Submitted by वैवकु on 15 November, 2013 - 14:42
उरलेल्या ओलाव्याने हा मौनाचा ग्लास विसळतो मी
इतका गहिवर प्याल्यावरही बघ मुद्देसूद बरळतो मी
ही गझल हवी असल्यास तुला ये उद्या पहाटे पाण्याला
लयगंगेच्या डोहामधुनी संध्याकाळी भळभळतो मी
तो नायगरा आता बरका नुसता जळफळतो माझ्यावर
तिकडे जग ढुंकतही नाही इतका सुंदर कोसळतो मी
प्रतिभेच्या अवखळ लाटांना इतक्या संयत उसळ्या देतो
ज्यांच्यामध्ये काही नाही त्या डोक्यांनाही कळतो मी
तू मनामधे येताच कशी आनंदुन गेली बघ दु:खे
तू मनामधे नसल्यावरती त्यांच्या डोळ्यात तरळतो मी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच झाली आहे ...अनेक मिसरे
छानच झाली आहे ...अनेक मिसरे उत्तम !
नायगार्याच्या शेरातील खयाल आगळावेगळा !
मतलाही खूप आवडला .
सुंदर गझल .
धन्यवाद !
नायगरा, कळतो, तरळतो....वा वा
नायगरा, कळतो, तरळतो....वा वा !!
उरलेल्या ओलाव्याने हा मौनाचा
उरलेल्या ओलाव्याने हा मौनाचा ग्लास विसळतो मी
इतका गहिवर प्याल्यावरही बघ मुद्देसूद बरळतो मी
प्रतिभेच्या अवखळ लाटांना इतक्या संयत उसळ्या देतो
ज्यांच्यामध्ये काही नाही त्या डोक्यांनाही कळतो मी
तू मनामधे येताच कशी आनंदुन गेली बघ दु:खे
तू मनामधे नसल्यावरती त्यांच्या डोळ्यात तरळतो मी<<< सुंदरच शेर झालेले आहेत. अभिनंदन!
नविन खयाल... वाह.. मज्जाच आली
नविन खयाल... वाह.. मज्जाच आली गझल वाचताना. Congrats!
भळभळतो च्या जागी डचमळतो कसा वाटेल रे?
ख्याल...आणि मांडणी अप्रतिम
ख्याल...आणि मांडणी अप्रतिम आहे....
खूप खूप आवडली मला...
धन्यवाद!!!!!
....तुम्ही नेहमीच छान लिहिता पण ही गझल त्यातही तुमच्या शैली पेक्षा हटके वाटली...
'ग्लास' च्या जागी पर्यायी शब्द नाही घेऊ शकत का?
मला लय नीटशी लक्षात नाही आली..
उरलेल्या ओलाव्याने हा मौनाचा <यती> ग्लास विसळतो मी
असं आहे का ?
वैभव..जमून आलाय सगळाच माहौल
वैभव..जमून आलाय सगळाच माहौल गझलेतला.
भळभळतो आणि तरळतो हे शेर
भळभळतो आणि तरळतो हे शेर सर्वात विशेष वाटले.
या गझलेतले खयाल हटके वाटले.
चांगली झालीय गझल. सगळेच शेर
चांगली झालीय गझल. सगळेच शेर उल्लेखनीय!
तू कॉम्प्लीमेंट म्हणून घेशील असे वाटत आहे म्हणून सांगतो,
प्रतिभेच्या अवखळ लाटांना इतक्या संयत उसळ्या देतो
ज्यांच्यामध्ये काही नाही त्या डोक्यांनाही कळतो मी
ह्या शेरावर बेफिकीर ह्यांचा खूप प्रभाव दिसतो.
आवडली
आवडली
अ फा ट!
अ फा ट!
वाह वा. भारी झालीय
वाह वा. भारी झालीय
जबरी गझल.
जबरी गझल.
वा वा काय मस्त खयाल आहेत.
वा वा काय मस्त खयाल आहेत. सुंदर गझल.
मस्त!
मस्त!
गझल आवडली नाही. भळभळणे वगैरे
गझल आवडली नाही.
भळभळणे वगैरे भडक वाटतेय इतकेच म्हणतो.
वेगळाच फॉर्म. मस्त आहे पूर्ण
वेगळाच फॉर्म. मस्त आहे पूर्ण गजल.
>>उरलेल्या ओलाव्याने हा
>>उरलेल्या ओलाव्याने हा मौनाचा ग्लास विसळतो मी
काहीच्या काही राव..! ओलावा, मौन, ग्लास, विसळणे अरे किती ते ओढून ताणून संबंध लावायचा..?
प्रतिसादासाठी विलंब झाला आहे
प्रतिसादासाठी विलंब झाला आहे त्यासाठी क्षमस्व
प्रत्येक प्रतिसादात्याचे मनापासून आभार
या वेळी मला इतके सगळे प्रतिसाद येतील अशी अपेक्षा नव्हती तरीही इतके आणि गझल आवडल्याचे प्रतिसाद वाचून फार छान वाटले
@जयदीप ...>>उरलेल्या ओलाव्याने हा..(यती).. मौनाचा ग्लास विसळतो मी <<..असे आहे
@बागेश्री मला अधी तसेच सुचले होते तोच शब्द इथे सर्वात सुंदर ठरेल पण डचमळणे क्षणिक असते व भळभळणे संतत असा विचार करून बदलला काफिया ! मी डुचमळणे असे लिहिणार होतो गावाकडे आम्ही असेच बोलतो पण आक्षेप येतील असा विचार करून मग नाही केले तसे
@कणखरजी प्रतिभेचा शेर बेफीजींच्या शेरासारखाच होणार हे प्रतिभा हा पहिला शब्द सुचल्यावरच माझ्या लक्षात आलेले ..कारण तो शब्द त्यानांच शोभतो हेही खरेच असले तरी एकंदर शेरात जे म्हटले आहे ते त्यांच्याच शेराना लागू होते खरेतर !..माझे शेर तसे नसतातच अनेकदा ...माझा एक शेरच आहे तसा ...
जरा संदिग्धसा आहे पुरेसा नेमका नाही
गझल सांगायचा अंदाज माझा बोलका नाही ...
@समीरजी विशेष आभार !! गझलेत तुम्हाला भडकपणा जाणवेल व भावणार नाही ह्याची पूर्वकल्पना होतीच स्पष्ट्पणे कळवणासाठी धन्स (भडकपण उतरला आहेच जरासा हे मान्यच आहे मला )
@योग आपला प्रतिसाद येणे दुर्मीळ असते .म्हणून विशेष आभार ...पण त्य ओळीत जराही ओढाताण मला रचताना जाणवली नाही उलट बाकीचे शेर झाल्यानंतर आता नियमानुसार एक मतला हवाच म्हणताना ऐनवेळी मला अतीशय अपसूक सुचलेला मतला आहे हा

आपण अख्खा शेर लक्षात घ्या .. बरळतो मी असे म्हण्तोच आहे की मी !! हो पण .मुद्देसूद बरळतोय.. हो कि नै ?
________________________________
मला माहीत आहे की वाचकांची आवड निवड हा रचना आवडण्यामागे सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे ..अमुक आशया-विषयाचे ..अमुक प्रकारे मांडलेले ..खास पद्धतीने मन व्यक्त करणारे (शैली/अंदाजे बयान) शेर /गझल्स जास्त आणि चटकन् आवडतात त्याना..तसे होणे स्वाभावीकच असते त्याल कोणी हरकत घेवूच शकत नाही ..मी मात्र एक वाचक म्हणून अशी कोणतीच बंधने कधी पाळत नाही आणि रचनाकाराच्या भूमीकेतून तर नाहीच नाही
कुणी काहीही कश्याही ढंगात लिहिलेले असो ते अधिकाधिक आवडून घेता येण्याकडेच माझा कल असतो (पण त्यामुळे मी लोकाना सवंगही वाटत असेन ..क्लासलेस वगैरेही असेही वाटते
असो ! )
___________________________________
@बेफीजी नेमके शेर उल्लेखलेत अगदी !! धन्स त्या बाकीच्या २ शेरात मलाही गडबडी जाणवत आहेत त्यातल्यात्यात नायगरा छानय माझ्यामते खयाल आकर्षक आहे आणि प्रतिमा छान वापरली गेलीये
तो पाण्याचा शेर चक्क गंडलाय माझ्यामते ..खासकरून मला जे म्हणायचेय ते आजूनपर्यंत नीटसे माझ्याही समोर येतच नाही आहे मी दुसरी ओळ अशीच का केली त्यातून मला काय म्हणायचे आहे / होते हे मलाही कळालेले नाही अजूनपर्यंत (लयगंगेच्या प्रवाहात लाट नेईल तिकडे वहावत गेलोय अक्षरशः मी अधिक बुडण्याचा प्रयत्न ठेवायला हवा होता म्हणजे शेराचा तळ गाठता आला असता बहुधा ..अत्ता आठवले ..नितळतो हाही काफिया सुचलेला ..असो आता आठवून काय उपयोग !!)
_____________________
माझे फायनल मत असे की गझल चांगली आहे
जमीनीची मजा फार छान देते ही गझल ... मला जास्त आवडले ते हे की एकाही शेरात काफियाची जागा येइस्तोवर मला काफिया काय असणार हे माहीत नव्हते ठरलेच नव्हते.. अगदी आपसूक आले काफिये.. बहुतांश चपखल बसलेत .आणि सर्वात महत्त्वाचे हे की सर्व शेरात एक समान धागा ... ओलावा.. पाणी ..!!
भारतीताई म्हणाल्या तसे माहौल बनवते ही गझल !!
((@भरतीताई अगदी एका शब्दात नेमकेपणे सागीतलेत !!..तुमच्या कवितेतच नाही तर प्रतिसादातही हा सद्गुण आहे ..!!)
असो खूप बोललो नै ?
तीन चार दिवस नेटच उपलब्ध नव्हते अजिबात ..म्हणून आज अधाश्यारखा तुटून पडलो आहे अगदी !!
काही उणे अधिक बोललो असेन तर सपशेल माफी !!
मला बोलायचे नव्हते तरी बोलून गेलो मी
म्हणाले मौन माझे ..बडबडावे वाटते आहे
सर्वांनी इतके ऐकून घेतलेत त्याबद्दलचे वेगळे आभार
~वैवकु
आवडली गझल वैभव. मजा आली
आवडली गझल वैभव. मजा आली वचताना.
विशेष आवडली नाही.... वैभ्या
विशेष आवडली नाही.... वैभ्या !
मुद्देसूद बरळतो मी
लयगंगेच्या डोहामधुनी संध्याकाळी भळभळतो मी
इतका सुंदर कोसळतो मी
प्रतिभेच्या अवखळ लाटांना इतक्या संयत उसळ्या देतो
तू मनामधे येताच कशी आनंदुन गेली बघ दु:खे
- असे काही सुटे मिसरे व अर्धमिसरे (
) आवडले !
>>उलट बाकीचे शेर झाल्यानंतर
>>उलट बाकीचे शेर झाल्यानंतर आता नियमानुसार एक मतला हवाच
नेमके हेच..!
धन्स जितू योग आपणास माझे
धन्स जितू
योग आपणास माझे म्हणणे समजले नसावे
अहो 'ते'च जरी असले तरी शेर काय बोलतो ते लक्षात घ्या मी त्या "तेच" शी प्रामाणिक राहूनच शेर रचायला बसलेलो होतो व त्या "तेच"शी ईमान राखणाराच शेर आहे हा
जे त्या शेरात बरळलो ते बरळणेच असले तरी त्या लेव्हल सोडून बोलण्यातही काहीतरी स्टँडर्ड आहे जी ह्या शेराची खरी गम्मत आहे हेच आपल्या लक्षात आले नाही अजून
आपण म्हणत आहात की ओढून ताणून जाणून बुजून मी तसे लिहिले आहे वगैरे त्याचा राग मुळीच नाही आहे मला पण मला सांगायचेय ते इतकेच की आवर्जून मुद्दामहून तसेच लिहिणे आणि जराशी सतर्कता बाळगून तसेच लिहिणे ह्यात फरकअसतो हे आपल्या लक्षात यावे
असो
पुढे नाही मला सांगायचे
कशाला फारसे सांगू तुला
असो
लोभ असूद्या !!
~वैवकु
(No subject)
ज्यांच्यामध्ये काही नाही त्या
ज्यांच्यामध्ये काही नाही त्या डोक्यांनाही कळतो मी ......
सुंदर.
बरीय वैभवजी.. खयाल अप्रतिम...
बरीय वैभवजी.. खयाल अप्रतिम... पण अनवट वृत्त असल्याने जरा जड गेली..
धन्स खारकर , अजयजी व पोरे
धन्स खारकर , अजयजी व पोरे साहेब