फेब्रुवारी २०१२ मधे मला डॉ दाभोलकरांचा फोन आला. "दैववादाची होळी हा अंनिसचा कुंडली जाळण्याचा कार्यक्रम आहे. मला माझी कुंडली कार्यक्रमात जाळायची आहे. मला कुंडली तयार करुन पाठव."
" ठीक आहे द्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख, जन्मस्थळ."
"ही घे १ नोव्हेंबर १९४५ सातारा सकाळी ७ वाजता."
" ठीक आहे पाठवतो."
२००८ मधे झालेल्या अंनिसच्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पात मी समन्वयक होतो.त्यावेळी मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या सर्व कुंडल्या मी तयार केल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते की तुमची कुंडली एकदा ज्योतिषांना अभ्यासाला दिली पाहिजे.सध्या ज्योतिषांच्या कुंडलीत दाभोलकर नावाचा ग्रह वक्री दिसतोय.ते नेहमी प्रमाणे निरागस हसले.
नोव्हेंबर १९९५ साली सातारा येथे आखिल भारतीय ज्योतिषांचे संमेलन झाले होते.त्यावेळी ज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका अंनिस ने घेतली होती. कृष्णराव वाईकर हे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी काही कडव्या हिंदूत्ववादी संघटनांना हाताशी धरुन हा धर्मावर घाला आहे अशी भूमिका घेतली होती.ज्योतिष हे धर्माचे अंग आहे. ज्योतिषाला आव्हान म्हणजे धर्माला आव्हान अशी मांडणी करुन अंनिसला दमात घेण्याचा प्रयत्न केला होता.अंनिस च्या कार्यकर्त्यांनी आपल्या बायकोचे कूंकु पुसुन यावे अशा आशयाची भाषा वापरली. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्स ने त्याची दखल घेउन कुंकवाची उठाठेव असा अग्रलेख लिहिला होता.अंनिसने या धमक्यांना भीक न घालता त्याही वेळी कुंडल्या जाळण्याचा कार्यक्रम केला होता. अशा कार्यक्रमात ओम,गणपतीची प्रतिमा अशा हिंदुत्वाच्या प्रतिकांचे दहन होणार नाही याची काळजी घेतली.कारण उगीचच भावना दुखावल्याचे भांडवल व्हायला नको.कुंडली हा आराखडा आहे. तो जाळून काय होणार आहे? लोकांच्या ज्योतिषावरील विश्वासाला त्यामुळे थोडाच तडा जाणार आहे? अशा आमच्यासारख्या काही लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणत अहो हे शेवटी प्रतिकात्मक असत.
आज दाभोलकर आपल्यात नाहीत.दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी दाभोलकरांचा २० ऒगस्ट २०१३ रोजी सकाळी सात सव्वासात च्या दरम्यान क्रूरपणे खून केला.भाडोत्री खूनी कदाचित सापडतीलही पण त्यामागच्या मास्टर माईंडचे काय? दाभोलकरांवर प्रेम करणारे अनेक ज्योतिष भाविक देखील आहेत.अनेक ज्योतिषी त्यांच्या कुंडलीवरुन आता ग्रहयोग खून दर्शवत होते असे सांगत फिरतील. कुंडलीतील शनि मंगळ युती कशी घातक ठरली हे सांगतील.जन्मवेळ व मृत्युची वेळ ही जवळपास एकच कशी होती हे सांगतील.त्यावेळी मंगळ कर्केत प्रवेश करीत होता हे सांगतील.पण त्यांनी आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरुन सांगाव हे त्यांना अगोदर सांगता आल असत काय?
(पुर्वप्रकाशित ब्लॉग व ऐसी अक्षरे)
कुंडली एका नरेंद्राची
Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 October, 2013 - 03:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यांची कुंडली मृत्यूपूर्वी
त्यांची कुंडली मृत्यूपूर्वी कुणी पाहिली होती का?
असल्यास तेव्हा काय भविष्य वर्तविले होते?
बहुतेक नाही. कारण त्याविषयी
बहुतेक नाही. कारण त्याविषयी ते इतक्या वर्षात कधी बोलले नाही.
घाटपांडेजी, जरा घाई केलीत
घाटपांडेजी,
जरा घाई केलीत तुम्ही ही कुंडली प्रसिद्ध करण्याची.
ही कुंडली नाव, गावविना प्रसिद्ध करुन विचारायचे तरी होते या व्यक्तीचे भविष्य काय होते? याने काय कार्य केले? यांचा मृत्यूयोग वगैरे.
बघु द्यायचे की कोण अचुकपणे काही भाकित करु शकतो का?
मग आता चिकीत्सा करणे
मग आता चिकीत्सा करणे कठीण.
आता एक करू शकता ही कुंडली जातकाचे नाव न सांगता कुणालातरी दाखवून आकस्मिक / अपमृत्यू योग आहे का विचारून बघा.
राहुल असे प्रयोग यापुर्वी
राहुल असे प्रयोग यापुर्वी झालेले आहेत. कुंडलीवरुन व्यक्ती जिवंत का मृत, स्त्री का पुरुष हे ज्योतिषांना सांगता येत नाही. सु़ज्ञ ज्योतिषी या भानगडीत देखील पडत नाहीत. अधिक माहिती साठी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद हे पुस्तक वाचावे. विशेषतः त्यातील अंनिस बाबतचा प्रश्न.
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/jyotishakade%20janypurvee.pdf
श्री दाभोलकरांची पत्रिका
श्री दाभोलकरांची पत्रिका बघितल्यावर कर्केतील शनि मंगल युती आणि अष्टमातील हर्शल लक्ष वेधून घेत आहेत. त्याची हत्या झाली तेव्हा शनि महादशेत मंगळाची अंतर्दशा होती .बाकी जाणकार मते व्यक्त करतीलच .
भाडोत्री खूनी कदाचित
भाडोत्री खूनी कदाचित सापडतीलही पण त्यामागच्या मास्टर माईंडचे काय?
मास्टर माइंड सापडत नाहीत, असा आजवरचा इतिहास आहे.
कुंडलीवरुन व्यक्ती जिवंत का
कुंडलीवरुन व्यक्ती जिवंत का मृत, स्त्री का पुरुष हे ज्योतिषांना सांगता येत नाही.
>>
असं कसं कुंडलीवरुन व्यक्तीचे आयुष्य (अचुक नाही पण अंदाजे तरी) सांगता येत असेल ना? मग जन्मतारीख आणि आजची तारीख या फरकातून कोणीही माणूस जिवंत आहे की मेलाय सांगू शकेलच.
आम्ही याविषयी प्रयोग केले
आम्ही याविषयी प्रयोग केले आहेत. एका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते. आता कुणी म्हणेल की एखादा ज्योतिषी चुकला म्हणून काय शास्त्र चुकीचे का?
राहुल या विषयी अंनिस चे २१
राहुल या विषयी अंनिस चे २१ लाखांचे आव्हान आहे. तो भाग वेगळा आहे.
>>मग जन्मतारीख आणि आजची तारीख या फरकातून कोणीही माणूस जिवंत आहे की मेलाय सांगू शकेलच.<<
माणसे वयाच्या वेगवेगळ्या वर्षी मरतात.
भारताच्या कुंडलीवरुन सांगा,
भारताच्या कुंडलीवरुन सांगा, कीती गुन्हेगार पुढच्या वर्षी निवडुन येतील.
>>मग जन्मतारीख आणि आजची तारीख
>>मग जन्मतारीख आणि आजची तारीख या फरकातून कोणीही माणूस जिवंत आहे की मेलाय सांगू शकेलच.<<
माणसे वयाच्या वेगवेगळ्या वर्षी मरतात.
>>
एखाद्या व्यक्तिचा जन्म १९८० चा असेल आणि जर ज्योतिषाने त्याचे आयुष्य २० वर्षे सांगितले असेल, तर तो आज म्हणजे २०१३ ला मृत असायला हवा ना!
जर आयुष्य ४० वर्षे असेल तर तो जिवंत.
ह्म्म.. इंटरेस्टींग. मलाही
ह्म्म.. इंटरेस्टींग. मलाही खुप उत्सुकता आहे ज्योतिषी मृत्युवेळ ठामपणे सांगु शकतील का ते जाणण्याची.
भारताच्या कुंडलीवरुन सांगा,
भारताच्या कुंडलीवरुन सांगा, कीती गुन्हेगार पुढच्या वर्षी निवडुन येतील
भारतात जो माणुस लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकिटापर्यंट पोचतो त्याचा तिथवरचा प्रवास स्वच्छ राहु शकतच नाही. त्यामुळे अगदी ५३४ हे उत्तर दिले तरी ते चूकणार नाही
फलाण्या थोर माणसाने आपल्या
फलाण्या थोर माणसाने आपल्या मृत्यूचा दिवस कुंडलीवरून आधीच वर्तवून ठेवला होता, आणि बरोबर त्याच दिवशी त्याला मृत्यू आला, असे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. ज्याला आपल्या मरणाचा दिवस किंवा वेळ आधीच अचूक कळली तो माणूस थोर, अशी समजूत प्रचलित आहे. ते किस्से खरे असतील तर त्याचा अर्थ असा होतो की कुंडलीवरून मृत्यूची तारीख बरोबर सांगता येते. तसे असेल तर मेलेल्या माणसांच्या पाच-दहा कुंडल्या ज्योतिषाला दिल्या तर निदान एका तरी कुंडलीवरून त्या माणसाच्या मृत्यूची तारीख बरोबर सांगता यायला पाहिजे, पण तसे होत नाही. हा तिढा टाकल्यावर ज्योतिषी कबूल करतात की कुंडलीवरून मृत्यू अचूकपणे वर्तवता येत नाही, पण मृत्यूची शक्यता मात्र वर्तवता येते! 'शक्यता` या शब्दाच्या प्रांतात एकदा शिरल्यावर मूळ प्रश्नाला अनेक फाटे फुटतात, आणि त्यात उत्तर हरवून जाते. सांगायचा मुद्दा हा की, मृत्यूची अचूक भाकिते कुंडलीवरून वर्तवल्याच्या कथा कर्णोपकर्णी फैलावत जातात, पण त्यांची शहानिशा करणे दुरापास्त असते. लोकांना मात्र वाटत रहाते की ज्योतिष किती महान शास्त्र आहे! थोडक्यात संभवनियतेनुसार खरी ठरलेली भाकिते आणि जातकाला मिळालेले मानसिक समाधान वा आधार यालाच तो 'अनुभव` म्हणतो.
( उधृत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद)
अभ्यासु असल्याने जास्त सांगता
अभ्यासु असल्याने जास्त सांगता येत नाही, पण दशमात शनी मंगळ युती कर्केतः- अपघात दर्शवते. दशमातल्या शनीने त्यांना लोकसंग्रह मिळवुन दिला, लोकांसाठी ते झटले. शनी दशमाचा म्हणजेच कर्माचा मालक, नेमका दशमातच त्यामुळे अतीशय कष्ट केले.
अष्टमात हर्षल, तडकाफडकी मृत्यु. हर्षल अचानक घटना घडवतो असे सहा महिन्यापूर्वीच एका ज्योतिष्यविषयक अंकात वाचले होते, त्याचा प्रत्यय आता हे वाचल्यावर आला. यावरुन कुणी आपली पत्रिका पाहुन तिथे हर्षल असल्यास असे वरच अनुमान आपल्या संबंधी बांधु नये. दिर्घायुष्याकरता बाकी शुभ ग्रह पण कारणीभूत असतात.
मृत्युबद्दल कुठलाही ज्योतिष्यी कधीच कुणाला सांगत नाही, अगदी कळले तरी. कारण जो नंतर मरायचा तो आधीच मनाने अर्धमेला होईल. कशाला आगीत हात घालायचा?
या कुंडलीत ग्रहांच्या
या कुंडलीत ग्रहांच्या नावजवळील वर-खाली दिशा दाखवणारे बाण, आडवे बाण, ग्रहाच्या नावाजवळील(-) चिन्ह ह्या चिन्हांचा अर्थ काय?
चंद्र रास कन्या असल्याने
चंद्र रास कन्या असल्याने राशीकडून अष्टमेष मंगळ आहे.
त्यामुळे शनि - मंगळ युती इथे प्रभावी होत आहे. तसेच
अष्टमेष मंगळ कर्केत आहे.
गमभन बाण जेव्हा खालची दिशा
गमभन बाण जेव्हा खालची दिशा दाखवतो, तेव्हा तो निचीचा ग्रह असतो. म्हणजे उदाहरणार्थ पत्रिकेत लग्नस्थानी, म्हणजे प्रथम स्थानी जो ७ आकडा आहे ( ती तुळ रास आहे, तुळेचा नं ७ आहे, मोजुन बघा) त्यात रवी ग्रह निचीचा आहे, म्हणजे रवीचे जे गुण आहेत, किंवा जे लाभ आहेत, ते मिळाले नाहीत/ मिळणार नाही. ( रवी म्हणजे सरकार, सत्ता, त्यामुळे ज्या विधेयकाकरता जंग जंग पछाडले ते मृत्युनंतर मंजूर झाले). १२ व्या स्थानी म्हणजे जिथे ६ आकडा आहे ( त्यांची चंद्र रास कन्या होती, चंद्र ज्या राशीत असतो ती आपली रास असते.) त्या कन्येत शुक्र पण निचीचा होतो. त्यामुळे विवाह झाला तरी समाजकार्याकरता बाहेरच राहीले. कर्केत म्हणजे ४ आकड्यात मंगळ निचीचा. मंगळाबरोबर शनी युतीत आला की मंगळाची तडफ तो घालवुन टाकतो. शनी हा वृत्तीने थंड ग्रह आहे. आणी कर्क ही सौम्य रास मंगळाला मारक ठरते, म्हणजे मंगळाच्या लष्करी वृत्तीला मारक ठरते.
म दा आणी व दा भटांची पुस्तके अभ्यासा.
मग यांचा राहू आणि केतू हे
मग यांचा राहू आणि केतू हे दोन्ही उच्च आहेत की? इंदिरा गांधींचा राहू देखील उच्चच होता. उच्च राहू चलाखी दाखवतो ना?
डॉ. कबड्डीपटू देखील होते. कोणता ग्रहयोग क्रीडानैपुण्य दाखवतो?
मंगळ हा खेळाचा तसा कारक आहे,
मंगळ हा खेळाचा तसा कारक आहे, त्याचे ते गुण शनीमुळे आणी कर्क राशीमुळे कमी झाले. पण राहु उच्चीचा असल्याने कला, मोकळा स्वभाव वगैरे पण गुण होते.
मला पांढरा चौकोन दिसतो आहे.
मला पांढरा चौकोन दिसतो आहे. पांढर्या चौकोनाचा निषेध.
>>मला पांढरा चौकोन दिसतो आहे.
>>मला पांढरा चौकोन दिसतो आहे. अरेरे पांढर्या चौकोनाचा निषेध.<<
झेपल नाही काही!
अहो त्यांना ती पत्रिका दिसत
अहो त्यांना ती पत्रिका दिसत नाहीये, म्हणजे ती पत्रिकेची फोटोकॉपी दिसत नाहीये.
ओके कदाचित पिकासावेब
ओके कदाचित पिकासावेब त्यांच्याकडे बॅन असेल. पण या निमित्ताने ज्योतिष विज्ञान मंडळातला एक जुना किस्सा सांगतो. एका ज्येष्ठ ज्योतिषप्रेमी व्यक्तीने एक कुंडली आणली. स्पष्टग्रह, भावचलित या सूक्ष्म बाबींसह ती फळयावर मांडली. 'या व्यक्तीला मी ओळखतो, तसेच कुंडलीच्या खरेपणाबाबत शंका नको.` असे सांगितले. या जातकाचा सामाजिक, आर्थिक, बोैद्धिक दर्जा काय असेल? असा प्रश्न विचारला. प्रत्येकाने विश्लेषण करून हा आलेपाकवाला असेल, शिपाई असेल, कारकून असेल अशा प्रकारचे काहीतरी सांगितले. कारण कुंडलीत कुठलाही ग्रह स्वगृही, उच्चीचा नव्हता. नवपंचम योग नव्हता. अतिसामान्य अशी कुंडली होती. पण वस्तुस्थिती म्हणजे ती व्यक्ती रिटायर्ड उच्चपदस्थ, सामाजिक कार्यात पुढाकार घेणारी, दोन्ही मुले अमेरिकेत सुस्थितीत. बंगला, गाडी, नोकरचाकर, मानसन्मान लाभलेली अशी होती. मग आता वस्तुस्थितीचा अन्वयार्थ ग्रहयोगाशी लावण्याचे प्रकार सुरू झाले. भाकीत तर सोडाच. पण साधा वर्तमान काळ सुद्धा जर सांगता येत नाही तर जातकाचे भविष्य काय डोंबलं सांगणार? जन्मकुंडली ही जन्माच्या वेळच्या ग्रहस्थितीवर जर आधारित असेल तर 'वर्तमान काळ` हे त्यावेळच्या संदर्भाने भविष्यच असतं. त्याच तर्काने भूतकाळ हा सुद्धा तपासता येईल असा ताळा ठरतो.
कुंडली बनवताना जन्मवेळ चुकीची
कुंडली बनवताना जन्मवेळ चुकीची दिली असण्याची पण शक्यता असू शकते. वरच्या उदाहरणात असे घडु शकते.
घाटपांडेसाहेब तुमच्याशी एकदम
घाटपांडेसाहेब तुमच्याशी एकदम सहमत. गंमत म्हणजे साधारण वर्षापूर्वी चुकत माकत हा अभ्यास (ज्योतिष्य) शिकायला सुरुवात केली. अनेक किस्से तर खरे घडले आहेत, काही घटना विश्वास बसणार नाहीत अशा पद्धतीने खर्या झाल्यात. त्यामुळे भविष्य खोटे आहे असेही मी म्हणू शकत नाही. याचा अनूभव स्वतःला यावाच लागतो.
मध्यंतरी माझा मामेभावाची नोकरी गेली, हा विश्वास नसतांनाही आणी इच्छा नसतांनाही ४ ज्योतिष्यांकडे जाऊन आला. तीन जणांनी अर्धवट माहिती दिली, चौथ्याने मात्र तारखेसकट सर्व सांगीतले. ( म्हणजे नोकरी कधी लागेल ते) अगदी नेमके त्याच तारखेच्या दुसर्या दिवशी त्याला ज्या कंपनीत ४ महिने आधी मुलाखत दिली होती तिथे कॉल आला. तो नोकरीत आता स्थिर आहे, पण आताची जागतीक अवस्था काय असेल देव जाणे
नशिबाने मी पूर्ण आहारी नाही गेले. पण हे सुद्धा पत्रिकेचा सखोल अभ्यास जो करतो त्यालाच जमते. कुडमुड्यांना जमणार नाही. निष्णात माणसे सुद्धा अती गोंधळ करतात हे पण खरे. पण माणसाचे धाडस, आत्मविश्वास आणी जिद्द बळकट असेल तर देव सुद्धा मदत करतो, मग ज्योतिष्य कशाला हवे?
या ज्योतिष विज्ञान मंडळातील
या ज्योतिष विज्ञान मंडळातील किश्श्याने माझी ज्योतिषाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मोठा फरक पडला. मिना यांनी जन्मवेळ चुकीची असू शकेल अशी शंका व्यक्त केली आहे. मी माझ्या पुस्तकात त्याचा अंतर्भाव केला आहे.
जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?
समजा आम्ही उलट असा प्रश्न विचारला की, जन्मवेळ बरोबर असेल तर भविष्य बरोबर येईल याची खात्री ज्योतिषी देईल का ? काय उत्तर मिळेल ? मुळात, खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. एक गोष्ट खरी की जन्मवेळ ही मिनिटांच्या हिशोबात अचूक सांगणे जवळजवळ अशक्य आहे. अचूक जन्मवेळेवर कुंडलीचा अचूकपणा अवलंबून असतो. अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो. त्यामुळे भाकीत खरे ठरले नाही तर जन्मवेळ चुकीची असेल हे निमित्त लगेच पुढे केले जाते व ते पटण्यासारखेही असते. आपण जेव्हा किती वाजले हा प्रश्न विचारतो तेव्हा "३ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद " असे काटेकोर उत्तर अपेक्षित नसते, तर "चार वाजले " असे उत्तर पुरेसे असते. डिजीटल घडयाळात ३.५९ नंतर ४.०० हा आकडा येतो. तिनाच्या ऐवजी चाराचा आकडा तिथे दिसू लागतो. प्रत्यक्षात एक मिनिटच उलटलेलं असतं पण तासाचा आकडा एकाने वाढतो. हे जसे घड्याळाच्या बाबतीत होते तसेच कुंडलीतही एखादे वेळी होते. अशा "बॉर्डर "वरची जन्मवेळ असेल तर ५-१० मिनिटांच्या अंतराने प्रथमस्थानातील राशीचा आकडा बदलू शकतो. पण ज्योतिषी लोक मात्र असा समज करून देतात की तेवढ्या थोडयाशा फरकामुळे कुंडलीत काहीतरी मोठी उलथापालथ होते. सामान्यत: भविष्यकथनासाठी ज्योतिषीलोक ठोकळा कुंडली वापरतात. दहा-पंधरा मिनिटांच्या फरकामुळे कुंडलीतला जो घटक बदलणार असतो तो घटक या ठोकळा कुंडलीत टिपलेला नसतोच. आणि जरी सूक्ष्म कुंडली वापरली तरी सर्वसाधारण भविष्यकथनासाठी ज्योतिषी तो घटक विचारात घेत नाहीतच. एकंदरीत काय तर जन्मवेळेच्या अचूकपणावर भविष्य फारसे अवलंबून नसते.
नाही घाटपांडेसाहेब. अहो एक
नाही घाटपांडेसाहेब. अहो एक मिनिटाचा जरी फरक पडला तरी लग्न बदलु शकत नाही का? म्हणजे समजा दुपारी ३ वाजुन ५६ मिनिटांपर्यंत तुळ लग्न असेल आणी मग वृश्चिक लागत असेल तर जन्मवेळ चुकुन दुपारी ३ वाजुन ५६ च्या ऐवजी ५५ केली तर तुळ लागेल. आणी रास जरी चुकली नाही तरी पत्रिका चुकेल की. जर वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेत मंगळ नसेल पण तुळ लग्न चुकुन त्या पत्रिकेत आले तर मंगळ आधी आला तर मंगळाची पत्रिका समजली जाऊ शकते.
अहो एका व्यक्तीने माझी जन्मवेळ पी एम च्या ऐवजी ए एम करुन पूर्ण पत्रिका उलटी छापली होती.:फिदी:
धन्यवाद जन्मवेळे विषयी माहिती
धन्यवाद जन्मवेळे विषयी माहिती दिल्याबद्द्ल.
Pages