पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे.
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्याच पाकृ आहेत पोह्यांच्या.
तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.
चला तर मग....
प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.
१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.
हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.
हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित
२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.
३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.
कोळाचे पोहे दडपे पोहे
कोळाचे पोहे
दडपे पोहे
मटार पोहे.
मटार पोहे.
म्या पण फॅनमोडात...
म्या पण फॅनमोडात...
फोडणीचे दहीपोहे अणि त्यावर
फोडणीचे दहीपोहे अणि त्यावर चुरलेली ताकातली तळली मिरची! अहाहा!
दडपे पोहे, तिखटमीठ लावलेले
दडपे पोहे, तिखटमीठ लावलेले पोहे, दही पोहे आणि नानबाच्या रेसेपीने पोह्यांची उकड हे माझे आवडते पदार्थ पोह्यांचे.
आणि हो पातळ पोह्यांचा चिवडा पण घालावा लागेल वरच्या यादीत.
सामान्यतः सगळे कुलकर्णी पोहे
सामान्यतः सगळे कुलकर्णी पोहे फॅन असतातच.... अपवाद विरळा....
आपुन भी फॅन..
आपुन भी फॅन..

दहीपोहे...स्स्स्स्स्स्स्स्स..
दहीपोहे...स्स्स्स्स्स्स्स्स.. भुक लागली..
दडपे पोह्यांना या जगभरात तोड
दडपे पोह्यांना या जगभरात तोड नाहीये..
फ्यानक्लबात आपुनका नाम दाखिल करवालो!
मी पण आहे फ्यानक्लबात. फक्त
मी पण आहे फ्यानक्लबात.
फक्त एकच अट आहे, तुम्ही (पोहे) करा, मी खातो.
ग्री ला +१. मी बनवलेले पोहे
ग्री ला +१.
मी बनवलेले पोहे कैतरीच होतात..
आमच्याकडे माझ्या साबांनी
आमच्याकडे माझ्या साबांनी बनवलेले एक प्रकारचे पोहे फार फेमस आहेत. परंपरेनुसार, ती कला आता नवर्याकडे आलेली आहे.
कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.
हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.
हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे.
सामान्यतः सगळे कुलकर्णी पोहे
सामान्यतः सगळे कुलकर्णी पोहे फॅन असतातच.... अपवाद विरळा....>>> +१

जन्मजात कुलकर्णी तर असतातच फॅन, पण आलेल्या सुनांनाही क्लबात ओढून घेतात.
प्राची तू वर दिलेल्या सारखे
प्राची तू वर दिलेल्या सारखे पोहे मी पण करते बर्याचदा. फक्त त्याला फोडणी न घालता कच्चं तेल घालते मी.
मी पण पोहे फॅन क्लबात. सगळ्या
मी पण पोहे फॅन क्लबात. सगळ्या प्रकारांनी केलेले आवडतात. इंदोरी पोह्यांचीही मी फॅन.
पोह्यात कांदा, बटाटा, मटार, टोमॅटो, कोबी, कोथिंबिर, लिंबू घालणे आणि हादडणे हा माझा आवडता उद्योग. मग जेवणही नको. मोठ्ठी कढई भरुन करते एकावेळी
लाल पोह्यांचं अजून काही सूत जुळलं नहीये माझं. काही टीपा त्याकरता? हेल्दी असतात ते जास्त.
प्राची तुझी रेस्पी उद्या संडे स्नॅक म्हणून करणार. सुदैवाने घरातली इतर मेम्ब्रं पण पोहे फॅन.
मै भी! दही पोहे आणि त्यावर
मै भी!
दही पोहे आणि त्यावर पोह्याचाच त्तिख्खट तळलेल्या पापडाचा चुरा..!
बटाटा,कांद,, मटार,आणि टोमॅटो घालून केलेले फोडणीची खमंग पोहे....!
आणि सायीच दूध,साखर घातलेले दूध पोहे....!
क्या बात!
मी आहे............. तुम्ही
मी आहे.............
तुम्ही पाककृती लिहा.............
मी बनवुन बघतो ..
आई पाकातले पोहे करायची. लवकरच
आई पाकातले पोहे करायची.
लवकरच कृती देते इकडे.
मी पण. माझ्या साबा एक
मी पण.
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.
शॉपराइट मध्ये खास उज्जैनीचे पोहे मिळतात.
पर्वा गुजरातेत मस्त पैकी बटा टे पोहे खाल्ले होते. आक्षी मस्त चव.
सीमंतिनी मटार पोहे? यू आर माय न्यू बी एफ एफ.
मटार पोहे व कॉफी हे माझे अल्टिमेट कंफर्ट फूड आहे. किती ही मूड खराब असला तरी मटार पोहे खाउन मन मस्त होते.
प्राची, हे माहिती नव्हते,
प्राची, हे माहिती नव्हते, उद्याच करुन पाहीन सकाळी नाश्त्याला. मेतकूट असतंच नेहमी.
आई ग सगळ वाचुन तोंपासु आणि
आई ग सगळ वाचुन तोंपासु आणि भुक लागली प्रचंड.
मीही फॅनक्लबात. मेतकूट पोहे
मीही फॅनक्लबात.
मेतकूट पोहे करेन आता, छान आहे रेसिपी.
तेल-तिखट-मीठ पोहे हे शाळेतून आल्यावरचे कम्फर्ट फूड होते एकेकाळी
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे. त्यामुळे चघळत बसण्यात वेळही जातो बराच
म्हणूनच शाळेतून आल्याबरोबर देत असावेत! 
अजून एक प्रकार - जाड पोहे
अजून एक प्रकार -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
पौर्णिमा... माझा ऑल टाईम
पौर्णिमा... माझा ऑल टाईम फेवरेट फुड आयटम आहे हा...तेल-तिखट-मीठ पोहे त्यात थोड ओल खोबर पण घालुन बघा....मस्त लागतात
मी पण फॅन क्लबात .. नेहमीचे ,
मी पण फॅन क्लबात ..
नेहमीचे , मटार पोहे, दडपे , बटाटा पोहे .. अतिशय आवडतं..
उसगावात होतो तेव्हा आठवडाभर वेळ मिळायचा नाही आरामात पोहे नि चहा साठी .. म्हणुन शनिवारी ब्रंचसाठी मेन्यु ठरलेला .. फुल्ल मोठ्ठा बाउल भरुन पोहे नि मगभर चहा .. अर्धा तास एंन्जॉय ..
पूनम, 'अहाहा!!!' वाटतोय
पूनम, 'अहाहा!!!' वाटतोय प्रकार.
लगेच करून बघते.
मै भी पोहे फॅन. दहीपोहे,
मै भी पोहे फॅन. दहीपोहे, दडपे, फोडणीचे. दूध्साखर कसेही.. आणि प्राची आणि पौर्णिमाची कच्च्या पोह्यांची रेसिपी तर ऑल्टाईम फेव्रिट. तोंडाला पाणी सुटलंय.. कच्चे पोहे लाल तिखट, मीठ, कांदा आणि तेलाची धार.. आहाहा!
'चहा पोह्यांच्या
'चहा पोह्यांच्या कार्यक्रमा'बद्दल कैतरी असेल म्हणून धागा उघडून आत डोकावलो होतो..
माझं पण अख्खं घरच घ्या
माझं पण अख्खं घरच घ्या क्लबात! आजचा नाश्ता बटाटेपोहेच
साबुदाणा खिचडी आवडत नाही म्हणणारे जसे विरळा तसेच पोहे न आवडणारे पण... बहुतेक असे कुणी नसतीलच म्हणा.
पोहे प्रकारांची यादी केली तर केवढी तरी लांबलचक होईल आणि एक सारख्या पदार्थाची पुन्हा प्रत्येकीची निराळी व्हर्जन्स.
माझा काका नुसते कच्चे पोहे आणि त्यात योग्य प्रमाणात फरसाण मिसळून ठेवतो. लागेल तेव्हा तसेच खायचे किंवा ऐन वेळेच्या उत्साह/निरुत्साहाप्रमाणे हव्या असतील तशा अॅडिशन्स करायच्या.
आरतीनं एकदा मला ऑफिसमधून गेल्या गेल्या गरमागरम पोह्यांचे वडे तळून खायला घातले होते, अप्रतिम कुरकुरीत आणि चवीष्ट झाले होते.
साखि प्रेमीमंडळ पण काढा आता लवकरच!
आमरस पोहे! जबरी लागतात. करून
आमरस पोहे! जबरी लागतात. करून पहा.
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
Pages