Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंद्र मी पण रडत्खडतच पूर्ण
मंद्र मी पण रडत्खडतच पूर्ण केली त्यातून शास्त्रीय गायन काहीच समजत नसल्याने विषय फारसा आवडलादेखील नाही.
काल हमीद दलवाई यांची इंधन वाचून काढली. खूप दिवसापासून वाचायची आहे या लिस्टमधे होतं. अस्खलित भाषा, ओघवतं वर्णन, शक्यता असूनदेखील कुठूनही जजमेंटल न बनता केवळ त्रयस्थ या दृष्टीने केलेले घटनावर्णन फार भावून गेलं. पुन्हा एकदा तर वाचणारच आहे.
आर्त हा मोनिका गजेन्द्रगडकर यांचा कथासंग्रह आणि गौरी देशपांडे यांचं आहे हे असं आहे, भीष्म सहानी यांचं बलराज ही पुस्तकं वाचून झाली मागच्या आठवड्यात.
मी गेल्या आठवड्यात, गेल्या
मी गेल्या आठवड्यात, गेल्या विकांताला खरं म्हणजे, आऊट ऑफ नोव्हेअर, 'गारंबीचा बापू' पुन्हा वाचली. (एका पुस्तकप्रेमी मित्रानं आयती घरी आणून दिली, म्हणून :हाहा:)
रोजच्या जेवणाचा कंटाळा आला, की कसं, कधीतरी मुगाची मऊ खिचडी, तूप, पापड, लोणचं हा मेनू बरा वाटतो, तसं वाटलं पुस्तक वाचताना.
पूर्वी वाचली होती तेव्हा न जाणवलेली एक गोष्ट यावेळी जाणवली - कादंबरीच्या उत्तरार्धात संवाद खूप आहेत. ते वाचायचा अधूनमधून कंटाळा येतो.
आणि यावेळी वाचताना शेवट मला गुंडाळल्यासारखा वाटला.
मला पहिल्यांदा वाचताना पण
मला पहिल्यांदा वाचताना पण तसंच वाटलं होतं. समहाऊ ते "बापू" कॅरेक्टर फारसं पटलं नाहीच कधी मला.
आणि मला 'राधा' पटली नाही
आणि मला 'राधा' पटली नाही कधीच. समजून चालू, की बापूचं व्यक्तीमत्त्व असं असं अफाट, तरी तो प्रेमात पडावा म्हणून तिला असं उदात्त, आदर्श दाखवलेलं मला बोअरच होतं जरा.
गारंबीचा बापू आवडली होती मला.
गारंबीचा बापू आवडली होती मला. जरा पॉझिटिव्ह व्यक्तिरेखा वाटली होती असे आठवते. त्यामानाने रथचक्र खूपच डिप्रेसिंग होती. लव्हाळी पण मस्त - बटाट्याची चाळ ची आधीची व्हर्जन वाटते. तुंबाडचे खोत ला मात्र तोड नाही. तीच वाचल्यावर पेंडश्यांच्या या इतरही आणल्या.
तुंबाडचे खोत ला मात्र तोड
तुंबाडचे खोत ला मात्र तोड नाही. >>> अगदी!
लव्हाळी मी नाही वाचलेली. ऑक्टोपस मात्र मला अजिबात आवडली नव्हती.
विजया मेह्तांच झिम्मा
विजया मेह्तांच झिम्मा वाचल
झिम्मा केवळ आत्मचरित्र आहे असे मुळिच वाटले नाही. सहज संवाद असतो तसे वाटले
कुठेही रडका सूर नाही की कुठे दोषारोप नाही
आवश्यक तेवढ स्पष्टीकरण आणि विवेचन यामुळे अधिक भावल.
सुरुवात होते ते बेबीच्या लहान्पनापासून
मग पुढे विजू ते विजया मेहता पर्यताचा प्रवास ऊलागड़त जातो.
अतिशय शांतपणे कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सार मांडल आहे बाईनी
आपल्या नाटकांचाही ऊल्लेख बाईंनी केलेला आहे
पण फ़क्त यशस्वी नाटकान्ची टिमकी न वाजवाता आपली काही नाटक पडली ती का पडली याचेही परीक्षन केलेले आहे
आणि त्यामुळे बहुदा नाट्य विषयक तपशील हे केवळ माहिती न देन्यापुराते मर्यादित न राहता एक रसरशीत दस्तावेज बनतात
बाईंच्या हाताखाली तयार झालेल्या अनेक कलाकारांचा ऊल्लेख आहे .तसेच रंगायन चळवळ ; त्याकाळचे वातावरण ; भारत व् जर्मन प्रकाल्पाबद्द्द्लाही बाईनी फार सुंदर रीतीने मांडले आहे
या सर्वामुळे बाईंच आत्मचरित्र हे केवळ आत्मचरित्र वाचन्र न राहता एक संपन्न नाट्य अनुभव वाचल्याच फीलिंग पदरी पडत.ं
मंद्र मी पण रडत्खडतच पूर्ण
मंद्र मी पण रडत्खडतच पूर्ण केली त्यातून शास्त्रीय गायन काहीच समजत नसल्याने विषय फारसा आवडलादेखील नाही.
>>>> शास्त्रीय थोडंफार उमगतं म्हणूनच तग धरलाय मी मंद्रमध्ये. वाचनही अगदी मंद्रसप्तकात चाललंय. वाचताना हमखास खर्जात घोरण्याचा सूर लागतो.
मामे
मामे
शास्त्रीय थोडंफार उमगतं
शास्त्रीय थोडंफार उमगतं म्हणूनच तग धरलाय मी मंद्रमध्ये. वाचनही अगदी मंद्रसप्तकात चाललंय. वाचताना हमखास खर्जात घोरण्याचा सूर लागतो. >>>> 'मध्य'रात्र होते का पुस्तक हातात घेतले की?
तुंबाडचे खोत नं इतिहास घडवला.
तुंबाडचे खोत नं इतिहास घडवला. पण त्याची पायाभरणी गारंबीच्या बापूने केली. रथचक्र आणि लव्हाळी यात प्रवाहाविरूद्ध जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न पेंडशांनी केला. त्याला अजून खतपाणी मिळाले असते तर कदाचित कोसलापूर्व कोसला वाचायला मिळाली असती. पण ते बापूच्या प्रसिद्धीप्रेमात अडकले अन फक्त 'अद्भुतरम्य घटनांचा मोठा आलेख' म्हणून गाजलेली 'तुंबाडचे खोत' लिहीली. त्यांचे पोटेन्शियल त्याहून अधिक वर जाण्याचे होते. वाचकांचे दुर्दैव. ऑक्टोपस फसली आहे.
मला माझ्या १० वर्शाच्या
मला माझ्या १० वर्शाच्या भाचीसाठी 'महाभारथ', 'रामायण' आणि 'शिवाजी महाराज', यावरील पुस्तके हवि आहेत.
क्रुपया मला सान्गाल का कोणती पुस्तके घेऊ ते... रन्गित चित्रे असलेली लहाण मुलान्चिच पाहिजेत असे नाहि..
पण ते बापूच्या
पण ते बापूच्या प्रसिद्धीप्रेमात अडकले अन फक्त 'अद्भुतरम्य घटनांचा मोठा आलेख' म्हणून गाजलेली 'तुंबाडचे खोत' लिहीली. >>>> असं कोण पेंडसे म्हणाले का?
ही विधानं मला जजमेंटल वाटली... कादंबर्यावर, लिखाणावर टिका करा.. पण प्रसिद्धीप्रेमात अडकले वगैरे नाही आवडलं.. असो..
पण ते बापूच्या
पण ते बापूच्या प्रसिद्धीप्रेमात अडकले अन फक्त 'अद्भुतरम्य घटनांचा मोठा आलेख' म्हणून गाजलेली 'तुंबाडचे खोत' लिहीली. >>>> असं कोण पेंडसे म्हणाले का?
ही विधानं मला जजमेंटल वाटली... कादंबर्यावर, लिखाणावर टिका करा.. पण प्रसिद्धीप्रेमात अडकले वगैरे नाही आवडलं.. असो.. >>>> अनुमोदन पराग. टोकाची वाटली ही टीका. असो. माणूस आणि लेखक मधून पेंडसे खुप सारे समजतात. जमिनीवर पाय घट्ट असलेला माणूस होता फार.
काही दिवसांपूर्वी गर्ल्स ऑफ
काही दिवसांपूर्वी गर्ल्स ऑफ रियाध वाचले. बरे वाटले. मिडल इस्टमधल्या अप्पर क्लासमधील चार मुलींबद्दल आहे. बर्याचशा गोष्टी कळाल्या.
टीका आहे का ती पराग? एखादी
टीका आहे का ती पराग? एखादी गोष्ट लोक डोक्यावर घेतात म्हणून तीच तीच करावी लागण्याच्या अनेक शोकांतिका आहेत कलाकारांच्या. तशीच ही एक. त्यात चूक काही नाही. बाकी " असं पेंडसे म्हणाले का?" ही पर्सनल कमेंट आहे - पेंडशांवर.
बाकी " असं पेंडसे म्हणाले
बाकी " असं पेंडसे म्हणाले का?" ही पर्सनल कमेंट आहे - पेंडशांवर. फिदीफिदी >>> मी लिहिलं त्याप्रमाणे ते विधान मला जजमेंटल वाटलं त्यामुळे हे विधान तुझं की आणखी कोणाचं हे विचारण्यासाठी मी विचारलेला rhetorical question (मराठी शब्द माहित नाही) होता तो... पेंडश्यांवर पर्सनल कमेंट असण्याचा सबंध कळला नाही तसच त्यातला विनोदही कळला नाही.
अनेक शोकांतिका आहेत कलाकारांच्या. तशीच ही एक >>>> ह्याला मी जजमेंटल म्हणतोय..
परत एकदा असो.
अर्थातच , दुसऱ्याचं विधान
अर्थातच , दुसऱ्याचं विधान असतं तर मी संदर्भ दिला असता.जे मला वाटलं तेच मी लिहीणार, इतरांसाठी ते 'माझं जजमेंट' च की.
मला त्यांचं पोटेन्शियल खूप जास्त आहे वाटलं म्हणून ही शोकांतिका वाटली. पुन्हा एकदा, दोन्ही माझीच जजमेंट्स.
विनोद नव्हता, ती कमेंट मी पर्सनली घेत नाहीये एवढाच त्याचा अर्थ.
'प्रसिद्धीप्रेमात अडकणं' यात
'प्रसिद्धीप्रेमात अडकणं' यात चुकीचं काहीच नाही की. आरोप काय त्यात? परमेश्वराएवढे मोठे लेखक सुद्धा त्यातून सुटले नाहीत. शिवाय या सार्यात पेंडसे 'माणुस' म्हणून कसे होते किंवा नव्हते याचा काहीही संबंध येत नाही.
गारंबीचा बापुला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्याचं नाटक झालं. (भाषांतरंही झाली ना?). विद्यापीठांनी ते अभ्यासाला ठेवलं. इतर कुणाला नाही, तर लेखक-प्रकाशकाला ही सारी प्रसिद्धी आकड्यांमध्ये कन्व्हर्ट झालेली कळतेच कळते. अशी प्रसिद्धी कॅश न करणार्या लेखक-प्रकाशकांना (यापुढे तरी) मूर्ख म्हटलं जाईल, कारण त्यात चुकीचं काहीच नाही. बहुसंख्यांच्या अभिरूचीचा अनुनय न करता लिहिणारे पण अचाट बुद्धी-शैलीचे लेखक मुख्य प्रवाहाच्या बाहेर, समासातच राहिले- याची अनेक उदाहरणे आहेत. लेखक वाचकाची/समुहाची/समाजाची अभिरूची बदलू शकत नाहीत. मला 'रथचक्र' ही त्यांची अत्यंत उच्च अशी कलाकृती वाटते. कुठच्या एका मुलाखतीत बोलताना पेंडशांनीसुद्धा 'रथचक्र' त्यांच्या आवडीची आहे, असं म्हटलेलं आठवतं. पण 'रथचक्र' आवडते याचा अर्थ 'प्रसिद्धी' आवडू नये, असा नाही. या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
मलाही आशूने 'गारंबीचा बापु' आणि 'तुंबाडचे खोत' चा संबंध लावलेला पटला. मात्र या दोन्हींच्या लेखनकाळात बराच, अनेक वर्षांचा फरक असावा.
प्रसिद्धिप्रेमात अडकणं चूक
प्रसिद्धिप्रेमात अडकणं चूक नाहीच, पण माणसाचा स्वभाव कसा असेल त्यावर ते नक्कीच अवलंबून असतं, म्हणून तो संदर्भ. तसे ते अडकले नव्हते हे त्यातल्या तपशीलांवरून कळू शकतं. लेखणीनी काळाच्या कितीतरी पुढे आणि तरीही वाचकप्रिय असूनही ते समासातच राहिले यातून त्यांची अलिप्तता दिसते. आवडते लेखक म्हणून जरा जास्त झोंबलं इतकंच.
रथचक्र ही माझ्यादेखील अत्यंत
रथचक्र ही माझ्यादेखील अत्यंत आवडीची कलाकृती. माझ्यादृष्टीने तरी उच्च!!
गारंबीचे बापू मधे बापू या कॅरेक्टरचाच जो बेस आहे तो मला पटत नाही. आणि म्हणून कदाचित राधादेखील खोटी वाटत राहते.
एखाद्या कॅरेक्टरच्याच प्रेमात लेखकाने पडणे यात चूक काहीच नाही. त्याच कॅरेक्टरवरून पुढे लिहत जाणं ही एक कंटीन्युअस प्रोसेस असते लेखकासाठी. तसं नसतं तर जेम्स बॉन्ड, शेरलॉक होम्स, यांसारखे अजरामर कॅरेक्टर्स एक दोन पुस्तकांतच हरवून गेले नसते का?
ललिता-प्रीति | 8 October,
ललिता-प्रीति | 8 October, 2013 - 21:35
तुंबाडचे खोत ला मात्र तोड नाही. >>> अगदी!
>> +१
गारंबीचा बापु जास्त प्रसिद्ध कशी याचे मला नेहेमी आश्चर्य वाटे पण इथे समविचारी भेटल्याचा आनंद मिळाला.
आणि मला 'राधा' पटली नाही
आणि मला 'राधा' पटली नाही कधीच. समजून चालू, की बापूचं व्यक्तीमत्त्व असं असं अफाट, तरी तो प्रेमात पडावा म्हणून तिला असं उदात्त, आदर्श दाखवलेलं मला बोअरच होतं जरा. >> गारंबीची राधा वाचल्यावर बापू नि राधा दोन्ही अधिक स्पष्ट होतात. कदाचित पेंडशांना पण म्हणूनच राधा लिहाविशी वाटली असेल.
श्याम मनोहरांचे' शंभर मी'
श्याम मनोहरांचे' शंभर मी' वाचले. प्रथमतर कंटाळा आला वाचायला.नंतर भाषेमुळे आवड्लं वाचायला.अर्थात कळलं
किती हा भाग अलहिदा! भाषा छान आहे.
श्याम मनोहरांच्या कथा वेगळ्या
श्याम मनोहरांच्या कथा वेगळ्या धाटनीच्या असतात
वंशवृक्ष वाचलं होतं काही
वंशवृक्ष वाचलं होतं काही महिन्यांपूर्वी. श्रोत्री ही व्यक्तीरेखा खूपच बारकाव्यांसकट मांडली आहे. पण हल्ली अशी व्यक्ती बघायला मिळणे अवघड नाही, अशक्यच आहे. त्यामुळे आपोआप एका फॅन्टसी चं रूप आलं त्या चित्रीकरणाला.
त्यांचं पर्व वाचताना सर्वसामान्य गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची त्यांची शैली आवडली होती. त्याचा प्रभाव असताना वरील पुस्तक वाचल्याने, पर्व मधले 'उद्दात्तीकरणाचे सामान्यीकरण' इथे बरोबर उलटे झाल्यासारखे वाटले.
सध्या केनेथ अंडरसन वाचतोय..
सध्या केनेथ अंडरसन वाचतोय.. लवकरच काही कथा भाषांतर करायचा विचार आहे. जिम कॉर्बेट इतकाच गुणी शिकारी असूनही काहीसा उपेक्षितच राहिला असं माझं प्रामाणिक मत आहे.
माझं नुकतच "नर्मदे हर..
माझं नुकतच "नर्मदे हर.. हर..." वाचून झालं. सुरेख पुस्तक आहे. इथे मायबोलीवरच त्याबद्दल वाचल होतं आणि तेव्हापासून ते वाचायच्या पुस्तकांच्या यादीत टाकून ठेवलं होतं.
पुस्तकात पानोपानी चमत्कृतीपूर्ण अद्भूतरम्य किस्से आहेत पण पुस्तक आवडायचं ते कारण नव्हे.
लेखक (जगन्नाथ कुंटे) ही एक अजब वल्ली आहेत. परिक्रमा करणे किती कठिण आहे हे निरनिराळे लेख/पुस्तके वाचून माहिती झाले होते. तरिही एकदा दोनदा नाही तर ४ वेळा ही परिक्रमा पायी करण्यासाठी निव्वळ धाडस अंगी असून उपयोग नाही. हातात पैसा नाही, भुकेला जेवण मिळण्याची शाश्वती नाही, शरिरात ताकद नाही, अंगावर पुरेसे कपडे पण नाहीत, अशा अवस्थेत आनंदाने परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एक अटळ, अढळ श्रद्धा असणं सर्वात जरूरीचं असावं. वाचताना एखादवेळी मनात आलच माझ्या की किती बरं झालं असतं जर आपली पण एखाद्या गोष्टीवर अशी श्रद्धा असती तर!
शूम्पी, भारती ठाकूर यांचे
शूम्पी, भारती ठाकूर यांचे नर्मदा परिक्रमा पण वाचा. परीक्रमेच्या निमित्ताने घडलेला आत्मसंवाद सुंदर तर्हेने सांगितलाय लेखिकेने.
भा. द. खेर लिखित 'हसरे दु:ख'
भा. द. खेर लिखित 'हसरे दु:ख' वाचले.
आठवत नाही पण शाळेत असतानापासून संधी असूनही दर वेळी का कोण जाणे टाळलेले पुस्तक होते. बर्याच लोकांनी चांगले पुस्तक म्हणून सांगितले म्हणून विकत घेतले होते, शेवटी मुहूर्त लागला. या पार्श्वभूमीमुळेच की काय पण नाही आवडले.
चार्ली चॅप्लिन कलाकार म्हणून थोर होता, वगैरे सगळे मान्य (त्याच्या चित्रपटांची मी चाहती आहेच.). पण या पुस्तकात तो माणूस म्हणूनही तेवढाच थोर असण्याचा/दाखवण्याचा अट्टाहास वाटला. बर्याचदा त्याचे निर्णय अगदीच चुकीचे असतात, तरी लेखक त्याचे समर्थन करतो, तेव्हा आश्चर्य वाटले. बर्याचदा तो थोडेसे स्वतःच्या स्वभावाविरुद्ध वागतो, असे वाटत राहते, त्यामुळे असं म्हणेन की खेरांनी रेखाटलेला चार्ली चॅप्लिन नाही आवडला.
शिवाय भाषा पण विचित्र वाटली. काहीशी खराब अनुवादित पुस्तकांची असते तशी... आणि हा अनुवाद नाहीये. जसं की एके ठिकाणी 'माझा आनंद छिनावून घेतला.' असं वाक्य येतं... अरे, आनंद हिरावून घेणे इतका अवघड वाक्प्रचार आहे का? आणि अशी बरीच उदाहरणे देता येतील.
Pages