वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातल्या एका बंगल्याच्या बाहेर:

कुत्र्यापासून सावध रहावे
कुत्रा मोकळा आहे

ह्याच्या बाजूला भुंकणार्‍या कुत्र्याचं चित्र होतं ते बहुतेक वाचता न येणार्‍या लोकांसाठी असावं. बाजूला एक बेल होती आणि त्याकडे बाण काढून 'बेल' असं लिहिलं होतं. ती बेल 'बेल' सोडून आणखी काही असेल असं फक्त एखाद्या एलियनला वाटलं असतं. Uhoh

फोटो काढायचा इरादा होता पण म्हटलं कुत्र्याला काही काम नसलं, म्हणजे तो मोकळा असला तर उगाच नसता ताप व्हायचा.

एका गाडीच्या मागे:

हमे आना पडेगा दुनियामे दोबारा

आणि बाजूला शिवाजीमहाराजांचं चित्र

महाराजांनी 'जानबाझ' मधलं हे गाणं पाहिलं तर 'मी आहे तिथेच बरा आहे' असं म्हणतील.

कोल्हापुरातली खूप जुनी गोष्ट आहे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा एकीवर जीव होता. साहजिकच सुंदोपसुंदी सुरू होती. तिचे मात्र, दोघांपैकी एकावरच प्रेम होते. एकदा हा प्रेमाचा त्रिकोण एकत्र आला आणि दोघे कर्मचारी हमरीतुमरीवर आले.
अगदी हातघाईवर आले. दोघांनीही कमरेची रिव्हॉल्वर काढून एकमेकांवर रोखली.
आणि तिचे ज्याच्यावर प्रेम होते, त्याला उद्देशून ती ओरडली, `नाम्या, बघतोस काय, घाल गोळी!'
ही बातमी हा हा म्हणता शहरभर पसरली. स्थानिक पेपरात तर हीच हेडलाईन होती.
पुढे खटला चालला, आणि या वाक्यामुळे गुन्हा सिद्ध झाला...
पुन्हा पेपरात तीच हेडलाईन झाली... नाम्या बघतोस काय, घाल गोळी!
नंतर शहरातल्या अनेक रिक्षांच्या मागे हे वाक्य झळकू लागले..
नाम्या, बघतोस काय, घाल गोळी!...

बर्‍याच वाहणांच्या मागे लिहलेले असते...
१) मालिक तो मेहरबान है... लेकिन चमचो से परेशान है.
२) दोघांत अंतर ठेवा...
३) एक फुल दो माली.... म्हणजे एक गाडी आणि डाव्हर आणि किन्नर असे असावे बहुदा..

>>एक फुल दो माली.... म्हणजे एक गाडी आणि डाव्हर आणि किन्नर असे असावे बहुदा.
इइइइइइइइइइइइइइइइ काहीहीहीहीहीहीहीही Sad

हल्ली महाराष्ट्रात 'दुर्गे दुर्घट भारी' एवढंच लिहिलेल्या गाड्या पाहिल्या. एवढीच ओळ लिहून अर्थ विचित्रच होतोय हे लोकांना कळत नाही. Wink

आमच्या गावात
'इतना मत पी मेरी रानी
महंगा है इराकका पानी '
असं रिक्षांच्या मागे लिहिलेलं असतं.

मध्ये 'केजीएन' लिहिलेल्या बर्‍याच रिक्षा पाहिल्या.
त्याचा अर्थ बहुतेक 'खाजा गरीब नवाज' असा असावा.

'नाम्या' ची स्टोरी भारीच इंटरेस्टिंग आहे. पॉप्युलर कल्चरमधे काही गोष्टी कशा कुठून कुठून जाऊन बसतात ! नवल वाटते. याचे डॉक्युमेन्टेशन झाले पाहिजे असेही वाटते. कारण आठवणी पुसल्या जातात हळूहळू.

आई वडिलांच्या उसळती प्रेमाच्या लाटा
त्याच्यावर चालते पवारांची टाटा

600

Pages