असे होते का?

Submitted by _आनंदी_ on 18 November, 2013 - 02:39

माझी मुलगी १ वर्ष , ४ महिन्यांची आहे...
खुप दंगा मस्ती करते .. त्या बाबत काही प्रश्न नाही उलट मजाच येते..
पण खेळायच्या नादात भुके कडे अजिबात लक्ष नसते..
भुक लागली कळाले तरी खेळातच इंटरेस्ट असतो...
दाढा आल्या नाहियेत... दात मिळुन ८ आलेत...
खाण्याची आवडच नसल्याने उपमा शिरा सारख थोड काही घातल तर टाकुन देते वा खुप उशिर तोंडातच ठेवते...
सध्या तिला अम्ही.. दुध-बिस्किट, तांदुळ आणि डाळ भाजुन बारिक करुन केलेलि पुड शिजवुन, रव्याचा शिरा-उपमा,गव्हाची पोळी दुधात अगदी मऊ करुन कुस्करुन देतो...
आहारात अजुन काही मिसिंग आहे काय?

थोड घट्ट , शिरा-उपमा सारख कधी खाउ लागेल .. तसेच खाउ लागावे म्हणुन काय प्रयत्न , उपाय, पद्धती या बद्दल कुणाचा अनुभव असल्यास शेअर करावा..
दात घासण्याबद्दल वल्लरीच कडुन छान माहिती मिळाली धन्यवाद..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

maaza mulga 1.5 varshacha ahe. amhi tyala baherche [biscuits paan nahi]. det nahi. tyacha aahar sadharaan Khalil pramane asato
1. 150 ml gaiche dudh
2,nachani satva
3.dhirde/dosa/thalipeeth/bhat/khichadi/chatnipoli
4.phal[apple/kele/chikku/amba]
5.150 ml gaiche dudh
6. 3 madhlech kahitari

adhun madhun satuche peeth/shira/ravyachi kheer/purnann deto
tiche vajan-unchi neet asel taar phar kalaji karu naka. sadhya mazya mulache paan khelnyachya nadaat khane kami zale ahe.

उंची .. एकुण प्रगती उत्तम आहे.. पण वजन जरा कमी आहे..
त्यामानाने अ‍ॅक्टिविटिज दुप्पट आहेत... तुमच बाळ तुम्ही देता त्यातल धिरडे, पोळी , भात ई. चाउन अथवा घट्ट खते काय ?

वजन असू दे कमी, नंतर वाढले तर आपल्याच डोक्याला त्रास कमी करायचा. अ‍ॅक्टिव्हिटीज जास्त म्हणूनच ग, वजन मध्ये येत नाही खेळण्याच्या.

मऊ मऊ खाणं बंद कर, सरळ पोळी भाजी, वरण भात, आमटी भात, ठेपला, पराठा द्यायला सुरुवात कर,मसाले घालून, सुरुवातीला जिरं आणि मीठ मग थोडी मिरपूड, मग थोडी लवंग - अख्खी, मग थोडी दालचिनी... पावभाजी मसाला, छोले मसाला...थोड्या दिवसांनी बिया काढलेल्या मिरचीची फोडणी.

अग टेस्टी खाणं दे. आपल्याला आवडेल का, मिळ्मिळीत, पचपचीत खायला. आणि स्वतःसोबत जेवायला बसव. तू एक घास तिने एक घास, खाताना जेवनाची तारीफ कर. आणि सर्वात महत्वाचं पाहा किती वेळ राहाते न खाता - चार तास? सहा तास? आठ तास? नाही राहाणार - स्वतःहून मागू दे किंवा भूक लागल्याचे सिग्नल देऊ दे. मग एक नियम कर, खुर्चीवरून खाली उतरली तर खायला नाही. एका जागी बसूनच खायचं. पळाली तर पुन्हा आणून बसवायचं, सांगायला सोपं आहे करायला खूप दमछाक होते आपली. मुलांना उपाशी ठेवायचा जीव नाही होत. पण तरीही... हवं तर बालगाणी लाव ऐकण्यासाठीपाहाण्यासाठी नाही.

माझा मुलगा नऊ महिन्याचा होता तेव्हा प्रसादाचा शिरा, वरणात, कमी तिखट भाजीच्या रश्श्यात नुसती भिजवलेली पोळी खायचा. वर्षाचा झाला तेव्हा उपमा, पोहे, मसालेभात, पोळी भाजी , वरण भात खायचा. फक्त कमी तिखट. अगदी कमी तिखट घरी बनवलेली पाव भाजीची भाजी सुद्धा खायचा. आणि हे मला माझ्या पेडियाट्रिशियनने सांगितल्य नुसारच मी त्याला खायला देत होते.

साधारण नऊ दहा महिन्यापर्यंत मुलांचे टेस्ट बड्स डेव्हलप होतात त्यामुळे त्यांना तीच तीच चव बेचव वाटू लागते.

भाजणीचे थालिपीठ किण्वा धिरडे देऊ नकोस कारण त्यात अनेक धान्ये मिक्स असतात शिवाय ते थोडे जास्तच कडक आणि तेलकट असते. हो पण तूपावर बनवलेले एका धान्याचे- ज्वारी आणि एका डाळीचे - शक्यतो मूगडाळ - थालिपिठ किंवा धिरडे दे. सगळ्या भाज्या दे खायला, लगदा करून नाही, व्यवस्थित आपण खातो तशा. जर एखादी चव नाही आवडली तर लगेच हिरमुसून जाऊ नकोस. चार दिवसांनी परत तीच चव रीपिट कर. तेव्हा खाईल कदाचित. आणि मुलांछ्या पुढ्यात काहीही निगेटीव्ह बोलायचं नाही - माझं मूल खातच नाही, माझ्या मुलाला हे आवडतच नाही. .. उलट त्यांना प्रोत्साहन द्यायचं माझ्या बाळाला सगळं काही आवडतं माझें बाळ सगळं काही खातं. बीटाची भाजी खातं - त्यात आयर्न असतं त्यामुळे आपल्या शरीरात रक्त तयार होतं आपण स्ट्राँग होतो. पालकाची भाजी खातं त्यात कॅल्शियम असतं त्यामुळे बोन्स स्ट्राँग होतात. पोळी खाल्याने ताकद मिळते.. इत्यादी इत्यादी..

हो ग दहा महिन्याचा होता तेव्हा. आता तो सव्वापाच वर्षाचा आहे.

आणि एक गोष्ट, जेवायच्या वेळेला सगळी खेळणी, सगळी पुस्तकं उचलून ठेवायची. आधीच सांगून ठेवायचं मात्र. आपण जेवताना - टेबल खुर्चीवर बसून (किंवा तुमची जेवायची जी जागा असेल ती) जेवणार आहोत. जेवण पूर्ण झाल्यानंतरच तिथून उठायचं. जेवताना खेळायला जायचं नाही, मी उठते का? मग तूसुध्हा नाही उठायचं, असं एकाजागी बसून जेवलं की जेवण पोटाला छान छन वाटतं आणि मग आपण स्ट्राँग होतो.

जमल्यास जेवताना जेवण्याच्या खोलीचे दार बंद करून घ्या आणि जेवण्याच्या खोलीत कोणतीही खेळणी ठेवू नका. मुलीला ज्याने खेळायला आवडत तेसुद्धा नाही - म्हणजे ताटल्या - भांडी - चमचे.

तरीसुद्धा ती उठून खेळायला जाऊ शकते. त्यामुळे लहान मुलांची जेवणाची खुर्ची असते, जिथून त्यांना इतरताच येत नाही ती वापरलीत तर बरं पण सांगून - आजपासून तू ह्या खुर्चीत बसून जेवायचं हां कित्ती छान छान आहे ही खुर्ची, वगैरे वगैरे..

लहान मुलांना बिनडोक समजायचा बिनडोकपणा आपण नाही करायचा, ते आपलं बारसं जेवल्याइतके शहाणे असतात. त्यांना सगळं समजतं. सगळं काही सांगून करायचं,. म्हणजे तू आता तिचं जेवण बदल्णार ना, मग सांगायचं, आज पासून तुला पोळी भाजी खायला देणार आहे, जे मी, बाबा, आजी आजोबा खातो ते. तू मोठी होते आहेस ना मग मोठ्यचं जेवण जेवायचं. तोंडातलं जेवण चावून चावून खायचं, झालं का चावून, अरे वा, आता खाऊन टाक ते... चला पुढचा घास, ह घास सुद्धा चावून चावून खायचा, किती वेळा चावतेस चला मोजू या, एक दोन... घास तोंडात धरून ठेवला की दात खराब होतात, आपल्याला तर बुवा छान चान स्ट्राँग दात हवेत. मग मस्त चावून चावून पटकन खाऊन टाकायचा...

हुश्श ....

maza mulga dhirde/poli vagre chaun khato. paan khatana dhavat asato. aji/aai/tyala sambhalnarya baai agadi majja chalu asate...paan khato sagle neet

हवं तर बालगाणी लाव ऐकण्यासाठीपाहाण्यासाठी नाही>>>>>> अग माझ्या मुलासाठी मला भरवताना बालगीते च लावायला लागायचि, कधीहि रात्रि ३ वाजता हि हा सिडि लावायला सांगायचा.

ह्म्म्म्म माझही तेच .. बालगीत लागतात जेवताना....
पण काल सुरुवात केली थोड घट्ट घालायला ..
खुप नाही खाल्ल.. Happy
पण निदान सुरुवात झाली...