Submitted by वैवकु on 12 November, 2013 - 14:38
शारूख आवडत नाही
तो मनास रिझवत नाही
सगळेजण रेडी झाले
सोनमचे उरकत नाही
ती स्पष्टच "भाई" म्हणते
(मी मला दुखावत नाही )
पार्र्टी रंगत नसते ,पण..
पील्यावर उठवत नाही
मी शेर गंडके करतो
लोकांना समजत नाही
ती अश्या मारते बुक्क्या
आरसा पाहवत नाही
बघ 'जितू" देवसर आले
चल....मीपण थांबत नाही !!
______________________
मूळ रचना इथे पहावी ही विनंती ...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डिस्क्लेमर्स : १) जितूची माफी
डिस्क्लेमर्स :
) त्यांच्या सारखे तेच असलेले अतीशय डेंजर गझलकार प्रा. सतीश देवपूरकर ... सीरियसली सांगायचे झाले तर एक ज्येष्ठ आणि तपस्वी (व यशस्वीही )गझल उपासक मायबोलीकरांचे लाडके देवपूरकर सर
१) जितूची माफी मागण्याची औपचारिकता वगैरे पाळण्याची गरज वाटत नाही म्हणून मागत नाही ..सोनमची मात्र अंतःकरणापासून क्षमा... देवपूरकरांची (देवसर) ते मायबोलीवर असताना कधी माफी मागीतली नाही आता कशाला मागायची म्हणून नकोच
२) ज्याना माहीत नाही त्यांच्यासाठी
-देवसर = माझे व जितूचेही अत्यंत आवडते (
- सोनम = रणजीत पराडकर (रसप) यांच्या सौभाग्यवती .
@सोनम ...माझ्या हझलेच्या अट्टाहासापायी तुला बिचारीला नाहक टार्गेट व्हावे लागले त्यासाठी पुन्हापुन्हा सॉरी सोनम ...
३) ह्याच रचनेचे विडंबन करण्याची तीन कारणे आज विडंबनाचा मूड असणे ...आज जितूची गम्मत करण्याचा मूड असणे व एखाद्या उत्तम रचनेचेच विडंबन करावे हा नियम मी पाळत असणे ..ही आहेत बाकी काही नाही
धन्यवाद
मस्त...आम्हालाही मुडमध्ये
मस्त...आम्हालाही मुडमध्ये आणलंत !
सगळेजण रेडी झाले
सोनमचे उरकत नाही
ती स्पष्टच "भाई" म्हणते
(मी मला दुखावत नाही )
पार्र्टी रंगत नसते ,पण..
पील्यावर उठवत नाही >>>
सुरूवातीला मला वाटलं मतल्यात शारूख म्हणून दुसर्या शेरात सोनम कपूर ला आणलंय की काय (क्षमस्व -अगोचरपणाबद्दल !)
तुमच्या प्रायव्हेट कविता
तुमच्या प्रायव्हेट कविता प्रायव्हेटच ठेवा ना. सार्वजनिक कशाला करताय? एक तर काहीतरी कच्चेबच्चे लिहायचे आणि ते सार्वजनिक करायचे.
थोड्या वेळाने अजून
थोड्या वेळाने अजून लिहितोच....!!
सगळेजण रेडी झाले सोनमचे उरकत
सगळेजण रेडी झाले
सोनमचे उरकत नाही
ती स्पष्टच "भाई" म्हणते
(मी मला दुखावत नाही )
पार्र्टी रंगत नसते ,पण..
पील्यावर उठवत नाही
मी शेर गंडके करतो
लोकांना समजत नाही
ती अश्या मारते बुक्क्या
आरसा पाहवत नाही
बघ 'जितू" देवसर आले
चल....मीपण थांबत नाही !!<<<
हा हा हा.... एकटीच हसत सुटलेय
हा हा हा.... एकटीच हसत सुटलेय !
अक्षय विचारतोय काय झालय मॉम ?
वाईईट्ट वाईईट्ट झालय विडंबन वैवकु .
मी शेर गंडके करतो लोकांना
मी शेर गंडके करतो
लोकांना समजत नाही
बघ 'जितू" देवसर आले
चल....मीपण थांबत नाही !!
हे दोन सर्वात मजेदार
खुरसाले, जितू
खुरसाले, जितू ,बेफीजी,सुप्रियातै ,उकाका धन्यवाद सर्वांचे
जाऊदे पाशचे पण आभार !! ....
हे विडंबन खरेच छान झाले मुळात जितूची रचनाच क्लास आहे ती मूळ रचना वाचून मग हे विडंबन वाचले की अधिक उत्तमपणे मजा लक्षात येते मूळ शेराबरोबर एकेक विडंबनाचा शेर शेर मस्त टॅली होतोय अगदी ...
मलाही मजा आली एकदम
पुनश्च धन्स
नवीन वाचकांसाठी ....की अधी जितूच्या रचनेचा एक एक शेर वाचून काढून लगेच विडंबनाचा शेर त्या त्या अनुक्रमाने वाचून पहावा नक्क्कीच खूप मजा येईल आपणास
धन्यवाद
खबरदार माजे आभार मानले तर!!
खबरदार माजे आभार मानले तर!!
मी काय उपकार केल्याले न्हायीत.
<<< पार्र्टी रंगत नसते ,पण..
पील्यावर उठवत नाही
मी शेर गंडके करतो
लोकांना समजत नाही >>>
पार्र्टी .....
हा कुठला नविण शबद काढलाय? 
गंडके करतो ..... असा कुटला वाकपर्चार मराटीत न्हायी. काय अर्थ काय तेचा?
पील्यावर .... अशा शबद्च नस्तो. पिल्यावर म्हना न्हायीतर प्याल्यावर म्हना. पील्यावर
शारुख....... हे काय अस्तं?
सरळ मराटी ल्ह्याय्ला शिका अदोगर मग गझल काय फझल ते ल्ह्या
(No subject)
छान प्रयत्न आहे हजलेचा!
छान प्रयत्न आहे हजलेचा!
पाशशी सहमत आहे मी खर तर
पाशशी सहमत आहे मी खर तर यावेळेला
पील्यावर??? अरेरे ! कसं वाटतं ते ऐकायलाही
बाकीचं सगळं सुट म्हणून समजुनही घेता येतील पण पील्यावर?????????? पुन्हा अरेरे!
आगं माजी बयी -- रिया --
आगं माजी बयी -- रिया -- थान्कू थान्कू.