सकाळी साखरझोपेतून उठून कामावर जायचे जीवावर आलेला माझा मित्र विवेक कुलकर्णी कुसुमाग्रजांच्या 'फक्त लढ म्हणा'च्या चालीवर म्हणाला - 'डोक्यावरती पांघरूण घेऊन फक्त झोप म्हणा'. मग मी विचार केला की याचा पूर्ण विस्तार करूया … आणि दुपार पर्यंत विडंबन तयार सुद्धा झाले !
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
(आधी विडंबन-कविता आणि खाली मूळ कविता देखील संदर्भासाठी दिली आहे)
कविवर्य कुसुमाग्रज यांची क्षमा मागून
विडंबन - मस्त पड म्हणा
पार्श्वभूमी : गणपती मिरवणुकीत अचकट विचकट नाचणे हा प्रकार फार वाढलाय, त्यात परवाच्या विसर्जनाला मरणाचा पाऊस पडला. कल्पना करा अशी एक मिरवणूक संपवून एका मोठ्या मंडळाचा एक छोटा कार्यकर्ता मंडळाच्या अध्याक्षाकडे आलाय
‘ओळखलत का भाऊ मला?’ - पावसात आलं कोणी,
बापडं होतं फार दमलेलं, केसांवरती पाणी
दम खात बसला कसनुसा हसला बोलला वरती पाहून
'गणपती बाप्पा पाहुणे आले, गेले मांडवात राहून
डी जे वरती पोरं आपली चारचौघात नाचली
मोकळ्या तोंडी जातील कशी, खैनी सुद्धा पोचली
भिंत रचली, गाणी वाजली, नाचून सारे मेले
उस्ताद तुम्ही हातावरती चिंचोके हो ठेवले
पोरांना या घेऊन संगे काढता पाय घेतो आहे
भरल्या चपला पुसतो आहे चिखलगाळ काढतो आहे’
पिशवीकडे हात जाताच हसत हसत उठला
‘ 'चपटी' नको भाऊ मला जरा थकवा वाटला
झाला काटा ढिला तरी पडला नाही फणा
"डोक्यावरती पांघरूण घेऊन मस्त पड" म्हणा’
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
मूळ कविता : फक्त लढ म्हणा
‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
.........
.........
शेवटच्या चार ओळी ... best...
शेवटच्या चार ओळी ... best...
मस्तं. विडंबन आवडले.
मस्तं.
विडंबन आवडले.
मस्तं जमलयं
मस्तं जमलयं
सुरेखच जमलंय ...
सुरेखच जमलंय ...
(No subject)
मस्तच जमलय
मस्तच जमलय
धन्यवाद मा.बो.करांनो ! @विजय
धन्यवाद मा.बो.करांनो !

@विजय देशमुख : तुम्ही दबा धरून बसता की काय माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया द्यायला
असो पण माझ्या प्रत्येक लिखाणावर तुमची प्रतिक्रिया येणार हे आता मी गृहीतच धरले आहे
हे मस्त आहे एकदम..
परिस्थितीचे नेमके वर्णन आणि
परिस्थितीचे नेमके वर्णन आणि चपटी, काटा नि फणा शब्द योजनाही चपखल छान आहे.
.
मस्त जमलयं
चपटी नको म्हणणारा कार्यकर्ता
चपटी नको म्हणणारा कार्यकर्ता म्हणजे फारच आदर्शवादी लेखन आहे..
इब्लीस : हाहाहा .... नाही रे
इब्लीस : हाहाहा .... नाही रे ... आदर्शवादी असता तर गुटख्याने तोबरे भरून DJ वर मरेस्तोवर नाचला नसता
सुरेख छान जमलय सर...
सुरेख छान जमलय सर...
दामले, अहो मी अधाशी आहे
दामले, अहो मी अधाशी आहे वाचनासाठी, आणि एकवेळ जिटॉक बंद असलं तरी चालेल, पण माबो चालुच हवं

तसही ऑफिसमध्ये दुसरं काय करणार...
जोतिराम >>>> सर वगैरे नका हो
जोतिराम >>>> सर वगैरे नका हो म्हणू .... उगाच पोक्त झाल्याचा फील येतो
विजय : तसही ऑफिसमध्ये दुसरं काय करणार >>>> हाहाहाहा.... माझ्याच पन्थातले दिसताय !
भारी...
भारी...
भारी!
भारी!
(No subject)