देवनागरीत कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:09

नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्‍यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU

विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.

'दु।ख' वगैरे शब्दातले मधले दोन टिंब कसे टाईप करतात मा. बो. वर? दरवेळेस मला हे शब्द 'बरहा' त टाईप करून इथे पेस्ट करावे लागतात.

>>ब्राउजर कुठला वापरत आहात आणि विंडोज /मोबाईल काय वापरत आहात ते कळवाल का?
IE 10, Windows 7 Home Premium... The only change is now IE 10 previously IE 9.

same problem mala pan hotoy...... pahilyanda pratisaad detana....marathi yet ch nai.......
adhi pratisad dyava lagto ani mag "sampadan" madhe gel ki marathi type karata yetay Sad

आता मराठी type होतय ......
Please help....... !

aataa

जमले बाबा एकदाचे.
धन्यवाद इब्लीस, फायर फॉक्स डाऊनलोड केल्यावर मला मराठीत लिहीता येऊ लागले आहे.
I E मधून नाहि जमले

फायर फॉक्स डाऊनलोड केल्यावर मला मराठीत लिहीता येऊ लागले आहे <<
शाळांमध्ये 'फायर फॉक्स डाऊनलोड' सक्तीचं केलं पाहिजे म्हणजे Proud

त्यापेक्षा सरळ गुगल मराठी वापरा. म्हणजे IE, गुगल काहीही असले तरी लिहिता येते.
तसेही इंग्रजीतच लिहिले तरी काय फरक पडतो?

शाळांमध्ये 'फायर फॉक्स डाऊनलोड' सक्तीचं केलं पाहिजे म्हणजे फिदीफिदी >>>>>>>> +१०००००००

सोबत लिनक्स असेल तर बेस्टच... उगाच खिडक्या त्रास देतात Happy

माझे पूर्वी केलेले सर्व लि़खाण 'मराठी सॉफ्टवेअर उपकरण' या भारत सरकारने वितरित केलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून akruti marathi B_yogini या फाँटमध्ये ms word मध्ये लिहिलेले आहे. ते इथे कसे प्रकाशित करता येईल?

Pages