खगोलशास्त्रीय सटरफटर

Submitted by aschig on 9 July, 2010 - 00:50

फार खोलात न शिरता इथे खगोलशात्राशी संबंधीत काही त्रोटक factoids (सद्य आकलनानुसार) नियमीतपणे टाकायचा विचार आहे.

(१) विश्वाच्या मालमत्तेपासुन सुरुवात करु या: विश्वात पसरलेल्या दिर्घीका, त्यांचा व्याप व विश्वावे आकारमान वाढण्याचा वेग पहाता असे लक्षात येते की ५% पेक्षा कमी मालमत्ता दृष्य वस्तुमानात आहे (म्हणजे तुम्ही-आम्ही, ग्रह, तारे ई. थोडक्यात बॅरीऑन या प्रकारात मोडणारे कण - Baryonic matter). त्याच्या ५ पट वस्तुमान अदृष्य स्वरुपात (dark matter) असते, तर तब्बल 3/4 पसारा अदृष्य उर्जेच्या स्वरुपात असतो (dark energy). [८ जुलै २०१०]

(२) विश्वात किती अणु आहेत ते पाहुया: ज्ञात विश्वात ~१०^११ दिर्घीका आहेत (galaxies). प्रत्येक दिर्घीकेत ~१०^११ तारे आहेत. प्रत्येक तार्याचे सरासरी वजन १०^३१ किलोग्राम आहे. सुर्यमालेतील बहुतांश वजन तार्यात असतं. तारे (किंवा पुर्ण विश्वच) मुख्यतः हायड्रोजन चे बनले आहे (आणि हिलीयम, पण आपल्या या गणिताकरता त्यांच्यात फार फरक नाही). एक ग्रॅम हायड्रोजन मध्ये १०^२४ अणु असतात (अव्होगॅड्रो नंबर). विश्वातील एकुण अणु:
१०^११ * १०^११ * १०^३१ * १०^३ * १०^२४ = १०^८० (फक्त!?) [१० जुलै २०१०]

(३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते. पण वस्तुमानाची मर्यादा मात्र नसते. उदा. दिर्घिकांच्या मध्यभागी असलेली कृष्णविवरे ही सुर्याच्या वस्तुमानाच्या १०^५, १०^६ वगैरे पटींची देखील असु शकतात. हळुहळु इतर वस्तु(मान) गिळंकृत करुन ती वाढत जातात. त्याउलट क्वांटम कृष्णविवरे इतकी छोटी असतात की आपल्या शरीराच्या आरपार जातील पण आपल्याला जाणवणार देखील नाही. त्यांचे बाष्पीभवन होऊन ती नष्ट देखील होऊ शकतात. [१२ जुलै २०१०]

(४) विश्वात ४ शक्ती/बल (forces) कार्यरत असतात. (अ) weak force - याचा अवाका केवळ १०^-१८ मि. येवढा. नावाप्रमाणे तसा दुर्बळ. किरणोत्साराला हा कारणीभूत असतो. (ब) strong force - याच्यामुळे अणुंगर्भामधील कण बनु शकतात. अवाका १०^-१५ (क) विद्युतचुंबकीय - जर विद्युतभारीत वस्तु असेल तर हे बल जाणवते - कितीही अंतरापर्यंत (अर्थात अंतर वाढते तसे बल कमी जाणवते) (ड) गुरुत्वाकर्षण - तसा हा सर्वात कुचकामी, पण कितीही अंतरापर्यंत कार्यरत असतो. आणि केवळ वस्तुमानावर अवलंबुन असल्याने, जसएजसे वस्तुमान वाढते (उदा. दिर्घीका) तसा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. [१६ जुलै २०१०]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून सिद्ध झालं नाही का? मध्यंतरी कुठलासा आर्टिकल वाचला त्यात सिद्ध झालय असं वाचल्याचं आठवतं. असो...
छान आर्टिकल आहे आस्चिग. हे वाक्य फारच जबरी वाटले.
John Learned, a neutrino astronomer at the University of Hawaii, said that if the results of the Opera researchers turned out to be true, it could be the first hint that neutrinos can take a shortcut through space, through extra dimensions. Joe Lykken of Fermilab said, “Special relativity only holds in flat space, so if there is a warped fifth dimension, it is possible that on other slices of it, the speed of light is different.”

हे खरं निघालं तर एकदम नवीन विश्वाचे दार उघडल्यासारखं होईल.

या संबंधी एका सायन्स फिक्शनमधे वाचले की जर एखादे यान प्रकाशापेक्षा जास्त वेगाने जात असेल तर त्यावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव उलटा पडतो. मॅग्नेट कधी आकर्षून घेते, कधी दूर लोटते, पण गुरुत्वाकर्षण हे नेहेमी आकर्षणच करते. तरी प्रकाशापेक्षा जास्त वेगाचे यान जर एखाद्या प्रचंड मोठ्या ग्रहाकडे जाऊ लागले तर आकर्षण होण्या ऐवजी ते दूरच जाईल!!
विग्यानका कमाल!!

माधव | 17 October, 2011 - 04:53
आशिष, प्रकाशाचा वेग हा सृष्टीतला महत्तम वेग नाही असा दावा केला जातोय. त्याचा कसा परीणाम होणार आहे बाकीच्या सिध्दांतांवर?

>>
वॉव बोट्झमनचे समीकरण आणि त्यातली न्युट्रीनोची कायनेटिक उर्जा ही विश्वप्रसारण अ‍ॅक्सलरेट व्हायला
कारणीभुत आहे असे ऐकुन होते. पण न्युट्रीनोचे मास झीरो असते. जर ते प्रकाशाहुन फास्ट जात असतील तर कदाचित वेगळ्या प्रतलात त्यांना मास आणि वेग पण असेल?

एका आठवड्यात किती नविन गोष्टी शोधल्या जाताहेत.
http://www.sciencefriday.com/program/archives/201111043
म्हणजे इलेक्ट्रो मॅगनेटिक फोर्स विश्वात वेगवेगळ्या जागी बदलतो.

हल्लीच न्युट्रीनो लाइट्पेक्षा फास्ट जात असतील हे ऐकले होते.

सध्या दर बुधवारी ब्रायन ग्रीनची नवी डॉक्युमेंटरी PBS (नोव्हा) वर प्रसारीत होते आहे. उद्या दूसरा भाग आहे (४ पैकी). लोकल लिस्टींग्स शोधा आणि जरूर पहा.

परवाच एक documentary पाहिली. त्यानुसार आता परग्रहावरील जीव शोधायच्या ऐवजी परग्रहावर जीव म्हणून कसे रहाता येइल याचा शोध सुरु झाला आहे.
याकरता दोन गोष्टींचे संशोधन मुख्यत्त्वे करून - १. प्रकाशापेक्षा वेगाने जाण्याचा मार्ग शोधणे. २. आपल्या सूर्यमालिकेत पृथ्वी जशी सूर्यापासून बरोबर अंतरावर आहे ( ज्यामूळे पाणी आणि जीवन शक्य झालेय) तसाच एखादा ग्रह बाहेरील सूर्यमालिकेत शोधणे..
तसा एक ग्रह मिळाला पण आहे म्हणा, पण सध्या माहीत असलेल्या प्रवास तंत्रज्ञानानुसार तिथे पोचायला हजारो वर्ष लागतील...

प्रकाशापेक्षा वेगाने जाण्याचे तंत्रज्ञान मिळाले तरी खरा प्रवास घडेपर्यंत खूप वेळ लागू शकतो.. म्हणून time-space मधे असलेली worm-holes शोधायचाही प्रयत्न जोर पकडू लागला आहे.. worm-hole म्हणजे, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्याचा shortcut!

>> (३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते.

माझ्या माहितीप्रमाणे , साधारणपणे सूर्याच्या १.६ पट व त्याहून जास्त वस्तुमानाच्याच (चंद्रशेखर लिमिट ) ताऱ्याचे पल्सर ताऱ्यात रुपांतर होऊन शेवटी कृष्णविवर म्हणजेच black hole मध्ये रुपांतर होते आणि त्याखालील वस्तुमानाचे तारे सुपारनोवात रुपांतर होऊन अतिप्रचंड अशे nuetron star मध्ये रुपांतर होते . त्यामुळे तुमचा तिसरा पोईंट थोडासा चुकीचा वाटतो .

सुलु, वर्महोल्सवर जे काही संशोधन सुरु आहे ते मुख्यत्वे थिअरेटीकल आहे. वर्महोल्स असतात का, असल्यास त्यांच्या प्रॉपर्टीज कोणत्या कॉस्मॉलॉगीप्रमणे कशा असतात हे ही नक्की नाही. प्रकाशापेक्षा अधीक वेगाने जाता येईल का हे ही नक्की नाही. न्युट्रीनोज बद्दलच्या इतक्यातीलच केल्या गेलेल्या दाव्यावर सर्व शास्त्रज्ञांची काकदृष्टी आहे. त्या डॉक्युमेंटरीचे नाव, पत्ता देणार का? किंचीत वाटचुकवु वाटते आहे.

सुलु म्हणतायत तसा एक लेख लेटेस्ट 'डिस्कवर' मॅगेझिनमध्येही आहे.

ते सायन्स चॅनेलवरच्या 'थ्रू द वर्महोल' मध्ये बघायला होते काय काय इन्टरेस्टींग, पण काहीतरी अंदाजपंचे धागोदरसे आहे असे वाटायचे. Proud

warm-holes आणि Time Travel चा महत्त्वाचा शत्रू आहे 'विरोधाभास'..(Paradox).. एखादे उदाहरण द्यायचे झाले तर, भूतकाळात जाणारे असे warm-hole मिळाले समजा, आणि एखाद्याने भूतकाळात जाऊन स्वतःचाच खून केला तर विरोधाभास (Paradox) निर्माण होईल. हॉकीन्स यांच्या म्हणण्यानुसार, भूतकाळात Time Travel शक्य नाही पण भविष्यकाळात शक्य होऊ शकतो..

अजून एक मुद्दा मांडला गेला की, मूळात विश्व तयार झाले ते Big Bang मुळे पण Big Bang घडविणारी dark energy/matter अजून कळले नाहीये. ते जर का कळले तर विश्वाची बरीच समीकरणं सोडावयास मोठी मदत होणार आहे..

हॉकीन्स यांच्या म्हणण्यानुसार, भूतकाळात Time Travel शक्य नाही पण भविष्यकाळात शक्य होऊ शकतो..
>> मी हे ऐकले आहे पण समजा भविष्यकाळात तुम्ही गेलात आणि भविष्यातल्या तुम्ही तुमचा खुन केला
तरी विरोधाभास (Paradox) निर्माण होईल.

वर्म होल्स, टाईम ट्रायव्हल वगैरे स्पेक्युलेटीव्ह प्रकार आहेत (सध्या). खगोलशास्त्रात प्रयोगशाळा हाताशी नसल्याने ते अंग आवश्यकही आहे. दुर्दैवाने बहुतांशांना त्याचेच जास्त आकर्षण असते.

@aschig, खरे आहे तुम्ही म्हणता ते! आईन्स्टाईन म्हणत असे, 'माझी प्रयोगशाळा माझ्या खिशात आहे' ( all he used to need was a pen n paper)..

काही मिनीटांनी लाईव्ह्कास्ट सुरु होत आहे ...

Asteroid Flyby & APEC

Nov. 8 - TONIGHT the Keck II telescope will be put to work catching near infrared images of asteroid YU55 as it whizzes past Earth. The observing run will be webcast live on UStream from the Keck II Remote Operations room in Kamuela, Hawaii, starting no later than 7 pm local time (9 pm U.S. PST / 0500 UT).

At the helm of the 10-meter Keck II telescope and using Keck’s pioneering adaptive optics to view YU55 will be asteroid investigators William Merline and Peter Tamblyn of Southwest Research Institute, Boulder, Colo.; and Chris Neyman of Keck Observatory.

The live webcast is being produced in cooperation with Keck Observatory, The Astronomical League and The Planetary Society and will be available via the following links:

http://keckobservatory.org/news_preview/live_webcast_keck_telescope_to_w... http://planetary.org
http://www.astroleague.org/KeckYu55
http://news.discovery.com/space/keck-live-asteroid-2005yu55-111108.html (going live at 5 pm PST)

निबिरु मधे काही अर्थ नाही. तसे काही असते तर इतर प्रकारे कळले असते. कॉन्स्पीरसी थिअरी वाल्यांचे म्हणणे खरे असते तर मागच्याच वर्षी त्याचा प्रभाव दिसला असता. ही एक लिंक बघा: http://news.discovery.com/space/david-morrison-nibiru-2012.html

नासाने aschig ला निबरु वरुन लोकांचे दुसर्या सटरफटर गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी नेमले आहे.
तुम्ही चुकीच्या माणसाला विचारलेत Happy

निबरु आणि २०१२ च्या संदर्भातला गोंधल मला असिमोव्ह च्या नाईट्फॉल ची आठवण करून देतो..

आशिष, दुसर्‍या दुव्यात दिल्याप्रमाणे न्यूट्रिनोपासून e आणि P बनणे म्हणजे उर्जेचे वस्तुमानात रुपांतर का? कारण माझ्या माहितीप्रमाणे न्यूट्रिनोंना वस्तुमान नसते आणि तयार होणार्‍या इलेक्ट्रॉनला नगण्य का होईना पण वस्तुमान असते. प्रोटॉनला तर भक्कम वस्तुमान असते.

मज्जा न! अशा ग्रहांची संख्या वाढतच जाणार. फक्त हॅबिटेबल झोन मधे असणे अर्थात मानवाकरता पुरेसे नाही, पण जिवनाकरता असणार.

सध्या गॉन व्हायरल असलेले हे चित्र अतिशय वास्तवीक आहे.
कुणा Rachel Wagner-Kaiser आणि Tahlia ने बनवलेले.

astronomer.jpg

सगळ्यांना हॅपी संत व्हॅलेन्टाईन दिवस

मला एक प्रश्न विचारायचा आहे.खरे म्हणजे इथल्या बाकी गोष्टी बघता असे काही विचारायची लाज वाटायला हवी,तरी विचारते आहे.
मधे मुलीसाठी वॉलमार्ट मधून kids telescope आणला,पण सुरुवात कशी करायची?काय काय बघता येईल्?मला ह्यातले ओ की ठो कळत नाही.कुणी थोडे बेसिक सांगितल्यास किंवा ही माहिती कुठे मिळेल सांगितल्यास मदत होईल Happy
धन्यवाद!

Pages