नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा...मिरची....हेमा... प्रज्ञा....दाद....आदी भाच्यांनो....

मला तुम्ही उगाचच लहानाचा मोठा करीत आहात....अपडेट्समुळे तुम्हाला जो आनंद मिळत आहे, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया वाचून उलट माझेच मन भरून येत आहे.

असे वाटत आहे की मालिका अशीच चालू राहावी.

मामा, मायबोलीवर तुमच्यासाठी मालिका धार्जिणी ठरली की मालिकेसाठी तुम्ही? की दोन्ही एकमेकांसाठी? Proud

उत्तर काहीही असो, आता तुमच्याशिवाय मालिका, हा विचारसुद्धा माबोवर बर्‍याच जणांना झेपणार नाही, हे नक्की! लाँगलिव्ह-तुम्ही आणि मालिका-दोघेही.. Happy

ओहो...सानी पोरी..... काय शब्दयोजना केली आहेस ! मस्तच... त्याला उत्तर न देणेच योग्य.

तुला सांगितले तर आश्चर्य वाटेल पण टीव्हीवरील ही एकमेव मालिका मी पाहतोय....हिंदी इंग्लिश काही नाही. त्यामुळे श्री जान्हवी आणि अन्य पात्रे अगदी घरातील झाली आहेत तसेच त्यांचे सुख आणि दु:खही आमचेच.... अशीच इथे सर्वांच्याच मनी भावना निर्माण झाली आहे.

त्यामुळे श्री जान्हवी आणि अन्य पात्रे अगदी घरातील झाली आहेत तसेच त्यांचे सुख आणि दु:खही आमचेच.... अशीच इथे सर्वांच्याच मनी भावना निर्माण झाली आहे.>> अगदी खरे मामा... Happy

आणि अहो मामा, तुमच्याकडून उत्तर अपेक्षितही नव्हते.. प्रकट चिंतन होते ते.. Happy

बाकी मामा माबोवर तुमचा फॅन क्लब तयार झाला ना काही दिवसांनी तर काही नवल नाही.---
फॅन क्लब तर आधीच तयार झालेला आहे. मी पण आहे त्यात.

मुग्धा....:( अग तु म्हणालीस ते बरोबर आहे....आजीबाई हट्ट काही सोड्त नाहीयेत अस दिसत....घर सोडून जाण्याबद्द्ल बोलल्याच आज....म्हणजे अजून काही सगळ सुरळीत नाही ....

आज आजीनी ती मुलगी या घरात आली कि मी या घरातून बाहेर पडेन असे सांगितले आणि हि गोष्ट तुम्ही श्री ला सांगायची नाही अशी सहाही जणींना श्री ची शपथ घातली . या मालिकेत शपथांचा खूपच घोळ आहे. जानाव्हीची आई श्री ला सांगते. तुम्ही जानव्हीच्या बाबांना सांगू नका. श्री सांगतो तुम्ही जानव्हिला सांगू नका. आजीला जानव्हीची आई शपथ घालते. मी जे सांगितले ते कोणालाच सांगू नका. आणखीन बर्याच शपथा आणि ह्याला सांगू नका/ त्याला सांगू नका Happy खूपच घोळ आहे Happy

शशिकलाबाईंना सदैव खलनायकी एक्स्प्रेशन मधेच बघितलय आत्तापर्यंत.
याआधी लता म्हणून .....GHH मधे....
यापेक्षा वेगळा रोल कधी केलाय का?

Pan aaji aata ghar sodun kashala nighalya ahet? Tyanna Shashikalabainnee khara sangitala nahi ka ajun?

बुधवार १६ आक्टोबर ~ अपडेट

~ काही कथांचा जिवंतपणा ताजा टिकविण्यासाठी लेखक [किंवा लेखिका] आणि दिग्दर्शक आयत्यावेळी त्या ढाच्यात तोचतोचपणा इतका आणतात की पडद्यावर ती पाहताना प्रेक्षक स्वतःशीच संतापतो; पण तो बदलाच्याबाबतीत हतबल असल्याने दिसेल ते हताशपणे पाहतो. आजच्या भागात भागीरथीबाईने जे अजब तर्कशास्त्र लढविले ते पाहता बाईना कोणत्याही स्थितीत जान्हवी सहस्त्रबुद्धे ही युवती जान्हवी गोखले बनायला नकोय असाच सूर उमटतो. काल तिचे वडील भेटले, आज शशीकलाबाई आणि मामा भेटले, त्यानी पाय धरून भागीरथीबाईंची माफी मागितली आणि जान्हवी गंगाजलाप्रमाणे पवित्र आहे असा पवित्रा घेतला.... पण या मुळे जान्हवी निष्कलंक ठरते हे मानायला आजी तयार नाहीत. पण श्री तर घरी राहिलाच पाहिजे, या पाच आयांचा सांभाळ त्यान केला पाहिजे, उद्योगधंदा पाहिला पाहिजे...अशा कुटुंबकल्याण विचारातून त्या निर्णय घेतात आणि पाचही आयाना बोलावून सांगतात की, "श्री चे त्या मुलीसोबत लग्न मी करून देणार....पण मुलीबाबत माझे मन अजूनही तयार होत नाही....त्यामुळे ती ज्या दिवशी माप ओलांडून या घरात प्रवेश करेल, त्याच दिवशी मी उंबरठा ओलांडणार....आणि माझा हा निर्णय तुम्ही कुणीही श्री ला सांगायचा नाही अशी तुम्हाला श्री चीच शपथ आहे....!"

~ हे देवा.... म्हणजे गेल्या आठवड्यात याच उंबरठा माप मुद्द्यावर सारे संपले होते, आज परत तोच... परत प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकणार....कारण श्री ला आजीने फक्त इतकेच सांगितले आहे की "मी तुमच्या लग्नाला होकार देत आहे. जान्हवीच्या आईवडिलांना पुढील बोलणी करण्यासाठी उद्या घेऊन ये..." हे ऐकलेला श्री अत्यानंदाने जान्हवीला ऑफिसमध्ये बोलावून घेतो आणि तितक्याच उत्साहाने आजीतील हा बदल तिला सांगतो....त्याला वाटते जान्हवी हर्षाने वेडी होईल; पण जान्हवीचे पाय अजूनी जमिनीवरच आह. ती म्हणते, "मला आनंद झाला आहे, पण हा अचानक बदल कसा काय ? माझ्याबद्दल त्यांच्या मनी काही गैरसमज होते, ते कसले, कुठले ? आणि ते दूर कसे झाले असतील ?" यावर श्री म्हणतो...आता या क्षणी त्याची काळजी नको.... माझ्या बायकोने आता कसली चिंता करता कामा नये...! बस्स श्री च्या 'माझ्या बायकोने..." या शब्दप्रयोगाने जान्हवीच्या चेहर्‍यावर काश्मिरची शालिमार बागच फुलते आणि होणार्‍या नवर्‍याला ती बिलगते.

'माझ्या बायकोने..." या शब्दप्रयोगाने जान्हवीच्या चेहर्‍यावर काश्मिरची शालिमार बागच फुलते आणि होणार्‍या नवर्‍याला ती बिलगते.>>>> हा एकच प्रसंग छान वाटला आज

पण तो बदलाच्याबाबतीत हतबल असल्याने दिसेल ते हताशपणे पाहतो>>>>खरंय काका तुमचं

आजी फक्त स्वतः चा विचार करते आहे असे दिसते.....तिला जान्हवी आवडत नाही तर नाही पण नातवावर जीव आहे ना...

तिच्या बाजूने मानले कि मुलगी अन तिच्या घरचे चांगले नाहीत. पण मग लग्न लावून आपण दूर निघून काय साध्य होणार? उलट तिथेच राहून सूनेवर लक्ष्य ठेवायला नको का?

हो ना...आता इथेच राहुन लक्ष्य ठेवायला हव खर तर आजीबाईनी....आता त्याना कस थांबवणार ते पाह्ण महत्त्वाच आहे....

चला, अशोक (सराफ) नंतर अजुन एक अशोक मामा झाले. Lol
मी मालिका बघत नाही, पण तुमचे अपडेट्स वाचतो. मालिकेपेक्षा अपडेट्स जास्त भावतात.
तुम्हीही लिहायचं मनावर घ्या बघु, काय सुंदर लिहिता, अशोक. मी मामा म्हणणार नाही. Happy

हो ना ग मिरचे.....शी बाई काय शुक्लकाष्ठ मागे लागलय जानुच्या काय माहित? बिचारीच्या प्रत्येक सुखाला दु:खाची किनार ठेवल्याशिवाय दैव पण स्वस्थ बसत नाही. इतकीही परिक्षा घेउ नये ना देवाने चांगल्या माणसांची.

आजीबाईंना लॉजिकली विचार करा म्हणावं .. सारखं काय शपथा घालत बसतात एकमेकांना..
ज्याच्या नावी शपथ देतात ते/ देव दोघेही वैतागले असतील..
त्या ५ आया तर सगळ्यांच्या बोलण्यात हो ला हो करतात.. स्वतःचा काही स्टॅण्ड आहे की नाही ?

गोखले हॉलमधे गालीचा का घालत नाहीत, सतरंजी काय घालतात? >>> बरोबर. त्याच काय आहे गोखलेना प्रत्येक गोष्ट अती पारखून घ्यायची सवय असल्यामुळे गालिच्याचे डिझाइन लवकर पसन्त पडत नाही आहे.

गोखलेना प्रत्येक गोष्ट अती पारखून घ्यायची सवय असल्यामुळे गालिच्याचे डिझाइन लवकर पसन्त पडत नाही आहे.>>>>> हो ना एकेका डिझाईन मागे ६ जणींची ६ मत कसा घेणार गालीचा?

धन्यवाद विजयराव....

तुम्हाला सा-या अपडेट्स मधील जे काही आवडले असेल त्याचे सारे श्रेय माझ्या इथल्या अगणित भाच्यांना जाते. त्यानीच मला लिखाणासाठी प्रेरीत केले म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अर्थात मालिकेमधील कथानक, संवादाची थेट सरळ धाटणी, नाट्यमयतेच्या नावाखाली केलेला गोंधळांचा अभाव....आणि या सर्वांपेक्षा श्री आणि जान्हवी या दोन पात्रांनी अगदी पहिल्या भागापासून राखून ठेवलेला साधेपणा....ह्या सर्वांमुळे ही मालिका मनी ठसली आहे, असेच म्हणावे लागेल. मूळ कलाकृती भावत असेल तर त्यावर करायचे अगदी अल्पसे लेखनदेखील त्याच सुरात उमटत जाईल असे वाटते.

वेल.... तुम्हीही मामा म्हणा.... आम्हा कोल्हापुरकरांना हे संबोधन खूप आपुलकीचे लक्षण वाटते.

अशोक पाटील

काही कथांचा जिवंतपणा ताजा टिकविण्यासाठी लेखक [किंवा लेखिका] आणि दिग्दर्शक आयत्यावेळी त्या ढाच्यात तोचतोचपणा इतका आणतात की पडद्यावर ती पाहताना प्रेक्षक स्वतःशीच संतापतो; पण तो बदलाच्याबाबतीत हतबल असल्याने दिसेल ते हताशपणे पाहतो. >>>>>>>>> +११११ अनुमोदन अशोक मामा तुम्हाला. अगदी खरयं.
श्री आणि जान्हवीमुळे बाकीच्यांना सहन करणं तर आलचं. तो मामा कायच्याकाय डोक्यात जातो. त्याच्यापेक्षा तो अनिल आपटे बरा होता असं म्हणावसं वाटतयं आता. Sad

btw आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार झी मराठी अ‍ॅवॉर्डसमध्ये श्री व जान्हवीला सर्वोत्कृष्ट नायक व नायिकेचा पुरस्कार मिळालाय. आणि मालिकेने तब्ब्ल ११ पुरस्कार पटकावले आहेत.
आणि आशा शेलार ( जानूची आई) यांनी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळालाय. Happy

<<सारखं काय शपथा घालत बसतात एकमेकांना>> हो ना. सगळ्याच्या लक्षात कस राहत. कोणी कोणाला शपथ घातलेय ते. आणि कोणी कोणाला काय सांगायचं नाही ते Happy मी असते तर मला कोणी कशाबद्दल शपथ घातलेय ते विसरूनच गेले असते Lol

btw आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार झी मराठी अ‍ॅवॉर्डसमध्ये श्री व जान्हवीला सर्वोत्कृष्ट नायक व नायिकेचा पुरस्कार मिळालाय.>> gr8.... मत वाया नाही गेले म्हणजे :)... कुठे वाचायला मिळेल डिटेल मध्ये?

>>>>>btw आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार झी मराठी अ‍ॅवॉर्डसमध्ये श्री व जान्हवीला सर्वोत्कृष्ट नायक व नायिकेचा पुरस्कार मिळालाय. आणि मालिकेने तब्ब्ल ११ पुरस्कार पटकावले आहेत.
आणि आशा शेलार ( जानूची आई) यांनी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळालाय.
++++++११११११११११११
Congratulations!!!

Aaplya saglaynchya manasarkh zal !!

btw आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार झी मराठी अ‍ॅवॉर्डसमध्ये श्री व जान्हवीला सर्वोत्कृष्ट नायक व नायिकेचा पुरस्कार मिळालाय.>> gr8.... मत वाया नाही गेले म्हणजे स्मित... कुठे वाचायला मिळेल डिटेल मध्ये?>>>>> झी २४ तास वर दाखवत होते. २७ तारखेला आहे पुरस्कार सोहळा. मे बी पेपरमध्ये येईल लवकरच.

Pages