मेहेर रिट्रीट, अरणगाव(अहमदनगर)

Submitted by मानुषी on 27 September, 2013 - 02:31

दिसामाजि काहीतरी व्यायाम तो करावा! असं कुणीसं म्हणून ठवलं आहे! या कुणा थोर व्यक्तीच्या उक्तीनुसार आमच्या गावातल्या नवीन नवीन जागा शोधून तिथे चालायला जात असतो.
अर्थातच अरणगावपर्यंत वाहनाने जातो. वाहन मेन रोडला खाली लावतो व वर जातो.
नगरपासून साधारणपणे ७/८ कि.मी.वर दौंड रस्त्यावर अरणगाव आहे. तिथे एक रेल्वेलाइन क्रॉस करून एक चढ चढून वर गेले की अवतार मेहेरबाबांची समाधी आहे.

हा मेहेरबाबा समाधीकडे जाण्याचा रस्ता. थोडा चढ असल्याने मजा येते. आजूबाजूला छान हिरवाई आहे. आणि शांतता!

एक दहा मिनिटे चालून गेल्यावर आपण समाधीच्या परिसरात पोचतो. तिथली ही जुनी ट्रस्ट ऑफिसची बिल्डींग.

याच्याच डाव्या बाजूला हे ओपन ऑडिटोरियम आहे. याची रचना अशी आहे की कितीही लांबच्या प्रेक्षकाला स्टेजवरच्या कलाकाराचे पायही दिसतील.
३१ जानेवारीला दर वर्षी याच स्टेजवर जगभरातले "बाबा लव्हर्स" इथे आपापली कला सादर करतात. नाच ,गाणी, स्किट्स, जादूचे प्रयोग असे विविध प्रकारचे कार्यक्रम इथे चालतात.

थोडं पुढे गेलं की मेहेरबाबांची समाधी. पांढरा कळस असलेली. स्वच्छ परिसर आणि पिनड्रॉप सायलेन्स. त्यामुळे समाधीचं दर्शन घेताना तुम्ही आस्तिक असा की नास्तिक..........काही तरी मनाला भिडणारं, जाणवतं आणि छान वाटतं!

मेहेरबाबांची समाधीचा मागील बाजूने फोटो.

समाधीच्या मागील बाजूस बाबांच्या काही भक्तांच्या समाध्या आहेत.

समाधीच्या परिसरात भक्तांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची छान व्यवस्था आहे.

दर्शन घेऊन समाधीच्या मागील रस्त्याने आता एक उतरण लागते. सगळीकडे स्वच्छता, टापटीप आणि उत्तम मॅनेजमेन्ट हे इथलं वैशिष्ठ्य! मागील रस्त्याला अशी ओळीत झाडं आहेत. (चिंच?)

या रस्त्यात ठिकठिकाणी असे दिवे आहेत. मुख्य म्हण़जे हे दिवे कुणीही अजून तरी तोडले/चोरलेले नाहीत.

सगळीकडे लोकल मटीरियल वापरून त्यातल्या त्यात थोडी व्यवस्था आणि कलात्मकता(फरशीवरचं डिझाइन) आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सगळीकडे रस्त्याकडेला असे पांढरे दगड लावून पायवाट निश्चित केली आहे.
माफक चढ उतारासह १५/२० मिनिटं चालल्यावर आपल्याला मेहेर रिट्रीटचा परिसर दिसायला लागतो.

ही मेहेर रिट्रीटची मुख्य बिल्डिंग. संकन पॉइंटिंगमधलं ब्रिकवर्क करून इथलं बांधकाम केलं आहे.

आता खालील हे सर्व फोटो रिट्रीटच्या परिसरातले आहेत. किती सुब़क बांधकाम आहे!


आता मेहेर रिट्रीटच्या आतले फोटो आहेत. टेड जेडसन नावाच्या अमेरिकन आर्किटेक्टची ही कलाकारी!इथे रहायला येणार्‍या भक्तांसाठी सबसिडाइज्ड रेटमधे उत्तम ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असते.
आम्ही कधी कधी जाळलेले उष्मांक परत मिळवण्यासाठी इथे ब्रेकफास्ट करतो.(फक्त रवीवारीच!). शुद्ध मराठीत.................बर्न केलेल्या कॅलरीज अर्न करतो!


रिट्रीटची इमारत बाहेरून

दर्शनी भागातला पोर्च/व्हरांडा


हा तिथे नेहेमी आमचं स्वागत करतो.

समोरून दिसणारी रिट्रीटचा दर्शनी भाग.

मी म्हटलं नव्हतं............लोकल मटीरियल वापरून कमी खर्चात बांधकाम करण्याचा प्रयत्न!

खूप मोठं सुंदर बेसिन

डायनिंग हॉलकडे जाण्याचा दरवाजा

डायनिंग हॉल.........

आम्ही मात्र हॉलमधे न बसता इथे बसतो. :स्मितः

ही ग्राफिटी वॉल. या टाइल्स वेगवेगळ्या भक्त लोकांना रंगवायला दिल्या होत्या. नंतर त्या प्रोसेस करून इथे भिंतीवर लावल्या.




असे हे अरणगावचे मेहेर रिट्रीट आणि परिसर!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद!
ओह्........गुर्जी तुमी दौंडचं का? :स्मितः असो...........जिप्सीभौ कधीही या यू आर वेलकमच!
म्हणजे याच ठिकाणाचे वेगळेच अप्रतीम फोटो माबोकरांना पहायला मिळतील!

आहाहा!!! शांत, स्वच्छ परिसर!!!

त्यातून लँप्स पण इन्टॅक्ट्???भरून आलं!!!!!!!!!!! Happy

समाधीजवळच्या शांततेत ईश्वराशी थेट संवाद साधायला मदत होते आणि आपल्याला हलकं हलकं आणि प्रसन्न वाटायला लागत >>>>>>>>>>> अनामिक.......म्हणूनच मी म्हटलं की आस्तिक असा वा नास्तिक या परिसरात काही तरी जाणवतं....मग कदाचित तो ब्लिस् ऑफ सॉलिट्यूड असेल.
जर सांगितले नसते तर भारतातले वाटलेही नसते.>>>>>>>>>>>>>> हो पाषाणभेद+१००
१) अमेरिकन आर्किटेक्ट २) स्वच्छता आणि शांतता.
ही दोन कारणं.
त्यातून लँप्स पण इन्टॅक्ट्???भरून आलं!!!!!!!!!!! >>>>>> खरंच!
लाजो .......ये ना कधीही! हाय का औंदा देशवारी?
आता आज काढलेले आणखी फोटो इथे डकवण्याचा मोह होतोय!
तुम्हा सर्वांना आवडले ...........धन्यवाद!

Pages