरी चांगलीच आहे, असा पवित्रा घेतला. राजधानीत आम आदमीमुळे भाजपासमोरील अडचणी वाढतील. त्यांना यश मिळणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागले. शनिवारपर्यंत मिनी लोकसभा असणाऱ्या या निवडणुका निकालानंतर मात्र प्रादेशिक झाल्या. विधानसभा निवडणुकांवरून लोकसभेसाठीचे मत मांडू नये, अशी भूमिका काँग्रेसी माध्यमांनी घेतली.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. हिंदुस्थानासह जगभरातील हिंदुस्थानी जनतेला या चार राज्यांत कोण बाजी मारते, याचे औत्स्युक्य असल्याने, विविध वृत्त वाहिन्यांसमोर जनता रविवारच्या दिवशी ठाण मांडून बसली होती. सोशल साईटसवर तासा-तासाला अपडेटस पडत होते. साधारणतः अकराच्या सुमारासच राजधानी दिल्लीत काँग्रेस पराभवाच्या वाटेवर, अशी ब्रेकिंग न्यूज वाहिन्यांवर आली, तर आम आदमीच्या झाडूने काँग्रेसला झाडले, हा संदेश सर्वत्र फिरत होता. राजधानी दिल्लीत दुपारी बाराच्या दरम्यान भाजपा 33, तर आम 27 असा कौल आला होता. त्यात तीनच्या सुमारास अचानक बदल होऊन भाजपा 31, आम 30 असा कौल आल्यानंतर काँग्रेसी पत्रकारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, चारच्या सुमारास दिल्लीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढे आला. त्याचवेळी आम आदमीने आपल्याला सत्तेत स्वारस्य नसल्याने कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला. एरव्ही तावातावाने भाजपासह मोदींवर तोंडसुख घेणारे काँग्रेसी नेते, पराभवाला राहूलच जबाबदार असल्याचे कबूल करण्यास तयार नव्हते. गांधी घराण्यापुढे सो कॉल्ड बड्या काँग्रेसी नेत्यांच्या निष्ठा कशा वाहिलेल्या आहेत, याचेच हे उदाहरण होते.

पंतप्रधान कोण…
इतके दिवस पंतप्रधानपदासाठी उमेदवार जाहीर करणे ही काँग्रेसी परंपरा नव्हे, असे म्हणून मोदी यांच्यावर टिका करणाऱ्या काँग्रेसला अखेर पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे जाहीर करावे लागले. साडेचारच्या सुमारास काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी 10, जनपथ येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेसचा पराभव मान्य केला. त्याचवेळी राहूल यांनी मोदी हे प्रमुख विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार आहेत. त्यांची भूमिका वेगळी असेल, हे मान्य करतानाच, काँग्रेस येत्या काळात आक्रमक होण्याचे संकेत दिले. त्याचवेळी भाजपा पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी संयम बाळगत, मतदारांचे आभार मानताना, कार्यकर्त्यांनाही विजयाचे श्रेय दिले.

काँग्रेसचा पराभव त्यांच्या कालावधीत घडलेले अब्जावधी रुपयांचे घोटाळे, पेट्रोलसह जीवनावश्यक वस्तूंचे दरदिवशी वाढणारे भाव, वाढती गुन्हेगारी, राजधानीतही महिला सुरक्षित नाहीत, हा निर्भया घटनेतून गेलेला संदेश, तसेच काँग्रेसी तेहलकाचा तेजपाल याचे उघडकीला आलेले लैंगिक शोषणाचे प्रकरण आदी कारणांमुळे झाल्याचे काँग्रेसी नेत्यांनी मान्यच केले नाही, हेही विशेष होय. तसेच जनमतही याच कारणांमुळे क्षुब्ध होते, हेही काँग्रेसने उमगून घेतले नाही. गाफील काँग्रेसने जनमताकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम समोर आहे.
सोनिया यांनी पंतप्रधानपदी डॉ. मनमोहनसिंह हेच कायम राहतील, असे न सांगितल्याने, डॉ. मनमोहनसिंह पराभवाची नैतीक जबाबदारी म्हणून पदाचा राजीनामा देते झाले, तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. फक्त त्यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार, हाच प्रश्न कायम आहे. राहूल यांनी गेल्या दोन-चार महिन्यांत सोयिस्कररित्या पक्षविरोदी भूमिका घेत, आपला वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसी राजकारण लक्षात घेतले, तर राहूल यांच्या नावाची घोषणा सोनिया करतील, असेच स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मात्र, सोनिया यांच्याप्रमाणेच राहूलच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकवार चर्चेत येईल. तसेच 2002 साली अमेरिकेत एफबीआयने त्याला भल्या मोठ्या रोख रकमेसह पकडले होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी राहूलला सोडण्यासाठी अमेरिककडे शब्द टाकला होता. राहूलचा भूतकाळही सोनिया माईनो यांच्यासारखाच गूढ असा आहे. त्याची विदेशी मैत्रिण व्हेरोनिका हिच्या बाबतीतही सविस्तर माहिती देशाला व्हायलाच हवी.

असो. देशभरातून मोदी यांचे स्वागत होत आहे. सोमवारी शेअरबाजारात या निकालाचे स्वागत निर्देशांकाच्या उसळीने होईल, यात शंकाच नाही. मोदी यांच्यामुळेच देशाचा विकास होईल, ही सार्वत्रिक आहे. त्याचवेळी तथाकथित सेक्यूलर पक्षांना मतदारांनी घरी बसवल्याने राष्ट्रवादीसारख्या कुंपणावरच्या पक्षांना आपल्या रणनितीत बदल करावा लागणार आहे. अन्यथा, काँग्रेसबरोबर जनता राष्ट्रवादीलाही चंबुगबाळे आवरायला भाग पाडेल. दिल्लीसारखाच निकाल महाराष्ट्रात लागून, दोन्ही काँग्रेस नेस्तनाबूत व्हाव्यात ही नेटिझन्सनी व्यक्त केलेली भावना सार्वत्रिक अशीच आहे. मोदी यांच्यामुळे काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक कोलमडली असून, खोटी आश्वासनांना जनता भुलणार नाही, असा साधा-सरळ या निकालांचा अन्वयार्थ आहे. काँग्रेसी पराभवाचे पडघम वाजायला सुरुवात झाले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आम्ही या जनाधाराचा आदर करत त्याचे स्वागत करत आहोत

- संजीव ओक

Pages