Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे? ती लग्न न झालेली
म्हणजे? ती लग्न न झालेली मावशी ही श्रीची सख्खी मावशी नाहिच्चे?
दक्षिणा ती सख्खीच मावशी आहे
दक्षिणा ती सख्खीच मावशी आहे श्रीची. नर्मदाची लहान बहिण.
नाही दक्षिणा...ती लग्न न
नाही दक्षिणा...ती लग्न न झालेली मावशी ही श्रीची सख्खी मावशी आहे.
सोमवार दि. ११ नोव्हेंबर २०१३
सोमवार दि. ११ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ आजचा भाग म्हणजे पूर्णतः शरयू स्पेशल होता किंवा आता हळुहळू जान्हवीच्या "सुधारक" ची भूमिका पुढे येत जाणार याचीच चिन्हे उघड करण्याची वेळ आली असावी असे मधुगंधा कुलकर्णी आणि मंदार देवस्थळी यानी ठरविले आहे व त्याची सुरुवात शरयू केसपासून केली आहे. आज सकाळी किचनमध्ये शरयू फोनवर भाजीवाल्याबरोबर भला मोठा संवाद करत आहे आणि जान्हवी बाजूला उभी राहून ते ऐकत आहे. शरयूने जवळपास दहा मिनिटे खाल्ली...कशासाठी तर हिंदीमध्ये भाज्यांचा तपशील ती त्या बागवानाला देत आहे आणि बोलण्यातील तिच्या चुकांकडे पाहून जान्हवी आपले हसू कसेबसे आवरत आहे. दोघीच आहेत किचनमध्ये. इतकी वेळ बोलूनसुद्धा शेवटी शरयू "माझा फोन नसताना मी भाजीवाल्याबरोबर काय बोलत होते...?" असा बालिश प्रश्न जान्हवीला विचारते...तेव्हा ती "तुमचा फोन तुमच्या हातात आहे ना ?" असे सांगितल्यवर शरयूचा पुन्हा तोच विसराळूपणाचा मुद्दा.
नर्मदाबाई आणि इंदूबाई नित्याच्या पद्धतीनुसार घरातील वातावरणावर चेहरे वाकडे करून बोलत आहेत तर तितक्यात मोठमोठ्याने हसत मावशी सरस्वती तिथे येते आणि शरयूने फोनबाबत केलेला गोंधळ प्रथम हास्यापेक्षाही जास्त हसणे करीत सांगते आणि शरयूच्या विसरभोळेपणावर तिघीही खो-खो हसत राहतात. मग त्याही नंतर किचनमध्ये जमतात, तिथे त्याना बेबीआत्याचीही साथ लाभते....त्या अगोदर जान्हवी श्री च्या खोलीत त्याला हा प्रसंग सांगते....तर तिथेही हास्याचे कारंजे फुटतात...एकूण आजचा भाग हा शरयूसाठीच.
सारे घर एकीकडे व मी मात्र दुसरीकडे का ? अशा प्रश्न पडलेल्या शरयूला अचानक रडू कोसळते आणि ती दु:खी मनाने सार्यांच्यातून निघून अन्यत्र जाते, तेव्हा घाईघाईने श्री तिच्या पाठोपाठ जातो. तिला थांबवितो, चेष्टा केल्याबद्दल सर्वांच्यावतीने तो तिची माफी मागतो...पण शरयू आता बांध फुटल्यागत आपल्या विसराळू स्वभावाचा पाढा वाचते आणि मी आता काय करू रे श्री...? असे कोडे घातल्याप्रमाणे श्री ला यालाच अडचणीत आणते....श्री त्यावर काही उत्तर देणार, तोच शरयू म्हणते, 'माझ्या विसराळू स्वभावाला तुम्ही सारे हसत बसला आहात, पण उद्या माझ्या नवर्याचा वाढदिवस आहे, त्याची तुम्हाला एकालातरी आठवण आहे का?" याला श्री कडे अर्थातच उत्तर नसते, उलट हे कसे विसरले यामुळे डोक्याला हात लावतो. बाजूला उभी असलेली जान्हवी हे सारे पाहात असते ऐकत असते. म्हणजेच आता श्री म्हटला आहे की काकांना आपण शुभेच्छा द्यायला जाऊ....त्यावर घाबरलेली शरयू 'नको नको...' म्हणते, त्याला कारण म्हणजे आईआजीचा स्वभाव...तरीही श्री आणि जान्हवी त्यावर उपाय काढतील....आणि अंदाज केल्यानुसार एकेक केसचा गुंता सुटत जाईल.
आज मालिकेतील गोखले घरातील सारी पात्रे कथानकात होती....पण अभिनयाच्याबाबतीत लीना भागवत यानी शरयूच्या कामात अगदी पारितोषिक द्यावे असे सादरीकरण केले....गुणवान अभिनेत्री आहेत लीना भागवत.
मामा हेच वाचायला आले होते.
मामा हेच वाचायला आले होते. लीना भागवत खरंच गुणी अभिनेत्री आहे ती नेहेमीच चांगले काम करते.
हो खरंच तिने मस्त काम केलं
हो खरंच तिने मस्त काम केलं आज.
मला आठवतंय प्रदीप पट्वर्धन बरोबर तिची एक मालिका असायची दुरदर्शनवर. त्यातही आवडली होती.
मी मालिका बघण बंदच केलय आता
मी मालिका बघण बंदच केलय आता (बर्याचदा लींक मिळत नाही म्हणुन) त्यामुळे मामांचे अपडेट्सच वाचते. जास्त काही मिस झाल्यासारख वाटत नाही
अदिती...... नोटेड. ~ तरीही
अदिती...... नोटेड.
~ तरीही किमानपक्षी आज दिवसभरात केव्हाही लीना भागवत यांच्या प्रभावी अभिनयासाठी का होईना, पण तू हा भाग बघावास अशी मी शिफारस करीत आहे. तिच्यासमोर जान्हवी आणि श्री दोघेही फिके पडले होते. जान्हवीला तर बाजूला उभे राहाण्याशिवाय बाकी काही कामच नव्हते.
ते काल उद्या म्हणून दाखवलं
ते काल उद्या म्हणून दाखवलं (जान्हवी पंजाबी ड्रेस घालून खाली उतरत्येय आणि दोन्ही सासवा खाणाखुणा करत आहेत) हे आजच्या भागात दाखवलंच नाही का? की मी मिस केलं?
ओ के मामा बघते. रोज इथे कोणी
ओ के मामा बघते. रोज इथे कोणी लिन्क टाकली तर किती बर होइल
आदीती, कित्ती कित्ती म्हणुन
आदीती, कित्ती कित्ती म्हणुन अपेक्षा ग..... ऐक इथे मागच्या पानांवर काही जणांनी प्रतिसादामध्ये लिंक दिली आहे बघ, मला सापडली तर मी टाकेन हां
अग dailymotion.com वर बघते
अग dailymotion.com वर बघते मी. त्यात सर्च केले की कधी मिळतात लिन्क्स तर कधी नाही. मधे ४/५ वेळा तसे झाले मग बघणंच बन्द झाल माझं
आदिति.. अगं झी वाल्यांची एक
आदिति.. अगं झी वाल्यांची एक लिंक आहे अधिकृत यु ट्युबवर बघ..
इथे उंच माझा झोका या बाफवर होती ती लिंक पहिल्या १-२ पानावर
http://www.desirulez.net/foru
http://www.desirulez.net/forumdisplay.php?f=2139
ithe bagha.. regularly links yetat.
http://www.tvforumonline.com/
http://www.tvforumonline.com/channel.aspx?c=marathi
इथे बघायला मिळतील
aditi, ekda link magitali tar
aditi, ekda link magitali tar kiti jan detahet bagha...
solid fan following aahe HSMHG cha....
अनुमोदन गोगो
अनुमोदन गोगो
हो थॅन्कु थॅन्कु. आज मिळाली
हो थॅन्कु थॅन्कु. आज मिळाली dailymotion.com वर पटकन
चनस मी झी वर बघायचे पण त्यानी बंद केलेले मधे मग apalimarathi वर बघीतल काही दिवस मग ते ही बदं झालं.
जिज्ञासा.... "पंजाबी ड्रेस"
जिज्ञासा....
"पंजाबी ड्रेस" घालून जान्हवी पायर्या उतरते आणि समोर आईआजी आहेत....हा प्रसंग कालच्या भागात नव्हता, तो सारा भाग शरयू भोवतीच फिरत होता....कदाचित आजच्या भागात ड्रेससंदर्भात समोरासमोर येतील त्या दोघी.
बाकी...अदितिला लिंक मिळाली हे वाचून आनंद झाला.
लग्नाआधीचे प्रसंग जास्त
लग्नाआधीचे प्रसंग जास्त वेगवान आणि दर्जेदार वाटायचे.
आजी आधी बर्याच लॉजिकल ,न्यायप्रिय वागायच्या. आजी आणि मोठी काकू यांचे स्वभाव अचानक बदलल्यासारखे वाटतेय .
पुर्वी सोनी वर एक मालिका
पुर्वी सोनी वर एक मालिका लागायची (नाव आठवत नाहीये)
त्यात घरात एकही स्त्री नसते... मग लहान मुलगा लग्न करतो... त्या मुलीचं नाव टोस्टी असतं...
मग ती हळू हळू घरात एक एक स्त्री आणते
त्या मालिकेसारखीच ही वाटतेय मला...
थोडासा बदल... पण कल्पना तिच!
पुर्वी सोनी वर एक मालिका
पुर्वी सोनी वर एक मालिका लागायची (नाव आठवत नाहीये)
त्यात घरात एकही स्त्री नसते... मग लहान मुलगा लग्न करतो... त्या मुलीचं नाव टोस्टी असतं...
>>>> सास बिना ससुराल
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स करेक्ट!
आजी आधी बर्याच लॉजिकल
आजी आधी बर्याच लॉजिकल ,न्यायप्रिय वागायच्या. आजी आणि मोठी काकू यांचे स्वभाव अचानक बदलल्यासारखे वाटतेय .>>>
या असल्या हेकट आजीबद्दल कोणाला खरच प्रेम वाटत असेल का? का निव्वळ आदर आणि भीती. का स्वतः काही करायची धमक नाही म्हणून आजीच्या आधारावर विसंबून रहायचे?
मला तर वाटते की शरयूच्या विसरळूपणाला (खरतर या आजाराला) आजीच कारणीभूत आहे.
हेकट आजी ! बरोबर नताशा.....
हेकट आजी ! बरोबर नताशा..... आणि सुशिक्षित, गोखले गृह उद्योगाची पहिल्या पायरीपासून सुरुवात करून त्याला पूर्ण बहरलेल्या इमारतीचे रुप देणारी ही बाई म्हणून यांचा बोलबाला झालेला....तर अशी ही आजीबाई आपल्या एकुलत्या एक आणि जीवापल्याड प्रेम असलेल्या नातवाच्या लग्नादिवशीच घर सोडून म्हणे एकांतात जाते ! का ? तर नातसून पसंत नाही म्हणून ! प्रत्यक्ष आयुष्यात अशी मी अनेक लग्ने पाहिली आहेत, जिथे मुलगा पसंत असतो तर मुलगी नसते, तर काही ठिकाणी मुलगी पसंत तर मुलगा नसतो, असे असूनसुद्ध कोणत्याच घरातील ज्येष्ठ मंडळी लग्नाच्या दिवशीच घर सोडत नाही....काही रीतिरिवाज पाळावे लागतातच...कथानक आहे तसे म्हणून कातडीबचाव धोरण स्वीकारता येणार नाही.
छे, कसला पोरखेळ करू शकतात या आजी ? ज्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिन तो....ज्याने यशस्वी प्रेम करून जवळपास जिंकून आणलेल्या मुलीला घरी आणले आहे पत्नी म्हणून, त्याला काही सुख देण्याचा विचार येत नाही या बाईच्या मनी....की उचलली बॅग आणि चालली बाहेर....? आणि बाहेर बाहेर तरी कुठे तर २०-२५ किमी. अंतरावर असलेल्या एका उपनगरातील बंगलीत....जिथून घरी आणायला नातवाला काहीच वेळ लागत नाही. कसली ही विरक्ती आणि कसले ते संसारापासून दूर जाणे....सारा पोरखेळच होता तो कथानकातील भाग....
मला वाटते इतक्या सुंदर मालिकेची घसरण या विरक्ती प्रकरण + एकांत प्रकरणामुळेच सुरू झाली आहे.
मला वाटते इतक्या सुंदर
मला वाटते इतक्या सुंदर मालिकेची घसरण या विरक्ती प्रकरण + एकांत प्रकरणामुळेच सुरू झाली आहे.>>> येस मामा.
अशोक मामा प्रचंड अनुमोदन
अशोक मामा प्रचंड अनुमोदन तुमच्या पोस्टिला.
मामा अनुमोदन. लिना भागवतने
मामा अनुमोदन.
लिना भागवतने खूप छान काम केले कालच्या भागात. तिचं रडू खरं वाटलं मला अगदी.
बहुतेक रोहिणी हट्टंगडी
बहुतेक रोहिणी हट्टंगडी सुट्टीवर जाणार असाव्यात किंवा तारखा नसतील म्हणून हा प्रपंच केला असावा.
मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०१३
मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ काल अंदाज व्यक्त केल्यानुसार देवस्थळी यानी आजही ते "शरयू प्रकरण" पुढे चालू ठेवल्याचे दाखविले आणि आजचा भाग अन्य काही नसून केवळ शरयू कथा. सुरुवातीलाच काल ज्या ठिकाणी प्रकरण थांबले होते तिथेच श्री जान्हवी आणि शरयू आहेत आणि परत तिच कथा पुन्हा पुन्हा उगाळत बसलेली आहेत तिघेही. शेवटी श्री आणि जान्हवी शरयूला घेऊन स्वयंपाकघराकडे येतात.इथे अन्य चार सासवा "शरयूला आपण दिलेला त्रास योग्य होता की नाही..." हा जणू आंतरराष्ट्रीय स्तरावरील गंभीर प्रश्न मांडून त्यावर परत तेच मुद्दे उगाळत आहेत. त्यातच बेबीआत्याचे नित्यचे जान्हवीला पिडा देणे हा कंगोरा आहेच. "श्री शरयूला समजावयाला गेला आहे हे ठीक, पण हिनेही त्याच्या मागोमाग कशाला जायला हवे होते ?" असली काहीतरी बिनपाण्याची करण्याची बेबीआत्याची सवय काही जायला तयार नाही. वाईट याचेच की गेले काही दिवस श्री ची आई, म्हणजे जान्हवीची सासू तिच्यावर खूप माया करू लागली आहे; मग अशावेळी जर तिसरी व्यक्ती हकनाक आपल्या सूनेला तिच्या माघारी काही अपशब्द वापरत असेल तर नर्मदाबाईनी तात्काळ त्यात हस्तक्षेप करणे योग्य दिसले असते....पण त्याही ते बोलणे ऐकत, हवा गेलेल्या रंगहिन फुग्यागत चेहरा करून उभ्या राहतात.
शरयू येते....आणि उलट याच सर्वांना परत "तुम्ही माझ्याकडे असे का बघत आहात ? माझे काही चुकले आहे काय ?" असले बालिश प्रश्न विचारून इतरांना हायसे वाटेल असेच वर्तन करते. रात्री श्री लॅपटॉपवर काम करीत असताना जान्हवी त्याच्यासमोर शरयूचे प्रकरण नेमके काय होते वा आहे ? ही बाब श्री ला विचारते. सुरुवातीला श्री जास्त काही सांगत नाही, पण जान्हवी त्याला हे प्रकरण मला समजणे फार गरजेचे आहे असे म्हटल्यावर तो शरयू आणि आपल्या काकाचे लग्नापासूनचे सारे किस्से ऐकवितो. काकाना किती प्रकारची वाईट व्यसने होती....आईने उद्योगात मिळविलेले धन आणि अन्य इस्टेट काकाने व्यसनापोटी कशी गमावली; मग लग्नानंतर शरयूला अगदी पहिल्या दिवसापासून दिलेला त्रास....आजीने सूनेची केलेली पाठराखण, प्रसंगी पोलिसांना बोलावून आपल्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिलेली घटना....सावकार मुलाच्या मागे लागल्यावर त्या सावकारांची देणी भागविणे....आणि सरतेशेवटी अती झाल्यावर सूनेला आपली मुलगी मानून तिला बंगल्यावर ठेवून पोराला कायमचे बाहेर काढणे....हा सारा इतिहास ऐकल्यावर जान्हवीच्या मनी आजीविषयी आदर निर्माण होतो.
रात्री सार्या आपापल्या खोल्यात असताना हळूच शरयू किचनमध्ये येते....ती चांगलीच नटली आहे...आणि ओव्हेनमधून केक काढते...एका बॉक्समध्ये पॅक करते आणि पिशवीत ठेवून सावकाश शांतपणे बंगल्याच्या बाहेर पडते. थोड्यावेळाने दुसर्या दिवसाच्या जेवणासाठी काही पदार्थ भिजत ठेवण्यासाठी नर्मदाबाई आणि बेबीआत्या किचनमध्ये येतात....त्यावेळी बेबीआत्याला मुख्य दरवाजाची कडी काढलेली दिसते....विसरली असेल लावायची म्हणून ती जाऊन कडी पुन्हा बसविते आणि या सासवा तिथून निघून जातात. मध्यरात्र ओलांडल्यावर शरयू परत गुपचूपपणे बंगल्याच्या गेटमधून आत प्रवेश करते. तिला माहीत असते की मुख्य दरवाजा बंद नसणार. उघडायला गेल्यावर तिला समजून येते की आतून कडी लावली गेली आहे. आत जायला तर दुसरा मार्गच नसतो...ती कासाविस होते, रडू लागते....आणि शेवटचा उपाय म्हणून जान्हवीला मोबाईल करते...तिच्या सुदैवाने जान्हवी उठते आणि फोन घेते. फोनवर शरयू सारे तिला सांगते आणि "प्लीज खाली ये आणि दरवाजाची कडी काढ..." अशी विनंती करते. तिचा रडवा आवाज ऐकून जान्हवी हळूच श्री ला समजणार नाही इतक्या शांतपणे तिथून खाली येते....आणि शरयूला आत घेते.
उद्या...शरयू तिला बाहेर नेमके काय झाले हे सांगणार आहे असे दिसते.
Pages