राजकीय सेमिफायनल - विश्लेषण व चर्चा

Submitted by बेफ़िकीर on 7 December, 2013 - 21:50

नमस्कार मित्रहो. हा धागा त्या सर्वांसाठी आहे ज्यांना आज होणारी मतमोजणी, त्यातून निघणारे निकाल, त्यांचे अर्थ, मतदारांचा कल, नजीकच्या भविष्यावर होणारे त्यांचे परिणाम या सर्वांवर हिरीरीने किंवा विश्लेषणात्मक चर्चा करायची आहे अथवा वाचायची आहे.

मतमोजणी सुरू झालेलीच आहे.

वैतक्तीक शेरेबाजी टाळली तर धागा सुरळीत चालेल व मा. प्रशासकांना लक्ष घालण्याची वेळ येणार नाही असे वाटते.

बाकी राजकीय पक्ष, नेते, आपण सगळे ह्या सर्वांची खुसखुषीत खेचाखेची सगळ्यांनाच आवडू शकेल, एका मर्यादेत.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय मतदार सुजाण बनण्याच्या पायरीपासून अजुनही लांबच आहे असे मला तरी ठामपणे वाटते.

सगळ्या पोस्टींमधल मला सर्वात पटलेल विधान. हा उन्माद ७७ साली पाहिलेला आठवत आहे. त्यातून काय निष्पन्न झाल ते सर्वांना माहीत आहे. कठीण आहे!

सर्वांनी विषयांतर न करता निखळ राजकीय चर्चा चालू ठेवावी ही विनंती.
आता तर म्हणे भाजप आणि आआप दोन्ही पक्ष म्हणत आहेत की त्यांची विरोधी पक्ष बनायची तयारी आहे.
म्हणजे ७० पैकी ८ जागा मिळालेल्या कॉन्ग्रेसला सत्ता द्यायची की काय ??

आता तर म्हणे भाजप आणि आआप दोन्ही पक्ष म्हणत आहेत की त्यांची विरोधी पक्ष बनायची तयारी आहे.<<<

ते दोघेही तसे म्हणत आहेत ते बहुमत नसल्यामुळे म्हणत आहेत. निदान हल्ली राजकीय पक्षांना स्वतःलाच त्रांगडे सरकार नकोसे वाटू लागलेले आहे इतपत सुचिन्ह म्हणावे का ह्याला?

>>अश्या वेळेला 70- 8 = 62 भाजपाचे बहूमत सिध्द होईल
कसे काय आआप भाजप बरोबर युती करेल की काय ??

वॉक आउट केले तरी एकूण संख्येच्या ५०% हून जास्त डोकी लागणारचह.<<< हेच म्हणायचे होते. कारण तसे चालू शकत असते तर त्रिशंकू सरकारांची संख्या आधीच रोडावली असती.

खरेच नियम काय आहे अशा केसमधे ? उदयन यांनी सांगितल्याप्रमाणे आहे की डॉ. कैलास यांनी ?
डॉ. मी प्रश्न लिहिण्याच्या आधीच आपले उत्तर आले होते.
पण येथे ७० जागा असल्याने ५०%+१ = ३६ जागा जर असतील तर निर्विवाद बहुमत ना ? ३७ नाही.

आप सध्या युती अथवा बाहेरून पाठिंबा नाही म्हणत आहे. भाजप विरोधी पक्षात बसायला तयार आहे. (हा ज्याचा कुणाचा विचार आहे त्याची नजर २०१४ वर आहे!! कधी नव्हे ते भाजपकडून उत्तम राजकारण बघायला मिळालं -सध्यातरी!!!)

उदयन, इतकं सोपं गणित नसते ते. जरा आधी लोकशाही समजून घ्या.
बहुमत मिळालेल्या पार्टीला अथवा अभुमत सिद्ध करू शकणार्‍या राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देतात. कॉम्ग्रेसकडे आठच आमदार असल्याने राज्यपाल त्यांना आमंत्रण देऊ शकतच नाही. त्यामुळे कॉन्ग्रेस विश्वासदर्शक ठराव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी वॉक ऑट केले म्हणून उरलेले सगळे आमदार बीजेपीला सपोर्ट करतात असं होत नाही.

अरे पण मग होणार काय दिल्लीत? Uhoh

पुन्हा निवडणुका की पुन्हा मतमोजणी की राष्ट्रपती राजवट की काय?

(मयेकरांना बर्‍याच काळाने शांत झोप लागलेली दिसते) Light 1

केजरीवाल कोणालाही समर्थन देतील असे वाटत नाही. एककल्ली आणि एकहाती सत्तेसाठी हपापलेला पक्ष पुन्हा निवडणुका घेण्यास भाग पाडून स्वत: पायावर धोंडा पाडून घेईल.

बेफि, थांबा. आजच निकाल आलाय.

अजून घोडेबाजार चालू व्हायचा आहे. आपमधे काही "असंतोषी" लोकं आहेतच. त्यांना अचानक हवा तो पोर्टफोलिओ देऊन भाजप आपल्याकडे खेचू शकते. तसं केलं तर त्या कॅन्डीडेटला परत निवडणुक लढवून जिंकावे लागेल.

दुसर्‍या एका शक्यतेमधे आप कॉन्गेसबरोबर हात मिळवणी करू शकते. (पण तसं केलं तर आआप आत्महत्या करेल निश्चित. आपची नजर जर २०१४ वर असेल तर ते असला मूर्खपणा करणार नाहीत असं वाटतंय)

केजरीवाल कोणालाही समर्थन देतील असे वाटत नाही.<<<

येथे मला वैवकुंचे मत पटले. केजरीवालांनी पाठिंबा दिला तर तूर्त शहाणपणा ठरेल कारण मतदारांची स्मृती कमी असते व पुन्हा त्यांना पुढील निवडणुकीत वळवून घेता येते. पण सरकारच स्थापन होऊ दिले नाही तर मोठा वेडेपणा ठरू शकेल.

केजरीवाल आडमुठे आहेत की सूज्ञ हाही प्रश्नच आहे, कारण कोणालाही पाठिंबा न देणे हाच तर त्यांचा मूळ अजेंडा होता, मग आता त्यांनी का बदलावे? हिम्मत असली तर काँग्रेस किंवा भाजपने बहुमत मिळवायला हवे होते असे ते आता म्हणू शकतील.

म्हणजे प्रथमच उभे राहून जो पक्ष दणदणीत यश मिळवतो त्यालाच बाहेरून पाठिंबा का द्यायला लावायचा? मी तर म्हणतो भाजपने केजरीवालांना पाठिंबा द्यावा बाहेरून!

पी व्हि नरसिम्हा राव हे अल्पमतातील सरकारचे ५ वर्षे पंतप्रधान राहीले होते. जर कॉंग्रेस किंवा आप मतदानावेळी तटस्थ राहीले तर भाजप सरकार बनवू शकतो.

जर कॉंग्रेस किंवा आप मतदानावेळी तटस्थ राहीले तर भाजप सरकार बनवू शकतो.<<< ५०% +१ इतके सदस्य कुठे आहेत पण त्यांच्याकडे? (हा मुद्दा वर चर्चिला गेला नुकताच, घटना म्हणते की पन्नास टक्क्याहून अधिक इतके बहुमत लागते)

>>तिसर्या एका शक्यातेमध्ये भाजप आपला पाठिंबा देऊ शकतो. (ही फार मोठी चलाखी होइल भाजपाकडून)
ही शक्यता फारच कमी वाटते, कारण भाजपला २०१४ चा परिणाम कमी करून घ्यायचा नसावा,
तसेच त्यांच्या जागा आआप पेक्षा जास्त असल्याने तो पण एक इगो असणारच.

(ही फार मोठी चलाखी होइल भाजपाकडून)<<<

ही डेंजर गेम ठरेल भाजपची, ह्याचे कारण पुढील महत्वाच्या निवडणुकांच्या वेळी मतदारांना हे नक्की माहीत असेल की अशी वेळ आलीच तर भाजप आप च्या पाठीशी उभे राहतात. (अर्थात तो एक प्रकारचा जुगारही ठरेल म्हणा). भाजपने असे केले तर २०१४ चा मार्ग अधिक सुकर होऊ शकेल त्यांना! काँग्रेसचे मात्र दिल्लीत कोणीही हाल खाणार नाही त्यामुळे, पण हे दिल्लीपुरतेच!

मी सांगतो काय होईल ते.

निवडून आलेल्या ८ काँग्रेस्स आमदारांपैकी २ भाजपच्या गळाला लागू शकतील असे आहेत. उरलेल्या साठी थैल्या मोकळ्या केल्या जातील.सत्ता हा काँग्रेसचा श्वास आहे...अन्यथा त्यांची घुसमट होते....त्यामुळे ८च्या २ /३ सदस्य घेउन कुणीही भाजप मधे जाईल आणि ५ वर्षे सत्तेची पोळी खाईल.

तसेच त्यांच्या जागा आआप पेक्षा जास्त असल्याने तो पण एक इगो असणारच.<<<

महेश, नंदिनी तेच म्हणत आहेत (व मला ते पटतही आहे की) हा इगो सद्यस्थितीत सोडणे ही भाजपची धूर्त खेळी ठरेल.

निवडून आलेल्या ८ काँग्रेस्स आमदारांपैकी २ भाजपच्या गळाला लागू शकतील असे आहेत. उरलेल्या साठी थैल्या मोकळ्या केल्या जातील.सत्ता हा काँग्रेसचा श्वास आहे...अन्यथा त्यांची घुसमट होते....त्यामुळे ८च्या २ /३ सदस्य घेउन कुणीही भाजप मधे जाईल आणि ५ वर्षे सत्तेची पोळी खाईल.<<<

डॉक्टर साहेब, हे पटत नाही आहे, कारण माझ्या माहितीनुसार असे आमदार मिळवताना त्या आमदारांना आमदारकी सोडून पुनः निवडणूकीत विजयी व्हावे लागते, एकदा विजयी झाल्यावर पक्ष बदलता येत नाही किंवा पक्षाच्या पॉलिसीच्या बियाँड कोणाला वैयक्तीक पाठिंबा देता येत नाही. (हे राजीव गांधींच्या काळात ठरलेले होते).

Pages