दिसामाजि काहीतरी व्यायाम तो करावा! असं कुणीसं म्हणून ठवलं आहे! या कुणा थोर व्यक्तीच्या उक्तीनुसार आमच्या गावातल्या नवीन नवीन जागा शोधून तिथे चालायला जात असतो.
अर्थातच अरणगावपर्यंत वाहनाने जातो. वाहन मेन रोडला खाली लावतो व वर जातो.
नगरपासून साधारणपणे ७/८ कि.मी.वर दौंड रस्त्यावर अरणगाव आहे. तिथे एक रेल्वेलाइन क्रॉस करून एक चढ चढून वर गेले की अवतार मेहेरबाबांची समाधी आहे.
हा मेहेरबाबा समाधीकडे जाण्याचा रस्ता. थोडा चढ असल्याने मजा येते. आजूबाजूला छान हिरवाई आहे. आणि शांतता!
एक दहा मिनिटे चालून गेल्यावर आपण समाधीच्या परिसरात पोचतो. तिथली ही जुनी ट्रस्ट ऑफिसची बिल्डींग.
याच्याच डाव्या बाजूला हे ओपन ऑडिटोरियम आहे. याची रचना अशी आहे की कितीही लांबच्या प्रेक्षकाला स्टेजवरच्या कलाकाराचे पायही दिसतील.
३१ जानेवारीला दर वर्षी याच स्टेजवर जगभरातले "बाबा लव्हर्स" इथे आपापली कला सादर करतात. नाच ,गाणी, स्किट्स, जादूचे प्रयोग असे विविध प्रकारचे कार्यक्रम इथे चालतात.
थोडं पुढे गेलं की मेहेरबाबांची समाधी. पांढरा कळस असलेली. स्वच्छ परिसर आणि पिनड्रॉप सायलेन्स. त्यामुळे समाधीचं दर्शन घेताना तुम्ही आस्तिक असा की नास्तिक..........काही तरी मनाला भिडणारं, जाणवतं आणि छान वाटतं!
मेहेरबाबांची समाधीचा मागील बाजूने फोटो.
समाधीच्या मागील बाजूस बाबांच्या काही भक्तांच्या समाध्या आहेत.
समाधीच्या परिसरात भक्तांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची छान व्यवस्था आहे.
दर्शन घेऊन समाधीच्या मागील रस्त्याने आता एक उतरण लागते. सगळीकडे स्वच्छता, टापटीप आणि उत्तम मॅनेजमेन्ट हे इथलं वैशिष्ठ्य! मागील रस्त्याला अशी ओळीत झाडं आहेत. (चिंच?)
या रस्त्यात ठिकठिकाणी असे दिवे आहेत. मुख्य म्हण़जे हे दिवे कुणीही अजून तरी तोडले/चोरलेले नाहीत.
सगळीकडे लोकल मटीरियल वापरून त्यातल्या त्यात थोडी व्यवस्था आणि कलात्मकता(फरशीवरचं डिझाइन) आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सगळीकडे रस्त्याकडेला असे पांढरे दगड लावून पायवाट निश्चित केली आहे.
माफक चढ उतारासह १५/२० मिनिटं चालल्यावर आपल्याला मेहेर रिट्रीटचा परिसर दिसायला लागतो.
ही मेहेर रिट्रीटची मुख्य बिल्डिंग. संकन पॉइंटिंगमधलं ब्रिकवर्क करून इथलं बांधकाम केलं आहे.
आता खालील हे सर्व फोटो रिट्रीटच्या परिसरातले आहेत. किती सुब़क बांधकाम आहे!
आता मेहेर रिट्रीटच्या आतले फोटो आहेत. टेड जेडसन नावाच्या अमेरिकन आर्किटेक्टची ही कलाकारी!इथे रहायला येणार्या भक्तांसाठी सबसिडाइज्ड रेटमधे उत्तम ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असते.
आम्ही कधी कधी जाळलेले उष्मांक परत मिळवण्यासाठी इथे ब्रेकफास्ट करतो.(फक्त रवीवारीच!). शुद्ध मराठीत.................बर्न केलेल्या कॅलरीज अर्न करतो!
रिट्रीटची इमारत बाहेरून
दर्शनी भागातला पोर्च/व्हरांडा
हा तिथे नेहेमी आमचं स्वागत करतो.
समोरून दिसणारी रिट्रीटचा दर्शनी भाग.
मी म्हटलं नव्हतं............लोकल मटीरियल वापरून कमी खर्चात बांधकाम करण्याचा प्रयत्न!
खूप मोठं सुंदर बेसिन
डायनिंग हॉलकडे जाण्याचा दरवाजा
डायनिंग हॉल.........
आम्ही मात्र हॉलमधे न बसता इथे बसतो. :स्मितः
ही ग्राफिटी वॉल. या टाइल्स वेगवेगळ्या भक्त लोकांना रंगवायला दिल्या होत्या. नंतर त्या प्रोसेस करून इथे भिंतीवर लावल्या.
असे हे अरणगावचे मेहेर रिट्रीट आणि परिसर!
छान जाग आहे. एवढी निवांत कशी
छान जाग आहे. एवढी निवांत कशी ?
फोटो दिसत नाहित.
फोटो दिसत नाहित.
एकदम छान जागा आहे ही. अनेक
एकदम छान जागा आहे ही.
अनेक प्रचि तर "अँगल" फोटोग्राफीच्या स्पर्धेत टाकण्यासारखे आहेत.
फोटु दिसना झालेत
फोटु दिसना झालेत
वा!!!
वा!!!
दिनेशदा....जागा एवढी
दिनेशदा....जागा एवढी निवांत>>>>>>>>>>>हे फोटो रविवारी सकाळी पावणेसात वाजता घेतलेले आहेत.
(माझ्या सांगलीच्या फोटोंवरही आपल्या पौतैंनी हेच विचारलं होतं. पण तेव्हाही सकाळी लवकरच फोटो घेतले होते.)
आणि तसंही नगरपासून ७/८ किमि दूर असल्याने शांतताच असते.
ब्रेकफास्ट टाइम ८ ते ९. तेवढा वेळ हा भाग जरा गजबजलेला नंतर सगळे डायनिंग एरिया रिकामा होतो.
समाधीस्थळावर तर कमालीची शांतता बाळगली जाते. कितीही जनता असेल तरी!
संध्या. आरती असते आणि समाधीवर जगातल्या विविध भाषेतली विविध वाद्यांच्या साथीवरची भजनं/गाणी म्हटली जातात. कारण भक्त विविध देशातून येतात.
मस्त आहे परिसर आणि फोटोग्राफी
मस्त आहे परिसर आणि फोटोग्राफी देखिल!
अतिशय सुंदर परिसर. स्वच्छता
अतिशय सुंदर परिसर. स्वच्छता चांगली ठेवतात आणि परिसरातील शांतता देखील भिडते प्रचिंमधून.
सुंदर. जायलाच हव एक्दा.
सुंदर. जायलाच हव एक्दा. रिट्रीट पर्यंत गाडी जाते का?
मस्तच आहेत फोटो , आणि खुप
मस्तच आहेत फोटो , आणि खुप निवान्त जागा आहे हि.
व्वॉव! कस्ली कमालीची निवांत
व्वॉव! कस्ली कमालीची निवांत जागा आहे.
बघायलाच हवी.
सर्वांना धन्यवाद! वरपर्यंत
सर्वांना धन्यवाद! वरपर्यंत गाडी जाते.
आणि फोटोग्राफी(!!) सेलफोनातल्या कॅमेर्यातून.
माझा कॅमेरा बर्याच दिवसांपासून दुरुस्तीला! मी मिस करतीये माझा कॅमेरा.
खुप सुंदर परिसर आणि फोटो.
खुप सुंदर परिसर आणि फोटो. श्रीरामपूरला असताना जायला पाहीजे होते ईथे, तिथे असतांना माहिती नव्हती ही जागा.
वा, फारच निसर्गरम्य, शांत आणि
वा, फारच निसर्गरम्य, शांत आणि स्वच्छ परिसर दिसतोय ... , सर्व फोटोही सुंदरच ....
रच्याकने, इथे कोणालाही जाता येते का फक्त मेहेर-भाविकांसाठीच आहे हे ?
इथे कोणालाही जाता येते का
इथे कोणालाही जाता येते का फक्त मेहेर-भाविकांसाठीच आहे हे ?
कोणीही जाऊ शकत.
पुण्यावरुन येताना नगरमधे जायच्या आधीच रेल्वे ब्रीज नंतर उजवीकडे जाणारा रोड दौंड रोड आहे.
मानुषी ताई तुमच्यासाठी ७/८ किमी, पण आमच्यासाठी १५-२० किमीतरी नक्कीच
छान आहे की. गेटवर पितळी
छान आहे की.
गेटवर पितळी ताम्ब्या लावलाय का?
आयडीया मस्त आहे.
मस्त फोटो. एकदम शांत, स्वच्छ
मस्त फोटो. एकदम शांत, स्वच्छ दिसतंय. हिलस्टेशन असावं असं वाटलं.
खुप वर्ष झाली इथे जाऊन. आता
खुप वर्ष झाली इथे जाऊन. आता जायला पाहिजे परत. छान आलेत फोटो!
छान!
छान!
सुरेख फोटो. गर्दी नाही, कचरा
सुरेख फोटो.
गर्दी नाही, कचरा नाही, मोडतोड झालेलं काही नाही, - फार छान वाटलं बघायला !
छान आलेत फोटो. गेलं पाहिजे
छान आलेत फोटो. गेलं पाहिजे एकदा.
नगर जिल्ह्यात अशा लहान-मोठ्या खूप जागा आहेत. गेल्या भारत वारीत मी अशी बरीच देवस्थानं बघितली. आधी कधी माहिती सुद्धा नव्हती. अशा एका ट्रिपमध्ये काळविटांची देखणी जोडी पण दिसली
गर्दी नाही, कचरा नाही, मोडतोड
गर्दी नाही, कचरा नाही, मोडतोड झालेलं काही नाही, - फार छान वाटलं बघायला !>>> +१११
सुंदर फोटो..
व्वा मस्त फोटो.
व्वा मस्त फोटो.
वॉव.. मस्त फोटोज .. सुंदर आहे
वॉव.. मस्त फोटोज .. सुंदर आहे जागा
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
मस्त जागा आणि सुरेख
मस्त जागा आणि सुरेख फोटो.
मानुषीताई कधी येऊ? (मी दौंडचाच)
स्वच्छ आणि रम्य
स्वच्छ आणि रम्य परिसर....
परिसरातील शांतता देखील भिडते प्रचिंमधून>>>>>> अगदी अगदी!
बाय द वे, मोबाईल मधून काधलेले असले तरीही फोटो फारच सुरेख आलेत. अगदी डिजी कॅम मधून काढल्यासारखे!
मस्त परिसर मस्त प्रचि
मस्त परिसर मस्त प्रचि
छान!
छान!
अतिशय सुंदर फोटो आणि
अतिशय सुंदर फोटो आणि परिसर!
दरवेळी या ठिकाणी गेलो की मनाला भावते इथली शांतता आणि स्वच्छता. बाबांनी म्हंटलंही आहेच की 'Things that are Real are Given and Received in Silence'.
समाधीजवळच्या शांततेत ईश्वराशी थेट संवाद साधायला मदत होते आणि आपल्याला हलकं हलकं आणि प्रसन्न वाटायला लागत (हा स्वानुभव आहे, प्रत्येकाला असे वाटेलच असे नाही).
Pages