खगोलशास्त्रीय सटरफटर

Submitted by aschig on 9 July, 2010 - 00:50

फार खोलात न शिरता इथे खगोलशात्राशी संबंधीत काही त्रोटक factoids (सद्य आकलनानुसार) नियमीतपणे टाकायचा विचार आहे.

(१) विश्वाच्या मालमत्तेपासुन सुरुवात करु या: विश्वात पसरलेल्या दिर्घीका, त्यांचा व्याप व विश्वावे आकारमान वाढण्याचा वेग पहाता असे लक्षात येते की ५% पेक्षा कमी मालमत्ता दृष्य वस्तुमानात आहे (म्हणजे तुम्ही-आम्ही, ग्रह, तारे ई. थोडक्यात बॅरीऑन या प्रकारात मोडणारे कण - Baryonic matter). त्याच्या ५ पट वस्तुमान अदृष्य स्वरुपात (dark matter) असते, तर तब्बल 3/4 पसारा अदृष्य उर्जेच्या स्वरुपात असतो (dark energy). [८ जुलै २०१०]

(२) विश्वात किती अणु आहेत ते पाहुया: ज्ञात विश्वात ~१०^११ दिर्घीका आहेत (galaxies). प्रत्येक दिर्घीकेत ~१०^११ तारे आहेत. प्रत्येक तार्याचे सरासरी वजन १०^३१ किलोग्राम आहे. सुर्यमालेतील बहुतांश वजन तार्यात असतं. तारे (किंवा पुर्ण विश्वच) मुख्यतः हायड्रोजन चे बनले आहे (आणि हिलीयम, पण आपल्या या गणिताकरता त्यांच्यात फार फरक नाही). एक ग्रॅम हायड्रोजन मध्ये १०^२४ अणु असतात (अव्होगॅड्रो नंबर). विश्वातील एकुण अणु:
१०^११ * १०^११ * १०^३१ * १०^३ * १०^२४ = १०^८० (फक्त!?) [१० जुलै २०१०]

(३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते. पण वस्तुमानाची मर्यादा मात्र नसते. उदा. दिर्घिकांच्या मध्यभागी असलेली कृष्णविवरे ही सुर्याच्या वस्तुमानाच्या १०^५, १०^६ वगैरे पटींची देखील असु शकतात. हळुहळु इतर वस्तु(मान) गिळंकृत करुन ती वाढत जातात. त्याउलट क्वांटम कृष्णविवरे इतकी छोटी असतात की आपल्या शरीराच्या आरपार जातील पण आपल्याला जाणवणार देखील नाही. त्यांचे बाष्पीभवन होऊन ती नष्ट देखील होऊ शकतात. [१२ जुलै २०१०]

(४) विश्वात ४ शक्ती/बल (forces) कार्यरत असतात. (अ) weak force - याचा अवाका केवळ १०^-१८ मि. येवढा. नावाप्रमाणे तसा दुर्बळ. किरणोत्साराला हा कारणीभूत असतो. (ब) strong force - याच्यामुळे अणुंगर्भामधील कण बनु शकतात. अवाका १०^-१५ (क) विद्युतचुंबकीय - जर विद्युतभारीत वस्तु असेल तर हे बल जाणवते - कितीही अंतरापर्यंत (अर्थात अंतर वाढते तसे बल कमी जाणवते) (ड) गुरुत्वाकर्षण - तसा हा सर्वात कुचकामी, पण कितीही अंतरापर्यंत कार्यरत असतो. आणि केवळ वस्तुमानावर अवलंबुन असल्याने, जसएजसे वस्तुमान वाढते (उदा. दिर्घीका) तसा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. [१६ जुलै २०१०]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थ डे निमित्त गुगलवर आज एक चलचित्र आहे: google.com

त्यात गुगलला न साजेशा चुका आहेत (खगोलशास्त्राच्या दृष्टीने). अनेक बालपुस्त्कांमधे याच चुका असतात. कोणी ओळखायचा प्रयत्न करणार का?

आशिष, एक चूक मला दिसली - चंद्र जेव्हा पूर्ण गोल असतो तेव्हाच सूर्य मावळल्यानंतर उगवतो. एरव्ही सूर्य व चंद्र आकाशात एकाच वेळेस बराच काळ असतात.
(बाय द वे - ही चूक बॉलीवूडवाले, कवी ई. ही नेहमी करतात Proud )

सावल्या दिसत नाहीत, संध्याकाळी पाखरं झाडांकडे परतायला हवीत ती उलट झाडांवरून उडताना दिसत आहेत.

पृथ्वी सपाट दाखवल्यासारखी वाटतेय त्यामधे. पाणी अगदी सरळ वाहत जाऊन खाली पडतंय. शिवाय चंद्र इकडून तिकडे जाताना त्याच्या आजूबाजूला तारे दिसत राहतात (चंद्रकोरीच्या आजूबाजूला अख्खा चंद्र असणार, मग त्याच्या पाठचे तारे कसे दिसणार?)

> शिवाय चंद्र इकडून तिकडे जाताना त्याच्या आजूबाजूला तारे दिसत राहतात (चंद्रकोरीच्या आजूबाजूला अख्खा चंद्र असणार, मग त्याच्या पाठचे तारे कसे दिसणार?)

आजुबाजुचे तारे दिसु शकतात, पण चंद्रापलीकडे असलेले दिसायला नकोत. गुगलच्या चलचित्राप्रमाणेच अनेक इतर चित्रांमधेही ती चूक दिसते.

http://www.accuweather.com/en/features/trend/dazzling-northern-lights-an...
आज उत्तरेतून अरोरा (नॉर्दर्न लाईट्स) दिसायची शक्यता ...
>>>
याला अरे, हे पाहिलंच नव्हतं.. याला आठवडा उलटून गेला, पण कोणाला दिसले का ऑरोरे? आम्ही गेलो होतो बघायला.. आम्हाला कुठे काही दिसलं नाही Sad
तरी आम्ही त्या चांगलं दिसण्याच्या पट्ट्यात होतो म्हणे.. लाल आणि पिवळ्या रेघांच्या मध्ये.

बरोबर... चंद्र पूर्ण गोल असायला हवा होता आणि कोर दाखवताना उरलेला काळोखा भाग गायब करता कामा नये. पण ह्या चुका बहुतेक सगळेजण करतात. माझ्या मित्राने त्याच्या मुलीला चंद्र दिसला की रात्र होते असं शिकवलं होतं Sad

आजुबाजुचे तारे दिसु शकतात, पण चंद्रापलीकडे असलेले दिसायला नकोत>> हो तेच म्हणायचे होते. चंद्र ट्रान्स्परंट नसतो Happy

Noodling Google’s Doodle
- The phase of the moon is shown the wrong way.
- The phases are out of order.
- The stars don’t move.
- The dark part of the moon is transparent.
- The rising and setting sun (and moon) speed up.

अस्चिग
पहिले तुझे आभार अशी छान आर्टिकल्स शेअर करतोस म्ह्णणुन.
तु दिलेल्या आर्टिकल मध्ये इथे वाचले
", he reasons, the light they emitted then would, in keeping with the laws of quantum mechanics, have been less energetic than the light they emit now. Since less energetic light has a longer wavelength, astronomers looking at it today would perceive it to be redshifted."

मला पण तार्यांचे अंतर ओळखण्याची ही पद्धत कधीच पुरेशी पटली नाही. तु मागे मला थोडी एक्स्प्लेन केलीस तरी (सॉरी)

१) विश्वात किती प्रमाणात काय घटक आहेत याचा अंदाज आपण बांधतो आपली सुर्यमालिका पाहुन.
२) नंतर तेच घटक इतर तार्यातुन किरण सोडतायत समजुन आपण त्याची रेड्शिफ्ट शोधतो. आपल्याला माहित नाही
अ) हे घटक तेच आहेत.
ब) हे किरण कोणत्याही लेन्सिंग इफेक्ट मधुन गेले नाहित
क) वर वाचले त्याप्रमाणे या घटकांच्या अणुंचे वस्तुमान एकच आहे का नाही?
ड) आपल्याला तर हे पण माहित नाही की बिलियन प्रकाशवर्षानंतर विश्वात ३ स्पेशल दिशा आहेत का ४

यामुळे या काही सिद्धांतावर, थोडेफार अंदाज बांधणे ठीक पण हाच पाया वापरुन जेंव्हा दुरवरच्या गोष्टी प्रेडिक्ट करतो तेंव्हा त्यातला फोलपणा कोणाला कधी जाणवत नाही का?

मध्ये एक पुस्तक वाचले त्यात चंद्रा लॅबमध्ये मिळालेले मायक्रोवेव्ह आणि काही वैश्विक कण वापरुन. स्पेस टाइम शेप. दुरवर आकाशगंगामध्ये असलेली डार्क मॅटरचे पर्सन्टेज वगैरे मोजले होते.

आपण हे सर्व करायचे थांबवावे असे मला वाटत नाही पण आइन्स्टाइनने ज्या प्रकारे मुलभुत संकल्पनाचा
विचार केला तसे करणारे फिजिसिस्ट आजकाल दिसत नाहित. याविरुद्ध सर्व फिजिसिस्ट एका राजमार्गावरुन चालले आहेत आणि याच्या बाहेरची वाट उपेक्षित (unfunded and scorned) आहे असे काहिसे वाटते.

यावर असे पण म्हटले जाते की या थियरींना विश्वातील घटना एक्स्प्लेन कराव्या लागतात. पण इथेच तर प्रश्ण आहे. जर आपण पृथ्वी एक शिंपला आहोत आणि आप्ल्याकडे एक वाळुचा कण आहे तर यावरुन फार तर समुद्र्किनार्याच्या वाळुचा आपण अंदाज बांधु शकतो पण त्यावरुन शार्कची शरिररचना कशी ओळखणार. मला वाटते की सर्व शास्त्रज्ञानी एकत्र बसुन एकदा आपल्याला काय कधीच नक्की कळु शकणार नाही हे निश्चित केले पाहिजे. म्ह्णणजे काय कळु शकते तिथे प्रथम जास्त शक्ति घालवता येइल.

आजही अनेक विचारवंत मूळ प्रक्रियांबद्दल संशोधन (थिअरॉटीकल) करताहेत.

टायर्ड लाईटची संकल्पना पण पहिल्यांदाच नाही मांडण्यात आलेली. नारळीकर आणि सहकार्‍यांनी थोड्या वेगळ्या स्वरूपात अनेक वर्षांपुर्वी तशीच एक मांडली होती. अजुनही अशा थेअर्‍या येत राहणार कारण त्या १००% निकालात नाही निघालेल्या.

पण दूरवरील दिर्घिकांमधे काय आहे हे सांगणारे आपले विज्ञान ठोस पुराव्यांवर आधारीत आहे, सध्याच्या सर्वोत्तम. त्यात बदल कदाचित होतीलही ...
पण तपासून पाहता येतील अशी भाकितं करता येणं हे चांगल्या, nay, अ‍ॅक्सेप्टेबल थेअरीचे आवश्यक लक्षण आहे.

चंद्रादी दुर्बिणींना डेटा मिळवण्याची परवानगी पण ठोस थेअरी असल्याशिवाय मिळत नाही.
विचार, भाकीत, डेटा, तपास, विचार ... हे अविरत चालणारे चक्र म्हणजेच विज्ञान नाही का?

उत्तरा बद्दल थॅन्क्स अस्चिग. आणि वरील त्रागाबद्दल क्षमस्व.
हॉवेल यांचा स्थिर स्थिती सिद्धांत आणि नारळीकरांची अ‍ॅडिशन ऐकुन होते पण टायर्ड लाईटची संकल्पना माहित नव्हती.
वाचुन पाहेन.
>>

विचार, भाकीत, डेटा, तपास, विचार ... हे अविरत चालणारे चक्र म्हणजेच विज्ञान नाही का?

>> एकदम मान्य पण डार्क मॅटर, डार्क एनर्जी , अ‍ॅन्टी मॅटर पार्टिकल्स भरपुर असलेले विश्व याबद्दल आजकाल खुपच वाचायला मिळते आणि लिखाण पण असे असते जसे कोणी तिथे राहुनच आले आहे.
यामुळे मधला बराचसा भाग अनप्रुव्हन ठेउन आपण खुप पुढे जातोय असे कधी कधी वाटते, अर्थात माझीच अल्प मती असेल!

अजुन एक प्रश्ण दुरवर असलेल्या २ गॅलक्सी एकमेकांकढे ओढल्या जात आहेत हे कसे कळते. म्हणजे त्या
गिव्ह अ‍ॅन्ड टेक एरर एकमेकांपासुन काही १०० मिलियन प्रकाशवर्षे मागे-पुढे सहज असु शकतात.
आपल्य आयुष्यात हे अंतर कापलेले कसे काय कळते. हे सॅन्डियागोहुन फ्लोरिडात मियामीतला कुत्रा सरळ रेषेत ऑर्लअ‍ॅन्डोच्या कुत्राकडे धावतोय असे काहिसे वर्तवण्यासारखे आहे.

> हे सॅन्डियागोहुन फ्लोरिडात मियामीतला कुत्रा सरळ रेषेत ऑर्लअ‍ॅन्डोच्या कुत्राकडे धावतोय असे काहिसे वर्तवण्यासारखे आहे.

इतकही काही वाईट नाही. Anology च वापरायची झाल्यास मायामीत लावलेल्या कॅमेर्‍यात तिथल्या कुत्र्याची दिशा (vector) दिसते आहे, आणि ओरलॅण्डोत लवलेल्या कॅमेर्‍यात तिथल्या. लोकली पृथ्वी सपाट आहे असे समजून ते एकमेकांकडे जाताहेत की नाही हे त्यावरून सांगणे सहज शक्य आहे (सॅन डिअ‍ॅगोत बसून). ते एकमेकांकडे आकर्षीत झाले आहेत का हे सांगणे वेगळे. जास्त कुत्रे (आय मीन गॅलॅक्सीज) च्या बाबत मात्र असे भाकीत करणे शक्य आहे - मीन रिसेशन व्हेलॉसिटी, आणि त्याउपर इतरांच्या व्हेलॉसिटीजचे डिस्परशन वगैरे.

Pages