कधीतरी छान चांदणे बनून ये यार विठ्ठला

Submitted by वैवकु on 12 October, 2013 - 16:41

असेल जे त्या कशातही नसेल जे ते बघायचे
नसेल जे त्या मधेच मग खुशाल गुंतून र्‍हायचे

बघून आकाश मोकळे उडून गेलीत पाखरे
परत कुठे यायचीत ती उगाच घरटे जपायचे

हवेहवेसे बनेल ह्या भ्रमात मी आत घ्यायचो
जिणे नकोसे करून ते उसासुनी श्वास जायचे

नको तिथेही मुशाफिरी करू पहातात माणसे
हजारवेळा मरूनही पुन्हा इथे जन्म घ्यायचे

पुन्हा मला भेटलीस तर शिकव तुझी ती कला मला
निघायच्या त्या क्षणी कुणी रडू कसे आवरायचे

तुझ्या बिलोरी रुपातल्या दवामधे चांदवा भिजे
म्हणून झालो चकोर मी मला तुझे रूप प्यायचे

कधीतरी छान चांदणे बनून ये यार विठ्ठला
तुझ्या उन्हाचे अजून मी कितीक चटके सहायचे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघून आकाश मोकळे उडून गेलीत पाखरे
परत कुठे यायचीत ती उगाच घरटे जपायचे<<< वा वा

विठ्ठलाचा शेरही मस्तच!

एकुणच गझल आवडली.

छान.... तुमच्या आजवर वाचलेल्या गझलांपेक्षा बरीच वेगळी वाटली.

बघून आकाश मोकळे उडून गेलीत पाखरे
परत कुठे यायचीत ती उगाच घरटे जपायचे

पुन्हा मला भेटलीस तर शिकव तुझी ती कला मला
निघायच्या त्या क्षणी कुणी रडू कसे आवरायचे

हे दोन सर्वात विशेष वाटले.
आणि
"कधीतरी छान चांदणे बनून ये यार विठ्ठला
तुझ्या उन्हाचे अजून मी कितीक चटके सहायचे"
या शेरात विठ्ठलाला मित्र म्हणणे हे खास.

श्रीयू , दाद ,जय् जी ,बेफीजी , अमेय , देवा ,रमा , सुप्रियातै ,उकाका ,भारतीताई, सर्वंचे मनःपूर्वक आभार

मित्रवर्य प्रशांतराव चुका शोधाच .. सापडतीलच . सापडल्यावर इथे जरूर कळवा म्हणजे सर्वांना समजतील व मलाही ! मग आवश्यक त्या सुधारणाही करता येतील .सुधारणा करण्याबाबतच्या गोष्टी मित्रांनी नाही सांगायच्या तर कुणी Happy
धन्यवाद

छान

बघून आकाश मोकळे उडून गेलीत पाखरे
परत कुठे यायचीत ती उगाच घरटे जपायचे

पुन्हा मला भेटलीस तर शिकव तुझी ती कला मला
निघायच्या त्या क्षणी कुणी रडू कसे आवरायचे

तुझ्या बिलोरी रुपातल्या दवामधे चांदवा भिजे
म्हणून झालो चकोर मी मला तुझे रूप प्यायचे

कधीतरी छान चांदणे बनून ये यार विठ्ठला
तुझ्या उन्हाचे अजून मी कितीक चटके सहायचे

>> व्वाह !!
'विठ्ठल' खासच!

मला माहितेय तुला तेच आवडलंय, तरी मला तरी 'र्‍हायचे' कसं तरीच वाटलं.

एकूणात गझल खूप आवडली.......... पण कुठे तरी मी वर्षभरापूर्वीचा वैभू शोधतोच आहे अजून.. मिळेल मला लौकरच, बहुधा...! काय म्हणतोस?

घरटे, मुशाफिरी आणि विठठलाचा शेर आवडले.

ड्रामॅटीक शेर कमी कसे करता येतील ह्यावर विचार व्हावा.

नको तिथेही मुशाफिरी करू पहातात माणसे
हजारवेळा मरूनही पुन्हा इथे जन्म घ्यायचे

पुन्हा मला भेटलीस तर शिकव तुझी ती कला मला
निघायच्या त्या क्षणी कुणी रडू कसे आवरायचे >>>बेहद खूब !!े

अरविंदजी ,सुचेता ,, पुलस्तीजी, शशांकजी ,खूप खूप धन्स
डॉ.साहेब व जितू विशेष आभार
कणखरजी ड्रामॅटिक्पणा ह्याच मुद्द्याचा हली मीही विचार करत आहे पण नक्की कसे करायचे हे जाणून घेंण्यासाठी फोन करीनच :)...विशेष आतिविशेष आभार
हल्ली काही जण माझ्या गझलेवर प्रतिसाद देणे टाळत आहेत त्यांचे मुद्दाम आभार Angry

मयुरेश , समीरजी , मु.कु. ,बगेश्री , विनायक खूप खूप धन्स
आभार मानायला चक्क विसरून गेलो होतो क्षमस्व

पुन्हा मला भेटलीस तर शिकव तुझी ती कला मला
निघायच्या त्या क्षणी कुणी रडू कसे आवरायचे

तुझ्या बिलोरी रुपातल्या दवामधे चांदवा भिजे
म्हणून झालो चकोर मी मला तुझे रूप प्यायचे

कधीतरी छान चांदणे बनून ये यार विठ्ठला
तुझ्या उन्हाचे अजून मी कितीक चटके सहायचे

.... अवाक झालो हे शेर वाचून …. अफाट निर्मितीक्षमता Great!