पोळी - चपाती - फुलके इत्यादी संदर्भात चर्चा

Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:04

मायबोलीवर दर दोन महिन्यांनी पोळ्या नीट होत नाहीत, तवा कोणता वापरू? पीठ कोणते वापरू अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सगळे एकत्र करण्यासाठी हे पान.

भाकरी आणि फुलक्यांचा व्हिडीओ - http://www.maayboli.com/node/14935

जुन्या मायबोलीवरील पोळ्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4519.html

अजुन एक चर्चा इथे पण मिळेल - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111686.html?1225813423

माझे काय चुकले? आणि युक्ती सांगा या दोन्ही बा.फ. वर यासंदर्भात असंख्य वेळा विचारले गेले आहे. तेच सर्व इथे डकवले जाईल.

पोळ्यांसाठी कोणता तवा चांगला? ते इथे सापडेल
- http://www.maayboli.com/node/25369
जुन्या मायबोलीवरची तव्यासंदर्भातली चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103164.html?1157632534

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुयोग, तुम्ही दिलेली लिंक बघितली! फक्त कणिक आणि पाणी घालून सेट केलं की गरम गरम पोळी तयार ही कल्पना भन्नाट आहे! लाखो बायकांना पोळ्या करण्याच्या कामातून लवकरच सुट्टी मिळो!

पियूपरी, तू दिलेल्या वरील लिंकमधला आणि सुयोगने दिलेल्या लिंकमधला रोटीमेकर वेगवेगळे आहेत. तू दिलेल्या लिंकमधील रोटीमेकरचा बर्‍याच लोकांचा अनुभव फारसा चांगला नाहीये. तुझ्याकडचा रो मे कसा सुरु आहे?

सीमा, तुम्ही घेतलं तर नक्की इथे तुमचा review लिहा.
पोळ्या थंड झाल्यावर पण चांगल्या राहतात, का गरम गरम खाल्ल्या तरच ठीक., एका वेळेस किती होतात. वगैरे बघायला पाहिजे. त्याची किंमत काही कुठे लिहीलेली दिसली नाही मला. कोणाला कळली का? पोळ्या नाही फुलके होतायत वाटतं त्यावर.

यात त्यांनी कणीक मळण्याचे फूडप्रो टेक्निकही समाविष्ट केलेले दिसतेय. पण व्हिडिओत दाखवल्यानुसार शेवटच्या दबावतंत्रात Happy नेहमीच्या रोटीमेकरपेक्षा वेगळे तंत्र जाणवले नाही त्यामुळे एंड रिझल्ट नेहमीच्या रोटीमेकरच्या रिझल्टसारखाच वाटला मला तरी. प्रत्यक्षात ठाऊक नाही.
त्यांच्या वेबसाईटवरही कुठे, कधी मिळेल, किंमत वगैरे काही दिसली नाही. सिंगापूरची कंपनी आहे.
http://rotimatic.com/

तुझ्याकडचा रो मे कसा सुरु आहे?

>> छान चालु आहे.. फक्त पोळ्या केल्याकेल्या वाढल्या तर सगळे जास्त आवडीने खातात हा अनुभव आहे.

मला आवडला रोटीमेकर पण केल्या केल्या खाल्ल्या तरच चान्गल्या लागतिल असा कयास आहे, कारण कणिक मळ्ल्यवर रेस्टिन्ग टाइमच नहिये..

काहीही असो, जबरदअस्त इन्व्हेन्शन होईल हे, जर खरंच असेल तर. काही वेळा बनावट व्हिडिओज पण फरतात नेट्वर्किंग साइट्स वर, त्यामुळे खात्री वाटत नाहिये हे खरे आहे.

रोटीमॅटीक विडिओ एकदम कमाल आहे. बाई एकदम मस्त पेटींग काढत उभीये. नवरा मस्त टेबल अ‍ॅरेंज करतोय... चपात्या मशिनमधून बाहेर येतात.. एकदमच रोमँटीक. Proud

चपात्या बहुदा नाही चांगल्या लागणार लगेच नाही खाल्ल्या तर....बघूनच एकदम फडफडीत व कडक वाटताहेत.

यात दुसर्‍यासाईडने पोळी भाजली गेली आहे का ते कळत नाहीये. पोळी उलटायची तर काही process दिसली नाही तिथे. आणि सोनाली म्हणतिये तसं कडा कच्च्या राहतायत.

चपात्या बहुदा नाही चांगल्या लागणार लगेच नाही खाल्ल्या तर....बघूनच एकदम फडफडीत व कडक वाटताहेत.<<+११

पोळी लाटण्या ऐवाजी प्रेस करुन केल्याकी चिवट होतात. ह्या कश्या होतात ते दिसत नाही.

काय मस्त आहे रोटीमॅटिक...भारी ... कडा जर कच्च्या रहाताय्त असे वाटत असेल तर रोटि चा thickness कमी करु शकतो म्हणजे मस्त ठिक होयिल.. आणी मला वाटते तसे दोन्ही बाजुनी hot plate असणारं म्हणुनच पोळी फुगतिये आणी उलटायची गरज नाही ...electric roti maker मधे जसे असते ना तसेच ....

ह्यात एक सुधारणा केली पाहिजे Wink खाली हळूहळू रोटेट होणारी डिस्क, ज्यावर कणकेचा छोटा गोळा मधोमध पडल्यावर ही फिरु लागेल आणि वर मागेपुढे हलणारं लाटणं, ह्यात प्रेशर किती द्यायचं त्याची अ‍ॅडजस्टमेंट हवी म्हणजे सैल्/घट्ट कशीही कणीक असेल तरी लाटलं गेलं पाहिजे. भाजली गेली की एटीएम मधल्यासारखी बाहेर येणार आणि येताना तिथला ब्रश तेल्/तूप लावणार. काय पण स्वप्नरंजन!!!

स्वप्नरंजनात भर घालते. बटाटे + कांदे फक्त घातले की भाजी तयार होऊन त्यात भरली जाऊन पराठे आणि पुरणाचे साहित्य घातले की पुपो पण तयार होऊन बाहेर आली पाहिजे! Biggrin

मउसूत, पातळ, पुरणाने भरलेली पुपो जर होवून बाहेर येणारी मशिन आली तर सलाम ठोकलाच पाहिजे.:)

भाकरी करायचे मशिन आले तर दुसरा सलाम!

इथे एका मैत्रीणीकडे बराच स्वयंपाक (अर्थात वेस्टर्न पद्धतीचा) करणारे एक मशिन आहे. त्यावरुन ते स्वप्नरंजन केले. तिला विचारते ते मशिन कसे काम करते ते!

टीपीएन.
टोटल पॅराएंटेरल न्यूट्रीशन नामक एक प्रकार आम्ही डॉ लोक आजकाल वापरतो.
डायरेक्ट इन्जेक्शन घेतले, कि स्वयंपाक्/खाणे/पचवणे काय झंझटच नाय बघा.
Wink
याच्या वर पुढले स्वप्नरंजन करा.

अहो इब्लिस, हे स्वप्नरंजन काही वर्षापूर्वी मुलांच्या बाबतीत केलं आहे आणि धाकट्याला अजूनही धमकावते.
दुसरं म्हणजे मुलांच्या पोटाला झीप लावून मिळायला हवी. आपण इमानेइतबारे त्यात जेवण घालायचं काम करायचं. मागे लागायचं झंझटच नको.

दुसरं म्हणजे मुलांच्या पोटाला झीप लावून मिळायला हवी. आपण इमानेइतबारे त्यात जेवण घालायचं काम करायचं. मागे लागायचं झंझटच नको. >>> मीठ मसाले न घालता नुसतं शिजवून ठेवलं की झालं. फक्त सलायव्हाचं सप्लिमेंट त्या सोबत ठेवावं लागेल तो पाचक रस मिळणार नाही म्हणून. डॉक्टर, पुढचं स्वप्नरंजन तुमच्याकडून Wink

Pages