Submitted by निनाद on 3 October, 2013 - 06:32
मुग्ध मानसी यांची सुंदर रचना वाचल्यावर बिर्याणीचा मोह आवरेना.
मी अता तुला हे बिर्याणीचे सांगणार आहे!
'नकोस कांदे कापू येथे' बजावणार आहे!
असोत ते जे पाकपुस्तकी धरून करती मजा
मी मात्र तुला नेहमी उपाशी ठेवणार आहे!
पटूदे अथवा न पटो तुजला माझे हे सांगणे
हाच घास बघ तुझ्या गळीही उतरणार आहे!
तू काटे दे वा चमचे, डाव, सराटे दे मजला
तरी शेवटी मीच तुला बघ भरवणार आहे!
लाख नियम पाळूनही जेंव्हा मी करते रोटी
ट्रेडमिलवर तुला धाडूनी पळवणार आहे!
खाव खाव तुझी रे जाड्या जा माझ्यापासून दूर
अखेर तुला मी त्या जिममधेच धाडणार आहे!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मस्त
मस्त
(No subject)
व्वा..
व्वा..
भारी!!! १ नं.
भारी!!! १ नं.
धम्माल...print काढुन नवरोबाला
धम्माल...print काढुन नवरोबाला वाचायला दिली पाहिजे.
काय बिशाद, पुन्हा कशाची फर्माईश करेल?
हास्यरसिकांना
हास्यरसिकांना धन्यवाद!
कोणत्याही विडंबन रचनेवर कवीची दाद यावी ही खरी पावती!
मुग्धमानसी यांनी दिली, चक्क १ नं अशी दाद दिली आहे.
विडंबनाचा नंबर हा नेहमी दुसराच असतो याची जाणीव मला आहे.
पहिले हे नेहमी मूळ सृजन! तरी कौतुकाबद्दल आभारी आहे.