फेब्रुवारी २०१२ मधे मला डॉ दाभोलकरांचा फोन आला. "दैववादाची होळी हा अंनिसचा कुंडली जाळण्याचा कार्यक्रम आहे. मला माझी कुंडली कार्यक्रमात जाळायची आहे. मला कुंडली तयार करुन पाठव."
" ठीक आहे द्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख, जन्मस्थळ."
"ही घे १ नोव्हेंबर १९४५ सातारा सकाळी ७ वाजता."
" ठीक आहे पाठवतो."
२००८ मधे झालेल्या अंनिसच्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पात मी समन्वयक होतो.त्यावेळी मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या सर्व कुंडल्या मी तयार केल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते की तुमची कुंडली एकदा ज्योतिषांना अभ्यासाला दिली पाहिजे.सध्या ज्योतिषांच्या कुंडलीत दाभोलकर नावाचा ग्रह वक्री दिसतोय.ते नेहमी प्रमाणे निरागस हसले.
नोव्हेंबर १९९५ साली सातारा येथे आखिल भारतीय ज्योतिषांचे संमेलन झाले होते.त्यावेळी ज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका अंनिस ने घेतली होती. कृष्णराव वाईकर हे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी काही कडव्या हिंदूत्ववादी संघटनांना हाताशी धरुन हा धर्मावर घाला आहे अशी भूमिका घेतली होती.ज्योतिष हे धर्माचे अंग आहे. ज्योतिषाला आव्हान म्हणजे धर्माला आव्हान अशी मांडणी करुन अंनिसला दमात घेण्याचा प्रयत्न केला होता.अंनिस च्या कार्यकर्त्यांनी आपल्या बायकोचे कूंकु पुसुन यावे अशा आशयाची भाषा वापरली. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्स ने त्याची दखल घेउन कुंकवाची उठाठेव असा अग्रलेख लिहिला होता.अंनिसने या धमक्यांना भीक न घालता त्याही वेळी कुंडल्या जाळण्याचा कार्यक्रम केला होता. अशा कार्यक्रमात ओम,गणपतीची प्रतिमा अशा हिंदुत्वाच्या प्रतिकांचे दहन होणार नाही याची काळजी घेतली.कारण उगीचच भावना दुखावल्याचे भांडवल व्हायला नको.कुंडली हा आराखडा आहे. तो जाळून काय होणार आहे? लोकांच्या ज्योतिषावरील विश्वासाला त्यामुळे थोडाच तडा जाणार आहे? अशा आमच्यासारख्या काही लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणत अहो हे शेवटी प्रतिकात्मक असत.
आज दाभोलकर आपल्यात नाहीत.दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी दाभोलकरांचा २० ऒगस्ट २०१३ रोजी सकाळी सात सव्वासात च्या दरम्यान क्रूरपणे खून केला.भाडोत्री खूनी कदाचित सापडतीलही पण त्यामागच्या मास्टर माईंडचे काय? दाभोलकरांवर प्रेम करणारे अनेक ज्योतिष भाविक देखील आहेत.अनेक ज्योतिषी त्यांच्या कुंडलीवरुन आता ग्रहयोग खून दर्शवत होते असे सांगत फिरतील. कुंडलीतील शनि मंगळ युती कशी घातक ठरली हे सांगतील.जन्मवेळ व मृत्युची वेळ ही जवळपास एकच कशी होती हे सांगतील.त्यावेळी मंगळ कर्केत प्रवेश करीत होता हे सांगतील.पण त्यांनी आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरुन सांगाव हे त्यांना अगोदर सांगता आल असत काय?
(पुर्वप्रकाशित ब्लॉग व ऐसी अक्षरे)
कुंडली एका नरेंद्राची
Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 October, 2013 - 03:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेच लॉजिक ताणुन पुढे
हेच लॉजिक ताणुन पुढे सेकंदांपर्यंत देखिल आणता येईल. वर ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाची डाउनलोड करुन घेण्याची लिंक दिलेली आहेच. जिज्ञासू लोक वाचू शकतात.
भविष्य पाहण्याच्या अनेक
भविष्य पाहण्याच्या अनेक पद्धती आहेत . पण त्यापेकी कोणती एक पद्धत परिपूर्ण अशी म्हणता येणार नाही .त्यामुळे जास्तीत जास्त अचूकतेकडे जाणारी कृष्णमुर्ती पद्धती हि भारतीय ज्योतिष शास्त्रातील अनेक पद्धतीपेकी अतिशय प्रभावी पद्धत आहे.
चेन्नई चे प्रो. के. एस.कृष्णमुर्ती ह्यांनी बरेच वर्षे आपल्या अभ्यासातून आणि अनुभवातून हि पद्धत शोधून काढली . ह्यासाठी त्यांनी आपले पारंपारिक ज्योतिषशास्त्र व नाडी ग्रंथ ह्याचा अभ्यास केला. त्यांनी शोधून काढलेली भविष्य कथनाची हि पद्धत म्हणजेच "कृष्णमुर्ती पद्धती".
ह्या पद्धतीमध्ये नक्षत्राचा बराच अभ्यास केला आहे.कोणताही ग्रह हा त्याच्या दशेत , अंतर्दशेत तो ज्या स्थानी आहे त्या स्थाना संबंधी फळे न देता त्याचा नक्षत्रस्वामी ज्या स्थानात आहे त्यास्थानाची व त्याच्या ( नक्षत्रस्वामीच्या )राशी ज्या स्थानात आहेत त्या स्थानाची फळे अधिकतेने देतो. असा नवीन सिद्धांत कृष्णामुर्तीनी मांडला आहे. ह्या नवीन नियमाचा बऱ्याच वेळा अनुभव येतो .
तसेच कृष्णमुर्ती पद्धती मध्ये प्रश्नकुंडली हा अतिशय उपयोगी प्रकार आहे त्यायोगे नोकरी कधी मिळेल ? लग्न कधी होईल? हरवलेली वस्तू सापडेल का? कुठे? अशा कितीतरी प्रश्नाची उत्तरे तारखेवारी देता येतात .
अर्थात त्यासाठी फार सरावाची आणि खूप अभ्यासाची गरज आहे.
प्रश्नकुंडली ? जेव्हा
प्रश्नकुंडली ?
जेव्हा जातकाच्या मनात काही प्रश्न असतात, उदाहरणार्थ, मला प्रमोशन कधी मिळेल? घर कधी बांधून होईल? हरवलेली वस्तू सापडेल का? मॅचमध्ये भारत जिंकेल का? जेव्हा असा एखादा प्रश्न कुणी ज्योतिष्याला विचारतो तेव्हा ज्योतिषी लगेच किती वाजले आहेत ते पाहून त्यावेळेची कुंडली मांडतो. तिला प्रश्न कुंडली म्हणतात. फलज्योतिषात कृष्णमूर्ती किंवा नाक्षत्रज्योतिष नावाची पद्धत आहे. या कृष्णमूर्तीचा तत्वज्ञ जे. कृष्णमूर्तीशी काही संबंध नाही. या पद्धतीत प्रश्नकुंडलीला विशेष महत्व आहे. असे समजा की एका निवडणुकीतले दोन प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच वेळी एका ज्योतिष्याकडे गेले. दोघांनी ज्योतिष्याला विचारले की मी निवडणूक जिंकेन का ? आता पंचाईत आली! दोघांच्या प्रश्नाची वेळ एकच म्हणून दोघांची प्रश्नकुंडली एकसारखीच येणार. दोघांनाही एकच भविष्य कसे सांगायचे ? मग अशा वेळी ज्योतिषी काय युक्ती करतो तर त्या दोघांना १ ते २४९ पैकी कुठलाही एक आकडा मनात धरायला सांगतो. दोघेही एकच आकडा धरण्याची शक्यता फारच कमी असते. मग त्या आकडयाशी संबंधीत असलेली प्रश्नकुंडली मांडून ज्योतिषी त्याना भविष्य सांगतो ! या पद्धतीवर काही ज्योतिषी असा आक्षेप घेतात की तिच्यात जन्मकुंडलीचा विचारच होत नाही. पण धंदेवाईक ज्योतिष्यांना ही पद्धत सोयीची आहे कारण, अचूक जन्मवेळ तर राहोच पण जन्मवर्ष सुद्धा ज्यांना माहित नाही असे खूप लोक असतात. त्यांची जन्मकुंडली कुठून असणार ? मग तशा लोकांचे भविष्य कसे सांगायचे ? पण प्रश्नकुंडलीच्या पद्धतीमुळे अशा लोकांची - व ज्योतिष्यांचीही - सोय झाली आहे.
या पद्धतीबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'आत्मपुराण` पुस्तकात सांगितलेला एक मजेदार किस्सा विचार करायला लावणारा आहे. गुरु-शिष्य परंपरेतून शिकलेल्या महादेवशास्त्रींनी पणजीत दारावर पाटी लावून भविष्य सांगणे चालू केले. तिथल्या लोकांचे प्रश्न काय असणार तर आमची गाय हरवली आहे, ती केव्हा सापडेल ? बाहेरगावी गेलेला पाहुणा कधी परत येईल? असले प्रश्न. महादेवशास्त्री मारे प्रश्नकुंडली मांडून उत्तरे देत. पण गंमत काय व्हायची की गाय दोन दिवसांनी सापडेल असे सांगावे तर ती संध्याकाळीच गोठयात हजर व्हायची! पाहुणा पंधरा दिवसानी येईल असे सांगावे तर तो दुसऱ्याच दिवशी टपकायचा! त्यांची भविष्यवाणी खरी ठरेना. तेव्हा त्यांनी त्याच गावातील एका ज्येष्ठ ज्योतिषाचे शिष्यत्व पत्करले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे महाशय पृच्छकालाच बोलायला लावीत. त्याच्याच कडून इतिहास-वर्तमान वदवून घेत. 'आशां कालवती कुर्यात्।` व 'कालं विघ्नेन योजयेत्।` अशा द्विसूत्रीचा वापर करून जातकाला संदिग्ध भाषेत भविष्य सांगत. ही त्यांची पद्धत पाहून, तिच्यात जातकशास्त्र कुठ आलं अशी भाबडी शंका महादेवशास्त्रींनी विचारली. '' जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाचे आधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात. इथं शब्दजंजाळ कामाला येतं. समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून भविष्य सांगायचं ते बरं असंच सांगायचं अन् त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. तुमच वाक्चातुर्य जेवढं प्रभावी तेवढं तुमचं भविष्य बरोबर........`` शेवटी महादेवशास्त्रींनी विचार केला. किती दिवस मी स्वत:ला व लोकांना फसवत राहू? त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरलं व पणजीहून आंबेडयाला परत आले.
( उधृत- ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद)
प्रकाश घाटपांडे मला यातल
प्रकाश घाटपांडे मला यातल जास्त काही कळत नाही परंतु माझे सासरे श्री. विजय दिगंबर रानडे स्वतः ज्योतिषी होते. कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका पहाण्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता आणि अतिशयोक्ती नाही परंतु ९९% लोकांच्या बाबतीत त्यांनी अभ्यासलेल्या पत्रिकांबद्दल वर्तवलेल भविष्य अचुक आलेल मी स्वतः अनुभवलेल आहे.
बरेच लोक आमच्याकडे आपल्या मुलांच्या लग्नाविषयी विचारायला येत. तेव्हा ते विवाहेच्छुक मुलासाठी/मुलीसाठी कोणी स्थळ बघाव इथपासुन ते त्या मुलाच्या/मुलीच्या जोडीदाराची आद्याक्षरेदेखील सांगत असत. या आणि अशा अनेक गोष्टी मी स्वतः गेल्या ६ वर्षात अनुभवल्या आहेत.
मी त्यांच्याकडुन नेहमी ऐकायचे की जर तुम्हाला चांगला ज्योतिषी बनायची मनापासुन ईच्छा असेल तर गणपतीची उपासना करणे अतिशय आवश्यक आहे. ते स्वतः रोज संध्याकाळी "गं गणपतये नमः" हा जप १० माळा करत असत. अगदी आजारपणात देखील त्यांनी जप करणे सोडले नाही. मला वाटत की अभ्यासाच्या जोडीला दैवी शक्ती आणि स्वच्छ मन असेल तर हातात घेतलेल कोणतही काम हे नक्कीच यशस्वी होत.
जाता जाता अजुन एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते माझे सासरे कधीही पत्रिका बघण्याचे पैसे घेत नसत.... कोणी खूपच आग्रह करु लागल तर ते त्यांना पैसे पंचांगावर किंवा आमच्या घरी एक ल़क्ष्मीची मूर्ती आहे त्या मूर्तीसमोर ठेवायला सांगत असत. पण व्यवसाय म्हणुन त्यांनी कधीही या गोष्टीकडे बघितल नाही तो त्यांचा एक छंद होता आणि त्यांनी तो छंद म्हणुनच जोपासला जवळ जवळ ३५ ते ३६ वर्ष.....
>>>> तर गणपतीची उपासना करणे
>>>> तर गणपतीची उपासना करणे अतिशय आवश्यक आहे. <<<<
मुग्धा, बरोबर.
मी लिंटी म्हणून आज इथे जे काही मांडत असेन, तर त्याचेही श्रेय सारसबागेच्या श्रीसिद्धिविनायकाकडेच जाते. मी तिथे शाळकरी वयातील लहानपणापासून बौद्धिकदृष्ट्या जे जे आवश्यक ज्ञान/कला-कौशल्य मागितले, ते ते पुढील काळात आपसूक/विनासायास माझे समोर येत गेले/मिळत गेले.
>>अतिशयोक्ती नाही परंतु ९९%
>>अतिशयोक्ती नाही परंतु ९९% लोकांच्या बाबतीत त्यांनी अभ्यासलेल्या पत्रिकांबद्दल वर्तवलेल भविष्य अचुक आलेल मी स्वतः अनुभवलेल आहे.<<
मुग्धाताई ही अतिशयोक्ती वाटते. परंतु ती आपल्या सासर्यांवरील प्रेम व आदरापोटी आहे.तशीच ती फलज्योतिषावरील असलेल्या गूढ वलयामुळे आहे. ९९ टक्के ही टक्केवारी फार मोठी वाटते. ही आपण सर्वसाधारण निरिक्षणातू काढलेली आहे हे उघड आहे. त्यामुळे मी काही लगेच डेटा मागत नाही. संभाव्यताशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटी. याचा मोठा उपयोग भाकिते वर्तवणाऱ्यांना होतो. याचे नित्य परिचयातले उदाहरण म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल याचे भाकीत. ते भाकीत पन्नास टक्के बरोबर येणारच असते, पण सामान्य लोक मात्र भाकीत बरोबर ठरल्याचे श्रेय ज्योतिषाला देतात. असे संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे ते जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकालाच असते. ती उत्कंठा भागवणारा कुणीही माणूस दिसला की लोक त्याच्यामागे लागतात. समजा, तुम्हाला हस्तरेषांतले काहीही कळत नाही, तरी पण तसा आव आणून व थोडी हुषारी वापरून तुम्ही जरा थापा मारायला सुरुवात करा. लगेच तुमच्या परिचयातले लोक, मुलं, मुली सुद्धा हात पुढे करतील, याचा अनुभव घेऊन पहा! तुम्हाला ज्योतिषातले थोडेफार कळते एवढा सुगावा लागायचाच अवकाश की तुमच्या आप्त परिवारातले लोक तुम्हाला आपले भविष्य सांगायचा आग्रह धरतात की नाही ते पहा. एवढे लांब कशाला, पेपरात येणा या राशी-भविष्याचा तुमचा स्वत:चा काय अनुभव आहे त्याचा विचार करा. त्या भविष्यात काही अर्थ नसतो हे ठाऊक असूनही तुम्ही अधूनमधून का होईना पण तुमच्या राशीचे भविष्य वाचताच ना! "राशीचक्र" चा प्रयोग पाहून आलेल्या प्रेक्षकांना त्यांचे मत विचारा, करमणूक भरपूर झाली, राशींची वर्णने काही पटली, काही नाहीत असेही म्हणतील, तरीपण प्रयोगाची लोकप्रियता काही कमी व्हायची नाही!
हे शास्त्र जर भ्रामक असेल तर त्याचे अनुभव लोकांना कसे येतात ? या शंकेचे उत्तर असे आहे की, नरबळी देणे, चेटूक, जारणमारण, भानामती, भूत काढणे, जट येणे, शुभ-अशुभ शकुन, गणपती दूध प्याला अशा कितीतरी वेडगळ अंधश्रद्धांंचे अनुभव लोकांना येत असतात म्हणून तर त्या आजवर टिकून राहिलेल्या आहेत. फलज्योतिषाचेही असेच अनुभव लोकांना येत असतात, पण त्या अनुभवांच्यामुळे हे खरे शास्त्र आहे असे सिद्ध होत नाही. वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शक्यतेच्या आधारे वर्तवलेली 'भाकिते` वेगळी व फलज्योतिषाच्या आधाराने वर्तवलेली भाकिते वेगळी, पण दोन्हींची गल्लत लोक करतात. भाकिते खरी ठरली तरी त्यामागचा कार्यकारणभाव न तपासताच खरी ठरलेली भाकिते जणू काही ज्योतिषाचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून गणले जाते. आता हे भाकीत पहा :- ' तुमच्या मुलाला लवकरच नोकरी लागेल व ती यंत्राशी संबंधीत असेल.` आता कुठेही नोकरी लागली तरी या यंत्रयुगात यंत्राशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येतोच. खऱ्या ठरलेल्या भाकितांची यादी जशी देता येते तशी खोटया ठरलेल्या भाकितांची यादी पण देता येते. चुकलेली भाकिते लोक विसरून जातात पण खरी झालेली भाकिते मात्र पक्की लक्षात ठेवतात. अशा अनेक कारणांमुळे फलज्योतिषाला एक फसवी प्रतिष्ठा लाभते.
>>मी त्यांच्याकडुन नेहमी ऐकायचे की जर तुम्हाला चांगला ज्योतिषी बनायची मनापासुन ईच्छा असेल तर गणपतीची उपासना करणे अतिशय आवश्यक आहे. ते स्वतः रोज संध्याकाळी "गं गणपतये नमः" हा जप १० माळा करत असत. अगदी आजारपणात देखील त्यांनी जप करणे सोडले नाही. मला वाटत की अभ्यासाच्या जोडीला दैवी शक्ती आणि स्वच्छ मन असेल तर हातात घेतलेल कोणतही काम हे नक्कीच यशस्वी होत. <<
इथे एखाद्या ज्योतिषाची श्रद्धा जर गणपती पेक्षा अन्य देवतेवर अधिक असेल तर तो तिची उपासना करणे आवश्यक आहे असे म्हणेल. काही ज्योतिषी हे अभ्यासापेक्षा अंतस्फुर्तीला अधिक महत्व देतात. अंतस्फुर्तीला उपासना आवश्यक असते असे त्यांचे म्हणणे असते. आपल्या सासर्यांनी ज्योतिषाच्या माध्यमातुन अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे हे आपल्या लिखाणावरुन जाणवते. अशी अन्यही उदाहरणे आपल्याला दिसतात. पण अशा फलज्योतिषाचा खगोलशास्त्रीय वैज्ञानिकतेशी संबंध नाही. व्यवसाय म्हणुन केला तर तो वाईटा व छंद म्हणुन केला तर तो चांगला असे ही मी मानत नाही. सूज्ञ ज्योतिषी हे तुमचे मानसमित्र बनतात. पुर्वी कुठे मनाच्या आरोग्यासाठी मानसोपचार तज्ञ होते? त्याची गरज ज्योतिषी भागवत. आजही ती परिस्थिती आहेच.
अगदी बरोबर मुग्धा
अगदी बरोबर मुग्धा ,
कृष्णमूर्तीनी सुद्धा प्रश्नकुंडलीला 'दैवी मार्गदर्शन 'असे म्हटले आहे . त्यामुळे अभ्यासाबरोबरीने अध्यात्मिक बैठक पण तेवढीच महत्वाची आहे.
फलज्योतिष, कुंडली हे थोतांड
फलज्योतिष, कुंडली हे थोतांड आहे .........
१. आकाशस्थ ग्रह-तारे आपल्या प्रारब्धावर परिणाम करतात की त्यांचे स्थान आपल्या प्रारब्धाची दिशा दाखविते ?
२. जर ते दिशादर्शक आहेत तर त्यांची पूजा-अर्चा करून प्रारब्ध कसे बदलणार ?
३. जर त्यांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो … तर त्यामागील कार्य-कारणभाव स्पष्ट करा ..कोणते प्रयोग करून ही अनुमाने काढली गेली ?
४. त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर पृथ्वीसारखे आपल्या जवळचे प्रचंड वस्तुमान पत्रिकेत का नाही ?
५. मंगळ आणि गुरुच्या मधील उपग्रहांचा पट्टा का धरला जात नाही ? ज्यामध्ये सेरेस सारखे हजार किमी व्यासाचे प्रचंड गोल आहेत
६. शनीला टायटन आणि गुरूला गनिमिड नामक चंद्र आहेत ते बुधापेक्षा मोठे आहेत … शिवाय प्रत्येकी 60 चंद्र आहेत … त्यांच्या वस्तुमानाचे काय?
७. जर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर राहू-केतू मुळात नाहीतच …. ते ग्रहणात भासणारे भासमान बिंदू आहेत … मग वस्तुमान नसताना गुरुत्व कोठून येणार ?
८. अवकाशातील या ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो असे आपले गृहीतक आहे … पण मुळात पत्रिकेतील त्यांचे स्थान हे खरे स्थान नाहीच …. तो आपल्या डोळ्यांना होणारा भास आहे हे आपण शोधून काढले आहे …. मग खऱ्या स्थानाप्रमाणे बदल कधी करणार ?
९. जग सपाट आहे पासून …. सूर्य-केंद्रित विश्व … नंतर आकाशगंगा अशा नवनवीन गोष्टी समजत गेल्या पण पत्रिकेत उजळणी का केली नाही ….
१०. अल्बर्ट आईन्स्टाईन ने सापेक्षतावाद सिद्धांत मांडला …त्यानंतर खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रीय धारणेत क्रांतिकारी बदल झाले …. न्यूटनसारख्या विख्यात वैज्ञानिकाचे mechanics सुद्धा या बदलातून सुटले नाही …. मग फल-ज्योतिषात बदल का झाले नाहीत … सोपे करून सांगायचे तर … वेळ, वस्तुमान आणि वेग या तिन्हींच्या अभ्यासात सापेक्षतावादाने आमूलाग्र बदल आणले …. तरीही आमच्या पत्रिका आणि वेळेचे गणित तसेच !!!! अणुविज्ञान आणि लघुकणांचा अभ्यास असो किंवा खगोल शास्त्रातील कृष्णविवारांसारखे शोध असोत … ते लागले कारण भौतिकशास्त्री न्यूटनच बरोबर असा आंधळा आग्रह धरून तिथेच थांबले नाहीत
ह्म्म.. इंटरेस्टींग. मलाही
ह्म्म.. इंटरेस्टींग. मलाही खुप उत्सुकता आहे ज्योतिषी मृत्युवेळ ठामपणे सांगु शकतील का ते जाणण्याची. मी फलज्योतिष शिकण्याच कारणच कै. नरेंद्र दाभोळकरांबरोबर झालेला पत्रव्यवहार होता ( १९९२ ) ज्योतिषशात्राच्या वर्गात गेल्यावर पहिलाच धडा मिळाला की कोणाच्याही मृत्यु वर्तवु नये कारण ज्योतिषशात्राच्या सहायाने हे १०० टक्के बरोबर येणे शक्य नाही.
असही ज्योतिषाच्या आधारे वर्तवले जाणारे भविष्य हा अंदाज असतो.
सुदैवाने ज्योतिषकला म्हणजे
सुदैवाने ज्योतिषकला म्हणजे तद्दन टाकाउ आहे (ज्योतिषांसाठी नाही
) हे कळण्यासाठी मला घाटपांडे सरांएव्हडा अभ्यास करावा लागला नाही. हे एक थोतांड आहे हे एव्हड्या संयमाने सांगण्याचं त्यांचं कौतुक वाटतं.
ज्योतिष विद्या हि जगणे सुसह्य
ज्योतिष विद्या हि जगणे सुसह्य करण्याकरता वापरावी."मृत्यू कधी होईल ? " असे प्रश्न विचारण्यापेक्षा
टाळता येण्यासारखे आजार , लग्न , संतती ,नोकरी करावी कि व्यवसाय ?कोणते शिक्षण घेणे चांगले? कोणत्या क्षेत्रात करियर करावे ? अशा अनेक प्रश्न आहेत . ज्या साठी हे
मार्गदर्शन उपयोगी पडू शकते विशेषत: आपण जेव्हा
दोन पर्यायापेकी कोणता एक पर्याय निवडावा या बाबतीत गोंधळलेले असतो . तेव्हा याचा नक्की उपयोग होतो .
फसवेगिरी म्हणाल तर ती प्रत्येक क्षेत्रात आहे आणि अचूक भविष्याचे म्हणाल तर ज्योतिषी सुद्धा माणूसच
आहे त्यामुळे भाकीत चुकू शकते. प्रत्येक निष्णात डॉक्टरचे निदान दर वेळेस बरोबर येतेच असे नाही हि शक्यता गृहीत धरूनच बरेच वेळा लोक सेकंड ओपिनिओन घेतात .
कोणत्याही माणसाला खोटे नाटे सांगून फसवू नये . असे भविष्य कधी सांगू नये ज्याने त्या माणसाला नैराश्य येईल . ज्योतिष हे आयुष्य जास्तीत जास्त सुखी कसे होईल
हे बघण्यासाठी वापरावे .
बाकी ज्योतिष हे शास्त्र आहे / विद्या आहे/ कला आहे ह्या वादात पडण्याची काय गरज ? फक्त त्याचा दुरुपयोग होत नाही ना हे महत्वाचे . ज्यांना थोतांड वाटते त्यांनी ह्या पंथाला जाऊ नये.
ज्योतिष खर नक्की आहे
ज्योतिष खर नक्की आहे का?
असल्यास मी इथे माझी जन्मवेळ आणि तारिख, ठिकाण सांगतो,,,, माझे भविष्य सोडा,,, भूतकाळ सांगणार का?
गगोवरच्यांना माहीत आहे थोडेफार,, त्यामुळे जस्टीफाईड पण होईल,,
बोला,,,
।।।
।।।
उदयन ज्योतिष खर नक्की आहे का?
उदयन
ज्योतिष खर नक्की आहे का? हा प्रश्न कैक शतके चघळला जातो आहे. त्याच सोप उत्तर म्हणजे ज्यांची ज्योतिषावर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी ते खर आहे व ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्यासाठी ते खोट आहे. काही लोकांना ज्योतिष पाहिले की बर वाटत हे मात्र खर. त्यांना ते खर आहे कि खोट याच्याशी काही घेण देण नसत. असो
या धाग्यानिमित्त लोकांच्या मनात प्रश्न निर्माण व्हावे हा माझा हेतु होता.
माझा ज्योतिषा वर फारसा
माझा ज्योतिषा वर फारसा विश्वास नव्हता. कारण भविष्य बघावे अशी परिस्थिती निर्माणच झाली नव्हती. आमच्या ऑफिस मधे साधारण २००९ च्या जुलै महिन्यात एका क्लायेंट्चं आगमन झालं...त्यांचा एकंदर अवतार ( धोतर, कपाळाला टिळा, झब्बा) बघता हे पुजारी असावेत असं वाटलं..... मी फारसं लक्ष दिलं नाही.... माझी मैत्रिण सांगत आली की ते फार मोठे ज्योतिषी आहेत. मी बीझी असल्याने जास्त उत्सुकता दाखवली नाही. तिच्या केबीन मधे सगळे त्यांच्या भवती जमले होते. नंतर दुपारी जेवताना मैत्रिण जरा अस्वस्थ होती. खोलात जाउन विचारल्यावर ती म्हणाली की तिने त्यांना हात दाखवुन भविष्य विचारले. आर्थातच करीअर बद्दल.... त्यांनी फटकन सांगितले की तुम्ही ८ ऑगस्ट नंतर या कंपनीत नसाल. तुम्हाला काढुन टाकले जाईल. त्या पेक्षा स्वतःच दुसरी नोकरी शोधा. खरंतर तेंव्हा आमच्य कंपनीत अशी काहीच सिच्युएशन नव्हती. त्या मुळे मी तिला उडवुन लावलं..... पण मला ह्या प्रकारावर विश्वास ठेवावाच लागला... कारण खरच तिला ७ ऑगस्ट्ला एका दिवसाची नोटिस कंपनीने दिली आणि ८ तारखे पासुन पुर्ण नोटिस पिरेड चा पगार देवुन तिला टाटा केलं....... कारण काहीतरी फुसकं होतं..... नंतर कळलं की बॉस ने काही अपमानांचा बदला घेतला होता.....
नंतर त्यामैत्रिणीचा ह्यांच्यावर खुप विश्वास बसला. ती मला घेवुन तिच्या मुलाचं भविष्य विचारायला गेली. त्या वेळेस तो बारावीत होता व इंजिनीअरींग ची एंन्ट्रन्स देणार होता. त्यांनी सांगितले की ह्या वर्षी तो नापास होइल पुढल्या वर्षी तो पास होइल पण चांगल्या कॉलेजात प्रवेष मिळण्या एवढे मार्क नसतिल. कुठेतरी कोपर्यातल्या कॉलेजात प्रवेष मिळेल. आणि तसच झालं. पुढल्या वर्षी प्रवेष मिळाला आणि तो ही रत्नागीरीच्या कॉलेजात.
ह्या उदाहरणां मुळे माझ्या नवर्याने आपली पत्रिका त्यांना दाखवली. त्यांनी काहीही न सांगता पुर्वायुष्य बरोबर ओळखलं...... पुढल्याही काही घटना सांगितल्या. आणि मग मात्र मी ह्या शस्त्रा बद्दल थोडी सीरीयस झाले. स्वतः अभ्यास करायचं ठरवलं..... पण जसं मागे एकदा लिहिलं तसं भविष्य ही आंधळ्याची काठी आहे, डोळे नव्हेत. साधारण गेली २ वर्ष कृष्ण्मुर्ती, भावनवमांश आणि पारंपारीक ह्या तिन्ही पद्धतींचा अभ्यास केला. त्या पुढे जावुन टॅरो, क्रिस्टल थेरपी, सेकीम थेरपी ह्यांचाही शास्त्र शुद्ध अभ्यास केला. काही आश्चर्य कारक अनुभव आले. त्या वरुन आलेले निष्कर्ष
१. मृत्यु अचुक सांगणं महा कठीण. फक्त काही आडाखे बांधता येतात : जसे, आयुर्मर्यादा, वाईट काल, मृत्यु कशा मुळे येइल, कुठे येइल, इ.इ. साधारण वरील उदाहरणात अष्टमात हर्षल त्या मुळे अकस्मित मृत्यु नक्की. अष्टमेश शुक्र १२ व्या स्थानात त्या मुळे घरा पासुन वा रहात्या शहरा पासुन दूर मरण नक्की, त्या दिवशी ( २०/०८/२०१३) गोचरीचा चंद्र १२ व्या स्थानात होता आणि शनी महादशेतिल मंगळाची अंतर्दशा होती. काळ कठीण होता.
२. ज्योतिषी हा काही लोकांसाठी काउंसिलर चं काम करतो. काही धोके जे नजिकच्या काळात आहेत त्यांची जाणीव करुन देवु शकतो.
३. मृत्यु भविष्य सांगण्या पेक्षा जर कोणाच्या आयुष्यात उभारी आणु शकलात तर तुम्ही चांगले ज्योतिषी.
४. जसं माझं आध्यात्म माझ्या जवळ, तसचं आपली आधार स्थाने/ मनोबल वाढवणार्या गोष्टी आपल्या जवळ. तुमचा विश्वास आहे ना ह्याला महत्व आहे. शेवटी सगळं प्रयत्नांवर आहे. जर कोणी साधु/ज्योतिषे तुम्हाला काही पुजा/व्रत इ.इ. सांगत असेल तर तो बोगस आहे हे सरळ मान्य करावे.पुजा/ व्रतं ही मनोबल सुधारण्य साठी आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढवण्या साठी करणार असाल तर जरुर करा. अशी कोणत्याही ग्रहाची शांती वगैरे होत नाही
५. हा अभ्यास केल्या मुळे माझ्यात झालेला बदल. सगळे उपास बंद केले. रोजचं मेडिटेशन सुरु केलं. गणपतीचं विसर्जन बंद केलं धातुची मुर्ती करुन घेतली. सगळी व्रतं उदा: वट्पौर्णिमा, हरतलिका, इ.इ. पुर्ण पणे बंद, देवळात जाणं सोडलं, खुप शांत झाले. राग फरच कमी झाला. घरतल्या लोकांशी संबंध एकदम सुधारले. एक प्रकारची हार्मनी आली. नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. स्वतःला झेपतिल तेवढे क्लयेंट ठेवुन विषया शी टच मधे आहे. एक प्रकारची वेगळीच शांती स्वभावात आली.
हा माझा अनुभव. त्या मुळे भविष्य सांगता येतं का? मृयुत्यु सांगता येतो का? ते खरं असतं का? इ.इ. सग्ळे प्रश्ण फोल आहेत. कारण जगण्या साठी त्यांची गरज नाही. जगणं शेवटी जगायचच असतं. ते कोणाला चुकत नाही. जगणं हे शाश्वत सत्य आहे. त्या कडे फोकस करुया.
तुम्हाला काय वाटतं?
माझी श्रध्दा वगैरे काही नाही
माझी श्रध्दा वगैरे काही नाही कशावर ही............
पण...शास्त्र आहे तर सांगावे ना... त्यात काय...यात कुठे आला संशय आणि श्रद्धेचा विषय ? जे घडुन गेले ते सांगा म्हणालो...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे नक्की काय प्रतिक्रिया
इथे नक्की काय प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. भविष्य हे थोतांड आहे अशा की अभ्यासाकरता पत्रिका असा?
मोकीमी, छान पोस्ट. >>>> त्या
मोकीमी, छान पोस्ट.
>>>> त्या दिवशी ( २०/०८/२०१३) गोचरीचा चंद्र १२ व्या स्थानात होता आणि शनी महादशेतिल मंगळाची अंतर्दशा होती. काळ कठीण होता.<<<< घातचक्राचा संदर्भदेखिल घ्या.
>>>> फक्त काही आडाखे बांधता येतात : जसे, आयुर्मर्यादा, वाईट काल, मृत्यु कशा मुळे येइल, कुठे येइल, इ.इ. <<<< बरोबर, आयुष्यातील गंडांतरांचा अंदाज नक्कीच बांधता येतो, दोरी बळकट असेल, महापुरुषांचे आशिर्वाद पाठीशी असतील तर गंडांतरातून सुखरुप बाहेर पडणे होते.
मात्र काही योग इतके दुष्कर असतात की तिथे काहीही उपाय चालत नाही/उपाय व्हावा अशी परिस्थितीही रहात नाही.
मोकिमी खुप छान लिहिलेत.
मोकिमी खुप छान लिहिलेत.
मोकिमी आपण आपल्या मैत्रीणी
मोकिमी
आपण आपल्या मैत्रीणी बाबत चा जो अनुभव सांगितलात तो आपण अनुभवला असल्याने त्याला मी काही खोटे म्हणत नाही.मात्र त्यामागचा कार्यकारण भाव तपासणे गरजेचे आहे. हस्तसामुद्रिक मधे असे ७ ऑगस्ट वगैरे तारीख सांगता येत नाही.ढोबळ मानाने कालखंड सांगतात. त्यामुळे त्या जोतिषाने हात बघितला असला तरी भाकित सांगताना हस्तसामुद्रिक शास्त्राचाच आधारे सांगितले असेल हे संभवत नाही. त्यात अंतस्फुर्ती वगैरे घटक असणार. आता अंतस्फुर्तीच्या आधारे सांगितलेले भाकित खरे ठरते काय? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर ठरु शकते असे द्यावे लागेल कारण हाच प्रश्न तारतम्याने सांगितलेला अंदाज खरा ठरतो काय? असा ही विचारला जाउ शकतो. वर योगायोगाच्या वा संभवनीयतेच्या घडणार्या गोष्टीबद्दल लिहिले आहेच. इतका योगायोग कसा असू शकतो? असा प्रश्न मनात येइल. पण तुला शंभर वर्षे आयुष्य आहे आत्ताच तुझी आठवण काढली होती. अशा प्रकारे आपण त्याचे प्रचिती घेत असतोच ना?
भविष्याची चाहूल घेण्याचे प्रयत्न अनादिकालापासून चालू आहेत. अनंतकाळ ते चालुच राहतील.कुंडली हे अनेक साधनांपैकी एक साधन आहे. बाकी हस्तरेषा, फोटो, सही/हस्ताक्षर, शकुन, न्युमरॉलॉजी वगैरे अन्य मार्गही आहेतच. शेवटी हे अंदाज बांधण्याचे प्रयत्न असतात. कधी खरे ठरतात कधी खोटे.
बाकी२,३,४,५ मुद्दे सर्वसामान्यांच्या दृष्टीने योग्य आहेत. सदसदविवेकबुद्धीने चांगल्या गोष्टी केल्या काय अन ईश्वरावरील श्रद्धेपोटी केल्या काय? चांगल्याला चांगल म्हणाव.
>>>>> भविष्य हे थोतांड आहे
>>>>> भविष्य हे थोतांड आहे अशा? की अभ्यासाकरता पत्रिका असा? <<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्या प्रतिक्रिया मनात उद्भवल्या आहेत त्या प्रामाणिकपणे जशाच्या तशा देणे अपेक्षित असेल
या ज्योतिषवाल्यांचे अनुभव
या ज्योतिषवाल्यांचे अनुभव कोकणातल्या भुतांच्या अनुभवासारखे असतात. कुणीतरी कुणाकडून तरी ऐकलेलं असतं. भविष्य सांगणारी व्यक्ती 'रिचेबल' नसते. कुणीही खणखणीतपणे हा ज्योतिषी आहे आणि हवा तो प्रश्न विचार असं सांगत नाही. बरं, हे ज्योतिषीसुद्धा फुटकळ लोकांची भविष्यसांगण्या पेक्षा मोठ्या लोकांची भविष्य बघून करोडपती का होत नाहीत?
तूर्रमखान, वर मोकिमी नी इतकं
तूर्रमखान,
वर मोकिमी नी इतकं ढळढळीत स्वतःचं आणि मैत्रीणीचं उदाहरण दिलं असता तुम्ही सांगोवांगीचा अनुभव असे का म्हणताय?
निष्कर्ष काय निघाला ?
निष्कर्ष काय निघाला ? एव्हढ्या सगळ्या चर्चेचा ?
निष्कर्ष काय निघाला ?
निष्कर्ष काय निघाला ? एव्हढ्या सगळ्या चर्चेचा ? >>> ज्योतिष हे शास्त्र नव्हे तर्कशास्त्र आहे. इती शरद उपाध्ये
साती, वर मोकिमी नी इतकं
साती,
वर मोकिमी नी इतकं ढळढळीत स्वतःचं आणि मैत्रीणीचं उदाहरण दिलं असता तुम्ही सांगोवांगीचा अनुभव असे का म्हणताय?
> > >
मोकिमी नी जे उदाहरण दिले ( नं. ५ ), त्यावरुन असं काहिच सिद्ध होत नाही जे त्यांना म्हणायचं आहे. आणि जे सिद्ध झालं आहे तेच खरे कारण आहे त्यांच्या मानसिक शांतीमागचे.
आता हे जे सिद्ध झालं आहे ते ईथे बहुतेक बर्याच जणांना जाणवलेच नाही कारण, त्यासाठी वृत्ती तटस्थ असाव्या लागतात.
कोण ताही बाफ वाचतांना ईथे प्रत्येक जण विशीष्ट मनोस्थितीत जातो. तटस्थ राहात नाही कारण राहु दिलं जात नाही.
त्यामुळे रिझल्ट्स आणी त्यांचे रुट कॉज वेगळे वाटतात.
नमस्ते.
@साती: तुम्ही परत एकदा तो
@साती: तुम्ही परत एकदा तो प्रतिसाद वाचा. म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येइल.
काही वर्षापुर्वी सोलापुरात तिथल्या स्थानिक टिव्ही चॅनलने प्रसिद्ध श्री पामिस्ट्री चे संचालक, इतर अनेक मोठ्ठे ज्योतिषी, आणि अंनिसवाल्यांना बोलावलं होतं. हा कार्यक्रम पुण्यात वगैरे झाल्या नसल्यानं फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण त्यानंतर इतके प्रसिद्ध लोकं एका मंचावरती आलेच नाहीत. (चु.भु.दे.घे.) आले असल्यास घाटपांडे सर माहिती देतील). हा कार्यक्रम मी प्रत्यक्ष बघितल्यामुळे माझ्यावर खूप परिणाम झाला. त्या आधी माझा भविष्य-ज्योतिषावर विश्वास होता. वाचन-अभ्यास सुद्धा चालू केला होता. चर्चा ज्या अंगाने जायला हवी होती तशीच गेली आणि ज्योतिषवाल्या मंडळींनी अक्षरशः नागीच टाकली. (शरद उपाध्ये नाहीका शो चा आधिच ज्योतिषविद्या म्हणजे फारश्या गंभीरपणे घेण्याचा विषय नसून मनोरंजनाचा आहे म्हणतात तसंच). तिथल्या एकाही जणात अतिशय साधं निपक्षपाती आव्हान स्विकारायचा आत्मविश्वास नव्हता.
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात त्यांचं ग्रह, स्थान, फळ, संचीत वगैरे चाललं होतं. उत्तर न देता आल्यामुळे आरडा-ओरडा चालला होता. अनिंसवाले मात्र अतिशय शांत आणि संयमाने रोखठोक प्रश्न विचारत होते आणि विचारलेल्या प्रश्नांना टू द पॉईंट उत्तरं देत होते. असो.
राजपूर आणि तुर्रमखान, मी
राजपूर आणि तुर्रमखान,
मी फक्तं 'दुसर्या कुणाचे तरी ऐकलेले अनुभव असतात' या वाक्यावर आक्षेप घेतेय.
कारण वरती मोकिमी स्वतः अनुभव घेतल्याचे सांगतायत.
मोकिमी तुमची पोस्ट आवडली.
मोकिमी तुमची पोस्ट आवडली.
मोकिमी तुमची पोस्ट पटली आणि
मोकिमी तुमची पोस्ट पटली आणि आवडलीही.
Pages