Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
कृपया मला
कृपया मला "अनामय" या शब्दाचा अर्थ सांगावा.
*इन्द्र्सुत(अ)द्वितीय*
'निरोगी'
'निरोगी' असा अर्थ आहे.
*** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary. ***
इंद्रसुता,
इंद्रसुता, स्लार्टीने सांगितलेला अर्थ बरोबर आहे. थोडी अधिक माहिती: 'आमय' म्हणजे 'रोग'/'आजार'. त्यामुळे ते नसण्याचा गुणविशेषण जातीचा शब्द बनवताना 'अन्' हे नकारदर्शक उपपद जोडून 'अनामय' हा शब्द बनतो. याच अर्थाचा 'निरामय' हा शब्द तुलनेने अधिक वापरात आहे.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
अहा! सर्वे
अहा! सर्वे संतु निरामय: चा अर्थ असा आहे तर. धन्यवाद फ.
'खुतनीचा
'खुतनीचा चोळणा' हा शब्द राऊ, मंत्रावेगळा वगैरे कादंबर्यांतून बरेचदा वाचला. तर 'खुतनी' म्हणजे नेमकं काय?
'चमचेगिरी'
'चमचेगिरी' ला इंग्रजीत काय म्हणतात??????
चिन्या, चमच
चिन्या,
चमचेगिरी म्हणजे obsequiousness, sycophancy.
चमचा = sycophant, obsequious, lackey.
किसिंग अप,
किसिंग अप, सकिंग अप, ब्राउन नोझिंग असे ही वाक्प्रचार आहेत
धन्स
धन्स चिनॉक्स्,शोनु!!
मागे
मागे कान्होपात्रेच्या अभंगाचा उल्लेख आला आहे॰
त्यात "मोकलूनी आस" नसून ते "मोकलोनी आस" असे आहे॰ मोकलोनी म्हणजे सोडून देऊन, टाकून देऊन.
परटी (की
परटी (की परटे?) म्हणजे काय?
काहि
काहि जणांचे बबन असे नाव असते. (उदा. बबनराव नावडीकर, बबन प्रभू). बबन या शब्दाचा नक्की अर्थ काय?
बबन या
बबन या शब्दाचा नक्की अर्थ काय? >> बबुन या शब्दाचा अपभ्रंश असावा का?
बिल्वा आणि
बिल्वा आणि अन्विता ह्या दोन नावांचा अर्थ काय होतो?
बिल्व
बिल्व म्हणजे बेलाचे झाड/फळ
अन्वित म्हणजे 'अनुसरला गेलेला' अथवा 'युक्त,सहित'
बिल्वा, अन्विता ही वरील शब्दांची स्त्रीलिंगी रूपे
खड्ग का
खड्ग का खड्ज म्हणजे काय?????
खडगः का?
खडगः का? म्हणजे तलवार
खड्ग
खड्ग म्हणजे तलवार. आणि याच शब्दाचा दुसरा अर्थ आहे गेंडा, किंवा त्याचे शिंग.
अरे तु ते
अरे तु ते गाण नाही का एकलस....
दे दी हमे आझादि बिना खडगः बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल
जीएंच्या
जीएंच्या कथांमध्ये बर्याचदा 'परट्यांची भोकं' अशी उपमा (बहुतेकदा डोळ्यांसाठी) येते. यातले 'परट्या' म्हणजे काय?
नाही नाही
नाही नाही खड्ग म्हणजे तलवार माहीत आहे पण 'खड्ज्'का काहीतरी आहे ना त्याचा अर्थ काय्???माझ्यामते आवाजाबद्दल आहे तो शब्द.
खर्ज
खर्ज का?खर्जातला आवाज असतो..
चिन्या,
चिन्या, आवाजासंबंधी म्हटले तर षड्ज आणि खर्ज असे दोन शब्द आहेत.
खर्ज्....खर्
खर्ज्....खर्ज्!!!!!काय असत ते???
खालची
खालची पट्टी म्हणजे खर्ज..... चांगला खर्ज लागणे हे गायकाचे स्वप्न असते.
आलं
आलं लक्षात्.धन्यवाद
>>> चिन्या,
>>> चिन्या, आवाजासंबंधी म्हटले तर षड्ज आणि खर्ज असे दोन शब्द आहेत.
आवाजाच्या पट्टीसाठी खर्ज (खालची पट्टी), मधली पट्टी आणि वरची पट्टी असे शब्द आहेत.
षडज म्हणजे 'सा' हा स्वर. इतर स्वरांसाठी ऋषभ (रे), गांधार (ग), मध्यम (म), पंचम (प), धैवत (ध) आणि निषाद (नि) असे शब्द आहेत.
वर मला
वर मला 'आवाजासंबंधी' म्हणजे 'आवाजाशी संबंधीत' असे म्हणायचे आहे.
षडज म्हणजे
षडज म्हणजे 'सा' हा स्वर.
हेही माहीत नव्हत्.दोन्-दोन शब्द कळले.धन्यवाद
किंकर या
किंकर या शब्दाचा अर्थ काय?
Pages