Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:42
चपला, बूट, पादत्राणे, Shoes, Sandals, Chappal यांच्या नवीन फॅशनबद्दलचं हितगुज
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चपला, बूट लिहून परत पादत्राणे
चपला, बूट लिहून परत पादत्राणे हा आणखी एक शब्द कशाला?
कि तो(पादत्राणे) एक वेगळा प्रकार आहे? हा मराठी शब्द तसा एकायला व बोलायला विचित्रच वाटतो.
मला इतरही पादत्राणे अपेक्षीत
मला इतरही पादत्राणे अपेक्षीत होती. उदा, मोजड्या, सँडल्स, पंप्स, चुक्का, क्रेपीज, गेता, जिप्सीन, वराची, खडावा, पादुका
असे आहे होय.. वहाणा, सपाता
असे आहे होय..
वहाणा, सपाता राहिल्या तुमच्या लिस्टीत. हाही एक पादत्राणाचा प्रकार आहे.
कोणाला चांगल्या पादुका कुठे
कोणाला चांगल्या पादुका कुठे मिळतात ते माहीती आहे का?
(चला मी सुरुवात करते बीबी चालू ठेवायला.)
फॅशन मधे बसत नाही हा प्रश्न
फॅशन मधे बसत नाही हा प्रश्न पण तरीही इथेच विचारते. पुण्यात चपला तयार करून मिळतात का ? पायाला भोवर्या असणार्या एकांना अशा हव्या आहेत.
कोणाला चांगल्या पादुका कुठे
कोणाला चांगल्या पादुका कुठे मिळतात ते माहीती आहे का? >>>>>>>>> चांगल्या ( टिकाउ ) कदाचित नसतीलही पण बांद्रा लिंकिन्ग ला जबराट स्टायलिश चपला असतात......मोजड्या, सँडल्स, पंप्स, चुक्का, क्रेपीज, गेता, जिप्सीन, वराची, खडावा, पादुका हे सर्व प्रकार मिळतील तिथे आणि रिझनेबल
>> चुक्का, क्रेपीज, गेता,
>> चुक्का, क्रेपीज, गेता, जिप्सीन, वराची,
हे प्रकार काय आहेत कुणी सांगू शकेल का? वेब मास्तर हा अॅडमिनचा प्रकार आहे का? म्हणजे ते आता धागा उघडून गेले असतिल. नाहीतर त्यांनीच सांगितले असते.
वेब मास्तर हा अॅडमिनचा
वेब मास्तर हा अॅडमिनचा प्रकार आहे का? <<
नव्हे. ते अॅडमिनच्याही डोक्यावर आहेत.
'खादिम'च्या फूटवेअरचा आम्हाला
'खादिम'च्या फूटवेअरचा आम्हाला फारसा चांगला अनुभव आला नाहिये.... खुप तकलादू वाटल्या
(No subject)
>>मोजड्या, सँडल्स, पंप्स,
>>मोजड्या, सँडल्स, पंप्स, चुक्का, क्रेपीज, गेता, जिप्सीन, वराची, खडावा, पादुका>> चुक्का, क्रेपीज्, गेता,जिप्सीन, वराची हे खेटरांचे प्रकार आहेत? गुगल करून बघायलाच हवं.
लिंकींगला मस्त व्हरायटी असते हे अगदी खरं आहे. यावेळी त्या बाजूला गेले असताना हातात वेळ असूनही आळस केला जायचा.
पंप्स, चुक्का, क्रेपीज,
पंप्स,
चुक्का,
क्रेपीज,
गेता,
जिप्सीन,
वराची,
गेता मला लक्षात आलं नंतर. पण
गेता मला लक्षात आलं नंतर. पण ते घालून चालणं आणि ते ही मुंबईतल्या रस्त्यांवर.. अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे लिकींगला ठेवूनही कोण घेत असेल काय माहित. पण वरच्या लिंक्सकरता धन्यवाद वेमा.
धन्यवाद वेमा वराचे आपल्या
धन्यवाद वेमा
वराचे आपल्या कोल्हापुरी चपलान्सारखे दिसत आहेत. आणि गेता खडावान्सारखे.
सायो मुम्बईत गेता.. खरच आणि त्यातून घातल्याच तर जवळपास फ़िरणार्यान्चं काही खरं नाही.
सायो मुम्बईत गेता.. खरच स्मित
सायो मुम्बईत गेता.. खरच स्मित आणि त्यातून घातल्याच तर जवळपास फ़िरणार्यान्चं काही खरं ना
गेता मला लक्षात आलं नंतर. पण ते घालून चालणं आणि ते ही मुंबईतल्या रस्त्यांवर.. अशक्य गोष्ट आहे.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. इतकिही अशक्य नाही हं.....मी आता राहते ठाण्यात आणि मला कमीत कमी २ इंच हील्स ची सवय आहे.....ते घालुन मीच नव्हे तर कित्येक मुली ट्रेन ट्रॅवल करतात......एकदा घालायला सुरुवात केली की आपोआप ते जमुन जाते.....एंजॉय करायचं.......:)
अनिश्का दोन इंच हिल्स
अनिश्का दोन इंच हिल्स घातल्यावर तू अजून उंच दिसत असशीलना, मुळात तुझी हाईट दृष्ट लागावी अशी आहे.
हो अन्जु....दिसते उंच.. पण
हो अन्जु....दिसते उंच.. पण नवर्यापेक्षा नाही म्हणुन चालतयं
अरारा हे गेता भयानक प्रक्रण
अरारा हे गेता भयानक प्रक्रण दिसतंय... मी तर फ्लॅट मध्ये फ्लॅट होते.. हे गेता बिता घालून हिंडले... तर चार पायावरच बहुदा
क्रेपीज मस्त!! पण पाय तसे मस्त मेंटेन्ड नाहीयेत...
तुम्हा सर्वांना व तुमच्या
तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्यपूर्ण, उत्साहाची, यशाची, भरभराटीची जावो ही सदिच्छा.
मला नविन चप्पल घातली की
मला नविन चप्पल घातली की पायाला फोड येतात. यावर कायमचा उपाय आहे का?
कितीही नरम चांगली घेतली तरी पायाला फोड येतोच त्यामुळे नविन चप्पलची भिती असते. पायाला फोड आल्यामुळे दुसरी जुनी चप्पल घातल्यावर त्रास होतोच. प्लिज उपाय सांगा?