नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोकराव, काळजी घ्या. आम्हाला काळजी वाटून राहिली. एक स्टेंडबाय टाटा फोटॉन नेट डाँगल घेउन ठेवा.

सानी...अंजली....मन:पूर्वक धन्यवाद.

अश्विनीमामी ~ स्टँडब्या नेट डॉंगलबाबत मागे मला इथल्याच एका जालीयमित्रांने सूचना केल्याचे स्मरते; पण मी तिकडे लक्ष न देण्याचे कारण म्हणजे बीएसएनएल ब्रॉडबॅण्ड घेतलेल्या दिवसापासून अतिशय सुरेखरित्या कार्यरत होते, सबब काळजीचे असे काही कारण वाटलेच नाही. आजही कनेक्शन दुरुस्त झाल्यावर खुलाशासाठी त्या मेकॅनिकला काही विचारले तर ते गृहस्थ ठोसपणे काही बोलते झालेच नाहीत. फक्त "असे सहसा होत नाही, पण तुमच्याबाबतीत झाले, त्याला मी तरी काय करणार? आता दुरुस्त केले आहे....होणार नाही" इतपत भरवसा देऊन गेले आहेत..... आता त्यावर मी तरी काय जादाचे बोलणार ?

आज मंगळवार १५ आक्टोबर २०१३ ~ अपडेट

आज पूर्ण कार्यक्रमावर अंतिम घडामोडीपूर्वीचा ताण स्पष्ट जाणवत होता. श्री समोर आता हे सारे कसे यशस्वीरित्या सांभाळून न्यायचे हा प्रश्न आहे तर जान्हवी श्री ची होणारी घालमेल पाहून कमालीची अस्वस्थ आहे....आणि तिची ती अवस्था समजण्याजोगीच आहे. त्याला कारण म्हणजे आपल्याविषयी आजीचे असलेले वाईट मत....ते मत तिला पुसून काढायचे आहे, पण श्री तिला विश्वास देवू इच्छित आहे की ती बाजू तो सांभाळेल. जान्हवी त्याच्यासमोर शांत आहे पण त्यातूनही ती 'श्री, फक्त मला एकदा संधी दे आजींच्यासमोर उभे राहून माझे काय चुकले आहे ते विचारायचे आणि जर चुकले असेल तर दोन मुस्काटातदेखील खायला मी तयार आहे..."; पण श्री तिला शांत करतो. तिथून जान्हवी घरी येते. घरी फक्त वडील आहेत. ते मुलीचा थकावटीने दबलेला चेहरा पाहतात, काळजी व्यक्त करतात... जान्हवी 'डोके दुखत आहे' असे सांगून त्यांच्या शेजारी बसते. वडील खोलवर चौकशी करतात त्यामुळे जान्हवी लग्न आणि आजीचे तिच्याविषयीचे उलट यामुळे होत असलेला मनाचा कोंडमारा बापाजवळ व्यक्त करते.... मन मोकळे करीत रडतेही....आणि बापाला विचारात पाडते.

इकडे श्री च्या ऑफिसमध्ये जान्हवीची आई आणि मामा आले आहेत. नंदन त्याना चहा देतो. श्री अजूनी यायचा आहे आणि ही दोघे श्री ने आपल्याला इकडे का बोलाविले असेल ? यावर तर्काची लढाई लढतात आणि उत्तर निघते की आजीसमोर शशीकलाबाई जे बोलल्या त्याबद्दल श्री जाब विचारणार. यावर धूर्त मामा आपल्या बहिणीला सल्ला देतो की तिने ह्या खोट्या बोलण्याचे पाप अनिल आपटेवर टाकावे. त्यानेच सांगितले म्हणून मी हे आजीला बोलले. श्री येतो... रितीनुसार मामाला नमस्कार करतो आणि पुढे काही बोलायच्या अगोदरच शशीकलाबाई त्याला आजीकडे जाऊन जान्हवीविषयी मी काय बोललो हे सांगतात. त्यावर श्री चिडतोच आणि अशी बातमी ऐकल्यावर प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली येऊन त्या मुलीची बाजू घेऊ लागला तर मुलाकडील लोक ऐकणार नाहीत असे बोलतो...यावर ही दोघे क्षमा मागतात आणि हे सारी खरी कहाणी आम्ही आजींना सांगण्यास तिकडे जातो. श्री त्याना जाण्यास सांगतो आणि अनिल आपटेविरूद्ध परत डीएसपी ना फोन करतो.

शशीकलाबाई आणि मामा येण्यापूर्वीच सदाशिव सहस्त्रबुद्धे...जान्हवीचे वडील...गोकुळ बंगल्यावर येतात. तिथे इंदूवहिनी आणि आजी असतात. सदाशिवराव पायाच्या दुखण्यामुळे अडखळत्या अवस्थेत असल्याचे पाहून आजी त्याना बसण्यास सांगतात व इंदूला चहा करण्यासाठी पाठवितात. जान्हवीचे वडील आपण जान्हवीच्या बाजूने आलो आहे असे सांगून विषयाचा फापटपसारा न करता थेट मुद्द्यावर येऊन जान्हवीच्या निर्मळ चारित्र्याविषयी आपली हमी देतात. पण आजी 'असे प्रत्येक मुलीचा बाप म्हणत असतोच....पण लग्न ठरविताना केवळ बापाचे बोलणे ऐकून कुणी निर्णय घेत नसतो...' यावर वडील म्हणतात 'मग तिच्याविषयी तुम्ही दुसर्‍या व्यक्तीलाही विचारा..." असे म्हटल्यावर आजी "दुसर्‍या व्यक्तीपेक्षाही मला तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनेच तिच्या चारित्र्याविषयी सांगितले आहे असे तुम्हाला कळले तर ?" या प्रश्नावर सदाशिवराव शांत राहतात आणि म्हणतात, 'जान्हवीच्या आयुष्यात जवळचे फक्त दोनच आहेत...एक मी व दुसरे श्री." आजी पृच्छा करतात, "आणि तिची आई ?" यावर सदाशिवराव सरळ सांगतात, "जान्हवी आपल्या आईला आई म्हणते, पण ती तिची सावत्र आई असून मी तिचा जान्हवीशी तसला संबंध मानत नाही...तेव्हा मी तुम्हाला परत विनंती करतो की तुम्ही तिला फक्त एकदाच थोडा वेळ भेटा आणि निर्णय घ्या..."

आजीना अन्य आया याबद्दल विचारत आहेत....आणि आजी होकार द्यायच्या अवस्थेत असतानाच दारात शशीकलाबाई आणि मामा आल्याचे दिसत्ये.

वेलकम काका. माझेपण bsnlचे नेट सध्या slow आहे, रात्री बरे चालते पण दिवसा slow असते.
आज जान्हवीच्या बाबांचा अभिनय खरंच मनाला भिडला.

काका मस्तच ! Happy
श्रीला कसले मामेसासरे आणि सासू मिळालीये श्शी:
त्याच्या स्वभावाशी अगदी विसंगत.

खरंय. काल ज्या संयत रुपात श्री.मनोज कोल्हटकर यानी 'सदाशिव सहस्त्रबुद्धे' साकारले आणि मुलीच्या आजेसासूपुढे अक्षरशः हात जोडून तिच्याविषयी गुणांचे जे चार शब्द सांगितले ते पाहताना हृदयी वेदना होतच होत्या. मला तर वाटले त्या पात्राची शारीरिक स्थिती जर ठीक असती तर असल्या चांदणीसारख्या मुलीचे नाते गोखले घराण्याशी जोडण्याचा यत्नच त्यानी केला नसता. पण परिस्थितीने त्यांची चारी बाजूने कोंडी केलेली असल्याने आपल्या हयातीत लाडक्या जानूच्या डोक्यावर अक्षता पडायचे सौभाग्य मिळावे तसेच जान्हवीचे श्री सोबतचे स्वप्नही प्रत्यक्ष आकाराला यावे याचे उद्देशाने त्यानी पडते घेतल्याचे जाणवत होते.

सुरेख अभिनयाचे तितकेच सुरेख उदाहरण.

मला तर वाटले त्या पात्राची शारीरिक स्थिती जर ठीक असती तर असल्या चांदणीसारख्या मुलीचे नाते गोखले घराण्याशी जोडण्याचा यत्नच त्यानी केला नसता <<< काय वाईट आहे हो आमच्या श्री त? :d

अगं अदिती बालिके ~~ 'श्री' देखील लखलखीतच आहे.... त्याबद्दल तीळमात्र शंका नाही. पण म्हणून सदाशिवरावांनी त्याच्या दारात जाऊन त्याच्या आजीपुढे हात जोडून तिला पदरात घ्या अशी विनवणी करणे खूप क्लेशदायक वाटले. मुळात जान्हवीसारखी कलिका श्री च्या वाट्याला का आली ? तर तिला या अगोदर १८ स्थळांनी नाकारले होते....ही काहीशी अतिशयोक्ती वाटतेच....कारण यातील एकाही पठ्ठ्याने थेट त्यानंतर या कुटुंबांपैकी जान्हवी वा वडीलांना स्वतंत्र गाठून 'नकार का द्यावा लागला...?" याची कारणमीमांसा केल्याचा दाखला नाही....[अर्थात कथानकातून असले विकल्प स्वीकारावे लागतातच].... तसे झाले असते तर मग जान्हवीचे लग्न या अगोदरच व्हायला हरकत नव्हती... पण वरच्या सटवाईने तिच्या भाळी गोखल्यांचाच टिळा टिकविला आहे असे दिसत्ये. आता श्री गोखलेशी तिचे जमले म्हणजे आणखीन् तिच्या नशीबाची फरफट होऊ नये हीच एकमेव भावना त्या वडिलांच्या मनी आहे.

सबब....माझ्या मनी श्री बद्दल कसलाही उणेपणा नाही...नाही...नाही....[बघ, तीन वेळा सांगितले आहे. आता त्याच्याकडे माझ्या नावाने तक्रार करू नकोस म्हणजे झाले.]

<तर तिला या अगोदर १८ स्थळांनी नाकारले होते....ही काहीशी अतिशयोक्ती वाटतेच....कारण यातील एकाही पठ्ठ्याने थेट त्यानंतर या कुटुंबांपैकी जान्हवी वा वडीलांना स्वतंत्र गाठून 'नकार का द्यावा लागला...?" याची कारणमीमांसा केल्याचा दाखला नाही> शशिकलाबाई पाहण्याच्या कार्यक्रमातच मुलाच्या आईला आत बोलावून जान्हवीच्या अफेअर्सबद्दल सांगायची. मग ती बाई आपल्या नवर्‍याला आणि मुलाला घेऊन पळ काढायची.
शशिकलाबाई त्या स्थळाबद्दल जान्हवीला व तिच्या वडिलांनाही असेच काही सांगत.

खरंय. काल ज्या संयत रुपात श्री.मनोज कोल्हटकर यानी 'सदाशिव सहस्त्रबुद्धे' साकारले >>> मला या मालिकेत पहिल्या पासून त्यांचा अभिनय आवडला आहे.
अनिल आपटेला हकलतात तेव्हाही मनातली अस्वस्थता, चीड, शारीरिक अगतीकता, मानसीक कणखरपणा असे अनेक भाव एकाच वेळी दाखवले होते.

श्री.कोल्हटकर यांच्या अभिनय क्षमतेबद्दल या निमित्ताने इथे चर्चा चालू आहे ते वाचून एका गुणी कलाकाराची दखल घेतली जात आहे हे पटते. मालिका सुरू झाल्यापासून त्यानी ती भूमिका परिस्थितीने दडपलेल्या बापाची केली आहे, जो कसल्याही स्थितीत आपल्या मुलीवर मात्र जीवापाड प्रेम करतो....अर्थात सारेच बाप आपल्या मुलीवर अशी लोभस माया करतातच, पण जान्हवीवरील त्यांच्या प्रेमाला अशी एक झीलई आहे की त्याना उमजून चुकले आहे ही इतकी सुंदर मुलगी भाली दुर्दैव घेऊनच या घरात जन्माला आली आहे.... शिवाय आपण असे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही हतबल आहोत, ही टोचणीही त्याना सतत पिडा देत आहे. त्यामुळेच ज्यावेळी श्री सारखा उमदा तरुण तिच्या आयुष्यात येतो आणि तिच्या चेहर्‍यावर टवटवीत हास्य फुलते त्यावेळी सदाशिवराव निर्णय घेतात की 'हाच तो !'.....त्यामुळे तो जान्हवीला मिळावा म्हणून प्रसंगी स्वतःला कितीही लीन करावे लागले तरी तसे करण्याची माझी तयारी आहे....हा त्यांचा अभिनय अप्रतिमच म्हणावा लागेल.

व्वॊव.... तुला वाटला ना ? बस्स !! तसे गेले दोन दिवस मालिकाही छान रंगत असल्यामुळे लिखाणालाही बरेच वाटते असे म्हणावे लागेल.

जान्हवीचे बाबा मस्त आहेत Happy
माझ्या डोळ्यातच पाणी आलं टचकन तो अभिनय बघताना Sad
सहसा मी कधी मालिका बघुन रडत नाही Happy

ऑल डॅड्स आर ग्रेट ऑलवेज!!!!!!!!!

रिया....तू तर मुलगी आहेस त्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येणे ही बाब सहज आणि नैसर्गिक मानली जावी. पण मागे एकदा जान्हवी जेव्हा वडिलांना "आज श्री ने मला मागणी घातली...." ही बातमी प्रथम हसर्‍या प्रसन्न चेहर्‍याने आणि नंतर हमसाहमशी रडतरडत सांगते आणि बापाच्या कुशीत जाते, त्यावेळी बापाचे डोळे असे काही भरून आले की मी पुरुष असूनही मला जाणवले की आपल्याला आता पडद्यावरील काहीच दृष्य दिसत नाही.

सारीच थोर आहेत ही मंडळी...!!

खरच अतिशय सुन्दर सुरु आहे ही मालिका.....रोज ८ वाजण्याची वाट पाहायला लावणारी मालिका...खरच ६ सासवा घर सोडुन जाणार असा अपडेट दाखवला का? माझ्या पहाण्यात नाही आला....अस होउ नये...कारण आता होइलच ना गेरसमज दूर...

अशोकह्यांचे अपडेट नेहमी प्रमाणे वाचनीय. रियाशी सहम्त, अन जानु श्रीबद्दल त्यादिवशीही असेच डोळे भरुन आले. श्री कोल्हटकर प्रचंड सहमती.

ओय मिरची मी एकदा सकाळी झी मराठी बघत असताना खाली स्क्रोलमध्ये दाखवल होत. आता ते येत नाहीये आता काहितरी वेगळच येतय... नवा स्क्रोल मी विसरले आहे पण हे नक्की सांगते की नवा स्क्रोल पॉझिटिव्ह आहे.

रिया....तू तर मुलगी आहेस त्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येणे ही बाब सहज आणि नैसर्गिक मानली जावी. पण मागे एकदा जान्हवी जेव्हा वडिलांना "आज श्री ने मला मागणी घातली...." ही बातमी प्रथम हसर्‍या प्रसन्न चेहर्‍याने आणि नंतर हमसाहमशी रडतरडत सांगते आणि बापाच्या कुशीत जाते, त्यावेळी बापाचे डोळे असे काही भरून आले की मी पुरुष असूनही मला जाणवले की आपल्याला आता पडद्यावरील काहीच दृष्य दिसत नाही.
सारीच थोर आहेत ही मंडळी...!!>>>>>. अशोक मामा प्रचंड अनुमोदन.

बाकी मामा माबोवर तुमचा फॅन क्लब तयार झाला ना काही दिवसांनी तर काही नवल नाही. एक दिवस तुम्ही
माबोवर दिसला नाहित तर आम्हाला सगळ्यांना जाम म्हणजे जाम टेन्शन आल होत तुमच्या तब्येतीबद्दल.... मी तर अत्यानंद बाबांना (हात जोडुन नमस्कार करणारी बाहुली श्रीच्या मावशीसारखी) पाण्यातच ठेवणार होते Proud पण तेवढ्यात समजल की तुमच्या घरी नेट कनेक्शनला प्रॉब आहे आणि हुश्श झाल. जोक्स अपार्ट पण खरच या धाग्यावर तुमचे अपडेट्स नसले की मिसिंग मिसिंग वाटत रहात.....

खर आहे मुग्धा ....अशोक मामाचे अपडेट्स मस्तच असतात...रोज टिव्हिवर मालिका पाहिलि तरि इथे पण मी ते वाचतेच.....:)

मला सुद्धा ही मलिका आणि मा बो वरची त्या वरची चर्चा प्रचन्ड आवड्ते. मी रोज रात्री आठ वाजण्याची वाट पहात असते. श्री जान्हवीच लग्न कधी पाहीन अस झाल आहे.

<<<<बाकी मामा माबोवर तुमचा फॅन क्लब तयार झाला ना काही दिवसांनी तर काही नवल नाही. >>>> १००% अनुमोदन,

पुर्वी रामायण्-महाभारत पाहायला बरोबर ९ वाजता सर्वजण हजर होत तसे ह्या रविवारी होणार असे वाटते. Happy

Pages