Submitted by बेफ़िकीर on 7 December, 2013 - 21:50
नमस्कार मित्रहो. हा धागा त्या सर्वांसाठी आहे ज्यांना आज होणारी मतमोजणी, त्यातून निघणारे निकाल, त्यांचे अर्थ, मतदारांचा कल, नजीकच्या भविष्यावर होणारे त्यांचे परिणाम या सर्वांवर हिरीरीने किंवा विश्लेषणात्मक चर्चा करायची आहे अथवा वाचायची आहे.
मतमोजणी सुरू झालेलीच आहे.
वैतक्तीक शेरेबाजी टाळली तर धागा सुरळीत चालेल व मा. प्रशासकांना लक्ष घालण्याची वेळ येणार नाही असे वाटते.
बाकी राजकीय पक्ष, नेते, आपण सगळे ह्या सर्वांची खुसखुषीत खेचाखेची सगळ्यांनाच आवडू शकेल, एका मर्यादेत.
धन्यवाद
-'बेफिकीर'!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या तासातील स्थितीप्रमाणे
पहिल्या तासातील स्थितीप्रमाणे 'आप'ने आपण तगडे प्रतिस्पर्धी आहोत हे दाखवले आहे. कुठेही त्रिशंकु होउ नये असे वाटते.
आप ची ताकद आणि मोदींची जादु ह्याबद्दल जास्त कुतुहल आहे.
सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटे
सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटे -
आघाडी -
छत्तीसगड - ८१ पैकी ३८ काँग्रेस आणि ४० भाजप
राजस्थान - १२३ पैकी २२ काँग्रेस व ९० भाजप
मध्य प्रदेश - १९३ पैकी ५६ काँग्रेस व १३० भाजप
दिल्ली - ५९ पैकी ९ काँग्रेस, २७ भाजप व २० आम आदमी पार्टी
दिल्लीत काँग्रेसची पिछेहाट जी
दिल्लीत काँग्रेसची पिछेहाट जी अपेक्षीत होती ...
परंतु काँग्रेस च्या मुद्द्यावरचा अपेक्षित लाभ बीजेपी नाही उचलु शकली ...... आप ने मैदान मारले आहे...
केजरीवाल आता पुढे चालले आहे शीला दिक्षित पेक्षा.....
आपची आघाडी निश्चितच आशादायक
आपची आघाडी निश्चितच आशादायक आहे. त्यांना थोड्याफार प्रमाणात अप्रत्यक्षरीत्या अण्णांच्या पुण्याईचा पण फायदा झाला असावा. पण लोकपाल वगैरे सारखे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिल्लीपुरते मर्यादीत राहुन उपयोगी नाही. राष्ट्रीयपातळीवर कशी कामगिरी करतात ते पण पहायला हवे.
अपेक्षित निकाल. भाजपचे
अपेक्षित निकाल. भाजपचे अभिनंदन. केजरीवाल यांचे अभिनंदन.
, काँग्रेस आपटणार हे माहिती
, काँग्रेस आपटणार हे माहिती होतं पण इतक्या जोराने वाटलं नव्हतं.

केजरीवालांची कमाल आहे.
कुठेही त्रिशंकू होऊ नये खरंच.
>>थोड्याफार प्रमाणात
>>थोड्याफार प्रमाणात अप्रत्यक्षरीत्या अण्णांच्या पुण्याईचा पण फायदा झाला असावा ???
८० ते ९० % पेक्षा जास्त फायदा
का कोण जाणे पण केजरीवाल हा माणूस आणि आप जेन्युईन वाटत नाही.
एकतर केजरीवाल हे नाव जनलोकपालच्या आंदोलनामुळे सर्वांना माहित झाले.
तसेच आप पक्षाची निर्मिती ही या आंदोलनाचेच फळ आहे.
कोणत्याही नविन पक्षाला काहीतरी सनसनाटी मुद्दा हवा असतो, तो यांना जनलोकपालच्या माध्यमातुन मिळाला.
कॉन्ग्रेस, भाजप हे कितीही वाईट पक्ष असले तरी त्यांची खुप काळापासुन देशभर पकड आहे जनमानसावर अगदी तळागाळापर्यंत पोहोच आहे.
तसे आपचे काय आहे ?? केवळ माध्यमे, एसएमएस, इंटरनेट, इ. गोष्टी वापरणार्या लोकांमधे निर्माण झालेली ही क्रेझ आहे असे वाटते.
हे म्हणजे खुप काळ रियाझ केलेल्या गवयापेक्षा एखाद्या नवख्या गायकाला कमी काळात अचानक उगाचच जास्त प्रसिद्धी मिळते तसे आहे. संगीतक्षेत्रात, चित्रपटक्षेत्रात जसे घडते तसेच राजकारणातदेखील घडू लागलेले पाहून वाईट वाटले.
केजरीवाल यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला हे पाहून मलातरी खुप आश्चर्य वाटले.
आणि माझे सरळ सरळ मत आहे की यांनी अण्णा हजारे यांचा उपयोग करून घेतला आपल्या राजकीय स्वार्थासाठी.
आजकाल सर्वांना सर्व काही लवकर लवकर हवे असते फास्ट फूड सारखे. पण ते पौष्टिक असेलच असे नाही.
असो तरी देखील 'आप' ला शुभेच्छा 'केजरीवाल' यांना नाही. कारण या पक्षाकडून व्यक्तीपुजेची अपेक्षा नाही.
तसेही राजस्थानात नेहमीच खो खो
तसेही राजस्थानात नेहमीच खो खो चालतो. त्यात गेहलोत सरकारचा भोंगळ कारभार.
मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांची कामगिरीही चांगलीच असावी. तिथला आर्थिक वाढीचा दर चांगलाच आहे. त्यांची सामाजिक धोरणे रिग्रेसिव्ह आहेत, पण तिथल्या जनतेला ते खटकत नसावे. तसेच मागल्या वेळी उमा भारती स्वतंत्र पक्ष स्थापून भाजपच्या विरोधात होत्या.
१६ डिसेंबरच्या प्रसंगात शीला दीक्षित यांची प्रसंग हाताळणी कमी पडली होती. जसी ती केंद्रसरकारातील नेत्यांची गेल्य पाच वर्षांत अनेकदा कमी पडली. बाकी काँग्रेस-भाजपात फारसा फरक नसावा. केवळ अण्णा हजारेंची पुण्याई केजरीवालना उपयोगी पडली असे म्हणाणे अन्यायकारक आहे. जनलोकपालवर देशव्यापी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अण्णांचा 'उपयोग' केला. पण त्यांचे स्वतःचे काम, मुद्देही आहेतच. 'आप'ला बहुमत मिळाले असते तर सत्तेच्या वारूवर ते कसे स्वार होतात हे पाहायला मजा आली असती. (जशी नाशकात येतेय)
राज्यांमध्ये काम करणारे , दिल्लीचा वरदहस्ताकडे नजर लावून बसणार्यांपेक्षा वेगळे नेते
राज्यांमध्ये काम करणारे,केवळ दिल्लीच्या वरदहस्ताकडे नजर लावून न बसलेले नेते काँग्रेसला केव्हा मिळणार?
Assembly election results
Assembly election results live: BJP leads in 2 states, in a close race with Congress in Chhattisgarh, hung assembly likely in Delhi
Read more at: http://ibnlive.in.com/?utm_source=ref_article
छत्तीसगढमध्ये गेल्यावेळीही
छत्तीसगढमध्ये गेल्यावेळीही चुरशीची लढत होती. काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा अलीकडेच एका मोठ्या नक्षलवादी हल्ल्यात बळी गेला.
एकूण "इतर" लोकांना मिळणार्या
एकूण "इतर" लोकांना मिळणार्या एकदम कमी जागा हे चांगले लक्षण दिसते. चारही राज्यात तीन प्रमुख पार्ट्या बर्याचश्या जागा मिळवतील असे दिसते.
आता - छत्तीसगड - ७४ पैकी ३८
आता -
छत्तीसगड - ७४ पैकी ३८ काँग्रेस आणि ३६ भाजप
राजस्थान - १८३ पैकी २९ काँग्रेस व १३१ भाजप २३ इतर
मध्य प्रदेश - २१५ पैकी ५९ काँग्रेस व १४० भाजप १६ इतर
दिल्ली - ७० पैकी ७ काँग्रेस, ३४ भाजप व २६ आम आदमी पार्टी ३ इतर
फारेण्ड, या तीन राज्यांत इतर
फारेण्ड, या तीन राज्यांत इतर कोणी कधी नव्हतेच.
इतर महत्त्वाची असलेली राज्ये : उ.प्र.(स.प., बसप), बिहार(जदयु, लालू) प.बंगाल(कम्युनिस्ट, तृणमूल), दक्षिणेची चारही राज्ये, पंजाब, हरयाणा (चौतालांचा पक्ष), ओडिशा (बिजूजद), महाराष्ट्र (शिवसेना, राकाँ, मनसे), जम्मू-काश्मीर.
ओके भरत, थॅन्क्स. मला वाटले
ओके भरत, थॅन्क्स. मला वाटले जनता पक्षाची जी पिल्ले होते ते काही जागा खाउन बसतील.
पण काँग्रेसला हे निकाल अपेक्षित होते हे कसे काय? मागच्या काही दिवसांतील किमान माबोवरच्या पोस्टी पाहून तसे वाटले नाही.
माबोवरच्या पोष्टी
माबोवरच्या पोष्टी पाहून////

म्हणजे काँग्रेसवाले माबोवर येतात की काय?
काँग्रेसला बहुतेक हे अपेक्षित असावे.
त्यांच्या प्रचारात अगदीच जीव नव्हता.
इथे लोक म्हणतात त्याप्रमाणे राहुलजींचे फक्तं दर्शन घेऊनच लोकांचे समाधान झाले असावे.

त्यांना काँग्रेसला मत वैगेरे द्यायची गरज वाटली नसावी.
'ऑल द केजरी फॅन्स... डोन्ट
'ऑल द केजरी फॅन्स... डोन्ट मिस द चान्स... झाडू डान्स, झाडू डान्स, झाडू डान्स, झाडू डान्स....'
यावेळी दिल्लीत काँग्रेस
यावेळी दिल्लीत काँग्रेस सत्तेत येणार नाही याचा अंदाज होता पण इतका मोठा पराभव होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. शीला दिक्षितचा स्वतःचा पण पराभव होईल असं खरंच वाटलं नव्हतं. .
इथे दिल्लीत तरी काँग्रेसचा
इथे दिल्लीत तरी काँग्रेसचा फारस प्रचर नव्हताच. एकटी शीला दिक्षितच प्रचारात आहे असं वाटत होतं. आमच्या प्रभागामध्ये काँग्रेसचा आमदर आहे सध्या. प्रभागासाठी काम केलं होतं त्याने बर्यापैकी पण तरीही त्याच्या प्रचारात जान नव्हती. प्रचारादरम्यान फक्त आम आदमी पार्टीच्या रॅलीज निघाल्याचं दिसत होतं. भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी फिरताना दिसत होते. पण काँग्रेसची फक्त पत्रकं रस्त्यावर पडलेली दिसत होती.
सध्या तरी आमच्या प्रभागात आम आदमी पार्टी आघाडीवर दिसतेय.
इथे लोक म्हणतात त्याप्रमाणे
इथे लोक म्हणतात त्याप्रमाणे राहुलजींचे फक्तं दर्शन घेऊनच लोकांचे समाधान झाले असावे.
त्यांना काँग्रेसला मत वैगेरे द्यायची गरज वाटली नसावी.<<<
पण या निकालांवरून विविध चॅनलवर हे काही अॅनालिसिस चालू आहे ते अति मनोरंजक आहे.
मला वाटते की दोन घटक यावेळचे
मला वाटते की दोन घटक यावेळचे निकाल नेहमीपेक्षा वेगळे लागण्यास किंवा पारंपारीक निकाल न लागण्यास कारणीभूत ठरले,
१. अधिक मतदान होणे
२. प्रगत देशांप्रमाणे पारदर्शी राजवट आपल्याकडेही असावी असे वाटणार्यांनी मतदान केल्यामुळे फक्त 'आहे ते बदलले की झाले' अश्या दृष्टिकोनातून होणारे मतदान वाढणे!
वेगळ्या शब्दांत - नरेंद्र मोदींचा करिष्मा उपयोगी पडणे व / किंवा राहुल गांधींच्या प्रतिमेचा काहीच उपयोग न होणे यापेक्षा हे घटक अधिक महत्वाचे ठरले असे मला वाटत आहे.
'आप'च्य यशाबाबत - फक्त दिल्लीदिल्लीपुरते बोलायचे झाले तर केजरीवालांची हवा निश्चितच होती हे आधीही जाणवले होते असे आठवत आहे.
पण या निकालांवरून विविध
पण या निकालांवरून विविध चॅनलवर हे काही अॅनालिसिस चालू आहे ते अति मनोरंजक आहे>> +१
हल्ली खरंच चांगलं राजकिय विश्लेषण बघायला मिळत नाही.
बेफिकीर यांचं अॅनालिसीस
बेफिकीर यांचं अॅनालिसीस पटलं.
यावेळी 'डोक्याने' मतदान झालं हे निश्चित.
इंटरनेटचा लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यात सहभाग नक्कीच आहे.
तरूणांना मोठ्या प्रमाणात मतदान करावेसे वाटले याला नेटवरच्या उलाढाली नक्कीच कारणिभूत आहेत.
विचार करू शकणार्या मध्यमवर्गियांचा वाढलेला टक्का याला जबाबदार आहेच.
AAP ने एक फार महत्वाची गोष्ट
AAP ने एक फार महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे एंट्री बॅरीअर तोडणे. ज्याने कुणी निवडणुकांमध्ये काम केले असेल त्यांना लक्षात येईल की हा 'प्रवेश अडथळा' काय चीझ आहे.
AAP ने काळा पैसा, दारू, उपकार ह्यांच्या विना निवडणुक जिंकली ही गोष्ट अजूनच महान आहे.
AAP ची आर्थिक, कायद्याच्या बाबीतली धोरणे मात्र बाळबोध वाटतात. पण कदाचित ही बाळबोध धोरणे प्रत्यक्षात आणणे शक्य असेल, कोणास ठावूक.
बीजेपीचे मनापासून अभिनंदन.
AAP ची आर्थिक, कायद्याच्या
AAP ची आर्थिक, कायद्याच्या बाबीतली धोरणे मात्र बाळबोध वाटतात. पण कदाचित ही बाळबोध धोरणे प्रत्यक्षात आणणे शक्य असेल, कोणास ठावूक. >>> +१
दिल्लीत नक्की काय होईल कळत नाहीये. भाजपा आणि आप दोन्हीला स्प्ष्ट बहूमत दिसत नाहीये. थोड्यावेलापूवी आम आदमीची शाजिया इल्मी १३००-१४०० मतांनी आघाडीवर होत्या आणि आता दिसतंय ३५० मतांनी त्या हरल्या. सगळीकडेच असा कमी मतांचा फरक दिसतोय.
दिल्लीत नक्की काय होईल कळत
दिल्लीत नक्की काय होईल कळत नाहीये. भाजपा आणि आप दोन्हीला स्प्ष्ट बहूमत दिसत नाहीये<<< आप कुणाबरोबर हातमिळवनी करतेय ते समजेल आता.
दिल्लीत बहुमताकरीता ४६
दिल्लीत बहुमताकरीता ४६ जागांची गरज असल्यामुळे आआप ला भाजप शीच हातमिळवणी करावी लागेल.
केजरीवालांनी वेळोवेळी स्पष्ट
केजरीवालांनी वेळोवेळी स्पष्ट सांगितलं होतं, कुणाशीही हातमिळवणी करणार नाही. सपोर्ट देणार /घेणार नाही. गरज पडल्यास परत निवडणूकांना सामोरे जावू.
जर त्यांनी हातमिळवणी केली तर मग त्यांच्यात आणि बाकीच्यांमध्ये तसा काही फरक उरणार नाही.
शीला दिक्षित तब्बल २२ हजार
शीला दिक्षित तब्बल २२ हजार मतांनी हारली ??????????
हे काँग्रेस च्या विरोधात मत
आआपा म्हणालीय की ते विरोधी
आआपा म्हणालीय की ते विरोधी पक्षात बसतील.
उदयन मी तेच लिहायला आले होते.
उदयन मी तेच लिहायला आले होते. १५ वर्ष मुख्यमंत्री.. आणि आता चक्क २२ हजार मतांनी हार.
Pages